Privacy Policy

Wednesday, June 29, 2011

बरं वाटलं तू आलीस ! आज भेटलीस !!



बरं वाटलं तू आलीस !
आज भेटलीस !!

रात्री माझ्या बागेत ,
रातराणी फ़ुलली होती
कारण नसताना, उगाचचं
ती बडबड करत बसली होती !
तेव्हाच यायला हवं होतं लक्षात,
आज तू भेटणार ,
इतके दिवस कुठे होतास म्हणून
भांड भांड भांडणार
भांडून भांडून दमल्यावर ,
माझाचं हात हातात धरून,
पुन्हा माझ्याचं खांद्यावर डोकं टेकणार !!!!

पुन्हा मुक्यानेच होइल संभाषण आपलं
पुन्हा पानं फ़ुलं एकतील
आणि मग पुन्हा तुझ्या गालावर
लाजेचे ताटवे फ़ुलतील !!

जाताना मात्र नको विचारूस
पुन्हा कधी भेटायचं
असचं , अवचित , कधीतरी
रातराणी सारखं फ़ुलायचं !!!!!!!


No comments:

Post a Comment