कल्हुआ: ही क़ॉफी फ्लेवर असलेली मेक्सीकन लिक्युर आहे. बेलीज आयरीश क्रीम: ही आयरीश व्हिस्की आणि क्रीम (साय) बेस्ड लिक्युर आहे. ह्या दोन्ही लिक्युर 'ऑन दि रॉक्स' सुद्धा घेउ शकता. फारच भारी चाव असते.
प्रकार: वोडका बेस्ड, क्लासिक कॉकटेल
साहित्य: वोडका - 1 औस कल्हुआ - 1 औस बेलीज आयरीश क्रीम - 0.5 औस बर्फ क़ॉफी बीन्स - 2-3 (सजावटी करीता) ग्लास - ओल्ड फॅशन
कृती: ग्लासमधे ¾ भरेल असे बर्फाचे खडे घ्या. त्यावर अनुक्रमे वोडका आणि कल्हुआ ओतुन घ्या. कॉकटेल स्पूनने व्यवस्थित स्टर करून घ्या. आता कॉकटेल स्पूनच्या एका टोकावरून बेलीज आयरीश क्रीम ओघळून ग्लासात आतल्या बाजूला अगदी चिकटून सोडा. बेलीज आयरीश क्रीमचे ढग वोडका आणि कल्हुआ च्या मिश्रणावर जमा व्हायला हवेत. (आयरीश क्रीम कल्हुआ पेक्षा हलके असल्यामुळॆ वर तरंगते). आता कॉफी बीन्स सजावटी साठी टाका. व्हाइट रशिअन तयार
टीप: ह्या कॉकटेल मधे बेलीज आयरीश क्रीम वगळले तर त्या कॉकटेलला ब्लॅक रशिअन कॉकटेल म्हणतात. तेही एक क्लासिक ह्या प्रकारात मोडणारे कॉकटेल आहे. पण मला बेलीज आयरीश क्रीम भयंकर आवडते त्यामुळे व्हाइट रशिअन माझे आवडते कॉकटेल आहे.
No comments:
Post a Comment