Privacy Policy

Thursday, August 18, 2011

देशासाठी प्रत्येकाने आठ दिवस तरी द्या : अण्णा



देशासाठी प्रत्येकाने आठ दिवस तरी द्या : अण्णा



आपण स्वतःसाठी नेहमीच जगतोआता देशासाठी किमान आठ दिवस तरी द्या... भ्रष्टाचाराविरुद्ध ' दुसरा स्वातंत्र्यालढा ' तीव्र करण्याचीवेळ आली आहेत्यामुळे अटक झाली तरी आंदोलन थांबवू नकापण काहीही झाले तरी अहिंसेचा मार्ग सोडू नका... असा संदेश अण्णाहजारे यांनी अटक होण्यापूर्वी दिला

आपल्याला अटक होईल याची शक्यता असल्याने अण्णांनी आपला संदेश रेकॉर्ड करून ठेवला होतात्यात कोणालाही अटक झाली तरीलढा थांबवू नका असा भावनिक संदेश दिला आहेफक्त हा लढा सुरू ठेवताना कायदा मोडू नकाहिंसात्मक प्रकार घडू देऊ नका...सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नकाअसे भावनिक आवाहन अण्णांनी केले आहे

माझ्या अटकेने आंदोलन थांबणार नाही , देशभरातील लोक मोठ्या प्रमाणावर रस्त्यावर येतील . माझ्यानंतर दुस-या फळीतील किरणबेदी , अरविंद केजरीवाल , मनिष शिसोदिया , प्रशांत भूषण ही मंडळी लढ्याचं नेतृत्व करतीलत्यांनाही अटक झाली तर पुढील फळीनेतृत्त्व स्वीकारतील

हा सत्याग्रह आहेसत्याग्रह म्हणजे आत्मक्लेशाने आपली व्यथा लोकांपुढे मांडणेत्यामुळे स्वतःला कितीही त्रास झाला तरी इतरांनात्रास होणार नाही याची काळजी घ्यासार्वजनिक संपत्ती आणि शिस्तीचा कोठेही भंग होऊ देऊ नकाअटक झाली तरी घाबरू नका.देशासाठी अटक होणे हे भागाचे लक्षण आहेहे विसरू नका असे अण्णांनी म्हटले आहे

ज्यांना शक्य आहे त्यांनी शाळा , कॉलेज , कार्यालय यामधून आठ दिवस सुट्टी घ्यावीआठ दिवस देशाकरता द्यावेतभ्रष्टाचारी नेत्यांचेखरे रुप लोकांसमोर आले आहेआता निकराच्या लढाईची वेळ आली आहेजनलोकपाल विधेयकाची ही लढाई मोठी आहेतीपरिवर्तनवादी लढाई आहेत्यामुळे जोपर्यंत परिवर्तन होत नाही , खरी लोकशाही येत नाही तोपर्यंत आम्ही अहिंसेच्या मार्गाने आम्हीआंदोलन करत राहूअसेही अण्णांनी स्पष्ट केले.

 



No comments:

Post a Comment