हिरवाई आणि कोसळणाऱ्या धबधब्यांमुळे लोणावळा-खंडाळ्याचा परिसर हिरवाईने नटलेला आहे. मुसळधार पावसामुळे पर्यटक मोठ्या प्रमाणात आकर्षित होत आहेत. डोंगर कपाऱ्यांमधून कोसळणारे धबधबे, दऱ्या व घाटात उतरलेले ढग आणि रस्त्यांवर पसरलेले धुके याचा पर्यटक मनमुराद आनंद घेत आहेत. हिरवाईने बहरलेल्या डोंगर-झाडीतून धावणारी रेल्वे पाहताच पर्यटक तो क्षण कॅमेऱ्यात बंदिस्त केल्याशिवाय रहात नाहीत. पावसाच्या जलधारांमध्ये चिंब होऊन पर्यटक त्याचा आनंद घेत आहेत. ही झलक टिपली आहे सकाळचे छायाचित्रकर अरुण गायकवाड यांनी.





No comments:
Post a Comment