PUPUTUPU
Privacy Policy
(Move to ...)
Privacy Policy
▼
Saturday, September 10, 2011
बॉम्बस्फोट
बॉम्बस्फोट
नमस्कार, गृहमंत्रालयाच्या बॉम्बस्फोटविषयक हेल्प लाइन वर आपले स्वागत आहे.
आताच ताज्या ताज्या झालेल्या स्फोटासंबधी माहिती साठी कृपया १ दाबा ...
स्फोटावर गृह मंत्री यांचे प्री रेकॉर्डेड गमतीदार विधान ऐकण्यासाठी कृपया २ दाबा
स्फोटावर प्रधानमंत्री यांनी केलेली कडक निंदा आणि त्यावर योजलेल्या कडक उपयोजना ऐकण्यासाठी कृपया ३ दाबा
स्फोटावर प्रधानमंत्री यांनी योजलेल्या अधिक? कडक उपयोजना ऐकण्यासाठी कृपया ४ दाबा
कोणी या स्फोटाची जबाबदारी घेतली कि नाही हे जाणून घेण्यासाठी कृपया 5 दाबा
स्फोटावर दिग्विजय सिंह यांनी RSS चा हात आहे असे केलेले वक्तव्य ऐकण्यासाठी कृपया ६ दाबा
चुकून कोणी आतंकवादी पकडला गेला असेल आणि कॉंग्रेस सरकार त्याला जावई बनवायला जात असेल तर त्याचे नाव जाणून घेण्यासाठी कृपया ७ दाबा
आंतकवादाला कुठला धर्म नसतो असे वक्तव्य ऐकण्यासाठी कृपया ८ दाबा
जर तुमचा कोणी या स्फोटामध्ये मरण पावला असेल तर राहुल गांधी यांची मुक्ताफळे ऐकण्यासाठी कृपया ९ दाबा
आता पुन्हा हे सर्व ऐकण्यासाठी कृपया 0 दाबा
जर तुम्ही या स्फोटामध्ये सापडले होता आणि तरी सुद्धा तुम्ही जिवंत असाल तर कृपया तुम्ही तुमचा गळा दाबा
फोन करण्यासाठी ध्यनवाद....केन्द्र सरकारची राहलेली वर्ष तुम्हाला सुरक्षित जाऊ दे आणि त्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा
हल्ल्यांचे लक्ष्य सामान्य माणूसच!
आज पुन्हा 'ब्रेकिंग न्यूज'...
आज पुन्हा नवा आकडा...
26/11 म्हणा...13/2 म्हणा ...
किंवा आता 7/9
स्फोट दूर तिकडे झाला... म्हणून
त्या यादीत "माझे' कुणी नाही... म्हणून
हायसे वाटत नाही आता मला...
आताशा माझा "आज'
"उद्या'ची छातीठोक खात्री देत नाही...
-ई-सकाळ
No comments:
Post a Comment
‹
›
Home
View web version
No comments:
Post a Comment