Privacy Policy

Sunday, December 18, 2011

" फेसबुक बंद पडलं तर करायच्या ११ गोष्टी "

" फेसबुक बंद पडलं तर करायच्या ११ गोष्टी "
१ आपला कम्प्युटर फेसबुकशिवायही चालतो हे लक्षात ठेवा.
... २ त्यामुळे एखादवेळेस फेसबुक बंद असेल तेव्हा स्वच्छता मोहीम राबवता येईल. अनावश्यक फाइल्स डिलीट केल्या की झाला कम्प्युटर स्वच्छ.
३ स्वच्छता मोहिमेचाच भाग म्हणून पीसी, कीबोर्डजवळची जळमटंही लगेच साफ करून टाका.
४ फेसबुक बंद असताना फेसबुकसाठीच करायचं एखादं काम म्हणजे कोट्स जमवा. म्हणजे बऱ्याच वेळाने जेव्हा लॉग इन व्हाल तेव्हा स्टाइलमध्ये कोट्स अपडेट करू शकाल.
५ पीसीवर इतर गेमही असतातच. सो, तिथेही कधीतरी फिरका ना.
६ अगदीच काही पर्याय नसेल तेव्हा कम्प्युटरवर पत्ते खेळा.
७ हल्ली फेसबुकिंगमुळे अन्य कामांना वेळ नसतो. त्यामुळे नखं रंगवणं, अॅक्सेसरीजचा बॉक्स साफ करणं किंवा नेटवरून इतर अॅक्सेसरीज डिझाइन घेता येईल.
८ आई-बाबांनी काही कामं सांगितली असतील तर करून टाका.
९ अगदी बरेच दिवसांपासून आई कम्प्युटर शिकव म्हणून मागे लागलेली असेल तर, लगेच तिच्या कम्प्युटर शिक्षणाचा श्रीगणेशा करा.
१० जुने मेल्स चेक करा. नको असलेले डिलीट करून टाका.
११). काहीच करण्यासारखे नसेल तर चक्क झोपा काढा....

No comments:

Post a Comment