Privacy Policy

Saturday, January 28, 2012

हे असे का? Why this so?

हे असे का? Why this so?

ह्या सर्वांसोबत नित्यच घडत असलेल्या गोष्टी आहेत. पण शांतपणे आठवल्यास त्यातही गंमत आहे.
• शहरात किंवा गावात प्रवेश केल्यावर एस.टी.. चे वेगाने धावणे पण हायवे वर मात्र संथ गतीने जाणे.
• पाहुणे घरि आल्यावर लिफ़्ट बंद असणे आणि मग पाहुण्यांचे विचरणे की बॅक-अप नाही तुमच्या बील्डींगला......?
• महत्वाची ईमेल पाठवताना फ़ाईल अटॅच करणे राहून जाणे आणि मग रिप्लाय मिळणे…….प्लीज रिसेंड द अटॅचमेन्ट .
• बॅंकेत गेल्यावर आपल्या जवळ पेन नाही हे लक्षात येणे.
• बॅंकेत आठवणीने नेलेला पेन इतरांनी मागुन घेणे व आपल्याला हवा असतांना त्यालाच पुन्हा मागावा लागणे ………वरुन उत्तर मिळ्णे की जरा थांबा ना ….….मी लिहीतोय ना हे!
• आपणास ज्या दिवशी रजा हवी अगदी त्याच दिवशी आधिच कुणितरि रजा मंजूर करवुन घेतली आहे असे कळणे व तो रजेवर असल्याने आपणास रजा न मिळणे.
• सोमवारि ऑफ़िसला गेल्यावार असे वाटणे की आज खूप थकवा आलाय आजच तर खरे तर सुटी हवी आहे.
• परिक्षेच्या वेळी प्रश्नपत्रिका मिळाल्यावर आपण सोडून दिलेल्या प्रकरणांवरच जास्त प्रश्न विचारले जाणे.
• लहानपणी लपुन पाणिपुरी खातांना ओळखिच्या काकांचे अचानक समोरुन येणे व आपले गर्भगळीत होणे.
• आता यापुढे ऑफ़िसला बसुन जास्त काम करणार नाही असे ठामपणे ठरवल्यावर दूसऱ्याच दिवशी नेहमी पेक्षा जास्त वेळ खूप काम करावे लागणे.
• ही माहिती काय? आत्ता दाखवतो…..असे म्हणून गुगल डॉट कॉम उघडण्यासाठी कॉम्पूटरवर बसल्यावर आयत्या वेळी इंटरनेट डीसेबल असणे.
• बस कंडक्टर व रिक्षावाले यांचे जवळ कधीही सुटे पैसे नसणे.
• दिवसभरात फ़क्त पाचच मिनीट जीमेल उघडल्यावर त्याच वेळी बॉस सहजच बाजुला येउन उभा रहाणे व त्यामुळे आपले हिरमुसणे. कारण असे की जी मंडळी दिवसभर नेटवरच असतात ती मात्र कधी अडकत नाहीत असे वाटत रहाणे.
• अर्जंटली ऑनलाईन मनी ट्रान्सफ़र करावयाचे वेळी ती सुविधा अंडर मेंटेनन्स असणे.
• रेनकोट वा छत्री आपल्या जवळ नसतांना मुसळधार पाऊस बरसणे व रेनकोट/छत्री बरोबर वागवत असतांना पावसाने मात्र दांडी मारणे!
• लग्नापूर्वी एकही मैत्रिंण नसणे व लग्न झाल्यावर अनेक मुली मैत्रिणी म्हणून मिळणे.
• उपवासाच्या दिवशी ऎन वेळी दिवे नसल्याने दाण्याचा कुट मिक्सर शिवाय बनवावा लागणे.
• जुन्या ठेवणीतला शर्ट घातल्यावर अनेकांनी असे म्हणणे की हा शर्ट तुला फ़ार छान दिसतोय, नवा की काय?

No comments:

Post a Comment