काही स्त्रियांच्या 'रक्तातच' घटस्फोट!
नाते टिकणे जनुकीय रचनेवर अवलंबून
लंडन, वृत्तसंस्था
लग्नासारखे नाते संपण्यात स्त्रीची जनुकीय रचनाही मोठी भूमिका बजावू शकते, असा दावा स्वीडनमधील संशोधकांनी केला आहे. काही स्त्रियांमध्ये चक्क घटस्फोटाला कारणीभूत ठरणारी गुणसूत्रे असतात, असे या संशोधकांनी म्हटले आहे.
' घटस्फोटाला कारणीभूत ठरणारी गुणसूत्रे असलेल्या स्त्रिया नवरा किंवा बॉयफ्रेण्डसोबत नाते निभावू शकत नाहीत. मूळात ही गुणसूत्रे असलेल्या स्त्रिया लग्नच करत नाहीत आणि लग्न केल्यास ते टिकू शकत नाही,' असा निष्कर्ष संशोधकांनी काढला आहे.
या गुणसूत्राचा संबंध स्त्रियांच्या शरीरातील 'कड्ल हामोर्न' अर्थात ऑक्सिटोसिनशी असतो. या हामोर्नमुळे स्त्रियांमध्ये प्रेम तसेच मातृत्व भावना निर्माण होते. बहुसंख्य स्त्रियांमध्ये ऑक्सिटोसिन नैसर्गिकरीत्या असते. मुलाला जन्म देताना आणि अंगावर दूध पाजताना ते अधिक प्रमाणात निर्माण होते. मात्र, या ऑक्सिटोसिनवर प्रक्रिया करणे स्त्रीच्या शरीराला जमले नाही, तर त्या कोणाशीच भावनिक नाते जोडू शकत नाहीत, असे संशोधकांनी म्हटले आहे.
............................
स्त्री-पुरुषांमधील भावनिक नात्यामध्ये ऑक्सिटोसिन महत्त्वाची भूमिका बजावते, याचे पुरावे आम्हाला अभ्यासात सापडले. या हामोर्नचे प्रमाण जास्त असलेल्या स्त्रिया जोडीदाराशी अधिक जोडलेल्या असतात.
- हासी वालूम, संशोधक गटाचे प्रमुख
No comments:
Post a Comment