Privacy Policy

Thursday, March 15, 2012

Jobs in Government of Maharashtra

Jobs in Government of Maharashtra

नगररचना व मूल्यनिर्धारण विभागात ५६ जागा
महाराष्ट्र शासनाच्या नगररचना मूल्यनिर्धारण विभागांतर्गत पुणे विभागातील पुणे/सातारा/सांगली/कोल्हापूर/सोलापूर जिल्ह्यातील कनिष्ठ लिपीक (२१), अनुरेखक (१२), वाहनचालक (०३) आणि शिपाई (२०) या रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांकडून विहित नमुन्यात अर्ज मागविण्यात येत आहेत. अर्ज पाठविण्याचा अंतिम दिनांक ११ एप्रिल २०१२ आहे.

परिवहन आयुक्त कार्यालयात वाहन चालकांच्या १८ जागा
महाराष्ट्र शासनाच्या परिवहन आयुक्त कार्यालय यांच्या अधिनस्त असलेल्या प्रादेशिक परिवहन विभागात वाहन चालक (१८ जागा) भरण्यात येणार आहेत. अर्ज स्विकारण्याची अंतिम तारीख २५ मार्च २०१२ आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सकाळमध्ये १० मार्च २०१२ रोजी प्रसिद्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात १४२ जागा
बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्यात सहाय्यक परिचारिका प्रसविका (७० जागा), समन्वयक (७२ जागा) ही पदे भरण्यात येणार आहेत. या पदासाठी थेट मुलाखत दि. २७ मार्च २०१२ ते ३१ मार्च २०१२ या कालावधीत आहे. यासंबंधीची जाहिरात दै. सामनामध्ये दि. १२ मार्च २०१२ तर दै. सकाळमध्ये ११ मार्च २०१२ रोजी रोजी प्रसिद्ध झाली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेत कनिष्ठ for more jobs click here

No comments:

Post a Comment