Privacy Policy

Tuesday, April 24, 2012

Avoid giving loans on Wednesday

बुधवारी कर्ज देण्यास टाळावे!

budh grah

कर्ज चुकविण्याची स्थिती कोणत्याही व्यक्तीला द्विधा मनःस्थितीत टाकते. रात्रं-दिवस केवळ कर्ज चुकविण्याच्या विचारामुळे व्यक्ती तणावाखाली असते. कर्ज घेणाऱयाला ज्या समस्यांना सामोरे जावे लागते. त्याच समस्यांना कर्ज देणाऱयाला कधी कधी सामोरे जावे लागते. चुकीच्या व्यक्तीला कर्ज दिल्यामुळे कधी कधी कर्ज देणाराही आर्थिक अडचणीत सापडू शकतो. त्याला त्याच्या व्यवसायात मोठे आर्थिक नुकसान सहन करावे लागते.

ज्योतिष शास्त्रानुसार बुध हा व्यापारासाठी उपयुक्त ग्रह मानला गेलाय. मात्र त्याचवेळी बुध हा नपुंसक ग्रह म्हणूनही ओळखला जातो. याचमुळे शास्त्रांनुसार बुधवारी कर्ज देणे चुकीचे मानले गेले आहे.(Avoid giving loans on Wednesday) या दिवशी दिलेल्या कर्जाची परतफेड होण्याची शक्यता खूप कमी असते. बुधवारी कर्ज घेतल्यानंतरही त्याची परतफेड करणे अवघड होऊन बसते. बुधवारी कोणाला कर्ज दिले, तर त्याच्या मुला-बाळांनाही त्यापासून त्रास होण्याची शक्यता असते, बुधवारी कर्ज दिल्यामुळे पैसे बुडण्याची शक्यता अधिक असून, व्यापारातही संबंधित व्यक्ती अडचणीत सापडू शकते. यामुळेच ज्योतिष शास्त्रानुसार बुधवारी कर्ज देणे चुकीचे ठरविण्यात आले आहे.(so Avoid giving loans on Wednesday)

No comments:

Post a Comment