पर्याय स्वस्त जेनेरिक औषधांचा
प्रसारासाठी अनेक संघटनांचे प्रयत्न
डायबिटिस, रक्तदाब आणि हृदयविकारासारख्या आजारांवर नियमित महागड्या औषधांना किफायतशीर आणि दजेर्दार पर्याय जेनेरिक औषधांमधून उपलब्ध आहे. कंपन्यांची नफेखोरी वृत्ती तसेच आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांच्या उदासीनतेमुळे या औषधांचा प्रसार होत नाही. मात्र ही औषधे डॉक्टर आणि पेशंटपर्यंत पोहोचवण्यासाठी मुंबई, पुण्यासह राज्याच्या ग्रामीण भागात प्रयत्न सुरू झाले आहेत.
मधुमेह, रक्तदाब, हृदयविकार हे केवळ श्रीमंतांचे आजार राहिलेले नाहीत. गरीब पेशंट तसेच ज्येष्ठ नागरिकांमध्ये या आजारांचे प्रमाण वाढलेले आहे. हे आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी महिन्याला दीड ते दोन हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मात्र या आजारांना अर्ध्याहून कमी किंमतीतील जेनेरिक औषधांचा तेवढाच प्रभावी पर्याय उपलब्ध आहे.
'प्रबोधन, गोरेगाव'ने ग्राहक सहकारी संस्थेच्या माध्यमातून सप्टेंबर २०११पासून जेनेरिक औषधे विक्रीसाठी उपलब्ध करून दिली आहेत. त्यासाठी डॉक्टर तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या संघटनांना या औषधांची माहिती करून देण्यात आली तसेच औषध घेण्यासाठी येत असलेल्यांना मार्गदर्शन करण्यासाठी डॉक्टरांची सेवाही पुरवण्यात आली, अशी माहिती संस्थेचे व्यवस्थापकीय विश्वस्त अण्णा देऊळकर यांनी दिली.
गोरेगावमधील ही चळवळ विलेपार्ले येथेही पोहोचली आहे. मराठी मित्र मंडळाच्या माध्यमातून जेनेरिक औषधाविषयीचे नागरिकांचे शंकानिरसन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत, प्रतिसाद वाढल्यावर औषधविक्रीचे केंद सुरू करण्याची योजना आहे, असे डॉ. सुहास पिंगळे यांनी सांगितले.
पुणे, अमरावतीत यशस्वी प्रयोग
पुण्यात पाच वर्षांपूवीर्च जनआरोग्य अभियानामार्फत लोकायत वैद्यकीय केंदातून जेनेरिक औषधांची विक्री सुरू करण्यात आली आहे. लॉ कॉलेज रोडवर असलेल्या या केंदात पेशंट तसेच त्यांच्या नातेवाईकांना या औषधांची माहितीही दिली जाते, असे डॉ. अनंत फडके म्हणाले. अमरावतीमधील आरवी गावातील निरामय संस्थेच्या माध्यमातूनही अशा प्रकारे औषधांची माहिती देण्याची तसेच विक्री करण्याची मोहीम सुरू आहे. www.niramayaarvi.com आणि www.generic-medicine.prabodhan-grahak.org या वेबसाइटवर जेनेरिक औषधांची माहितीही उपलब्ध आहे.
केमिस्टच्या साखळीपासून लांबच
संशोधन केलेल्या कंपनीला काही वर्षांसाठी औषधनिमिर्ती करण्याचे पेटंट दिले जाते. मात्र त्यानंतर कोणतीही कंपनी त्या औषधाची निमिर्ती करू शकते आणि ही औषधे निम्म्याहून कमी किंमतीला उपलब्ध होतात. भारत आणि चीनमधून जगभरात जेनेरिक औषधांची निर्यात केली जाते. मात्र जाहिरातीतून खर्च केलेला पैसा तसेच नफा मिळवण्यासाठी कंपन्या ते केमिस्टच्या साखळीपर्यंत जेनेरिक औषधांना पुढे आणले जात नाही.
Read here
No comments:
Post a Comment