Privacy Policy

Saturday, June 9, 2012

Katil Siddiki Murder

कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि अलोक भालेराव यांनी कतिल सिद्दिकीचा लेंग्याच्या नाडीने गळा आवळला
देशभरात बॉम्बस्फोट घडवणारा इंडियन मुजाहिदीनच्या दरभंगा मॉड्यूलचा हस्तक आणि श्रीमंत दगडूशेठ मंदिराजवळ बॉम्ब ठेवण्याचा प्रयत्न करणारा अटकेत असलेला कातिल सिद्दिकी याचा आज येरवडा कारागृहातील ‘अंडा’सेलमध्ये कुख्यात गुंड शरद मोहोळ आणि त्याचा साथीदार अलोक भालेराव याने पायजम्याच्या नाडीने गळा आवळून खून केला. येरवडा कारागृहातील ‘हायसिक्युरिटी झोन’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या ‘अंडासेल’मधील खळबळजनक घटनेनंतर गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी कारागृह अधीक्षक शरद खटावकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.
नाश्त्याच्या वादातून...
येरवडा कारागृहातील ‘अंडासेल’ हा हायसिक्युरिटी झोन म्हणून ओळखला जातो. ‘अंडासेल’ मध्ये कुख्यात गुन्हेगारांना ठेवण्यात येते. आज सकाळी १० च्या सुमारास या सेलमधील लॉकअपमधून सिद्दिकी बाहेर पडला. त्याचवेळी कुख्यात शरद मोहोळ आणि अलोक भालेराव हे लॉकपमधून बाहेर पडले. नाश्ता घेण्यावरून त्याच्यात वादावादी झाली. चिडलेल्या शरद आणि अलोक याने पायजम्याच्या दोरीच्या नाडीने सिद्दिकी याचा गळा आवळला. त्यामध्ये तो जागीच मरण पावला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर एकच खळबळ उडाली.

No comments:

Post a Comment