Privacy Policy

Monday, July 16, 2012

Black Beauty book in Marathi ana Sivel

घोडा हा प्राणी प्राचीन काळापासून माणसाचा जिवलग मित्र राहिला आहे. जगभरातील राज्यकर्त्यांना उत्तम साथ करणारा प्राणी घोडाच होता. युद्घातही त्याची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. या इमानी प्राण्यावर अॅना सिवेल या इंग्रजी महिलेने लिहिलेली ' ब्लॅक ब्युटी ' ही कादंबरी जागतिक साहित्यात एक अजरामर कृती म्हणून प्रसिद्घ आहे. ब्लॅक ब्युटी हे एका घोड्याचे आत्मवृत्त आहे. ही कादंबरी गेल्या शतकात लिहिली गेली असली तरी , तिचे सौंदर्य किंवा आकर्षण जराही कमी झालेले नाही. पिढ्यान् पिढ्या लोकप्रिय झालेली ही कादंबरी आजही तितक्याच आवडीने वाचली जाते. या कादंबरीचा
मराठी अनुवाद स्मिता लिमये यांनी केला आहे. विशेष म्हणजे अॅना सिवेल यांनी हे एकमेव पुस्तक लिहिले आहे.

इंग्लंडच्या यारमाऊथ भागात जन्मलेली अॅना आणि तिचा घोडा यांची ही गोष्ट आहे. १८४५मध्ये अॅनाच्या वडिलांनी ब्राइटमध्ये नोकरी धरली तेव्हा घोडागाडीतून त्यांना स्टेशनवर पोहोचवण्याचे आणि आणण्याचे काम अॅना करत असे. तेव्हाच तिची त्याच्याशी गट्टी जमली असावी. ती एखाद्या माणसाशी बोलावे त्याप्रमाणे त्याच्याशी बोलत असे. चाबूक तिला लागत नसे. ऐन तारुण्यात एका अपघातात अॅनाला आपला पाय गमवावा लागला आणि ती अंथरुणाला खिळली. अंथरुणात पडल्या पडल्या तिला ब्लॅक ब्युटीची कल्पना सुचली. तिच्या आईने ही कादंबरी लिहून काढली. कादंबरी प्रकाशित झाल्यानंतर दुर्दैवाने काही महिन्यांतच अॅनाचे निधन झाले. माणूस आणि प्राणी यांच्यातील मैत्रीचे उत्तम दर्शन ही कादंबरी घडवते. या बेस्टसेलर कादंबरीचा मराठी अनुवाददेखील मूळ इंग्रजी पुस्तक वाचल्याची गंमत देणारा आहे.
......................................................
ब्लॅक ब्यूटी
मूळ लेखिका - अॅना सिवेल
अनुवाद - स्मिता लिमये
प्रकाशक - साकेत प्रकाशन , औरंगाबाद
पृष्ठं - १०४
किंमत - १२० रु.

No comments:

Post a Comment