Privacy Policy

Sunday, August 5, 2012

जुने दिवस मिस करतेय कृतिका सेनगर। (अभिनेत्री) Krutika Sengar - Actress



कृतिका सेनगर। (अभिनेत्री)

अगदी शाळेत असल्यापासून मी फ्रेंडशिप डे साजरा करतेय. खरंतर आमच्या शाळेत बँड वगैरे बांधून यायला परवानगी नव्हती. पण आम्ही मैत्रिणी स्कूलबसमध्येच फ्रेंडशिप डे सेलीब्रेट करायचो, बॅण्ड बांधायचो. वर्गात जायच्या आधी बँड काढून ठेवायचो...
माझे अगदी मोजकेच फ्रेंड्स आहेत. दोन मैत्रिणी मुंबईत आहेत. त्यांच्याशी थोडाफार संपर्क असतो. पण इतरांशी काहीच संपर्क नाही. इंडस्ट्रीतही जवळचे म्हणावे असे तीन-चार मित्रच आहेत. आता कामामुळे फ्रेंडशिप डे साजरा करायला जमत नाही. जमलंच तर डिनरला जातो. मला वाटतं की एका काळानंतर फ्रेंडशिप डे किंवा इतर दिवसांची क्रेझ कमी होते. माझे लहान भाचे-भाची त्यांच्या फ्रेंड्ससाठी चॉकलेट्स घेतात, कार्ड्स घेतात. पण माझ्यातला हाउत्साह आता कमी झालाय.
फ्रेंडशिप डेची अशी खास आठवण नाही. पण मी हॉस्टेलमध्ये असताना सुगंधा मेहरोत्रा नावाची माझी एक मैत्रीण होती. आम्ही भांडलो की एकमेकींचे तोंडही पाहायचो नाही. मग काही वेळानं मीआणि ती सॉरीचं ग्रीटिंग कार्ड रूमच्या फटीतून हळूच आत सरकवायचो. कधी चॉकलेट्स ठेवायचो आणि म्हणायचो चल बाहेर ये, तुझ्यासाठी चॉकलेट ठेवलंय ते खाऊन घे, अशी सगळी गंमत होती. हे सर्व आता मी खूप मिस करतेय.

No comments:

Post a Comment