Privacy Policy

▼

Sunday, August 5, 2012

भांडणं तेवढय़ापुरतीच रवी दुबे। (अभिनेता) Ravi Dubey



रवी दुबे। (अभिनेता)


माझ्या बेस्ट फ्रेंड्सच्या कॅटेगरीत भरपूर जण आहेत. काही शाळा-कॉलेजांतले मित्रआहेत, तर आता काही इंडस्ट्रीतलेही माझे बेस्ट फ्रेंड्स झालेत. मित्रांसोबत कधी कधी छोटेमोठे वाद होतात, कधी भांडणं होतात; पण ती तेवढय़ापुरतीच.. काही काळानंतर पुन्हा सगळं आलबेल असतं. हीच तर मैत्री असते ना! आजवर अनेक फ्रेंडशिप डे मी साजरे केलेत. आम्ही मित्र एकत्र जमतो, फिरायला जातो, धम्माल करतो अशी सगळी गंमत असते. आता यावर्षीबघूया काय करायचं ते. मीही शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यामुळे बाहेर जाऊ की नाही, ते माहीत नाही. पण नेटवरच चॅट करीन, फोनाफोनी करीन. पुढचं सेलीब्रेशन सर्वांच्या सोयीनं होईल.

No comments:

Post a Comment