Privacy Policy

Monday, August 20, 2012

सॅमसंग ओम्निआ एम Samsung Omnia M

सॅमसंगचा ओम्निआ एम हा नवा विंडोज मोबाईल फोन आता बाजारात आला आहे. विंडोज मोबाईलवर त्यामुळे प्रथमच ‘चॅट ऑन’ ही सुविधा उपलब्ध झाली आहे. सॅमसंगच्या क्लाऊडवर आधारित नेटवर्कशी असलेल्या जोडणीमुळे या मोबाईलमध्ये काही फीचर्स अशी आहेत की, जी आपल्याला इतरत्र कुठेही उपलब्ध होणार नाहीत. यातील एक महत्त्वाचे फीचर म्हणजे फॅमिली स्टोरी. या अ‍ॅपमुळे आपल्याला आपल्याशी संबंधित व्यक्तींशी फोटो, स्लाइड शो, व्हिडिओ आणि मेसेजेस सारे काही या अ‍ॅपद्वारे शेअर करता येईल.
३४८ एमबी रॅम आणि चार जीबीची इंटर्नल मेमरी या फोनला आहे. पाच मेगापिक्सेल, एलइडी फ्लॅश, व्हीजीए फ्रंट कॅमेरा अशीही काही वैशिष्टय़े आणखी समाविष्ट आहेत.
पर्सनल गेमिंग
या फोनचे आणखी एक सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे एक्स बॉक्स लाइव्ह अ‍ॅप. त्यामुळे पर्सनल गेमिंगसाठी तर हा फोन म्हणजे एक चांगली पर्वणीच आहे. या शिवाय डेअली ब्रिफिंग, आरएसएस टाइम्स, फोटो स्टुडिओ, मिनी डायरी या सुविधाही आहेतच सोबत..
भारतीय बाजारपेठेतील किंमत  रु. १८,६५० /-

No comments:

Post a Comment