Privacy Policy

Saturday, October 20, 2012

Amitabh having back pain

big b
(फाइल फोटो)

गेल्याच आठवड्यात वयाची सत्तरी ओलांडणारे बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन सध्या पाठदुखीनं हैराण आहेत. आपल्या ब्लॉगवरून त्यांनी चाहत्यांना या दुखण्याबद्दल सांगितलंय. अर्थात, फेब्रुवारी महिन्यातील पोटदुखीइतकी ही पाठदुखी गंभीर नसल्याचं त्यांच्या एकूण आविर्भावावरून वाटतंय.

मी चित्रपटांमध्ये मारामारीची दृश्यं करताना खबरदारी न घेतल्याचा परिणाम आता मला सहन करावा लागतोय. काही दिवसांपासून पाठीच्या खाली, कमरेजवळ अचानक गोळा आल्यासारखं वाटतं. जुन्या आठवणी जागवणारं मोठं अजब दुखणं आहे हे !... तेव्हाची परिस्थिती, ठिकाणं सगळं यानिमित्तानं पुन्हा आठवतंय, अशा काहीशा मजेशीर भावना बिग बीनं ब्लॉगवरून व्यक्त केल्यात.

अमिताभ यांच्या पोटाचं दुखणं बरंच जुनं आहे. १९८२ मध्ये ' कुली ' चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान ते गंभीर जखमी झाले होते. तेव्हापासून त्यांच्या मागे लागलेली पोटदुखी अधे-मधे डोकं वर काढत असते. २००५ मध्ये आणि यावर्षी फेब्रुवारी महिन्यात त्यांच्या पोटावर छोटी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. पण आता त्यांना पाठीचा त्रास होऊ लागल्यानं त्यांचे चाहते काळजीत पडलेत. ' गेट वेल सून ' , अशा सदिच्छांचा पाऊस या ब्लॉगवर पडतोय. या सदिच्छांनी, चाहत्यांच्या प्रेमानं अमिताभ यांना दरवेळी शक्ती दिली आहे. त्यामुळे या दुखण्यावरही बिग बी लवकरच मात करतील, असा विश्वास बाळगायला काहीच हरकत नाही.

No comments:

Post a Comment