त्या   जे  .  के  .  रोलिंगच्या   कल्पनाशक्तीला   तोड   नाही  .  हॅरी   पॉटरचं   काय   अफाट  ,  अद्      भुत   जग   निर्माण   केलंय   तिने  ...  असं   जर   कधी   कोणी   म्हटलं   तर   त्याला   म्हणावं  ,  कल्पनाशक्तीचे   पतंग   हव्या   त्या   दिशेने   उडवणारी   ती   रोलिंगबाई   जगात   एकटीच   नाही  .  आमच्याकडे   पण   एक   महाशय   आहेत  ,  करण   जोहर   नावाचे  .  ते   हवं   ते   जग   एका   सिनेमासरशी   उभं   करू   शकतात  .  अशक्य   वाटणाऱ्या   गोष्टी   खऱ्या   म्हणून   लीलया   विकू   शकतात  ... 
 
विश्वास नसेल तर त्यांचा नुकताच आलेला ' स्टुडंट ऑफ द इयर ' पाहा . त्यातली शाळा पाहताना डोळ्यांचं पारणं फिटेल आणि अद्  भुत जग फक्  त हॅरी पॉटरमध्येच नसतं तर ते धर्मा प्रॉडक्शनच्या बॅनरखाली असतं याची खात्री होईल .
 
थोडक्यात , हा सिनेमा म्हणजे पुन्हा करण जोहरच्या फॅक्टरीतलं दळण आहे . रंगीत , छानछान , गोडगोड , सुंदरसुंदर असं गोजिवारणं ब्रॅण्डेड प्लास्टिकचं जग . त्यातल्या प्लॉस्टिकच्या बाहुल्या आणि त्यांचे पोरखेळ . ना कथानकात दम , ना चित्रिकरणात . फक्त वय वर्ष १२ ते १६ मधल्या मुलामुलींच्या स्वप्नांना थोडं गोंजारेल आणि पुन्हा एकदा खऱ्या दुनियेपासून थोडे दिवस काही कोस दूर नेईल .
 
या सिनेमाचं कथासूत्र नेहमीचं . एक श्रीमंत सुंदर मुलगी . एक श्रीमंत चिकणा मुलगा . आणि गरीब चिकणा मुलगा . दोन मित्र . त्यांच्यामध्ये ती मुलगी . मग प्रेम , दोस्ती , दुश्मनी , स्पर्धा , गाणी , नाच याच्यापासून जो घडतो तो हा सिनेमा .
 
यात शाळा उभी करताना कुछ कुछ होता है , मोहबते किंवा तत्सम रंगीबेरंगी शाळा - कॉलेज सिनेमांची आठवण येते . हिरो पाण्यातून तोकडी स्वीमिंग पँट घालून बाहेर येतो आणि निथळती बॉडी दाखवतो तेव्हा त्या दोस्तानातल्या जॉनची आठवण येते . स्टाईलिश हिरॉईन बघताना ' कभी खुशी ..' मधल्या पू उर्फ करिनाची आठवण येते आणि बाकी सिनेमा बघताना जो जिता , कुछ कुछ , कभी खुशी , मोहब्बते , जाने तू अशा आधी पाहिलेल्या डझनभर यंगस्टर फेम सिनेमांची आठवण होत रहाते . या सिनेमातले बरीच दृष्यं इथे ना तिथे बघितल्यासारखी आठवत रहातात .
 
बाकी कलाकार चांगले आहेत . आलिया भट्टने चांगला अभिनय केलाय . म्हणजे खूप सुंदर पण विशेष डोक्याचा वापर न करणारी . आपल्या स्टायलीने सगळ्या परिसराला घायाळ करणारी अशी हिरॉईन पाहताना मजा येते . ती सुंदर दिसते . अगदी एखाद्या बार्बी डॉलसारखी . तिच्या वाट्याला आलेली ही बार्बीची भूमिका तिने उत्तम निभावली . दोन्ही तरूण अभिनेते टीनएजमधल्या स्वप्नाळू मुलींना वॉव्व , हॉट , यो ... असं म्हणायला लावतील असे . आपल्या भूमिकांशी प्रामाणिक . करण जोहरचं दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी दोन्ही उत्तम . पण त्यात नावीन्य कणभरही नाही . तरुणवर्ग वगळता ॠषी कपूर , राम कपूर , रोनित रॉय हे ठीक आहेत पण त्यांची पकड या सिनेमाला हवी तितकी येत नाही .
 
आलियाच्या एन्ट्रीसोबत ' गुलाबी आखें है ' गाणं किंवा वरूणच्या एन्ट्रीसोबत पापा कहते है . ये चांद सा रोशन चेहरा , राधा , इश्कवाला लव्ह ही गाणी करणच्या इतर सिनेमांप्रमाणे इण्डस्ट्रीत मूळं रुजवणारी नसली तरी छान आहेत . ऐकायला मजा येते . विशेष करून गाडी चालवताना किंवा सॅटरडे नाईटला जुळून येतील अशी ही गाणी या पटाला साजेशी आहेत . यातल्या पात्रांचं वय १९ पेक्षा अधिक नाही आणि त्या वयाला साजेसा हा सिनेमा आहे . अर्थात शाळेतली मुलं आपल्याकडे अशी वागतात का हा प्रश्न सुटत नाही ही गोष्ट वेगळी . पण तरी टीनएजला त्यांचं स्वप्नजग म्हणून खपून जातो . पण या चेहऱ्याने विशीच्या आतली दिसणारी मुलं दहा वर्षांनी पुढे दाखवून उगाच काहीतरी सस्पेन्स उभा करायची ठिगळबाजी का केलीय देवजाणे . त्यापेक्षा गुडी गुडीपटाचा शेवटही तसाच नेहमीच्या साच्यातला गुडी गुडी केला असता तरी सिनेमा साजरा झाला असता . शेवट देखील उगाच काहीतरी करायचा म्हणून केलाय .
 
एकूण हा सिनेमा विशेष काही सांगणारा , बुद्धिजीवी वर्गासाठी बनवलेला किंवा काही खास अपेक्षेने बनवलेला नाही . हे खुद्द करण जोहरलाही ठाऊक असणार . ज्युनिअर कॉलेजची मुलं कदाचित वॉव्व म्हणत सिनेमाचं कौतुक करतील आणि विसरून जातील . बाकीच्यांनी पुढे कधीतरी टीव्हीवर पाहिला किंवा नाही पाहिला तरी विशेष काही नुकसान होणार नाही .
....
दर्जाः **
निर्माताः गौरी खान , हिरू यश जोहर , दिग्दर्शकः करण जोहर , संगीतः विशाल शेखर , कलाकारः आलिया भट्ट , वरूण धवन , सिद्धार्थ मल्होत्रा , ॠषी कपूर , राम कपूर ........
- वैष्णवी कानविंदे - पिंगे
 
No comments:
Post a Comment