Privacy Policy

Thursday, November 8, 2012

सवलतीच्या गॅस सिलिंडर्सची संख्या ६ वरुन ९

ऐन दिवाळीच्या तोंडावर सवलतीच्या गॅस सिलिंडर्सची संख्या सहावरुन नऊ करून राज्य सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा दिला आहे. बुधवारी राज्य मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला असून पिवळ्या व केशरी रंगाचे रेशन कार्ड असलेल्या एलपीजी गॅसधारक असलेल्या ग्राहकांना या निर्णयाचा फायदा होणार आहे.
ज्या ग्राहकांकडे उच्च उत्पन्न गटाचे म्हणजे पांढ-या रंगाचे रेशन कार्ड असेल त्यांना या सवलतीचा लाभ मिळणार नाही. केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने केवळ सहा सिलिंडर सवलतीच्या दरामध्ये देण्याचे व त्यावरील सिलिंडर बाजारभावाने म्हणजे सुमारे ९२२ रुपयांनी खरेदी करावा लागणार असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर काँग्रेसशासित राज्य सरकारे आपल्या अखत्यारीत तीन आणखी सिलिंडर सवलतीत देतील असे आश्वासन देण्यात आले होते. त्याला अनुसरून राज्य मंत्रिमंडळाने सदर निर्णय घेतला आहे.

No comments:

Post a Comment