Privacy Policy

Sunday, November 11, 2012

झवेरी बाजारातील ३४ पेढय़ांवर छापे Income tax dept Jhaveri Bazar

ऐन दिवाळीच्या तोंडावर आयकर विभागाने झवेरी बाजारातील ३४ सराफांच्या पेढींवर छापे घालून २२ कोटींचे बेहिशेबी सोने आणि रोख रकमेचे व्यवहार उघडकीस आणले आहेत. या छाप्यात हवाला रॅकेट चालवणार्‍या अंगाडीयांचीही चौकशी करण्यात येत आहे. या कारवाईमुळे एरव्ही दिवाळसणात झळाळून निघणारा झवेरी बाजार काळवंडला आहे.
धनत्रयोदशी आणि दिवाळीच्या दिवशी झवेरी बाजारातील सोन्याची खरेदी विक्री उच्चांक गाठते. धनत्रयोदशीला दोन दिवस असतानाच आयकर विभागाने झवेरी बाजाराभोवती पाश आवळण्यास सुरूवात केली. शुक्रवारी रात्रीपासून या कारवाईला सुरूवात झाल्यानंतर काही तासातच बड्या सराफांचे लॉकर खोलून आयकर विभागाने पाच कोटींच्या बेहिशेबी सोन्याची चौकशी सुरू केली. ही कारवाई शनिवारी दिवसभर सुरू ठेवण्यात आली.
या कारवाईत बेहिशेबी व्यवहारांचा आकडा २२ कोटींच्याही पुढे गेला. छाप्यांमध्ये सोने खरेदी — विक्रीच्या व्यवहारांबाबतची आक्षेपार्ह कागदपत्रे आयकर विभागाने ताब्यात घेतली असून हवाला रॅकेट चालवणार्‍या अंगाडीयांचा बेकायदेशीर व्यवहारांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचीही चौकशी करण्यात येत असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment