Privacy Policy

Friday, January 4, 2013

More rapes in India not in Bharat


भारतापेक्षा इंडियात जास्त बलात्कार!




bhag.jpg

देशातील बलात्कारांच्या वाढत्या घटनांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी पाश्चात्य जीवनशैलीला दोष दिला आहे. ' बलात्कारांच्या घटना ग्रामीण भागात म्हणजेच भारतात कमी आणि शहरी भागांत म्हणजेच ' इंडियात ' जास्त आहे, ' असे मत भागवत यांनी मांडले आहे.

सिलचर येथील नागरी मेळाव्यात ते बोलत होते. ' बलात्काराच्या घटना गावांच्या तुलनेत शहरात जास्त घडतात. पाश्चिमात्य जीवनशैलीच्या प्रभावाखाली असलेल्या भागांतूनच लैगिक अत्याचाराच्या बातम्या वरचेवर येतात, असे ते म्हणाले. ' या घटना थांबवायच्या असतील तर कठोर कायद्यांबरोबरच महिलांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलायला हवा. भारतीय संस्कृतीमध्ये महिलांना आदराचे स्थान आहे. आदर व सन्मानाची ही संस्कृती पुन्हा आपल्या जीवनात उतरवली पाहिजे, ' असेही त्यांनी यावेळी सांगितले. बलात्कारासारख्या गुन्ह्यांतील आरोपींना फाशी दिली गेली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment