Privacy Policy

Sunday, June 16, 2013

लटकता प्रवास बंद? Mumbai Local Train Travelling

लोकलना स्वयंचलित दरवाजे बसवण्याची रेल्वेची योजना

धावत्या लोकलमधून पडून होणाऱ्या अपघातांचे प्रमाण रोखण्यासाठी रेल्वेने नवीन योजना आखली आहे . त्यानुसार स्वयंचलित पद्धतीने उघड - बंद होणारे दरवाजे असणाऱ्या लोकल आणण्याची योजना रेल्वेने आखली आहे . ही योजना प्रत्यक्षात आल्यास लटकत वारा खात प्रवास करणे बंद होणार आहे .

भारतीय रेल्वेच्या विद्युत विभागातील बड्या अधिकाऱ्यांनी यापूर्वीच ' मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन ' कडे ( एमआरव्हीसी ) याप्रकारची लोकल सेवा सुरू करण्याची सूचना केली होती . देशात याप्रकारे एसी नसणाऱ्या लोकलमध्ये स्वयंचलित दरवाजे बसवण्याची ही पहिलीच योजना आहे . त्यासाठी रेल्वेच्या ' रिसर्च डिझाइन अँड स्टँडर्ड्स ऑर्गनायझेशन ' कडे ( आरडीएसओ ) यापद्धतीने डब्यांची नेमकी रचना करण्याची जबाबदारी सोपवली आहे . त्यास रेल्वे बोर्डाची मान्यता मिळाल्यावर एमआरव्हीसीकडून टेंडर मागवण्यात येईल . या प्रक्रियेस काही महिन्यांचा अवधी लागणार आहे .

अपघातांचे प्रमाण कमी होईल

स्वयंचलित दरवाजे असणाऱ्या लोकल सेवेत आल्यास लोकलमधून प्रवासी खाली पडण्याचे प्रकार होणार नाहीत . त्यामुळे प्रवाशांना सुरक्षित प्रवास करणे शक्य होईल , असे ' एमआरव्हीसी ' चे संचालक राकेश सक्सेना यांनी सांगितले .

दरवाजे उघड - बंद करण्याचे काम मोटरमन किंवा गार्डकडून होणार

या लोकल ' एसी ' नसून नेहमीच्याच साध्या लोकल असतील

बंद दरवाजांतूनही हवा खेळती राहील याची दक्षता

प्रत्येक स्टेशनवर लोकल थांबण्यासाठी दिलेल्या वेळेनुसार दरवाजे उघड बंद होतील

मोनो - मेट्रो वा एसी लोकलप्रमाणेच संपूर्ण दरवाजे बंद झाल्याशिवाय लोकल सुरू होणार नाही

No comments:

Post a Comment