Privacy Policy

Tuesday, July 9, 2013

Marathi Groom Bride Wedding Matrimony ukhane and ukhana

Marathi Groom Bride Wedding Matrimony ukhane and ukhana

चंदनी पानात मुग्ध कळी हसली
...रावांच्या प्रेमात मी नकळत फसली.

रुपेरी सागरावर चंदेरी लाट,
---रावानच नाव घेते सोडा माझी वाट
.

परसात अंगण अंगणात तुळस
----- नाव घ्यायचा मला नाही आळस.


ईंन्द्रधनुष्य दिसतो जेव्हा असत् पावसात ऊन
... रावांच नाव घेते .... ची सुन्.


मंगळसुत्रातील दोन वाटया सासर आणि माहेर
.......रावांनी दिला सौभाग्याचा आहेर.


लग्नात्त लागतात हार आणि तुरे
.... च्या नाव घेण्याचा आगृह् आता पुरे.


आजच्या सोहोळ्यात थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास


बारिक मणी घरभर पसरले,
-----साठि माहेर विसरले
.

रुसलेल्या राधिकेला श्रीकृष्णा म्हणतो हास
------ नाव घेते तुमच्यासाठी खास.


निरभ्र आकाशात चंद्राचि कोर
.....च नाव घेते भाग्य माझे थोर.

प्राजक्ताच्या फुलानि भरले अंगण
---रावांचे नाव घेवुन सोडले क़ंकण
.

भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता
----- रांवाच नाव घेते खास तुमच्या करिता.


सोन्याचे मंगळ्सुत्र सोनाराने घडविले,
--- रावांचे नाव घ्यायला सगळ्यांनी अडविले.

हिमालयाच्या पायथ्याशि उतरल्या लतिका,
...चे नाव घेते ....चि बालिका.


सरिते वर ऊठतात तरंग,सागरा वर उठतात लाटा,
-----च्या सुख दुखात अर्धा माझा वाटा


चांन्दिच्या त्ताटात अगरबत्तिचा पुडा
......... च्या नावाने भरला हिरवा चुडा


शुभवेऴी शुभदिनी आली आमची वरात,
... रावांचे नाव घेते, पहिले पाऊल घरात

जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते
सगळ्यांचा मान राखून नाव **** चे घेते.

खण खण कुदळी मण मण माती, मण मातीच्या उभारल्या भिन्ती, चितारले खांब;
सासुबाईंच्या पोटी आक्काबाईंच्या पाठी उपजले राव,
राव नाही म्हटलं, नाव नाही घेतलं;
३२ पानं ३२ सुपारी, तोंडात विडा बोलु कशी?
सदर दाराची,नजर पुरुषाची, सदरेला उभी राहू कशी?
येत होते जात होते घड्याळात पाहात होते;
घड्याळात वाजले तीन ......ची वाट पाहाते .....ची सुन्.


जिवनाच्या वाटेवर पाऊल नवीन ठेवते
सगळ्यांचा मान राखून नाव **** चे घेते.

सुशिक्षित घराण्यात जन्मले, कुलवंत घराण्यात आले
.....रावाचे नाव घेउन मी सौभाग्यवति झाले


जशी आकाशात चंद्राची कोर
..... पती मिळायला माझे नशीब थोर


एक दिवा दोन वाती
एक शिंपला दोन मोती
अशीच राहु दे माझी व ...रावांची प्रेम ज्योती.....

भाव तेथे शब्द,शब्द तेथे कविता
.....चे नाव घेते तुमच्या आघ्रहाकरिता

रुसलेल्या राधेला कान्हा म्हणतो हास
....रावांना भरवते ...चा घास

श्रीकृष्णाने केले अर्जुनाच्या रथाचे सारथ्य
....आणि माझ्या संसारात होईल
तुम्हा सगळयांचे नेहमी आदरातिथ्य.


सोन्याच्ये दागिने सोनाराने बनविले
*** रावाचे नाव
घेण्यासाठी तुम्हि सर्वानि अडविले


आजच्या सोहळ्याचा थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास


आजच्या सोहळ्याचा थाट केलाय खास
-- ला भरविते जिलेबिचा घास

निळ्या निळ्या आकाशात शोभुन दिसतात चंद्र-तारे;
....रावांच्या संगतिने उजलेल् माझे जिवन सारे

महादेवाच्या पिंडीला बेल घालते वाकुन्
.... नाव घेते सर्वांच मान राखुन

काचेच्या बशित् आम्बे ठेवले कापुन
----रावान्च नाव घेते सर्वान्चा मान राखुन

मंद वाहे वारा,संथ चाले होडी,
परमेश्वर सुखी ठेवो ***,*** ची जोडी

आंब्यात आंबा हापुस आंबा
---- चे नाव घेते तुम्हि थोड थांबा.

पुरनपोलि वरण साजुक तूप भातात
--च्या आवडिचे पदार्थ वाढ़ले चान्दिच्या ताटात

ग़जाननाच्या मन्दिरात सन्गिताचि गोडि
सुखि थेवा गजानना -- चि जोडि

जाईजुईचा वेल पस्ररला दाट
...बरोबर बान्धलि जिवनाचि गाठ

अलिकदे अमेरिका पलिकदे अमेरिका
नाव घ्यायला सान्गु नका मि आहे कुमारिका

एक होति चिउ एक होता काउ
....... रावान्चे नाव घेते दोके नका खाउ

ताजमहाल बान्धायला कारागिर होते कुशल
----रावान्च नाव घेते तुमच्यासाथि स्पेशल

साता जन्माच्या जुळल्या गाठी,
...रावांच नाव घेते चालताना सप्तपदि

राजहंसाच्या पिलास चारा हवा मोत्याचा
... च नाव घेते अशिर्वाद द्यावा सौभाग्याचा

साँजवात लावताना येते माहेरची आठवण
--- रावांसाठी झाली सासरी पाठवण.

जन्म दिला मातेने,पालन केले पित्याने
---- चे नाव घेते पत्नि या नात्याने.

काव्य आनि कविता सागर आणि सरिता
...चे नाव घेते तुमच्या करिता


No comments:

Post a Comment