Privacy Policy

Tuesday, July 30, 2013

Saving Accounts Taxless earnings बचत खात्याचे करमुक्त उत्पन्न


ऐकण्यात असे येते की बँकेच्या बचत खात्यावर मिळणाऱ्या व्याजाला दहा हजार रु.पर्यंत करमाफी आहे. हे खरे आहे का ? तसे असल्यास असे १० , ००० रु.पर्यंतचे व्याज इतर व्याज उत्पन्नात मिळवून नंतर त्याची वजावट आयकर कायद्याच्या कलम ' ८० सी ' खाली घ्यावी की हे व्याज इतर व्याज उत्पन्नाबरोबर न मोजता भविष्य निर्वाह निधीवरील व्याजासारखेच एकूण उत्पन्नात समाविष्ट न केलेल्या बाबींप्रमाणेच दाखवावे ? बचत खात्यावरील व्याजाबद्दल आयकरात सूट मिळत असल्यास ती आयकर कायद्यातील कोणत्या तरतुदीप्रमाणे ?

--- आयकर कायद्याच्या कलम ' ८० टीटीए ' खाली बचत खात्यांवरील दहा हजारांपर्यंतचे व्याज हे करमुक्त असते. उत्पन्न मोजताना बचत खात्यावरील व्याज हे इतर उत्पन्नात मोजावे व त्यानंतर कलम ' ८० टीटीए ' खाली दहा हजारांपर्यंतची सूट घ्यावी.

कल्याण (जिल्हा ठाणे) येथे मी मे २०१२ मध्ये फ्लॅट खरेदीसाठी नोंदणी (बुकिंग) केली व त्या फ्लॅटच्या खरेदीचा करार ( अॅग्रिमेन्ट) जुलै २०१२ मध्ये झाला. कल्याण-डों​बिवली महापालिका क्षेत्रात स्थानिक पालिका कर ( ' एलबीटी ') लागू झाला व तो मी १ टक्का दराने भरला आहे. करारनामा करतेवेळी मूल्यवर्धित कराबाबत ( ' व्हॅट ') नि​श्चिती नसल्यामुळे तो त्या वेळेस भरला गेला नाही. आता मला फ्लॅटचा ताबा ळिणार असून बिल्डर माझ्याकडे २ टक्के ' व्हॅट ' ची मागणी करीत आहे. तर हा ' व्हॅट ' एक टक्का दराने आहे की दोन टक्के ? माझा ' व्हॅट ' मी कर खात्याच्या कार्यालयात थेट भरू शकतो का ?

--- ' व्हॅट ' ची रक्कम ही आपणास बिल्डरला द्यावी लागेल. ती आपणास थेट भरता येणार नाही. आपणास एक टक्का दराने ' व्हॅट ' भरावा लागेल.

मी एक निवृत्त सरकारी अधिकारी व ज्येष्ठ नागरिक असून , आर्थिक वर्ष २०१३-१४ चे अपेक्षित उत्पन्न पुढीलप्रमाणेः पेन्शन- २ , ६० , ००० रु. , बँक ठेवींवरील व्याज - ७० , ००० रु. , म्युच्युअल फंड योजनांमध्ये केलेल्या गुंतवणुकीवरील लाभांश ( डिव्हिडंड) - , ५०० रु. असे एकूण ३ , ३७ , ५०० रुपये. आयकर कायद्याच्या कलम ' ८० सी ' अंतर्गत १० , ००० रु.ची गुंतवणूक नियोजली आहे. पूर्वी म्युच्युअल फंडाच्या समभागनिगडित बचत योजनेत (इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम- ' ईएलएसएस ') गुंतवणूक केलेल्या व तीन वर्षांचा मुदतबंद कालावधी ( ' लॉकइन पीरियड ') पूर्ण केलेल्या योजनेचे २० , ००० रु.चे युनिट विकले तर हातात येणाऱ्या रकमेवर किती आयकर भरावा लागेल ? प्राप्त होणारी रक्कम आयकर विवरणपत्रात दाखविणे आवश्यक आहे ? असल्यास कोणत्या शीर्षकाखाली व त्याबाबतचे आयकर कायद्याचे कलम कोणते ? मला आयकर कसा , किती लागू होईल ?

--- आपण दिलेल्या माहितीअनुसार , म्युच्युअल फंडाकडून मिळालेला लाभांश हा करमुक्त आहे. तसेच आपण कलम ' ८० सी ' अंतर्गत दहा हजारांची गुंतवणूक केली आहे. त्यामुळे आपले करपात्र उत्पन्न रु. ३ , २० , ००० एवढे होईल. ज्येष्ठ नागरिकांना अडीच लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर आयकर भरावा लागत नाही. उरलेल्या रकमेवर म्हणजेच रु. ७० , ००० वर आपणास दहा टक्के दराने रु. , ००० व शैक्षणिक अधिभार रु. २१० असे एकूण ७ , २१० रु. आयकर म्हणून भरावे लागतील. ' ईएलएसएस ' चे परत घेतलेले पैसे आपण ' सिक्युरिटीज ट्रॅन्झॅक्शन टॅक्स ' (' एसटीटी ') भरून परत घेतले आहेत असे गृहीत धरल्यास सदर रक्कम दीर्घ मुदतीच्या भांडवली नफ्याखाली करमाफ आहे.

1 comment: