अंधश्रद्धा निर्मूलन
समितीचे अध्यक्ष आणि 'साधना' मासिकाचे संपादक नरेंद्र दाभोळकर यांची आज
पुण्यात हत्या करण्यात आली. ओंकारेश्वर पुलाजवळ अज्ञात व्यक्तीनं सकाळी
सातच्या सुमारास त्यांच्यावर गोळीबार केला. या हल्ल्यात दाभोळकर यांचा
जागीच मृत्यू झाल्याचं समजतं.
पुण्यातल्या ओंकारेश्वर मंदिराजवळील
पुलावर आज पहाटे एका अज्ञात व्यक्तीने गोळीबार केल्याने चांगलीच खळबळ
उडाली. या गोळीबारात एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळाली होती.
परंतु, ते नरेंद्र दाभोळकर असल्याचं अंधश्रद्धा निर्मुलन समितीच्या
कार्यकर्त्यांनी सांगितलं आणि सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. हल्लेखोरानं
अगदी जवळून दाभोळकरांवर दोन ते चार फैरी झाडल्या होत्या. या हल्ल्यानंतर
त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं, परंतु तोवर उशीर झाला होता.
नरेंद्र दाभोळकर यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी जाहीर केलं.
No comments:
Post a Comment