Privacy Policy

Tuesday, August 20, 2013

Open bank account without documents



कागदपत्रांशिवाय उघडा बँक खाते




एखाद्या बँकेत नवीन खाते उघडायचे असेल , तर कोणतीही कागदपत्रे सादर न करता केवळ आपला यूआयडी नंबर देऊन काही मिनिटांमध्ये खाते उघडण्याची सोय ' युनिक आयडेंटीफिकेशन नंबर अथॉरिटी ऑफ इंडिया ' च्या ( यूआयडीएआय) नवीन योजनेद्वारे झाली आहे. यूआयडीएआयने नव्याने सुरू केलेल्या ' ई-केवायसी ' सुविधेअंतर्गत हे शक्य होणार आहे. यूआयडीएआयचे अध्यक्ष नंदन निलेकणी यांनी सोमवारी मुंबईत एका चर्चासत्रात ही माहिती दिली.

यूआयडी नंबर दिल्यावर तेथील बायोमेट्रिक्स सिस्टिमच्या आधारे आपल्या बोटांचे ठसे घेतले जातील. त्यावरून आपली सर्व माहिती बँकेला उपलब्ध होईल. यामुळे कोणताही कागद सादर न करता बँक खाते सुरू करता येईल. हीच सुविधा इतर सरकारी यंत्रणा तसेच टेलिकॉम क्षेत्रातही राबविली जाईल , असा विश्वास निलेकणी यांनी व्यक्त केला. यूआयडीएआयशी या सुविधेसाठी टायअप असलेल्या बँका किंवा सरकारी कार्यालयांना ही सुविधा दिली जाणार आहे. या योजनेमुळे पेपरलेस गव्हर्नन्स , बोगस कागदपत्रांच्या घोटाळ्यांना आळा , खर्चात घट असे अनेक फायदे होऊ शकतील , असा विश्वासही निलेकणी यांनी व्यक्त केला.
aadhar.jpg
पासपोर्टसाठी आधार कार्ड ग्राह्य मानले जात नाही , पण लवकरच पासपोर्टवर यूआयडीनंबर येणार आहे. यासंदर्भात पासपोर्ट प्राधिकरणाशी बोलणी सुरू असून ती लवकरच यशस्वी होतील , असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

आधार सक्तीचा निर्णय संबंधित यंत्रणेचा!

आधार कार्ड हे सक्तीचे नसून ऐच्छिक आहे. तरीही विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी विविध स्तरावर आधार कार्डाची सक्ती केली जाते. याबाबत विचारले असता , कोणत्या योजनेला आधार कार्डाची सक्ती करायची , कोणत्या योजनेला नाही करायची याचा निर्णय संपूर्णतः त्या यंत्रणेच्या प्रमुखांकडे राखीव आहे , असे सांगण्यात आले.

No comments:

Post a Comment