Privacy Policy

Friday, September 6, 2013

भारतीय वकील सुनील कुलकर्णी अमेरिकेत न्यायाधीशपदी


भारतीय वकील सुनील कुलकर्णी अमेरिकेत न्यायाधीशपदी


ur-1
भारतीय वंशाचे अमेरिकेतील वकील सुनील कुलकर्णी यांची उत्तर कॅलिफोर्नियातील सँटा क्लॅरा काउंटी वरिष्ठ कोर्टाच्या राज्यस्तरीय न्यायाधीशपदी निवड झाली आहे. कॅलिफोर्नियात राज्यस्तरीय न्यायाधीशपदी नेमणूक होणारे ते पहिलेच भारतीय आहेत. कुलकर्णी यांचा जन्म लॉस एंजेलिस येथे झाला असून, किंग सिटीमध्ये त्यांचे शालेय शिक्षण झाले आहे. त्यानंतर बर्कले युनिव्हर्सिटीमधून त्यांनी पदवी मिळवली, तर हस्टिंग कॉलेजमधून वकिलीचे शिक्षण पूर्ण केले आहे.

यापूर्वी रूपा गोस्वामी, अलका सागर, व्हिन्स गिरिधारी छाब्रिया यांचीही कॅलिफोर्नियामध्ये न्यायाधीशपदावर निवड करण्यात आली आहे. कॅलिफोर्नियाचे गव्हर्नर जेरी ब्राउन यांनी गेल्या आठवड्यात कुलकर्णी यांचे नाव न्यायाधीशपदासाठी सुचविले होते, अशी माहिती स्थानिक माध्यमांनी प्रसिद्ध केली आहे.

No comments:

Post a Comment