आपला सर्वांचाच ATM मशीन शी बरेचदा संबंध येतो...त्यामुळे आपल्याला ATM बद्दल ची ही माहिती असणे आवश्यक आहे....
पोस्ट मोठी आहे पण प्रत्येकाने वाचा आणि शेअर कराच.....!!! ( जनहितार्थ )
बऱ्याचदा 'एटीएम'मध्ये एक हजार रुपयांची रक्कम काढण्याची रिक्वेस्ट
केल्यावर पाचशेची एक आणि शंभरच्या पाच नोटा येतात. काही वेळा फक्त
पाचशेच्या दोन नोटा येतात. त्यामुळे अनेक वेळा सातशे, आठशे, बाराशे या
प्रमाणात 'एटीएम'मधून रक्कम काढण्यास प्राधान्य दिले जाते.
मात्र, रक्कम काढण्याची रिक्वेस्ट केल्यावर काही वेळेस तांत्रिक
कारण्यामुळे मशिनमधून रक्कम बाहेर येत नाही आणि रिसिटवर रक्कम डेबिट
झाल्याचे स्पष्ट होते आणि काळजाचा ठोका चुकतो.
काही वेळेस आपणास अपुरी रक्कम मिळते पण रिसीप्ट वर पूर्ण रक्कम डेबिट झाल्याचे दिसते......
अश्या वेळेस काय करावे???
१ )
'' त्वरित बँकेच्या 'एटीएम'बाबत टोल फ्री नंबरवर (हा नंबर एटीएम स्लिपवर उजव्या बाजूस वर असतो) आपली तक्रार नोंदवावी.
अर्थात, ऑन साइट 'एटीएम'मधून रक्कम काढतो आहोत का, हे तपासावे.
अशा प्रकारचे 'एटीएम' संबंधित बँकेच्या शाखेतच असते.
त्यामुळे बँकेच्या वेळात 'एटीएम'मधून पैसे कमी आल्यास थेट शाखेत जाऊन शाखा व्यवस्थापकाला याची कल्पना द्यावी. ''
२)
'' कार्यालयीन वेळेव्यतिरिक्त अशी घटना घडल्यास संबंधित शाखा
व्यवस्थापकाचा नंबर 'एटीएम' सेंटरमध्ये लावलेला असतो. त्यावर फोन करून
तक्रार करता येऊ शकते; तसेच टोल फ्रीनंबरही वापरता येऊ शकतो. ऑफ साइट
'एमटीएम'वर अशी घटना झाल्यास टोल फ्रीनंबरचा आधार घ्यावा. ''
३)
'' काही वेळा थर्ड पार्टी 'एटीएम' म्हणजे अ बँकेचा खातेदार ब बँकेच्या
'एटीएम'चा वापर पैसे काढण्यासाठी करतो. अशा वेळी ब बँकेच्या टोल फ्रीनंबरवर
तक्रार नोंदवावी. ''
४) काय माहिती द्यावी?
बँकेच्या एटीएम
स्लिपवर ब्रँच एटीएम क्रमांक असतो. तो तक्रार नोंदविताना सांगावा. यामुळे
संबंधित एटीएम लवकर ट्रॅक करून तपासणी केली जाते.
५ ) तक्रार न दाखल झाल्यास?
बँकेकडून तक्रारीची दखल न घेतली गेल्यास संबंधित ठिकाणच्या कक्षेत
येणाऱ्या पोलिस चौकीत एटीएम मशिनचा पंचनामा करण्याची तक्रार दाखल करावी.
(यापूर्वी अशा पंचनामा झाल्याच्या घटना घडल्याचे बँकिंग सूत्रांनी
सांगितले.) पोलिस आणि बँक अधिकाऱ्यांच्या समोर असा पंचनामा होतो आणि
परिस्थिती समोर येते.
---------------------------------------------------------------------------
'एटीएम'मध्ये शंभर, पाचशे आणि एक हजार रुपयांचे ट्रे असतात. त्या ट्रेमध्ये संबंधित मूल्याच्या नोटा भरणे अपेक्षित असते.
मात्र, अनावधानाने पाचशेच्या ट्रेमध्ये शंभर रुपयाची नोट भरली गेल्यास याचा फटका हा खातेदाराला बसण्याची शक्यता असते.
कारण मशिन ट्रे नुसार नोट उचलत असते. त्याला पाचशेच्या ट्रेमध्ये शंभरची नोट आली आहे, का हे कळत नाही.
त्यामुळे एक हजार रुपये काढण्याची रिक्वेस्ट केल्यावर मशिनमधून पाचशे
रुपये आणि शंभर रुपयाची नोट आल्यास फटका संबंधित खातेधारकास बसतो. कारण
बँकेत गेल्यावर तुम्हाला एक हजार रुपयेच मिळाल्याचे दिसत आहे, असे बँक
सांगते. यात मशिनच्या चुकीचा नव्हे, तर मानवी चुकीचा फटका भोगावा लागतो...
यासाठी काय करावे ???
=> 'एटीएम'मध्ये सुरक्षेसाठी कॅमेरा बसविलेला असतो. त्यामुळे पैसे
काढल्यावर त्याच ठिकाणी उभे राहून पैसे मोजून घ्यावेत. यामुळे 'एटीएम'मधून
कोणत्या नोटा आल्या हे किमान दिसू शकते
.
No comments:
Post a Comment