Privacy Policy

Friday, June 25, 2010

शिवराज्याभिषेक राष्ट्रीय सण

शिवराज्याभिषेक राष्ट्रीय सण

तिथीनुसार येणारा शिवराज्याभिषेकाचा सोहळा पुढील वषीर् रायगडावर राष्ट्रीय सण म्हणून सरकारतफेर् साजरा केला जाईल, अशी घोषणा अर्थमंत्री सुनील तटकरे यांनी केली. प्रख्यात कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या शिवरायांवरील मालिकेच्या डीव्हीडीच्या प्रकाशनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. रायगडाच्या पायथ्याशी सरकार शिवसृष्टी साकारणार असून त्यासाठी देसाई यांनी सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी केले. 

राजा शिवछत्रपती या मालिकेच्या १६ भागांच्या डीव्हीडी संचाच्या प्रकाशनासाठी गुरुवारी बीकेसीच्या एमसीए क्लबमध्ये शानदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी सुनील तटकरे, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर, मधुर भांडारकर, राजकुमार हिराणी, केतन मेहता, अमोल कोल्हे, शमिर्ला ठाकरे उपस्थित होते. 

महाराजांची वेशभूषा करणे अयोग्य 

राज ठाकरे यांनी भाषणात शिवाजी महाराजांचे नाव येणाऱ्या प्रत्येक पिढीला ठावूक असले पाहिजे, त्यादृष्टीने त्यांचा जीवनपट तयार झाला पाहिजे, असे सांगितले. शिवजयंतीप्रसंगी निघणाऱ्या मिरवणुकांमध्ये महाराजांसारखी वेशभुषा करून कुणाला तरी घोड्यावर बसवले जाते, हे योग्य नाही. त्यामुळे महाराजांची विटंबना होते, त्यामुळे असले प्रकार थांबले पाहिजे, असे ते म्हणाले. 

शिवरायांवर केवळ ५० हजार पानेच 

महाराजांच्या जीवनावर आपल्याकडे विपुल लेखन झाले नाही, गंथसंपदा नाही. नेपोलियनच्या जीवनावर दोन लाखांहून अधिक पुस्तके आहेत. पण महाराजांच्या आयुष्यावर ५० हजार पानेच असतील, अशी खंत बाबासाहेबांनी व्यक्त के

No comments:

Post a Comment