पंचामृत (भोपळी मिरचीचं गोड रायतं )
४ जणांसाठी
साहित्य :
सिमला मिरच्या १ मध्यम
शेंगदाणे भिजवलेले २ टेबलस्पून
पांढरे तीळ १ टेबलस्पून
खवलेले खोबरे १ टेबलस्पून
काजू १०
जिर १/२ टीस्पून
पातळ साजुक तूप २ टेबलस्पून
गूळ १ टेबलस्पून
चिंचेचा कोळ १ टेबलस्पून
हिंग १ चिमुट
मीठ चवीनुसार
कृती:
१. सिमला मिरचीचे उभे छोटे छोटे तुकडे करावेत. तीळ भाजून घ्यावेत.
२. खोबरे काजू, भाजलेले तीळ व जिरे ह्याची अर्धा कप पाणी घालून बारीक पेस्ट (मिश्रण) करून घ्यावी.
३. कढईत तूप घालून त्यात मिरचीचे तुकडे परतून घ्यावेत. नंतर त्यात वाटलेली पेस्ट (मिश्रण), शेंगदाणे, गूळ, चिंचेचा कोळ, हिंग, मीठ व
अर्धा कप पाणी घालून मंद आचेवर दोन मिनिटे शिजवावे.
४. चपाती वा भाकरी बरोबर खायला द्यावे.
दीपा सुहास अवचट
मास्टरशेफ
chefdeepaawchat@gmail.com
No comments:
Post a Comment