४ जणांसाठी
साहित्य - सोलून,
उकडून बारीक केलेले सुरण १/२ कप (९० ग्रॅम )
भिजवलेले शेंगदाणे ३/४ कप (८० ग्रॅम )
भिजवलेले साबुदाणे १/२ कप (९० ग्रॅम)
जिरे १/२ टीस्पून
आलं १ टीस्पून
कडीपत्ता ६ पाने
साखर १/४ टीस्पून
आलं १ टीस्पून
कडीपत्ता ६ पाने
साखर १/४ टीस्पून
चिरलेले हिरवी मिरची २ नग
हिंग १ चिमुट
चवीपुरतं मीठ
वितळलेलं तूप २ टेबलस्पून
पाणी दी़ड कप (३७५ मी.ली.)
कृतीः-
१. अर्ध्या शेंगदाण्यांची अर्धा कप पाणी घालून पेस्ट करून बाजूला ठेवावी. कढईत तूप गरम करून त्यात, जिरं, हिरवी मिरची, कडीपत्ता, आलं व हिंग घालून त्यांना फोडणी द्यावी.
२. त्यात सुरण व अख्खे शेंगदाणे घालून दोन मिनिटं परतवून घ्यावे.
३. त्यात साबुदाणे, शेंगदाण्याची पेस्ट, पाणी, साखर व मीठ घालून, मिश्रण थोडं घट्ट होईपर्यंत एक उकळी काढावी.
४. कुठल्याही उपवास पिठाच्या भाकरीबरोबर किंवा वरीच्या भाताबरोबर गरम गरम खायला द्यावं.
-दीपा अवचट, मास्टर शेफ
chefdeepaawchat@gmail.com
No comments:
Post a Comment