Privacy Policy

Monday, June 11, 2012

ओबामा नालायक अध्यक्ष-जिंदाल

अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा हे आतापर्यंतचे सर्वांत नालायक अध्यक्ष आहेत, त्यांच्या प्रशासनाने उदारमतवादाचा कळस गाठला आहे, अशा शब्दांत लुइझियानाचे भारतीय वंशाचे गव्हर्नर बॉबी जिंदाल यांनी तोफ डागली. शिकागो कॉन्झव्हेर्टिव्ह पोलिटिकल अॅक्शन कॉन्फरन्समध्ये ते शनिवारी बोलत होते.
अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीचे वातावरण तापू लागले आहे. जिंदाल हे उपाध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहेत. त्यांनी ओबामांना लक्ष्य केले. ते म्हणाले, 'ओबामा सरकारने गाठलेला उदारमतवादाचा कळस, त्यात ओबामा यांची अकार्यक्षमता या दोन्हींमुळे प्रशासनाचे बारा वाजले आहेत.'

No comments:

Post a Comment