Thursday, November 7, 2013

दर्जाहीन विद्यार्थ्यांमुळे MPSC चिंतेत

दर्जाहीन विद्यार्थ्यांमुळे MPSC चिंतेत



राज्य लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससीसाठी इच्छुक आणि पात्र विद्यार्थ्यांचा दर्जा घसरल्यामुळे खुद्द एमपीएससी चिंतेत आहे. दर्जाहीन विद्यार्थ्यांच्या चिंतेमुळे एमपीएससीचे अध्यक्ष सुधीर ठाकरे यांनी त्याबाबतचं पत्रच राज्यपालांना लिहिलं आहे.

सध्या विद्यापीठांतून पदवी घेऊन बाहेर पडणारे विद्यार्थी, दर्जाहीन असल्याचं ठाकरे यांनी म्हटलं आहे. त्यामुळे एमपीएससीसाठी दर्जेदार उमेदवार मिळत नसल्याची खंत ठाकरेंनी राज्यपालांकडे मांडली आहे.

इंजिनिअरिंगसह सर्वच पदवीध विद्यार्थी जे एमपीएससीसाठी पात्र ठरलेत, त्यांची राज्य सेवा कर्मचारी म्हणून काम करण्यास गुणवत्ता कमी असल्याचं , ठाकरे यांनी पाच पानी पत्रात म्हटलं आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive