Saturday, April 28, 2012

Meet the Powerful Young Indian PoliticiansMost of the Indian citizens expect that it would be better if the country has young and energetic leaders to lead the country along with experienced senior politicians. Yes, it is true that the Indian politics must give an equivalent chance to the courageous youngsters who wish to rule and contribute to the society and the country. The citizens of India are cautiously electing their leaders who are capable of taking a note on the welfare of the society. Likewise, at present many of the youngsters are been given a chance to showcase their talent in the Indian politics. Here are some of the known young Indian politicians who have been elected to rule the society.


1. Akhilesh Yadav:


Born in the year 1973, Akhilesh is the son of Samajwadi Pary President and the Ex-Chief Minister of Uttar Pradesh [UP] Mulayam Singh Yadav. He is the present Chief Minister of the State of Uttar Pradesh. In the year 2000, he was elected to the Lok Sabha from the Kannauj in the by-election and he was successful in retaining his seat for the years 2004 and 2009 in the general election.  Before becoming the CM of Uttar Pradesh, he successfully led the campaign to bring the Samajwadi Party to get back its power in this year’s assembly election. He completed his Civil Engineering degree from Sri Jayachamarajendra College of Engineering, Mysore. After completing his degree in civil engineering, he did his Masters in Environment engineering from Sydney University.  His way of campaigning style introduced modern elements in the campaigning style of the Samajwadi Party and he was successful in attracting young voters and people from various communities during his Rath Yatra which was conducted across the State of UP.2. Rahul Gandhi:


Rahul Gandhi [Born in the year 1970], General Secretary of the Indian National Congress, is the son of Rajiv Gandhi and Sonia Gandhi. After completing his Bachelor of Arts in 1994 from the Rollins College,he moved on to Trinity College of Cambridge University to complete his M.Phil in 1995. He announced his entry into politics in the year 2004 by announcing that he would contest in that year’s May elections for the Lok Sabha seat from his father’s former constituency of Amethi in Uttar Pradesh.  The seat was been held by his mother until she transferred to Rae Barelly seat. At that time, Congress party was really doing bad in Uttar Pradesh by holding only 10 out of 80 Lok Sabha seats.
3. Milind Deora:


Born in the year 1976, Milind Deora is the member of 15th Lok Sabha which is the lower house of Parliament of India from South Mumbai constituency. He is the son of veteran politician Murali Deora , who was the Member of Parliament from the same South Mumbai constituency between the years 1984 and 1996. Milind is the Bachelor of Arts degree holder in Business and Political Science from the University of Boston.  Apart from being a political leader, Milind Deora is the founder of SPARSH which is the social initiative aiming to educate students in computer and IT proficiency.  In the year 2011, he was made the Minister of State for Communications and Information Technology. 
4. Sachin Pilot:


Sachin Pilot is the son of former Congress politician and Union Minister Late Rajesh Pilot who was also a Squadron Leader in the Air Force.  Sachin is a Management graduate from the esteemed Wharton Buisness School from the University of Pennsylvania, U.S.A. He is at present the Minister of State for IT and Communication and represents the Ajmer constituency of Rajasthan and is the member of the Indian National Congress.5. Agatha Sangma:


Agatha Sangma represents the Tura constituency from the State of Meghalaya as the candidate of the Nationalist Congress Party. She is considered to be the youngest member of the Parliament and also the youngest Minister. She is the Minister of State for Rural Development. Agatha is the daughter of prominent Indian politician and the former speaker of the Lok Sabha P.A. Sangma.  She holds a Masters Degree in Environment Management from the University of Nottingham, United Kingdom.

कंबोडियातील शिल्पवैभव India in Cambodia


कंबोडियातील शिल्पवैभव

altपुष्पा जोशी
altकंबोडियाच्या सियाम रीप आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरून बसने हॉटेलवर आलो. येथून जवळच असलेल्या अंगकोर येथे ८०० वर्षांपूर्वी बांधलेल्या हिंदू देवालयांचा शिल्पसमूह तब्बल ७७ चौरस कि. मी. एवढय़ा प्रचंड परिसरात पसरलेला आहे. सॅण्डस्टोन, विटा व लाल-पिवळा कोबा वापरून उभारलेले हे शिल्पांचे महाकाव्य जगातील सर्वात मोठे धार्मिक शिल्पकाम समजले जाते. येथील अद्वितीय शिल्पकलेवर तामिळनाडूतील चोला शैली तसेच ओरिसा शैलीचा प्रभाव जाणवतो. प्राचीन काळापासून इथे खमेर संस्कृती नांदते आहे. आजही येथे ९० टक्के लोक खमेर वंशाचेच आहेत. त्यांची लिपी आणि भाषाही खमेर आहे. अंगकोर ही कंबोडियाची राजधानी होती. सोळाव्या शतकात साहसी युरोपियन प्रवाशांना येथील घनदाट जंगलात भ्रमंती करताना या मंदिरशिल्पांचा अकस्मात शोध लागला. अंगकोर वाट (वाट म्हणजे मंदिर) हे बरेचसे सुस्थितीत असलेले प्रमुख देवालय राजा सूर्यवर्मन (द्वितीय) याच्या कारकीर्दीमध्ये १२ व्या शतकाच्या पूर्वार्धात बांधण्यात आले. या अतिशय भव्य, देखण्या मंदिराला पाच गोपुरे आहेत. यातील मधले उंच गोपूर हे मेरू पर्वताचे प्रतीक मानले जाते. ही मेरू पर्वताची पाच शिखरे (गोपुरे) मध्यवर्ती मानून साऱ्या विश्वाची प्रतीकात्मक स्वरूपात उभारणी होईल अशा पद्धतीने पुढील प्रत्येक राजाने इथले बांधकाम केले आहे. मंदिराभोवतालचे तळे हे क्षीरसागराचे प्रतीक मानले जाते. गुलाबी कमळांनी भरलेल्या तळ्यात मंदिराचे देखणे प्रतिबिंब पाहून मंदिर प्रांगणातील उंच दगडी पायऱ्या चढायला सुरुवात केली. जगातील सर्वात मोठी श्री विष्णूंची आठ हात असलेली भव्य मूर्ती येथे आहे. शंख, चक्र, गदा, पद्म धारण केलेल्या, खांद्यावरून सिल्कचे सोवळे पांघरलेल्या या मूर्तीची आजही पूजा केली जाते; परंतु या मूर्तीचे मस्तक आता भगवान बुद्धाचे आहे. खमेर संस्कृतीमध्ये हिंदू व बौद्ध या दोन्ही धर्माचा प्रभाव होता. श्री विष्णूचे मूळ मस्तक आता म्युझियममध्ये आहे.
या मंदिराच्या दोन्ही बाजूंच्या लांबलचक ओवऱ्या, त्यावरील सलग, उठावदार, प्रमाणबद्ध कोरीवकामामुळे जगप्रसिद्ध आहेत. सलग ६०० मीटर लांब व दोन मीटर उंच असलेल्या या पॅनेलवर रामायण व महाभारत यांतील अनेक प्रसंग अत्यंत बारकाईने कोरलेले आहेत. कुरुक्षेत्रावर लढणारे कौरव-पांडवांचे प्रचंड सैन्य, हत्ती, घोडे, रथ व त्यावरील योद्धे, बाणाच्या शय्येवर झोपलेले भीष्म, बाणाने वेध घेणारे द्रोणाचार्य, भूमीत रुतलेले रथाचे चाक वर काढणारा कर्ण, अर्जुनाच्या रथाचे सारथ्य करणारा श्रीकृष्ण, हत्तीवरून लढणारा भीम व त्याच्या ढालीवरील राहूचे तोंड असे अनेकानेक प्रसंग कोरले आहेत. पायाला बांधलेल्या उखळीसकट रांगणारा कृष्ण, कृष्णाने करंगळीवर उचललेल्या गोवर्धन पर्वताखाली आश्रय घेणारे गुराखी व गायी, आपल्या २० हातांनी कैलास पर्वत हलविणारा रावण, पार्वतीच्या विनंतीवरून शंकराला बाण मारणारा कामदेव, त्याच्या मृत्यूनंतर रडणारी रती, वाली व सुग्रीव युद्ध, वासुकी सापाची दोरी करून समुद्रमंथन करणारे देव-दानव, त्या समुद्रातून वर आलेले मासे, मगरी, कासवे, आकाशातील सूर्य-चंद्र, कुर्मावतारातील विष्णूने तोलून धरलेला मंदार पर्वत अशा अनेक शिल्पाकृती पाहून आपण विस्मयचकित होतो.
दुसऱ्या बाजूच्या पॅनेलवर सूर्यवर्मन राजाची शाही मिरवणूक आहे. यात प्रधान, सेनापती, प्रजाजन, हत्ती, घोडे, रथ व बासरी, ढोलकी, गाँग वाजविणारे वादक दाखविले आहेत. त्यापुढील पॅनलवर हिंदू पुराणांतील स्वर्ग, नरक, देवदेवता, रेडय़ावरील यमराज दाखविले आहेत. या सबंध मंदिरात मिळून जवळजवळ १८०० अप्सरांची पूर्णाकृती शिल्पे आहेत.  विविध ठिकाणी शंकर, मारुती, गणपती यांच्या छोटय़ा मूर्ती आहेत. हे गणपती दोन हातांचे, सडपातळ व सोंड पुढे वाकलेली असे आहेत. जिथे गणपतीला चार हात आहेत, तिथे मागील दोन हातांत कमल व चक्र आहे.
वास्तुशास्त्राचा अजोड नमुना म्हणून वाखाणलेल्या या देवालयाचे एकावर एक तीन मजले आहेत. लांबलचक कॉरिडॉर्स नि उंच जिन्यांनी ते एकमेकांना जोडलेले आहेत. दुसऱ्या मजल्यावर जाताना भगवान बुद्धाचे उभे व बसलेले वेगवेगळ्या मुद्रांमधील अनेक पुतळे आहेत. गॅलरीच्या दोन्ही बाजूंच्या खांबांवर नागाची शिल्पे आहेत. तिसऱ्या मजल्यावर जाण्याकरता पाच मजली उंच शिडी चढून जावे लागते. तेथील गच्चीवरून या मंदिराची रचना व आजूबाजूचा भव्य परिसर न्याहाळता येतो. मंदिराच्या गॅलऱ्यांचे दगडी खांब एखाद्या लेथवर केल्यासारखे सुरेख वळणावळणांचे आहेत. 
अंगकोर थोम (शहर) येथील गुलाबी कमळांच्या तळ्यावरील छोटा पूल ओलांडला की रस्त्याच्या एका बाजूला देव, तर दुसऱ्या बाजूला दानव सात फण्यांच्या नागाचे लांबलचक जाड अंग धरून समुद्रमंथन करताना दिसतात. या नगरीचे प्रवेशद्वार २३ मीटर म्हणजे जवळजवळ सात मजले उंच आहे. त्यावर चारी दिशांना चार तोंडे असलेली भव्य मूर्ती आहे. पायथ्याशी दोन्ही बाजूंना तीन मस्तके असलेला सोंडेने कमळे तोडणारा इंद्राचा ऐरावत आहे. त्यांच्या सोंडा प्रवेशद्वाराचे खांब झाल्या आहेत. अशी पाच प्रवेशद्वारे असलेल्या या शहराचा बराचसा भाग आज जंगलांनी व्यापला आहे. 
आठ मीटर उंच व प्रत्येक बाजू तीन किलोमीटर लांब अशी भक्कम लाल कोब्याची संरक्षक भिंत या शहराभोवती उभारण्यात आली होती. त्यापैकी फक्त दक्षिणेकडील भाग आज सुस्थितीत आहे. प्रत्येक कोपऱ्यात उंच देवालय तसेच लोकेश्वर बुद्धाची देवळे आहेत. मुख्य बेयॉन देवालय तीन पातळ्यांवर असून त्यावर ५४ उंच मनोरे आहेत. प्रत्येक मनोऱ्यावर राजाशी साम्य असलेले चार हसरे चेहरे आहेत. फणा उभारलेले नाग, गर्जना करणारे सिंह आहेत. सहा दरवाजे असलेल्या लायब्ररीसारख्या इमारती बऱ्याच ठिकाणी आहेत. त्यावरील पट्टिकांवर कमळे, देवता कोरल्या आहेत. एक आरोग्यशाळा (हॉस्पिटल) आहे. एके ठिकाणी नागाच्या वेटोळ्यावर बसलेली, चेहऱ्याभोवती नागाचा फणा असलेली १२ फूट उंचीची भगवान बुद्धाची पद्मासनात बसलेली मूर्ती आहे. उंच चौथऱ्याच्या खालील बाजूला अप्सरा, चायनीज व खमेर सैनिक, वादक, प्राण्यांची शिकार, शिवलिंग, आई व मूल, बाळाचा जन्म, मार्केटमध्ये भाजी-फळे विकणाऱ्या स्त्रिया, माकडे, कोंबडय़ांची झुंज, मोठा मासा, गरुडावरील विष्णू, नौकाविहार करणाऱ्या स्त्रिया अशी शिल्पे आहेत. एका चौथऱ्याखाली हत्तींची रांग, तर एके ठिकाणी मनुष्यधडाला एकदा गरुडाचे व एकदा सिंहाचे तोंड असलेली अनेक शिल्पे आहेत. पोलोसारखा खेळ खेळताना ते दाखविले आहेत. अगदी खालच्या पातळीवर पाताळातील नागदेवता, जलचर आहेत. नाक तुटलेला, हाताचा अंगठा नसलेला व लिंग नसलेला एक राजा कोरलेला आहे. त्याला 'लेपर किंग' असे म्हणतात. जयवर्मन सातवा व जयवर्मन आठवा यांच्या कारकीर्दीत हे शहर उभारले गेले आहे.
दा फ्राम येथील शिल्पकाम जयवर्मन सातवा याच्या काळात बाराव्या-तेराव्या शतकात झाले. येथे त्याने आपल्या आईसाठी यज्ञगृह व ध्यानगृह उभारले होते. भगवान बुद्धाच्या आयुष्यातील विविध प्रसंग इथे कोरलेले आहेत. द्वारपाल, भूमिदेवता, लायब्ररी, नृत्यालय, घोडेस्वारांची मिरवणूक, पुराणातील प्राणी असे सगळे शिल्पकाम गाइडने दाखविल्यावरच आपल्याला दिसते. कारण प्रचंड वृक्षांनी आपल्या मगरमिठीत हे शिल्पकाम जणू गिळून टाकले आहे. सावरीच्या कापसाची झाडे व एक प्रकारच्या अंजिराच्या जातीच्या झाडांनी या बांधकामातील भेगा रुंद करून आपली पाळेमुळे त्यात घुसवून शिल्पांवर कब्जा केला आहे.
बान्ते सरायचा शोध १९३६ साली लागला. गुलाबी सॅण्डस्टोनमधील येथील शिल्पकाम अत्यंत सुबक, शोभिवंत आहे. मूर्तीभोवतीच्या महिरपीवरील नक्षी, कमळे, पाने, फुले, फळे, पक्षी यांनी सुशोभित आहे. नंदीवर बसलेले उमा-महेश्वर, हिरण्यकश्यपूचा वध करणारा नृसिंह, इंद्राचा ऐरावत, सीताहरण, सुंद-उपसुंद यांची लढाई, भीम-दुर्योधन गदायुद्ध, शिवाचे तांडवनृत्य, सिंहरूपातील दैत्यावर नर्तन करणारी दुर्गा, शिवावर बाण मारणारा कामदेव, खांडववनाला लागलेल्या आगीवर पाऊस पाडणारा इंद्र आणि त्या पावसाला अडविण्यासाठी अर्जुनाने उभारलेले बाणांचे छप्पर, कृष्णाने केलेला कंसवध, कुबेर, हंसावरील देवता अशा अनेक देखण्या शिल्पांनी सजलेले छोटे असे हे मंदिर म्हणजे खमेर कलाकुसरीचा उत्कृष्ट नमुना आहे. माकड, गरुड, सिंह, अप्सरा, शंकराच्या मांडीवर बसलेली पार्वती, सज्जे, दरवाजांवरील छज्जे (लिंटल) असे सारे सुंदर उठावदार नक्षीकाम आणि शिल्पकामाने इंच न् इंच भरलेले आहे.
युनेस्कोने जागतिक वारसा म्हणून जाहीर केलेल्या इथल्या शिल्पांचे संरक्षण व पुनर्बाधणी करण्यासाठी जपान, चीन, फ्रान्स असे अनेक देश मदत करीत आहेत. भारताच्या पुरातत्त्व खात्यातर्फे येथील दोन मंदिरांत पुनर्निर्माणाचे काम करण्यात येत आहे. परंतु येथील अनेक मूर्ती चोरून विकण्यात आल्या आहेत, तसेच पॉल पॉटच्या कारकीर्दीत त्यांचा विद्ध्वंसही करण्यात आला आहे. अनेक शतके पिचत पडलेल्या कंबोडियाच्या राजवटीने गेल्या दहा वर्षांत आपली दारे जगासाठी उघडली आहेत. या दहा वर्षांत पर्यटनाच्या दृष्टीने अनेक सोयी-सुधारणाही करण्यात आल्या आहेत. सांस्कृतिक आणि आध्यात्मिक समृद्धी असलेल्या कंबोडियाला आपले पूर्ववैभव लवकरच प्राप्त करता येईल अशी आशा करूया.


डोकी रिकामी करणारं ‘ई-जाल’ऑनलाइन अँडिक्शनमुळे मन बिथरतंय आणि डोकी थंड पडू लागली आहेत !

खूप काम करतोय.
खूप तास करतोय.
पण कामात लक्षच लागत नाही.?
मनासारखं कामच होत नाही.?
गुणवत्ता घसरणीला लागली आहे..?
कामाचे तास वाढले तरी कामं संपतच 
नाहीत.?
का.?
विचारा स्वत:ला.
-तुम्ही दिवसभराचे किती तास इंटरनेटवर 
घालवता.?
-------**-------
नाही बसत तुम्ही घरी किंवा ऑफिसला
खुर्चीला चिकटून.?
नाही करत चॅटिंग.
पण मोबाईलवर नेट अँक्सेस आहे 
तुम्हाला.?
सतत वापरता टिटर 
हा काय म्हणाला आणि तो काय म्हणाला.
तुमच्या डोक्यात भिरभिरत राहतं
ते सारं.
आणि विसरूनच जाता तुम्ही
रोजची महत्त्वाची कामं.?
त्यावरून मग गिल्टी पण वाटतं तुम्हाला.?
-------**-------
आपण एक काम सुरू करतो.
मग त्यात काही मजाच वाटत नाही.
मग दुसरं सुरू करतो.
त्यातही काही मजा येत नाही.
एकही काम धड होत नाही.
एकावेळेस अनेक गोष्टी चालतात डोक्यात.
अनेक विचार.
विचारांची ट्रॅफिक जाम.
असं होतं कधी.?
पण मग तपासा
ही सारी कामं करताना
तुमच्या कॉम्प्युटरवर किती खिडक्या 
उघड्या असतात.?
-------**-------
-हे असं सारं होत असेल.?
तर नक्की ओळखा की, 
तुम्ही नेट डिस्ट्रॅक्शनचे बळी आहात.
तुम्हाला व्यसन लागलं असो नसो नेटचं.
पण त्यातून तुमचं मन बिथरलंय.
कामातलं लक्षच नाही, तर
कामच डोक्यातून उडवणारं हे बिथरलेपण 
आपणच थांबवायला हवं.
पण त्यासाठी जरा नेट मिनिमाईज करून, 
आयुष्याची खिडकी मॅक्सिमम उघडली 
पाहिजे.!
-------**-------
परीक्षा तोंडावर आल्या आहेत.
अभ्यास करू तेवढा कमी.
पुस्तकं समोर घेतलीही जातात.
पण मन लागत नाही.
अभ्यास करावासाच वाटत नाही.
कितीही समजावलं स्वत:ला
तरी चित्त अभ्यासात लागत नाही.
वाटतं, काहीतरी मिसिंग आहे.
असं होतं तुमचं.?
-विचारा स्वत:ला.
तुम्ही दिवसभराचे किती तास इंटरनेटवर 
घालवता.?
-------**-------
रविवारची एखादी संध्याकाळ.
एखाद्या मैफलीला गेला होतात तुम्ही.?
नाटकाला.?
सिनेमाला? 
एखाद्या भाषणाला.?
जुन्या मित्रांना भेटायला.?
एखाद्या लग्नाला, मुंजीला, बारश्याला.?
नाही.!
बोअर होतं हे सारं.
मग त्या वेळेत काय केलंत.
घरी बसून नेटवर टाइमपास.?
का असं होतं.?
आपण माणूसघाणे झाले आहोत का.?
-------**-------
बोअर होतं संध्याकाळी.
उदास.
लोक किती काय काय करतात
आणि आपलं आयुष्य अजिबात हॅपनिंग 
नाही
असं वाटतं.
डोकं जड होतं.
अंग दुखतं असं वाटतं.?
मग तपासा, दिवसभरात काहीच घडलं 
नाही किंवा केलं नाही आपण काम.
नुस्तं सर्फिंगच केलं.?


Shri Ramnavami श्रीरामनवमीला राशीनुसार करा श्रीरामाची उपासना

                                                                                                                                                                        
                                                                                                                                                                                                                                      श्रीविष्णूचा सातवा अवतार श्रीराम याच्या जन्माप्रीत्यर्थ श्रीराम नवमी साजरी करतात. या दिवशी पुष्य नक्षत्रावर, माध्यान्ही, कर्क लग्नी सूर्यादी पाच ग्रह असतांना अयोध्येत श्री रामचंद्रांचा जन्म झाला.

धर्मग्रंथानुसार यादिवशी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाचा जन्म झाला होता. यावर्षी एक एप्रिलला रविवारी श्रीरामनवमी आहे. या दिवशी दिवसभर पुष्य नक्षत्र रहाणार आहे. त्याचबरोबर पूर्ण दिवस सर्वार्थ सिद्धि योग आहे.

श्रीरामाचा सूर्यवंशात जन्म झाला आहे. आणि या वर्षी रामजन्म सूर्याचे स्वामित्व असलेल्या रविवारी आहे, त्यामुळे हा रविवार अधिक शुभफळ देणारा आहे. 

सर्व राशीच्या लोकांसाठी रविवारी श्रीरामाची उपासना विशेषफलदायी असेल. राशीनुसार करा श्रीरामाची उपासना....

मेष - श्रीरामाल सुगंधित फुल अर्पण करा.

वृषभ - श्रीरामाच्या दरबाराचे पूजन करा आणि फळ अर्पण करा.

मिथुन - श्रीरामनामाचा यथासंभव जप करा.

कर्क - श्रीरामरक्षास्तोत्राचे पाठ करा. 

सिंह - श्रीराम, सीतेचे दर्शन घ्या आणि सुंदरकांडाचे पाठ करा.

कन्या - श्रीरामाला सुगंधित द्रव्य समर्पित करा.

तूळ - श्रीरामाला चंदनाचे गंध लावा.

वृश्चिक -  श्रीरामाला फळ-फुल अर्पण करा. 

धनु - श्रीरामाच्या दरबाराचे दर्शन करा.

मकर - श्रीरामाष्ट्काचे पाठ करा. 

कुंभ - श्रीरामाची आणि सीतेची पूजा करा.

मीन - श्रीरामाची स्तुती करा.

History of lords Cricket ground लॉर्डस्, क्रिकेट संस्कृति जपणारे पवित्र मैदानलॉर्डस्, क्रिकेट संस्कृति जपणारे पवित्र मैदान

(२१जुलै १८८४साली इंग्लंड वि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला कसोटी सामना लॉर्डस् मैदानावर खेळवला गेला.१२७ वर्षांनी याच मैदानावर भारत इंग्लंड दरम्यान १००वा कसोटी सामना खेळवला जात आहे आणि आयसीसी ने कारभार हाती घेतल्यापासूनचा हा २०००वा कसोटी सामना आहे हा कमाल योगायोग समजला जाईल)

काही जागाच अशा असतात की जिथे गेल्यावर मंदिरात गेल्याचा भास होतो.सर्व टेस्ट प्लेयींग देशांचा दौरा आणि जगातील जवळपास १०० मैदाने पालथी घातल्यावर मनोमन भारावून जाण्याचा प्रसंग फक्त तीनदा आला.ऑस्ट्रेलियातील ऍडलेड गावी सर डॉन ब्रॅडमन यांचे घर आणि त्यांच्या नावे उभारलेले म्युझियम बघताना, दुसर्‍यांदा बार्बाडोस येथील युनिव्हर्सीटी ऑफ ३ डब्ल्यूज् वरील सर फ्रँ क वॉरेल यांचे थडगे आणि त्या समोरील वॉक ऑफ फेम बघताना आणि तिसरी जागा म्हणजे क्रिकेटची पंढरी समजल्या जाणार्‍या लॉर्डस् मैदान.१९८२ साली इंग्लंडला खेळायला गेलो असताना इंग्लंड आणि बलाढ्य वेस्ट इंडिज सामना बघताना खरोखरच भारावून गेलो होतो.तो दिवस आणि आजचा दिवस आहे वारीला जाणार्‍या वारकर्‍याप्रमाणे मी लॉर्डस्‌ची वारी मनोभावे करत आलो आहे.आज २१जुलै २०११रोजी लॉर्डस् मैदानावर होणार्‍या भारत वि इंग्लंड सामन्याला वेगळे महत्त्व आहे.भारत वि इंग्लंड दरम्यान होणारा हा १००वा कसोटी सामना आहे तर आयसीसीने क्रिकेट कारभार हाती घेतल्यापासूनचा हा २०००वा कसोटी सामना आहे.जगात खूप चांगली क्रिकेट मैदाने असली तरी लॉर्डस्‌ची शान वेगळी आहे यात शंका नाही.गेली १८१४साली लंडनच्या सेंट जोन्स वुडस् भागात लॉर्डस् मैदान वसवण्यात आले याचाच अर्थ असा की १९७वर्षांच्या क्रिकेटच्या इतिहासाचे हे मैदान साक्षीदार ठरले आहे.क्रिकेटची संस्कृती जपणार्‍या या पवित्र वास्तूचा इतिहास काय आहे हे समजून घेऊयात.

इतिहासाच्या पानात नजर टाकली तर समजते की १७८७ साली मेरलीबोन क्रिकेट क्लबची स्थापना झाली.लंडन शहराचा विकास होत गेला आणि क्रिकेट सामने बघायला प्रेक्षक गर्दी करू लागले तशी मोठ्या सुनियोजित मैदानाची गरज क्लबला भासू लागली.त्याकाळातील क्लब सदस्यांनी क्रिकेट प्रेमी श्रीमंत व्यक्ती थॉमस लॉर्ड यांना मार्ग काढण्याकरता विनंती केली.महत्त्वाकांक्षी लॉर्डस् यांनी लंडनच्या मध्य वस्तीतील मेरलीबोन भागातील डोरसेट फिल्ड्‌स् जागा दीर्घ करारावर भाड्याने घेतली.३१मे १७८७ रोजी मिडलसेक्स विरुद्ध इसेक्स सामना भरवला गेला आणि मेरलीबोन क्रिकेट क्लबची सुरुवात झाली.इतकेच नाही तर त्या दिवशीपासून मेरलीबोन क्रिकेट क्लबने क्रिकेट खेळण्याचे नियम घातले.तेव्हा पासून ते आजपर्यंत क्रिकेटच्या नियमांचे कर्ताधर्ता मेरलीबोन क्रिकेट क्लब आहे.भाडे तत्त्वावर मिळालेल्या मैदानावर २५ वर्ष क्लब चालवल्यावर क्लबच्या मालकीचे स्वत:चे मैदान उभारण्याचा विचार थॉमस लॉर्ड यांच्या मनात डोकावला.१८११साली सेंट जोन्स वुडस् भागात जागा घेऊन आधुनिक मैदानाची उभारणी केली गेली आणि १८१४साली बदकांच्या तळ्याच्या जागी मेरलीबोन क्रिकेट क्लबचे मैदान उभे राहिले.१८२५साली थॉमस लॉर्ड यांनी मैदान ५०००पाऊंडाला विकून टाकले तरी आजही मैदानाचे नांव लॉर्डस् कायम राहिले आहे असा पगडा थॉमस लॉर्ड यांच्या कर्तृत्वाचा राहिला आहे.

काळानुसार बदलत गेलेल्या या मैदानाने १८६४ साली पहिले गवत कापण्याचे मशीन घेतले जेव्हा पहिल्या पगारी ग्राऊंडस्‌मनची नेमणूक क्लबने केली.तसेच १८८९ साली लॉर्डस् मैदानावरील जगविख्यात नव्या पॅव्हेलियन इमारतीचे काम २०हजार पाऊंड कर्ज घेऊन चालू केले गेले.तेव्हा पासून ते आजपर्यंत ही इमारत जगातील एक सर्वांत ओळखली जाणारी खेळ वास्तू बनली आहे.अगदी आत्ताच्या काळापर्यंत मेरलीबोन क्रिकेट क्लबमध्ये महिलांना सदस्य बनता येत नव्हते.कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी चहापानाच्या वेळेला इंग्लंडच्या राणीला फक्त पॅव्हेलीयनमधून येता यायचे.नंतर मात्र काळानुरूप हा नियम बदलून महिलांना सदस्य करून घेण्यात आले.मेरलीबोन क्रिकेट क्लबचे सदस्य व्हायचे असले तर बरेच नियम आणि अटी आहेत त्या बरोबर (फक्त) १८ वर्षांचे वेटींग लीस्ट आहे.

पत्रकार कक्ष म्हणजेच मिडिया सेंटर हे लॉर्डस्‌ची शान आहे.संपूर्ण ऍल्युमीनीयमपासून बनवलेल्या या मिडिया सेंटरची उभारणी शिप यार्डवर झाली.जमीनीपासून ४५ फूट उंचीवर हे मिडिया सेंटर वसवले गेले आहे.या जागेवरून सामना ज्या प्रकारे स्पष्ट दिसतो त्याला खरोबखरच तोड नाही.
===========================================================
आम्ही नशीबवान होतो: सौरव गांगुली- राहुल द्रविड

क्रिकेट खेळणार्‍या प्रत्येक खेळाडूचे स्वप्न असते की ऐतिहासिक लॉर्डस् मैदानावर किमान एकदा तरी सामना खेळायचा.आमचे सुदैव असे की आमच्या कसोटी कारकिर्दीला सुरुवात लॉर्डस् मैदानावर झाली.''आम्ही खरच नशीबवान होतो''.१९जूनचा १९९६ चा तो दिवस अजून स्पष्ट आठवतो जेव्हा कप्तान अझरुद्दीनने सामन्याच्या आदल्या दिवशी आम्हांला तुम्ही उद्या खेळत आहात असे सांगितले.कसोटी पदार्पणाच्या ते सुद्धा लॉर्डस् मैदानावर म्हणल्यावर सामन्याच्या विचारांनी चांगली झोपही लागली नाही.माईक आथरटनच्या नेतृत्वाखाली खेळणारी इंग्लंडची टीम तगडी होती.पहिल्या डावात इंग्लंडचा निम्मा संघ लवकर बाद करण्यात गोलंदाजांना यश आले असताना ग्रॅहम थॉर्प आणि माईक रसेलच्या भागीदारीने इंग्लंडचा डाव सावरला.इंग्लंडचा डाव ३४४ धावात संपला.विक्रम राठोड बाद झाल्यावर सौरव फलंदाजीला गेला.पदार्पणाच्या दडपणाचा कोणताही लवलेश त्याच्या चेहर्‍यावर नव्हता.सौरवने सचिन सोबत भागीदारी करून डावाला चांगली सुरुवात केली.निम्मा संघ बाद झाल्यावर राहुल द्रविड मैदानात आला.राहुल द्रविड समोर सौरवने शतक केले तर त्याच्या शतकाला फक्त ५ धावा कमी पडल्या.

सौरव सांगतो, ''माझे शतक जवळ आले असताना कोलकात्यात दिवे गेले.माझ्या घरच्यांना प्रचंड दडपण आले.माझे काका लंडनला राहतात त्यांनी घरच्यांना फोनवरून जणू धावते समालोचन ऐकवले.माझे शतक पूर्ण झाल्यावर घरात एकच जल्लोष झाला.माझ्या आणि राहुलच्या कारकिर्दीला सुंदर सुरुवात झाली''.

राहुल द्रविडला अजून एका सामन्याची आठवण ताजी आहे.''असाच अजून एक सामना भारतीय संघाकरता संस्मरणीय ठरला होता तो म्हणजे १३ जुलै २००२ चा नॅटवॅस्ट ट्रॉफीचा शेवटचा सामना.इंग्लंडने उभारलेल्या ३२५ धावांचा मोठा स्कोअरचा पाठलाग भारतीय संघाने ज्या जिगरीने केला तो सामना विसरता येणार नाही.सामना जिंकल्यावर लॉर्डस्‌च्या बाल्कनीत झालेला दंगा आणि सौरवने फिरवलेला शर्ट मनात कायमचा कोरला गेला आहे'', द्रविडने सांगितले.''अशा लॉर्डस् मैदानावर भारत इंग्लंड दरम्यानचा ऐतिहासिक सामना खेळवला जाणार आहे.मालिकेची सुरुवात भारलेल्या वातावरणाने होणार आहे ज्याची सगळ्यांना प्रतीक्षा आहे'', शेवटी द्रविड म्हणाला.
============================================================

स्मृती आणि परंपरा

*लॉर्डस् मैदानावर गेल्यावर क्रिकेट मंदिरात गेल्याचा आभास निर्माण होतो कारण इथे क्रिकेट परंपरांना मानाचे स्थान आहे.पॅव्हेलियनच्या मुख्य इमारतीत खेळाडू आणि मेरलीबोन क्रिकेट क्लबचे सदस्य फक्त जाऊ शकतात.खेळाडूंना क्रिकेटचे कपडे अंगावर असणे गरजेचे असते तसेच सर्व मेंबर्सना एमसीसीचा पिवळा-लाल टाय आणि जॅकेट सक्तीचे आहे.चपला घालून कोणी या इमारतीत वावरू शकत नाही.नियमाला अपवाद अर्थातच कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी सामना बघायला येणार्‍या इंग्लंडच्या राणीला असतो.
*पॅव्हेलियनच्या बाजूला संपूर्ण आकाराचा साईट स्क्रीन नाहीये कारण त्या स्टँडमध्ये मेंबर्स बसतात.गोलंदाजाच्या हातामागे हालचाल न करता शिस्त पाळत हे मेंबर्स क्रिकेटचा आनंद लुटतात.पॅव्हेलियनच्या बाजूचा साईट स्क्रीन अर्ध्या आकाराचा आहे.
*प्रत्येक सामन्याचा प्रत्येक दिवसाचा खेळ चालू होण्या अगोदर खेळाडूंना पूर्वसूचना द्यायला लॉर्डस्‌च्या लॉंगरूममध्ये असलेली मोठी पितळी घंटा वाजवली जाते.सामन्याला हजर असलेल्या महान माजी खेळाडूला घंटा वाजवायला आदराने बोलावले जाते जो मान समजला जातो.
*लॉर्डस् पॅव्हेलियनच्या डाव्या बाजूने उजव्या बाजूला मैदानाला उतार आहे.डोळ्याला तो सहज दिसत नसला तरी चांगला ८ फूट उतार मैदानाला आहे.मधल्या काळात हा उतार दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला जो फार यशस्वी झाला नाही.
*२०१२ साली लॉर्डस् मैदानावर लंडन ऑलिंपिक्स मधील तिरंदाजी स्पर्धा खेळवली जाणार आहे.
*१९९८सालापर्यंत मेरलीबोन क्रिकेट क्लबने महिलांना सदस्य करून घेतले नव्हते.आता माजी खेळाडूंसह ७४ महिला क्लबच्या सदस्य आहेत.
============================================================

*१९८३साली भारताने लॉर्डस् मैदानावर बलाढ्य वेस्ट इंडियन संघाला पराभूत करून वर्ल्ड कप जिंकला.
*भारतीय संघाने लॉर्डस् मैदानावर खेळलेल्या तीन सलग कसोटी सामन्यात दिलीप वेंगसकरांनी शतक झळकावण्याची कमाल केली.
*२००२साली सौरव गांगुलीच्या कप्तानीखाली भारतीय संघाने नॅटवेस्ट ट्रॉफीच्या अंतिम सामन्यात ३२५ धावांचा पाठलाग करून सामना जिंकला.विजयाचा आनंद सौरवने शर्ट काढून फिरवला जो क्षण सर्वांच्या मनात कोरला गेला आहे.
=========================================================
कथा 'ऍशेसची'

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान होणार्‍या कसोटी मालिकेला 'ऍशेस' म्हणले जाते.जेमतेम ४ इंच उंचीच्या या ट्रॉफीला हाती घेण्याकरता दोनही बाजूचे खेळाडू जिवाचे रान करतात.काय कथा आहे या ट्रॉफीची.१८८२साली ओव्हल मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध जिंकायला इंग्लंडला फक्त ८८ धावांची गरज होती.सगळ्यांना वाटले की सामना इंग्लंड संघाच्या खिशात आहे.झाले भलतेच इंग्लंडचा डाव गडगडला आणि ऑस्ट्रेेलियाने सामना जिंकला.त्या भयानक पराभवाचे पडसाद वर्तमानपत्रातून उमटले ज्यात इंग्लिश क्रिकेट मेल्याचे मथळे देण्यात आले आणि जळलेल्या अवशेषाची राख ऑस्ट्रेलियाला पाठवली जावी असे उपहासात्मक बोलले गेले.पुढच्या दौर्‍याकरता इंग्लंडचा संघ ऑस्ट्रेलियामध्ये पोहोचला असता काही महिलांनी टेराकोटाची राख एका छोट्या कपमध्ये भरून इंग्लिश कप्तानाला सादर केल्या.तेव्हापासून तो कप म्हणजे लढतीची ऍशेस ट्रॉफी बनली.लॉर्डस्‌च्या म्युझियममध्ये तीच मूळ ऍशेस ट्रॉफी जतन करून ठेवली आहे. ============================================================


History of Thane City एका शहराचा दोन हजार वर्षाचा इतिहासएका शहराचा  दोन हजार वर्षाचा इतिहास

सातवाहनकालापासून ठाणे परिसराची अंधुकशी सुरुवात होते. कलियन (कल्याण), ठाणे ते सेमुली (चौल) पर्यंतच्या बंदरातून एतद्देशीय व आंतरराष्ट्रीय व्यापार-उदिमाला वेग येऊन आर्थिक संपन्नता आली. पुढे सातवाहनांनी वैदिक धर्माचा पुरस्कार केला आणि बौद्ध धर्माला राजाश्रय दिला. इंद्र-संकर्षण वगैरे दैवतांची पूजा होऊ लागली. कोरीव लेणी, बौद्ध स्तूप,शिल्पांची निर्मिती असा हा काळ होता. पुढे शिलाहार राजवंशाची कारकीर्द सुरू झाली. त्यांनी दक्षिण व मध्यभारतातून विविध व्यवसायाचे लोक आणून त्यांना आश्रय दिला. गावं वसवली. कालांतराने त्यातूनच नगरं अस्तित्वात आली. कोकणात उत्तम राज्यव्यवस्था सुरू झाल्याने राजधानीच्या शहराची निवड होणं गरजेचं होतं. इसवी सन 9 पासून 13व्या शतकापर्यंत 'श्री स्थानक' अर्थात सध्याचं ठाणे हे उत्तर कोकणच्या राजधानीचं केंद्र झाले. शिलाहारांच्या शिवोपासनेचं प्रतिबिंब त्यांनी बांधलेल्या मंदिरातून आणि तलावातून स्पष्टपणे दिसून येतं.

16 एप्रिल 1856 या दिवशी मुंबई ते ठाणे अशी या देशातील पहिली रेल्वेगाडी सुरू झाली आणि ख-या अर्थाने भारताच्या औद्योगिकीकरणालाच सुरुवात झाली, असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. रेल्वे आल्याचा आनंद लोकांनी वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त केला होता. त्यावेळच्या शाहिरांनीही या नव्या युगाला कवनातून दाद दिली होती. 'हिंदुस्थानी आगीची गाडी,तिला बांधला मार्ग लोखंडी, मनाचाही वेग मोडी.. मग कैची हत्ती घोडी, पाहूनि झाली, माणसे वेडी, पाऊण तासात, ठाण्यास धाडी..' असं गाणं आबालवृद्धांनी गायल्याचं डॉ. दळवींनी नमूद केलं आहे. १९व्या शतकात प्रारंभ झालेल्या अनेक सामाजिक-सांस्कृतिक-शैक्षणिक-औद्योगिक घडामोडींचं ठाणे शहर साक्षीदार आहे. प्रगती आणि विकास यांची मुहूर्तमेढ रोवली गेली त्या या शहराचा 'असे घडले ठाणे' पुस्तकात अत्यंत ओघवत्या भाषेत आढावा घेतला आहे.

विसाव्या शतकाच्या मध्यानंतर मुंबई आणि ठाणे परिसरामध्ये मोठं परिवर्तन घडून आलं. शहरांची महानगरं झाली. स्वातंत्र्योत्तर काळात झालेला असंतुलित आर्थिक विकास,औद्योगिकीकरण, यांत्रिकीकरण, नागरीकरण, दळणवळण तसंच माहिती तंत्रज्ञानाची वाढ, प्रसारमाध्यमांचं वर्चस्व यामुळे मुंबईपाठोपाठ ठाण्याचंही परिवर्तन झालं आहे. प्रगतीच्या टप्प्यांवर समस्या आणि न सुटणारे प्रश्नही निर्माण झाले. अर्थात त्यामुळेही इतिहासाचा अभ्यास अतिशय महत्त्वाचा, अपरिहार्य ठरतो. लेखकानेच म्हटल्याप्रमाणे स्थानिक परंपरांचं संवर्धन झालं नाही तर या भागातील स्थानिक संस्कृतीही अडचणीत येऊ लागली आहे. त्याचसाठी ठाणे व ठाणे जिल्ह्याची सांस्कृतिक पूर्वपीठिका पाहणं आवश्यक ठरतं. कदाचित यासाठी प्राचीन युगातील प्राकृतिक ठाणे, श्रीस्थानक, सांस्कृतिक वारसा, सामाजिक जडणघडण आणि तेव्हाची आर्थिक सुबत्ता यावर डॉ. दळवी यांनी प्रकाशझोत टाकला असावा.

प्राकृतिक ठाण्याचा अभ्यास करताना तत्कालीन बेट, बंदरं, खाडी, नदी-तलाव, जुनी गावं, डोंगर-घाट, वन्यजीव, समाजरचना, भौगोलिक स्थान, मंदिरं, शैली यांची माहिती दिली आहे. तेव्हाचे व्यवसाय, शेती, मासेमारी, कोळी-आगरी समाज, ब्राण, चांद्रसेनीय कायस्थ प्रभू, ख्रिस्ती, प्रोटेस्टंट, रोमन कॅथलिक, पारशी, मुस्लिम, ज्यू, जैन धर्मीयांच्या वसाहती,तेव्हाचं चलन, नाणी, व्यापार वगैरेंची माहिती देताना प्राचीन ठाण्याच्या आर्थिक समृद्धीची तसंच संपन्न लोकजीवनाची कल्पना करता येते. ठाण्याच्या इतिहासावर अनेक पुस्तकं तसंच लेख लिहिण्यात आले आहेत. मात्र अजूनही ठाण्याचा शास्त्रशुद्ध इतिहास लिहिला गेला नाही, अशी खंत डॉ. दळवी यांनी आपल्या मनोगतात मांडली आहे. ज्यांना ठाण्याबद्दल आवड आणि जिव्हाळा आहे, ज्यांच्या मनात 'माझे ठाणे' ही भावना आहे अशा व्यक्तींना ठाण्याचा इतिहास माहीत व्हावा तसंच आपल्या समृद्ध वारशाचं ज्ञान व्हावं यासाठी या पुस्तकाचं प्रयोजन असल्याचं डॉ. दळवी सांगतात. त्यांचे स्नेही आणि इतिहास संशोधक सदाशिव टेटविलकर यांचं या ग्रंथासाठी फार मोठं योगदान असल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. दोन हजार वर्षाचा इतिहास छोटय़ाशा पुस्तकात संकलित करण्याची अवघड जबाबदारी डॉ. दळवी यांनी साध्य केली आहे. मध्ययुगातील या शहराची माहिती देताना बिंब आणि इतर राजवंश, त्यांचे सामाजिक तसेच धार्मिक योगदान, मुस्लिम राजे, कोकण किनारपट्टीवर पोर्तुगीजांचं आगमन, त्यांची ठाण्यावरील राजवट, मराठय़ांनी जिंकलेलं ठाणे तसंच त्यावेळचा परिसर यांचा सविस्तर परिचय करून देण्यात आला आहे. शिलालेख, पुरातन वारसा असणा-या मूर्ती, राहणीमान, बखरी, किल्ले यांचीही माहिती आहे. 1782 मधील ठाणे किल्ल्याचं म्हणजेच सध्याच्या सेंट्रल जेलचं चित्रही या पुस्तकात आहे.

आधुनिक युगाचा आढावा घेताना डॉ. दळवी यांनी 'तेव्हा आणि आता' हे चित्रदर्शन घडवलं आहे. ब्रिटिश सत्तेची सुरुवात कशी झाली आणि त्याचा ठाणे शहराशी कसा संबंध येत गेला याची रंजक माहिती यात आहे. त्यावेळचे वाडे-वास्तू-इमारती-देवळं-मशिदी-चर्च, त्र्यंबकजी डेंगळे यांनी ठाणे किल्ल्यातून केलेलं पलायन, ब्रिटिश सत्तेचा प्रारंभिक प्रतिकार,क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके यांचा लढा, जिलतील पहिलं आयकर विरोधी आंदोलन, रेल्वेचं आगमन, वृत्तपत्रांचा प्रारंभ, जिल्ह्यातील शतकोत्तर ग्रंथालयं, ठाणे नगरपालिकेची स्थापना, पहिली 50 वर्ष, नंतरच्या महानगरपालिकेवर टाकलेला दृष्टिक्षेप, स्वातंत्र्याचं आंदोलन, लढे, शैक्षणिक विकास, सामाजिक तसंच सांस्कृतिक वाटचाल यांच्यासह 'काल आणि आज' या विषयावर विचारमंथन केलं आहे. सर्वाधिक आकर्षणाचा भाग हा परिशिष्टांचा आहे. त्यात सोपाऱ्याचा स्तूप, नाणेघाट, लोनाडचे शिलालेख, एकासार येथील वीरगळ आणि नौकायुद्ध, मराठी भाषेची सुरुवात, पर्यावरण संवर्धन, साष्टीची नाणी यांची माहिती अतिशय सुंदर आहे.

 

डॉ. दळवी यांनी या ग्रंथासाठी अभ्यासलेल्या संदर्भाची सूची, नकाशेही जिज्ञासूंसाठी महत्त्वाचे आहेत. काळानुसार बदलत गेलेली शहररचना, रस्ते, स्थापत्यकला, रेल्वेस्थानकापासून कौपिनेश्वर मंदिरापर्यंतचं नूतनीकरण, शाळा, टाऊन हॉल, न्यायालय, पोस्ट ऑफिस, कळवा पूल, चर्च, तलावांचे सुशोभीकरण, ठाण्यातील लोकप्रतिनिधी, सांस्कृतिक चळवळी,साहित्यिक, अभिनेते, खेळाडू, समाजसेवक, येऊरचे आदिवासी, त्यांची चित्र-काष्ठशिल्पकला यांची सचित्र माहिती वाचकांचं औत्सुक्य वाढवते. सध्याच्या विविध संस्थांची माहिती देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे शहराच्या जडणघडणीत मोलाचं कार्य करणाऱ्या व्यक्तींचा परिचयही करून दिला आहे. स्वच्छ, सुंदर व हरित शहरात राहायचं असेल तर आपलं मन प्रसन्न पाहिजे. म्हणूनच ठाण्यातील नागरिकांनी जुन्या ठाण्याचा आणि नव्या ठाण्याचा समन्वय साधून आधुनिकतेकडे वळलं पाहिजे, असं आवाहनही लेखकाने केलं आहे.

 ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दत्ताजी ताम्हणे यांचे आशीर्वाद या पुस्तकाला लाभले आहेत. हे पुस्तक इतिहासाच्या विद्यार्थ्यांसह सर्वसामान्य वाचकांनाही उपयुक्त असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं आहे. भरपूर रंगीत तसंच कृष्णधवल फोटो, गुळगुळीत कागद, उत्तम मांडणी, सजावट, ठळक अक्षरं, चांगली छपाई यामुळे हे अडीचशे पानी पुस्तक सर्वासाठीच उपयुक्त तसंच स्थानिक इतिहासाच्या दृष्टिकोनातून पाहता, अबालवृद्धांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी आशा लेखकाने व्यक्त केली आहे.

असे घडले ठाणे

 

लेखक : डॉ. दाऊद दळवी


History of Saibaba Shirdi Trustबाबांची शिर्डी ते राजकारणाची शिडी..

altसाईबाबांमुळे जागतिक दर्जाचे तीर्थक्षेत्र बनलेल्या साईबाबा संस्थान हे सत्ताक्षेत्र बनवायला निघालेल्या सत्ताधीशांना नवीन विश्वस्त मंडळाला स्थगिती देऊन न्यायालयाने चपराक दिली. विश्वस्त नेमताना काँग्रेस, राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळत जागावाटप केले, पण ते करताना एकमेकांवर कुरघोडय़ा करून शह-काटशहाचे राजकारण केले, स्वत:चे अहंकार कुरवाळले. श्रद्धा आणि सबुरीचा विसर पडल्याने त्यांनी संस्थानला राजकीय आखाडा बनविण्याचा प्रयत्न केला. ते करताना विधिनिषेध व सद्बुद्धीला तिलांजली दिली.१९२२ ते २०१२ असा साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाचा प्रवास हा निस्सीम व सेवाभावी साईभक्त ते नेता, काका, भाऊ असा राजकीय भक्तांचा आहे. त्यातून राजकीय पतनाचा आलेखच बघायला मिळतो. बाबा हयात असताना दुपारी द्वारकामाईत आरती होत असे. गावकरी, भक्त नैवेद्य आणत. बडेबाबा, माधवराव देशपांडे, म्हाळसापती, तात्यापाटील कोते त्यांच्याबरोबर भोजनाला असत. नैवेद्य येत असला तरी पाच घरी बाबा भिक्षा मागत. बाबांचे महानिर्वाण १९१८ ला झाले. त्यानंतर नित्यवेळच्या आरत्या सुरू झाल्या. 'भीष्म' नावाच्या भक्ताने आरत्यांचा संग्रह करून आरतीसंग्रह काढला. काकासाहेब चांदोरकर, दीक्षित, अब्दुलबाबा, तात्यापाटील, देशपांडे आदींनी आरत्या, नैवेद्य आदी प्रथा सुरू ठेवल्या. शिर्डीत येणाऱ्या भक्तांच्या भोजन, निवासाची व्यवस्था गावकरी करत. गणेश दत्तात्रय सहस्रबुद्धे ऊर्फ दासगणू महाराज हे बाबांचे निस्सीम भक्त होते. पूर्वी पोलीस खात्यात ते होते. नोकरी सोडून त्यांनी बाबांची सेवा पत्करली. त्यांनी बाबांच्या समकालीन गजानन महाराजांसह अनेकांची चरित्रे लिहिली. बाबांच्या कार्याचा प्रचार-प्रसार केला, प्रवचने दिली, कीर्तने केली. त्यांच्या पुढाकारातून १९२३ ला पहिले विश्वस्त मंडळ आले. त्यात दासगणू महाराज, मोरेश्वर विश्वनाथ प्रधान, गणेश गोिवद नरके, रामचंद्र आत्माराम तुरखुंड, तात्यापाटील कोते या पाच विश्वस्तांचा समावेश होता. त्यांना साहाय्य करण्यासाठी शिर्डी साई समिती होती. त्याचे अध्यक्ष दासगणू महाराज होते. समितीत गोिवद रघुनाथ दाभोळकर, यशवंत जालवनकर, हरी दीक्षित, रामचंद्र कोते, कृष्णराव नारायण परुळेकर, गणेश दामोदर केळकर, अंबादास मेहता, माधवराव देशपांडे, रघुवीर भास्कर पुरंदरे हे होते. कुणी निवृत्त तहसीलदार, सॉलिसिटर, उद्योजक, छायाचित्रकार, लिपिक, शेतकरी असे व्यवसायाने होते. राजकारणी नक्कीच नव्हते. होते ते बाबांचे सच्चे भक्त!
या मंडळाने ३५ वष्रे म्हणजे १९५८ पर्यंत कारभार पाहिला. त्यानंतर दुसरे विश्वस्त मंडळ आले राजकारण्यांनी नेमलेले. तेथूनच सुरू झाला घोटाळ्यांचा, गरव्यवहाराचा प्रवास. शिर्डीचे पहिले तत्कालीन आमदार बाजीराव कोते यांच्या अध्यक्षतेखाली मंडळ सत्तेवर आले. मंडळाने गरकारभार केला. त्याविरुद्ध विश्वस्त भीमाशंकर खांबेकर यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार केली. त्याची सीआयडीमार्फत चौकशी झाली. सीआयडीचे प्रमुख डी. डी. स्वार, पोलीस अधीक्षक एस. डी. महामुनी यांनी भ्रष्टाचाराची चौकशी सुरू केली. एक विश्वस्त हरीभाऊ शेळके हे साक्षीदार झाले. खांबेकर यांना काही विश्वस्तांनी साथ केली. नगरचे जिल्हा न्यायाधीश वी. रा. तळाशीकर यांनी बाजीराव कोते, राजाराम कोते, रावसाहेब गोंदकर, शाळीग्राम नागरे आदी विश्वस्तांना आठ महिने तुरुंगवास व दंडाची शिक्षा सुनावली. तेथून पुढे 'संस्थान'च्या तिजोरीवर 'डल्ला' मारण्याचे प्रकार सुरू झाले. न्यायालयीन लढे सुरू झाले. पूर्वी आठ ट्रस्टींना शिक्षा झाली तरी नंतरच्या काळात नियमांच्या चौकटीत केलेले 'घोटाळे' सिद्ध झाले नाहीत. घोटाळ्यानंतर १९५८ ते १९६० पर्यंत विश्वस्त मंडळाचा कारभार न्यायालयधारकांकडे (कोर्ट रिसीव्हर) गेला. श्रीपाद दर्प, डी. डी. पाटणकर, का. शी. पारस, कन्हैयालाल कांकरिया यांनी कारभार पाहिला. त्या वेळी घोटाळ्याविरुद्ध आवाज उठविणारे भीमाशंकर खांबेकर मानसेवी सल्लागार होते. १९६० ते १९८३ पर्यंत या मंडळाने कारभार पाहिला. मुंबईच्या साईभक्त मंडळाचे अध्यक्ष माजी आमदार सीताराम धानू, वसंतराव खोपकर व खांबेकर यांनी न्यायालयात १९८४ मध्ये विश्वस्त मंडळाकरिता अर्ज केला. अर्जावरून न्यायमूर्ती एन. के. पारेख यांनी विश्वस्त मंडळाची घटना तयार केली. त्यानंतर सरकारने १ सप्टेंबर १९८४ रोजी पी. के. सावंत यांच्या नेतृत्वाखालील २२ सदस्यांचे मंडळ नेमले. १९८९ पर्यंत या मंडळाने कारभार पाहिला, पण अध्यक्ष सावंत यांचे १९८७ ला निधन झाल्यानंतर मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांनी एम. आर. पाटील यांना अध्यक्ष नेमले. राज्याचे माहिती व जनसंपर्क विभागाचे महासंचालक, सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांनी काम पाहिलेले होते. चव्हाण यांनी नेमणूक करताना 'गुणवत्ते'ला महत्त्व दिले होते.
१९८९ नंतर खऱ्या अर्थाने नेमणुका करताना साईभक्तांऐवजी राजकीय नेत्यांच्या हितसंबंधीयांचा विचार केला गेला. तत्कालीन उपमुख्यमंत्री व बॅ. रामराव आदिक यांनी डॉ. लेखा पाठक यांना अध्यक्ष केले. भीमाशंकर खांबेकर, गोपीनाथ कोते, जयकर, श्रीपाद जाधव, राजीव कुलकर्णी, प्रकाश कारखानीस, एम. के. कीर्तिकर वगळता बाबुराव नरोडे, अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार दादा रोहमारे, प्रशांत हिरे, ना. स. फरांदे, अनंतकुमार पाटील, पृथ्वीराज आदिक, कारभारी देवकर, मोतीराम पवार, रेखा दिघे, मनोहर गोगटे आदी काही राजकारणी व त्यांचे हितसंबंधी आले. या मंडळाच्या नेमणुकीपूर्वी काही लोक न्यायालयात गेले होते. १९९४ ते १९९९ पुढे २००४ पर्यंत द. म. सुकथनकर यांनी काम पाहिले. पुढे २००४ साली तत्कालीन विधिमंत्री गोिवदराव आदिक यांनी जयंत ससाणे या आपल्या राजकीय शिष्याला अध्यक्ष केले. 'आमदार'कीची जागा ससाणेंनी रिक्त करावी असा त्यामागे उद्देश होता, पण ससाणे यांनी त्यांनाही 'झटका' दिला. त्या वेळी शंकरराव कोल्हे, शैलेश कुटे, पांडुरंग अभंग, सुरेश वाबळे हे राजकारणी विश्वस्त होतेच. त्याखेरीज काही दिल्लीच्या हायकमांडमधून आले होते. विश्वस्त नेमताना अनेक मंत्री, दिल्लीतील नेत्यांचा नेहमीच हस्तक्षेप राहिला आहे. 
२००४ साली धर्मदाय आयुक्तांचे विश्वस्त नेमणुकीचे अधिकार गेले. सरकारी नियंत्रण आले. त्यामुळे राजकारण्यांचे फावले. काँग्रेस-राष्ट्रवादीला जशा महामंडळावरील नियुक्त्या करता आल्या नाहीत. तसे संस्थानवर विश्वस्त नेमता आले नाहीत. त्यामुळे विश्वस्तांना वाढीव साडेचार वष्रे मिळाली. दरम्यानच्या काळात ससाणे यांचे विरोधक राष्ट्रवादीचे माजी आमदार भानुदास मुरकुटे यांनी आपल्या अनेक समर्थकांना हाताशी धरून न्यायालयात याचिका केल्या. माहितीच्या अधिकाराचे कार्यकत्रे संजय काळे यांनी माहिती मागवून पाच विश्वस्तांचा गरव्यवहार पुढे आणला. त्यांनी न्यायालयात धाव घेतली. न्यायालयाने सरकारला १५ दिवसांत नवीन विश्वस्त मंडळ नेमण्याचा आदेश दिला, पण नियमावली करताना अध्यक्षपद काँग्रेसला, उपाध्यक्षपदी राष्ट्रवादीला अशा पदाबरोबर निम्मे-निम्मे सदस्य अशी आपसात वाटणी केली. ही वाटणी करताना राजकीय आखाडा बनविला गेला. शिर्डी मतदारसंघाचे आमदार व कृषिमंत्री राधाकृष्ण विखे यांची राजकीय कोंडी करण्याकरिता त्यांच्या कट्टर विरोधकांना राष्ट्रवादीने संधी दिली. विखेविरोध हाच नेमणुकीचा मुख्य अजेंडा राहिला. आपल्या पक्षाच्या एका मंत्र्याची कोंडी होत असताना आघाडीचा धर्म निभावताना मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना काही करता आले नाही. ससाणे हे काँग्रेसचे असूनही त्यांना कारभार करणे सोपे जावे म्हणून राष्ट्रवादीचे भानुदास मुरकुटेंचे चिरंजीव सिद्धार्थ यांचा पवारांनी पत्ता कापला.  
नवे विश्वस्त मंडळ  दोन जागा भरता आल्या नाहीत. मागील मंडळात समी खतीब व राठोड हे अल्पसंख्याक व उपेक्षित घटकांतील सदस्य होते, पण नवीन मंडळात एकाच धर्माचे लोक असून त्यात ठरावीक समाजाचा प्रभाव आहे. एक नॉन-मॅट्रिक, दोघे बिल्डर, एक शिक्षणसम्राट असे मंडळ आहे. एवढेच नव्हे तर प्रथा- परंपरेचे भानही सरकारला राहिलेले नाही. सत्यसाईबाबा स्वत:ला साईबाबांचे अवतार मानत. त्यांना शिर्डीकर व साईभक्तांचा विरोध आहे. असे असूनही शिक्षणसम्राट व सत्यसाईबाबांचे भक्त व सत्यसाई सेवा समितीचे यवतमाळचे प्रमुख पदाधिकारी प्रकाश नंदूरकर यांची नेमणूक केली. ती वादग्रस्त ठरली असती, पण त्यावर तूर्त पडदा पडला आहे. विश्वस्त नेमताना बाबांच्या सर्वधर्मसमभावाचा सरकारला विसर पडला.
विश्वस्तांचा एक जवळपास शतकांचा कारभार व वाटचाल म्हणजे बदललेल्या राजकीय व प्रशासकीय अवमूल्यनाचा एक धांडोळा आहे. कुठे दासगणू महाराजांचे विश्वस्त मंडळ आणि कुठे दादा, बाबा, काकांचे विश्वस्त मंडळ!

हत्तीचं वजन - Weight of Elephant

Weight of Elephant

शास्त्रज्ञ आर्किमीडिजची पत्नी जेली हिला एकदा आर्किमीडिजची खूप काळजी वाटू लागली. तिनं त्याला विचारलं, 'आपण  एवढे चिंताक्रांत का आहात? तुमचं खाण्या-पिण्यात, कपडय़ालत्त्यात, अगदी कशा-कशात लक्ष नाही. सदोदित विचारात दंग असता. एवढा कसला विचार करताय?'

'अगऽऽ! तसंच विलक्षण घडलंय. काय करावं तेच सुचत नाहीए. राजेसाहेबांकडे काही व्यापारी हत्ती घेऊन आले आहेत. राजेसाहेबांना ते हत्ती खूप आवडले आहेत. त्यांना ते खरेदी करायचे आहेत.'
'मग त्यात अडचण ती कसली? राजेसाहेबांना काय कमी? पैसे द्यायचे आणि हत्ती घ्यायचे.'
'अगऽऽ! तेवढं सोपं नाही ते. व्यापारी म्हणताहेत, आम्ही वजनावर हत्ती विकायला तयार आहोत. हत्तीचं वजन करा आणि त्यानुसार हत्ती विकत घ्या.'
'अग्गो बाईऽऽ! हत्तीचं वजन करायला गेलं तर त्याच्या प्रचंड भारामुळे कोणताही वजनाचा काटा तुटून जाईल.'
'अगंऽऽ! तसंच झालं. हत्तीचं वजन करायला गेलं की, त्याच्या प्रचंड वजनामुळे तराजू तुटायला लागले. राजाला हत्ती विकत घ्यायचे आहेत खरे; पण हत्तीचं वजन करता येत नाहीए. त्यामुळे हत्ती विकत घेता येत नाहीत. हत्तीचं वजन करता येईल असा भक्कम तराजू तयार करायला त्यांनी मला सांगितलं आहे आणि असा तराजू कसा तयार करायचा हेच मला सुचत नाहीए.'
'विचार करा म्हणजे नक्कीच सुचेल तुम्हाला. धीर सोडू नका.' जेनीनं आर्किमीडिजला धीर दिला. त्यानंतर एक-दोन दिवसांनीच एक घटना घडली. म्हटली तर अगदी साधी; पण 'साध्याही विषयात आशय मोठा किती आढळे' असं म्हणतात, तेच खरं! त्याचं असं झालं- जेनी मोठय़ानं ओरडून आर्किमीडिजला म्हणाली, 'अहोऽऽ! लवकर या. पाण्याच्या हौदात भांडं पडलं आहे आणि त्यात माझ्या हातातील नाणी आणि गळ्यातला मौल्यवान हार पडला आहे. भांडं बुडण्याच्या बेतात आहे. भांडं बुडालं तर नाणी-हार सगळंच हौदाच्या तळाशी जाईल.'
आर्किमीडिज हौदाजवळ आला. त्यानं पाहिलं- भांडं अर्धवट बुडून पाण्यावर तरंगत होतं. त्यानं प्रथम वाकून काळजीपूर्वक भांडय़ातला हार काढला. भांडं किंचित पाण्याच्या वर येऊन तरंगू लागलं. त्यानं अलगद भांडय़ातील नाणी काढली. भांडं आता अधिक वर येऊन पाण्याच्या पृष्ठभागावर तरंगू लागलं. आर्किमीडिजच्या विचाराला चालना मिळाली. नाणी आणि हार सुखरूप मिळाल्यामुळे जेनीला आनंद झाला; पण आर्किमीडिजच्या चेहऱ्यावर अवर्णनीय स्वरूपाचा आनंद ओसंडून वाहत होता.
त्यानंतर काही दिवसांनीच 'आर्किमीडिजनं हत्तीचं वजन करण्याकरिता मजबूत तराजू तयार केला आहे', अशी वार्ता सर्वत्र पसरली. जो तो हातातलं काम सोडून तळ्याच्या दिशेने धावू लागला. बघता बघता तळ्याच्या काठावर मोठ्ठी गर्दी जमा झाली. आर्किमीडिज काही माणसांच्या मदतीने एक उभट आकाराची मजबूत नाव घेऊन तेथे आला.
राजा त्याला म्हणाला, 'आर्किमीडिज! कोठे आहे तुझा तराजू?'
आर्किमीडिजने नावेकडे अंगुलीनिर्देश करीत म्हटलं, 'महाराज! हा बघा माझा तराजू! याच्या मदतीनंच मी हत्तीचं वजन करणार आहे.'
तेवढय़ात आर्किमीडिजच्या सहकाऱ्यांनी तळ्याच्या काठावर मोठय़ा आकाराच्या दगडांचा ढीग जमा केला. जवळच एक साधा, मोठय़ा आकाराचा तराजू उभा केला. नंतर त्यानं मदतनीसांच्या साह्य़ानं नाव तळ्याच्या पाण्यात उतरविली. नावेपर्यंत फलाट टाकून हत्तीला नावेत उतरवलं. हत्तीच्या वजनामुळे नाव पाण्यात काही प्रमाणात बुडून तरंगू लागली. तिच्या पाण्यावरील पृष्ठभागावर आर्किमीडिजने खूण केली. नंतर हत्तीला काठावर परत आणण्यात आले आणि त्या नावेत काठावरील दगड भरायला सुरुवात झाली. नाव पुन्हा त्या खुणेपर्यंत बुडून तरंगू लागली. त्या वेळी त्याने दगड भरण्याची क्रिया थांबवली. याचा अर्थ नावेतील दगडांचे वजन त्या हत्तीच्या वजनाएवढे होते! आर्किमीडिजने दगडांचे वजन साध्या तराजूच्या साहाय्याने केले आणि त्यावरून हत्तीचे वजन काढले.
किनाऱ्यावर जमलेल्या लोकांनी आर्किमीडिजचा जयजयकार केला. राजाने आर्किमीडिजचा सन्मान केला आणि त्याला मोठे बक्षीस दिले.


आनंदीबाईं Anandibai - Doctor of Medicine

Anandibai - Doctor of Medicine
altएकोणिसाव्या शतकात स्त्री-शिक्षण, परदेशगमन, समुद्र उल्लंघन हे महापाप मानले जात असताना परदेशात उच्च शिक्षण घेऊन 'डॉक्टर ऑफ मेडिसिन' ही पदवी मिळवून डॉ. आनंदीबाई जोशींनी भारतीय स्त्री-शिक्षणाच्या इतिहासात एक विक्रमच नोंदविला. ३१ मार्च हा त्यांचा जन्मदिवस, त्यानिमित्ताने हा खास लेख...एकोणिसाव्या शतकातीलच एक भारतीय शाळकरी वयोगटातील एक बंडखोर ज्ञानपिपासू नायिका व तिने तत्कालीन परंपरावादी सनातनी, रूढीग्रस्त समाजाशी केलेला संघर्ष खरंच खूप अविस्मरणीय आहे. त्या नायिकेचं नाव डॉ. आनंदीबाई गोपाळराव जोशी. आनंदीबाईंचे संपूर्ण आयुष्य म्हणजे ज्ञानप्राप्तीची अखंड तपश्चर्या होती. 

डॉ. आनंदीबाईंचा जन्म ठाणे जिल्ह्य़ातील कल्याण शहरातल्या पारनाक्यावरील जोशी-इनामदारांच्या कुटुंबात ३१ मार्च १८६५ साली झाला.
आनंदीबाईंचे वडील गणपतराव जोशी यांच्या घराण्यामागे इतिहास होता. शिवाजी महाराजांच्या काळात या घराण्यातील रामचंद्र जोशी यांनी दुर्गाडी किल्ल्याला मुघलांपासून मुक्त केले. रामचंद्राचा भाऊ बाळाजींचे नातू म्हणजे 'गणपतराव' होत.
आनंदीचे नाव 'यमुना' ठेवण्यात आले. सुरुवातीपासूनच 'यमू' ही आईची गंगाबाईंची नावडती लेक होती. यमूच्या अगोदर दोन मुली झाल्या होत्या. त्यामुळे यमू जन्माला आली त्या वेळेस मुलाची अपेक्षा असताना मुलगी झाली म्हणून आईची घोर निराशा झाली. आपली हतबलता, निराशेचा सर्व राग यमूवर निघत असे. अतिशय अमानुषरीत्या आई यमूला मारत असे. वडिलांची मात्र यमू लाडकी होती.
यमू ही लहानपणापासूनच कुशाग्र, धीट, प्रचंड बुद्धिमत्तेची मुलगी होती. वडिलांना आपली मुलगी ही असामान्य आहे व पुढील आयुष्यात काही तरी चांगले कार्य सिद्ध करून दाखवील असे सतत वाटे. 
तिचा धीटपणा, तल्लख बुद्धिमत्ता, दांडगेपणा, एकपाठीपणा आईच्या दृष्टीने मुलीच्या जातीला न शोभणारे वर्तन होते. आईच्या वागण्याचा यमूच्या मनावर प्रचंड आघात होत असे. यमूचे हे बालपण पाहताना कोणा एका तळ्यात बदकाच्या सुरेख पिल्लात कुरूप वेडे ठरलेल्या राजहंसाच्या पिल्लाची आठवण होते.
आनंदीच्या जीवनाला अर्थपूर्ण वळण देणारी व्यक्ती म्हणजे आनंदीचे पती गोपाळराव जोशी. गोपाळराव सुधारणावादी आणि शिक्षित असल्यामुळे आनंदीच्या वडिलांनी गोपाळरावांना आनंदीस शिकविण्यास सांगितले. त्या काळात गोपाळराव हे ठाण्याच्या पोस्टात नोकरी करत होते. गोपाळरावांचे संस्कृत व इंग्रजी भाषेवर प्रभुत्व होतं. याचा आपल्या मुलीला फायदा होण्यासाठी वडिलांनी गोपाळरावांना शिकविण्यास विनंती केली. शिकविताना यमूच्या बुद्धिमत्तेचा प्रत्यय त्यांना आला.
'एक तरी स्त्री शहाणी करीन नाही तर नावाचा गोपाळ नाही' हे त्यांनी ठामपणे बोलून दाखविले. गोपाळराव व आनंदी यांच्यात फक्त एक शिक्षक आणि शिष्य एवढेच नाते होते, पण वडिलांच्या आग्रहाखातर त्यांचा विवाह ठरला. त्या वेळेस यमू दहा वर्षांची होती व गोपाळराव तिच्यापेक्षा २० वर्षांनी मोठे होते. ३१ मार्च १८७४ मध्ये यमूचा विवाह झाला व ती यमूची आनंदी झाली.
तत्पूर्वी भारतातील स्त्रियांची परिस्थिती अतिशय बिकट होती. स्त्रियांच्या आरोग्यविषयक समस्या अतिशय क्लिष्ट होत्या. बालविवाह, अकाली मातृत्व यामुळे स्त्रियांना स्वत:च्या आरोग्याच्या कठीण प्रसंगांना सामोरे जावे लागे. पुरुष डॉक्टर तुरळक होते, पण त्यांच्याकडून तपासण्यास स्त्रिया संकोचत.
सुईणींच्या निष्काळजीपणा, अज्ञानामुळे मुलांच्या, स्त्रियांच्या हालअपेष्टांना सीमा नव्हती. अशा वेळेस आपल्याच देशातील 'स्त्री डॉक्टर' असणे याची आवश्यकता समाजाला का भासली नाही? या साऱ्या पाश्र्वभूमीचा विचार करता आनंदी जोशी यांची डॉक्टर होण्याच्या स्वप्नाची भव्यता अधिक नजरेत भरते.
आनंदीच्या अभ्यासात व्यत्यय येऊ नये म्हणून गोपाळरावांनी अलिबागला बदली करून घेतली.
त्या काळात त्यांना समाजाकडून कडाडून विरोध झाला. पत्नीला शिकविणारा, कौतुक करणारा पोस्टमास्तर टवाळकीचे लक्ष्य बनला. आनंदीचा अभ्यास घरच्या घरी चालू होता. त्या वेळेस आनंदी बारा वर्षांची असताना 'आई' झाली. मुलगा झाला, पण हा आनंद क्षणभंगुर ठरला. दहा दिवसांतच बाळ मरण पावलं. याचा मोठा मानसिक धक्का बसला, पण हाच क्षण आनंदीच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. या क्षणातूनच स्वत: डॉक्टर होण्याचं ध्येय निश्चित केलं.
दु:खाच्या घरटय़ातून बाहेर पडून मनाने स्वप्नांचे पंख पसरले. ज्या काळात स्त्रियांना शिक्षण देणं महापाप मानलं जाई, त्या काळात एका १२ वर्षांच्या मुलीने डॉक्टर होण्याची आकांक्षा मनात ठेवली होती.
आनंदीच्या शिक्षणाला पोषक वातावरण शोधण्याच्या लालसेने गोपाळरावांनी अनेक ठिकाणी स्थलांतर केले. भूज, कोल्हापूर, मुंबई, कलकत्ता हे शहर त्यांच्या स्थलांतराचे शेवटचे शहर ठरले.
भूजमध्ये असताना गोपाळरावांनी अमेरिकेत शिक्षणाला मदत मिळावी म्हणून आव्हानात्मक पत्र पाठविले होते. त्या पत्राला उत्तर म्हणून एक अनपेक्षित पत्र आनंदीसाठी आलं आणि ते पत्र अमेरिकेतील 'रोझेल' या शहरातील कार्पेटर दाम्पत्यांचं होतं. एका भारतीय पुरुषाने आपल्या पत्नीच्या शिक्षणासाठी धाडस करणं हे त्यांच्यासाठी कौतुकास्पद होतं. या पत्राने ज्ञानार्जनासाठी अमेरिकेतील दारं आनंदीसाठी ठोठावली गेली.
प्रत्येक ठिकाणी शिक्षण घेताना अत्यंत घृणास्पद वाईट अनुभव येत असे. रस्त्यावरील लोक आनंदीला हसत, खडे मारत, वाईट बोलत. त्यांच्या नजरेत तिरस्कार, घृणा असे. हिंदुस्तानात कुठेही गेले तरी हाच अनुभव येणं अपरिहार्य होतं.
दररोज नवीन संकटे पुढय़ात असत. संकटे ही आत्मविकासाची सुवर्णसंधी बनत जाते व त्यातूनच या दाम्पत्याने देश सोडण्याचा निर्णय घेतला. पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने आनंदीला एकटेच सातासमुद्रापलीकडे पाठविण्याचा निर्णय गोपाळरावांनी घेतला.
थियोडोसिया कार्पेटर मावशीकडून पत्रव्यवहारातून अमेरिकेतील प्रवासाची माहिती घेतली.
आनंदी वैद्यकीय शिक्षणासाठी ज्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार होती ते अमेरिकेतील पहिले 'फीमेल मेडिकल कॉलेज ऑफ पेनसिल्व्हिनिया' हे जगातील पहिले कॉलेज १८५० साली स्थापन झाले.
आनंदीच्या देशांतराचे वारे भारतभर फिरू लागले आणि ही बाई आता धर्मातर करणार म्हणून लोकांच्या घोषणा, बहिष्कार टाकण्याच्या धमक्या यामुळे हे दाम्पत्य त्रस्त झाले होते. लोकांना त्यांच्या प्रश्नाचे जाहीरपणे उत्तर देण्यासाठी आनंदीने ठिकठिकाणी भाषणं दिली व भाषणातून आपल्या डॉक्टर होण्याची आवश्यकता काय ते पटवून देण्याचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आपल्या धर्मात, पोशाखात कुठलाच बदल होणार नाही याची ग्वाही दिली.
अमेरिकेत जाण्यासाठी निधीची जमवाजमव केली. ७ एप्रिल १८८३ रोजी 'सिटी ऑफ कलकत्ता' या आगबोटीने आनंदीचे अमेरिकेला प्रस्थान झाले.
दोन महिन्यांच्या प्रवासात आनंदीला अतिशय क्लिष्ट, त्रासदायक गोष्टींना सामोरे जावे लागले.
थंडी, वारा, उन्हाचा तडाखा, खाण्याचे हाल आणि त्यात एकटेपणाचा अनुभव यामुळे आनंदीला अतिशय असुरक्षित प्रवास करावा लागला. त्या दोघांच्या विरहपर्वाला सुरुवात झाली होती, पण त्याचा शेवट माहीत नव्हता. समुद्र प्रवासामुळे आनंदीची प्रकृती बिघडत होती. अशात तिने पुस्तकांनाच आपला सोबती केले. आनंदीला तिच्या धैर्यापासून परावृत्त करण्याच्या अनेक घटना घडल्या, पण ध्येयवादी आनंदी मागे हटली नाही.
अमेरिकेत गेल्यावर कार्पेटरांकडे आनंदीला आपले बालपण गवसले. अतिशय प्रेमाची, जिव्हाळ्याची माणसं तिला मिळाली. सौम्य व्यक्तिमत्त्व, सात भाषांचे ज्ञान व सफाईदार इंग्रजी बोलणारी ही 'लिटिल वूमन' सर्वाना तिथे नवलाईची वाटे.
आनंदी मॅट्रिकची परीक्षा पास झाली आणि ती अमेरिकेतील फिलाडेल्फिया शहरात आली. आनंदीचे कॉलेजचे जीवन सुरू झाले. पेनसिलव्हिनिया कॉलेजमध्ये आनंदीने प्रवेश घेतला. 'डीन रिचेल बॉडले' या शिक्षिका होत्या. त्यांनी आनंदीला तिच्या ज्ञानार्जनाच्या खडतर प्रवासात वेळोवेळी मदत केली. 'ऑबस्टेट्रिक्स' प्रसूतिशास्त्र हा विषय आनंदीने खास म्हणून निवडला होता.
ज्ञान आत्मसात करण्यास २४ तासही अपुरे पडत होते. त्यात बदललेल्या वातावरणामुळे तब्येतीच्या कुरकुरी चालू झाल्या. आनंदी धर्मातर करेल, अशा अफवा भारतात पसरू लागल्या. समाजाबरोबरच गोपाळरावांचे दुटप्पी वर्तन दिसू लागले. ते पण आनंदीच्या विरोधात बोलू लागले. त्यांच्या अहंभावामुळे त्यांच्यात विक्षिप्तपणा आला. यामुळे आनंदीच्या मानसिक खच्चीकरणाला सुरुवात झाली. वेगवेगळ्या निनावी पत्राने आनंदी दु:खी होत असे. हिंदुस्तानी समाजाने तिला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं होतं.
अशातच महत्त्वाची घटना म्हणजे आनंदीच्या तीन वर्षांच्या अविश्रांत जीवनक्रमाचं सार्थक झालं तो क्षण म्हणजे 'पदवीदान समारंभ'.
'डॉक्टर ऑफ मेडिसिन' या पदवीसाठी विद्यार्थिनींना एक प्रबंध लिहावा लागे. आनंदीबाईंचा प्रबंध हा ५० पानांचा होता. Obstetrics - ''Among The Aryan Hindoos'' हे प्रबंधाचे नाव होते.
गोपाळरावांचे अमेरिकेत आगमन झाले. खरंतर त्यांच्या येण्याने आनंदी सुखावणार होती, पण त्यांच्या लहरी, दुटप्पी वागण्याने आनंदी खिन्न झाली. सारं काही निमूटपणे सोसत राहण्याची वृत्ती आनंदीमधील निर्भीडपणा, खंबीरपणा यांना घातक ठरली.
पदवीदान समारंभ म्हणजे आनंदीच्या जीवनातील परमोच्च आनंदाचा आणि साफल्याचा कृतार्थ क्षण होता. आशिया खंडातील एका पौर्वात्य विद्यार्थिनीला 'डॉक्टर ऑफ मेडिसिन' ही पदवी मिळाली.
११ मार्च १८८६, गुरुवार या दिवशी अमेरिकेतील अ‍ॅकेडमी ऑफ म्युझिक या उत्तम ध्वनिनियंत्रण वास्तूत 'ग्रीन रूम' सभागृहात अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष, प्रतिष्ठित डॉक्टर, नागरिक यांच्या उपस्थितीत तीन हजार जनसमुदायांत भारतीय परंपरावादी पोशाख परिधान केलेल्या आनंदीबाईंचा हा पदवीदान सोहळा भारतीयांसाठी अभिमानास्पद ठरला.
मायदेशी परतण्याच्या आधीच कर्तबगारीला वाव असलेलं एक सुंदर भविष्य आनंदीची वाट पाहात होतं. ज्या संस्थानाच्या दबावामुळे आनंदीची शाळा बंद झाली होती, त्या कोल्हापूर संस्थानातील 'अल्बर्ट एडवर्ड हॉस्पिटल'मध्ये दरमहा ३०० रुपये मानधन 'स्त्री डॉक्टर' म्हणून त्यांची नेमणूक होणार होती.
बोस्टन, रोझेल शहरांचा निरोप घेऊन ९ ऑक्टोबर १८८६, रविवार या दिवशी न्यूयॉर्क बंदरातून 'इटरुटिया' या बोटीने आनंदी-गोपाळ हिंदुस्तानात येण्यास निघाले.
परतीच्या वाटेवर आनंदीचे आजारपण वाढतच गेले. शारीरिक व मानसिक आघातांमुळे आनंदीचा आजार प्रबळ ठरला. त्या अवस्थेला सिंहाचा वाटा असणारे गोपाळराव व सतत आरोप करणारा भारतीय समाज होता. दोन महिन्यांच्या या जलप्रवासात तिने प्रकृतीच्या यमयातना सहन केल्या. तिची प्रकृती जसजशी ढासळत गेली तसा बदल गोपाळरावांमध्ये झाला. तिची प्रेमाने सेवा-शुश्रूषा करत होते. अखेर १६ नोव्हेंबर १८८६ ला बोट मुंबई किनाऱ्याला लागली. उपस्थितांनी आनंदीवर पुष्पवृष्टी केली. तिच्या विषयीचा आदर, प्रेम, धन्यता या मंडळींनी प्रकट केली. स्वदेशी आल्यावर आनंदीची मनाची उमेद वाढली होती, पण प्रकृती, शरीर साथ देईनासे झाले होते. मुंबईतील अनेक डॉक्टरांनी आनंदीवर औषधोपचार केले, पण 'क्षयरोग' शेवटच्या अवस्थेत असल्यामुळे इलाज मिळत नव्हता.
शेवटी आनंदी आपल्या जन्मस्थानी आजोळी पुण्यात बाळशास्त्री माटय़ांच्या वाडय़ात आली. पुण्यातील अनेक डॉक्टर, वैद्य यांच्याकडून उपचारांना सुरुवात झाली.
आनंदी आता 'अस्थी व चर्म' यांचा सापळा झाली होती. गोपाळरावांकडे तिने अखेरची इच्छा मागितली ती म्हणजे माझी रक्षा कार्पेटर मावशीकडे पाठवावी.
२६ फेब्रुवारी १८८७ रोजी आनंदीची अवस्था अतिशय त्रस्त, असहाय्य झाली होती. तिच्या ओठातून असहाय्य शब्द बाहेर पडले, 'माझ्या हातून जेवढं झालं तेवढं मी केलं!' क्षणार्धात हाताला नाडी लागेनासी झाली.
आनंदीची झुंज संपली..
अमेरिकेच्या दिशेने दुसऱ्यांदा प्रवास करणार होता ती आनंदी नव्हे तर तिचा रक्षाकलश. गोपाळरावांनी आनंदीची अखेरची इच्छा पूर्ण केली. अमेरिकेतील 'पोकीस्पी' गावी आनंदीची समाधी झाली.
थोडक्यात, एकोणिसाव्या शतकात स्त्री-शिक्षण, परदेशगमन, समुद्र उल्लंघन हे  महापाप मानले जात असताना परदेशात उच्च शिक्षण घेऊन 'डॉक्टर ऑफ मेडिसिन' ही पदवी मिळवून डॉ. आनंदीबाई जोशींनी भारतीय स्त्री-शिक्षणाच्या इतिहासात एक विक्रमच नोंदविला.
या पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टरने विज्ञान युगाबरोबरच कला, कायदा अशा अनेक क्षेत्रांचा दरवाजा उघडून दिला. शोकान्त पण यशस्वी अशी ही आनंदीची जीवनगाथा अनेकांना स्फूर्ती, प्रेरणा देऊन गेली.
भारतात ठिकठिकाणी स्त्री डॉक्टरांचे दवाखाने दिसू लागले. रखमाबाई, नागुताई, काशीबाई, माणकबाई, कृष्णाबाई अशा तेजाच्या ज्योती प्रज्वलित झाल्या आणि त्यांनी आपला काळ उजळून टाकला. त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्रात कल्याण, पाली, रत्नागिरी, संगमेश्वर या शहरांत डॉ. अशोक मोडक, कोकण पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार यांच्या मार्गदर्शनाखाली 'रुग्ण सहाय्यक प्रशिक्षण वर्ग' चालविले जातात.
'कोकण पदवीधर मंच' कल्याणमध्ये २००४ मध्ये स्थापन झाला. या मंचात वनवासी क्षेत्रातील स्त्रिया व मुलींना नर्स आणि आयांचे प्रशिक्षण दिलं जातं. अनेक हॉस्पिटल्समध्ये त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाते.
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या 'लोकविद्यालय' या संकल्पनेतूनच या विद्यापीठाचा रुग्ण सहाय्यक हा अभ्यासक्रम 'कोकण पदवीधर मंच' ठिकठिकाणी राबवीत आहे. डॉ. अंजली कीर्तने यांनी आनंदीबाईंवर केलेल्या लघुपटाला राज्य शासनाचा सवरेत्कृष्ट लघुपटाचा पुरस्कार मिळाला होता.
आनंदीबाई जोशींच्या स्मरणार्थ कल्याणमधील अनेक महिला मंडळांत सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात. कल्याणकरांसाठी ही अभिमानास्पद गोष्ट नाही का?
अशा या उत्तुंग भरारी घेतलेल्या बुद्धिमान, ध्येयवादी स्त्रीने तिच्या २२ वर्षांच्या ३१ मार्च १८६५ ते २६ फेब्रुवारी १८८७ या अल्पावधीत आपल्या भारतीय समाजातील अज्ञानाच्या अंधारात चाचपडणाऱ्या स्त्री जातीला ज्ञानाची ज्योत दाखवून ज्ञानाच्या मार्गातील प्रकाशवाट दाखविली आहे.


Thursday, April 26, 2012

जलवायु वाता पर साझा मंच प्रदान करता ‘बेसिक’जलवायु वाता पर साझा मंच प्रदान करता 'बेसिक'
 
('बेसिक' चार विकासशील देशों- ब्राजील, दषिाण अफ्रीका, भारत और चीन का साझा मंच है कोपेनहेगन जलवायु वाता के दौरान चारों देशों ने साझा उद्देश्य जाहिर करते हुए तय किया था कि यदि विकसित देशों द्वारा जलवायु परिवतन पर उनके हितों की रषा नहीं की गयी, तो वे मिल कर एक मंच से अपनी बात रखेंगे हाल में ही संपत्र बेसिक देशों के पयावरण मंत्रियों की 10वीं बैठक के दौरान इस बात पर सहमति बनी कि जलवायु परिवतन से जुड़ी कोइ भी योजना बनाते समय समानता के मुद्दे (प्रिंसिपल ऑफ इक्विटी) को ध्यान में रखा जाना चाहिए 'बेसिक' बैठक के बहाने विकसित और विकासशील देशों के बीच पयावरण को लेकर अहसहमति के विभित्र पहलुओं की पड़ताल करता आज का नॉलेज)
 

क्या है क्योटो प्रोटोकॉल

 

यूनाइटेड नेशंस (संयुक्त राष्ट­) फ्रेमवक कन्वेंशन ऑन क्लाइमेट चेंज का क्योटो प्रोटोकॉल पयावरण की चुनौती से निपटने के लिए अंतरराष्ट­ीय प्रयासों का एक हिस्सा है 1997 में कांफ्रेंस ऑफ द पाटीज (सीओपीइ) के तीसरे सत्र में अनुमोदित इस प्रोटोकॉल में ग्रीनहाउस गैसों के उत्सजन की सीमा तय की गयी है, जो कानूनी रूप से बाध्यकारी है यूरोपीय संघ और उसके सदस्य देशों ने मइ 2002 में इसको मंजूरी दी भारत ने भी इसी वष इस पर हस्ताषार किया विकसित देशों में करीब 150 साल पहले शुरू हुइ ग्रीनहाउस गैसों के ब़ढते उत्सजन को कम करने और फिर उसे समाप्त करने के इरादे से अस्तित्व में आये क्योटो प्रोटोकॉल का अंतिम उद्देश्य हर ऐसी मानवीय गतिविधि पर रोक लगाना है, जिससे पयावरण के लिए खतरा पैदा होता है प्रोटोकॉल के मसौदे के मुताबिक, विकसित देशों को छह ग्रीनहाउस गैसों के उत्सजन में कम से कम पांच प्रतिशत की कमी करनी होगी इस सामूहिक लक्ष्य को हासिल करने के लिए स्विट्जरलैंड, मध्य और पूवी यूरोपीय राष्ट­ों व यूरोपीय संघ को 8 प्रतिशत, अमेरिका 7 प्रतिशत और कनाडा, हंगरी, जापान और पोलैंड को 6 प्रतिशत की कमी करनी होगी रूस, न्यूजीलैंड और यूक्रेन अपने मौजूदा स्तर पर कायम रहेंगे, जबकि नावे एक प्रतिशत, ऑस्ट­ेलिया 8 प्रतिशत और आइसलैंड इसमें 10 प्रतिशत तक की वृद्धि कर सकते हैं हर राष्ट­ को ग्रीनहाउस गैसों के उत्सजन का यह लक्ष्य 2008-2012 के बीच हासिल करना होगा उनके प्रदशन को मापने के लिए पांच सालों का औसत निकालने का प्रावधान किया गया है तीन सबसे महत्वपूण गैसों काबन-डाइ-ऑक्साइड, मिथेन और नाइट­स ऑक्साइड के घटे स्तर को मापने के लिए 1990 को आधार वष माने जाने की व्यवस्था है

औद्योगिक प्रतिष्ठानों से निकलने वाली खतरनाक गैसों में तीन सबसे पुरानी गैसों-हाइड­ोफ्लोरोकाबन, फ्लोरोकाबन और सल्फर हेक्साफ्लोराइड के स्तर का आकलन 1990 या 1995 को आधार वष मानकर किया जा सकता है अपेषा के मुताबिक इन देशों को अपने काबन उत्सजन के स्तर को कम करके 1990 के स्तर पर लाना था, लेकिन वे ऐसा करने में कामयाब नहीं रहे हैं सच तो यह है कि 1990 के बाद उनके काबन उत्सजन के स्तर में इजाफा ही हुआ है अथव्यवस्था में बदलाव के दौर से गुजर रहे देशों के उत्सजन के स्तर में 1990 के बाद कमी दिखाइ दी थी, लेकिन अब यह ट­ेंड बदलता नजर आ रहा है 2010 के लक्ष्य को प्राप्त करने के लिए प्रोटोकॉल के अंतगत उत्सजन के स्तर में 5 प्रतिशत की कमी सुनिश्चित करने के लिए विकसित देशों को वास्तव में करीब 20 प्रतिशत की कटौती करनी होगी क्योटो संधि के अनुसार उन सब देशों को इस संधि की पुष्टि करनी है जो धरती के वायुमंडल में 55 प्रतिशत काबनडाइऑक्साइड छोड़ते हैं उन्हें यह मात्रा 2008 से 2012 के बीच घटाकर पांच प्रतिशत तक लानी है रूस शुरू में क्योटो संधि पर हस्ताषार करने में झिझक रहा था, लेकिन अंतत: राष्ट­पति पुतिन ने रूस को क्योटो संधि से जोड़ दिया इस संधि को माच 2001 में उस समय भारी धक्का लगा था, जब अमेरिकी राष्ट­पति जॉज बुश ने घोषणा की कि वे कभी इस संधि पर हस्ताषार नहीं करेंगे अमेरिका दुनिया भर में ग्रीन हाउस समूह की गैसों के एक चौथाइ हिस्से के लिए जिम्मेदार है 191 देशों ने इस प्रोटोकोल की पुष्टि की है इसे 11 दिसंबर 1997 में जापान के क्योटो में ग्रहण किया गया और 16 फरवरी 2005 में अमल किया गया दिसंबर 2011 में कनाडा भी इस संधि से बाहर हो गया'बेसिक' चार विकासशील देशों- ब्राजील, दषिाण अफ्रीका, भारत और चीन का साझा मंच है कोपेनहेगन जलवायु वाता के दौरान चारों देशों ने साझा उद्देश्य जाहिर करते हुए तय किया था कि यदि विकसित देशों द्वारा जलवायु परिवतन पर उनके हितों की रषा नहीं की गयी, तो वे मिल कर एक मंच से अपनी बात रखेंगे हाल में ही संपत्र बेसिक देशों के पयावरण मंत्रियों की 10वीं बैठक के दौरान इस बात पर सहमति बनी कि जलवायु परिवतन से जुड़ी कोइ भी योजना बनाते समय समानता के मुद्दे (प्रिंसिपल ऑफ इक्विटी) को ध्यान में रखा जाना चाहिए l 

काबन उत्सजन में कौन कहां

प्रति वष उत्सजन प्रति वग किलोमीटर प्रति व्यक्ति मात्रा प्रतिशत में

(मीटि­क टन में) की दर से उत्सजन की दर से उत्सजनचीन 8,240,958 8,548 62 23

यूएसए 5,492,170 5,589 176 1811

भारत 2,069,738 6,296 17 578

रूस 1,688,688 989 118 567

जापान 1,138,432 30,122 89 401

जमनी 762,543 21,358 93 261

इरान 574,667 3,487 76 179

दषिाण कोरिया 563,126 56,195 115 169

कनाडा 518,475 519 149 180

यूके 493,158 20,244 79 173

यूरोपीय यूनियन 4177817 ---- -- 1404

(27 देश)

(दुनिया के कुछ बड़े देशों द्वारा प्रतिवष काबन उत्सजन की मात्रा, आंकड़े का स्नेत संयुक्त राष्ट­ की यूएएस डिपाटमेंट ऑफ इंजीनियरिंग 2010 इसमें केवल जीवाश्म ईंधन से उत्सजित काबन की मात्रा दी गयी है दस बड़े देश कुल 67 07 फीसदी काबन उत्सजन करते हैं)ं
 
हाल में ही प्रधानमंत्री मनमोहन सिंह ने कहा कि विकास ऐसा हो जिससे पयावरण पर कोइ बुरा प्रभाव न पड़े आथिक प्रगति लोगों के लिए जरूरी है, लेकिन हम ऐसी प्रगति की इजाजत नहीं दे सकते, जो हमारे पयावरण को नुकसान पहुंचाती हो प्रधानमंत्री ने यह बात बेसिक देशों (ब्राजील, दषिाण अफ्रीका, भारत और चीन) के पयावरण मंत्रियों की 10वीं बैठक के दौरान कही उन्होंने कहा कि जलवायु परिवतन से जुड़ी कोइ भी योजना बनाते समय समानता के मुद्दे (प्रिंसिपल ऑफ इक्विटी) को ध्यान में रखा जाना चाहिए समानता का मसला यानी कि हर देश द्वारा वायुमंडल में छोड़े जाने वाले काबन-डाइ-ऑक्साइड की मात्रा के आधार पर उस देश के उत्सजन लक्ष्य तय करना है गरीब और विकासशील देशों ने पिछले साल डरबन में भारत के समानता के सिद्धांत का समथन किया था साथ ही बेसिक देशों की डरबन में सकारात्मक भूमिका सामने आया संयुक्त राष्ट­ द्वारा प्रायोजित जलवायु वाता इस वष 18 दिसंबर को कतर में आयोजित की जायेगी उससे पहले बेसिक देशों के पयावरण मंत्री का यह 10वीं बैठक अहम है

बेसिक मंच की जरूरत

बेसिक चार विकासशील देशों ब्राजील, दषिाण अफ्रीका, भारत और चीन का साझा मंच है इसका गठन 28 नवंबर 2009 को एक समझौते के तहत हुआ कोपेनहेगन जलवायु वाता के दौरान चारों देशों ने साझा उद्देश्य जारी करते हुए तय किया कि यदि विकसित देशों द्वारा जलवायु परिवतन पर उनकी हितों की रषा नहीं की गयी, तो वे मिलकर एक मंच से अपनी बात रखेंगे बेसिक मंच चीन के प्रयास का नतीजा है इसके अध्यषा चीन के जी झेनहुआ हैं बेसिक मंच को कोपेनहेगन समझौते का नतीजा माना जाता है यह समूह काबन उत्सजन कटौती और इससे होने वाले नुकसान के लिए विकासशील देशों को मदद देने की योजना पर काम करता है जनवरी 2010 में समूह ने यह कह सबको चौंका दिया कि कोपेनहेगन समझौता राजनीति से प्रेरित है, क्योंकि यह कानूनी रूप से बाध्यकारी नहीं है कोपेनहेगन समझौते के सामने आने के बाद बेसिक देशों की ओर से जारी बयान में कहा गया कि 2011 में होने वाली डरबन वातातक संयुक्त राष्ट­ जलवायु परिवतन फ्रेमवक कन्वेंशन को कानून का दजा मिले और क्योटो प्रोटोकॉल को जारी रखने पर सहमति बनायी जाये साथ ही भारत ने समानता के सिद्धांत की बात भी रखी अमेरिका आदि विकसित देशों की मनमानी खत्म करने की भी मांग हुइ विकसित देशों से मांग की गयी कि काबन कटौती से विकासशील देशों हुइ षाति की भरपाइ और न्यायसंगत विकास करने में मदद देने के लिए कोष बने उन्हें वित्त, तकनीकी उपलब्ध करायें और षामता का विकास करने में योगदान दें लेकिन पिछले साल दिसंबर में डरबन में संयुक्त राष्ट­ जलवायु परिवतन सम्मेलन में देशों के बीच क्योटो प्रोटोकाल के विस्तार को लेकर सहमति नहीं बन पायी

विभित्र देशों में मतभेद

काबन उत्सजन में कटौती के लिए कानूनी रूप से बाध्यकारी क्योटो प्रोटोकाल की समय सीमा इस साल समाप्त हो रही है बेसिक देश जहां क्योटो प्रोटोकाल की समय सीमा ब़ढाए जाने पर जोर दे रहे हैं, वहीं अमेरिका और यूरोप आदि देश इसका विरोध कर रहे हैं बेसिक देशों का कहना है कि क्योटो प्रोटोकाल के लिए एक दूसरी प्रतिबद्धता अवधि आवश्यक है यदि वास्तव में जलवायु परिवतन से निपटना चाहते हैं, तो क्योटो प्रोटोकाल आगे अवश्य जारी रहना चाहिए संयुक्त राष्ट­ पयावरण कायक्रम (यूएनइपी) काबन उत्सजन में कटौती के लिए कानूनी रूप से बाध्यकारी और स्वैच्छिक उपाय दोनों की महत्ता स्वीकारने की वकालत करता रहा है उसका मानना है कि काबन उत्सजन को कम करने के लिए कुछ देशों के स्वैच्छिक उपाय और कानूनी बाध्यता दोनों एक-दूसरे के पूरक हैं और इन्हें एक-दूसरे से प्रतिस्पधा नहीं करनी चाहिए दोनों उपाय महत्वपूण हैं आज दुनिया पूरी तरह से स्वैच्छिक उपायों पर निभर नहीं रह सकती, लेकिन ये उपाय आवश्यक हैं, क्योंकि ये उपाय जलवायु परिवतन के प्रतिकूल प्रभाव से निपटने के लिए षोत्रीय स्तर पर देशों की प्रतिबद्धता दशाते हैं जलवायु परिवतन के मुद्दे पर संयुक्त राष्ट­ कहता रहा हैकि यही समय है जब हम जलवायु को बचाने के लिए कोइ कारगर कदम उठा सकते हैं अन्यथा बहुत देर हो जायेगी अभी तक क्योटो प्रोटोकाल में धनी देशों पर उत्सजन में कटौती करने की कानूनी बाध्यता है, जबकि विकासशील देशों पर यह स्वैच्छिक है

गतिरोध की वजह

विकासशील देश औद्योगिकीकरण के अपने अधिकार पर जोर देते हुए कटौती का विरोध कर रहे हैं यह गतिरोध का प्रमुख बिंदु है भारत कहता रहा है कि वह विकासशील देशों पर कानूनी रूप से बाध्य किसी भी कटौती का विरोध करेगा चारों देश इस मुद्दे पर एक हैं कि दुनिया के लिए काबन उत्सजन में कटौती के मानक 'समान' नहीं, बल्कि 'समतापूण' होने चाहिए यानी इतिहास में कुल मिलाकर सबसे ह्लयादा प्रदूषण फैलाने वाले देश अपने उत्सजन में सबसे ह्लयादा और सबसे तेज कटौती करें, जबकि विकास के निचले पायदान पर चल रहे देश धीरे-धीरे इस रास्ते पर आगे ब़ढें और विकसित देशों की ओर से उन्हें इस काम में सस्ते दर पर या मुफ्त तकनीकी मदद भी मुहैया करायी जाये विभित्र देशों की षामता और ऐतिहासिक भूमिका के मुताबिक इस काम में उनकी हिस्सेदारी तय होनी चाहिए भारत, चीन और दषिाण अफ्रीका के पास गैस, तेल और परमाणु संसाधनों की तुलना में कोयला कहीं ह्लयादा है और अपनी बिजली की जरूरतें पूरी करने के लिए कोयला आधारित बिजलीघरों पर निभर रहना उनकी मजबूरी है इसी तरह ब्राजील अपने यहां गóो की बड़ी उपज का इस्तेमाल मिथेनॉल आधारित गा़िडयां चलाने में करता है जाहिर है, उत्सजन में कटौती के नाम पर अगर कोयले और बायोफ्यूल के इस्तेमाल पर ग्लोबल कानूनी रोक लगायी जाती है, तो आथिक पिछड़ापन ही बेसिक देशों की नियति बन जायेगी लेकिन इस चिंता को सबसे ऊपर रखते हुए भी हम ग्लोबल वार्मिग से जुड़ी कहीं ह्लयादा बड़ी चिंताओं की अनदेखी नहीं कर सकते विकास के नाम पर विकासशील देशों में जिस तरह जंगल काटे जा रहे हैं और नदियां नाले में तब्दील हो रही हैं, वह अब इन समाजों के लिए आत्मघाती साबित होने लगा है

आय के वितरण और काबन उत्सजन संबंधी आंकड़ों का विश्लेषण करने पर यह बात सामने आती है कि भारत की सबसे अमीर 10 फीसदी आबादी का प्रति व्यक्ति काबन उत्सजन अमेरिका के सबसे गरीब 10 फीसदी लोगों द्वारा किए जाने वाले उत्सजन के बराबर या उससे कुछ कम ही था अगर अमेरिका के सबसे अमीर लोगों से तुलना की जाये, तो यह उनके द्वारा किए गये उत्सजन का 10 वां हिस्सा भी नहीं था दूसरे शब्दों में कहा जाये, तो भारत के अमीरों ने अमेरिका के गरीबों से भी कम काबन उत्सजन किया है

वष 2009 में कोपेनहेगन सम्मेलन में देशों को दो नयी Ÿोणियों में बांट दिया गया पहला, ऐसे संवेदनशील देश जिनको जलवायु परिवतन अपनाने के लिए तुरंत धन मुहैया कराया जाना था और दूसरे वे देश जिनको उभरते हुए प्रदूषक का दजा दिया गया- इसमें भारत, चीन, ब्राजील और दषिाण अफ्रीका शामिल थे इस सम्मेलन कहा गया कि भारत जैसे देश समानता के आधार पर उस धनराशि की राह रोक रहे हैं, जो बांग्लादेश और मालदीव जैसे देशों के खाते में जानी है इस तरह सम्मेलन में गरीब देश गरीबों से ही भिड़ गये तब से लेकर अब तक यह मतभेद जारी है इस तरह देखें तो इस तरह के गतिरोध दूर करने में यह मंच काफी उपयोगी साबित हो सकता है पिछले कुछ वर्षो के दौरान अमीर देशों के उत्सजन में लगातार इजाफा हुआ है, लेकिन उसके बारे में बात करने वाला कोइ है ही नहीं अब समय आ गया है कि हम इन बचकानी लड़ाइयों को खत्म करें यह तय करना होगा कि दुनिया भर में काबन उत्सजन में तेज गति से और बड़े पैमाने पर कटौती की जाये l


ऊन लागलं तर

मार्च, एप्रिल, मे म्हणजे तसे बाहेर फिरण्याचे दिवस. एकीकडे फिरण्यातला
आनंद खुणावत असतो, तर दुसरीकडे आग ओकणारं ऊन आपले पाय रोखत असतं. काही जण
तापणार्‍या उन्हाची तमा न बाळगता आपली फिरण्याची, उन्हात काम करण्याची
जिद्द कायम ठेवतात. पण अनेक जण रणरणत्या उन्हाला सामोरं जाताना पुरेशी
काळजी घेत नाही. तर अनेक जणांची प्रकृती काळजी घेऊनही उन्हात तग धरू शकत
नाही. मग कित्येकांना ऊन लागण्याचा त्रास होतो.
आपल्या शरीराचं सामान्य तपमान ९८.२ फॅरनहाईट इतकं असायला हवं. ते ऊन
लागण्याच्या त्रासात वाढतं. मग फणफणून ताप येणं, नाकाचा घोळणा फुटून रक्त
वाहणं किंवा लघवीला जळजळणं, सतत तहान लागणं, या अशा स्वरूपाचा त्रास
व्हायला लागला की त्याला ऊन लागणं असं म्हणतात. या तिन्ही प्रकारच्या
त्रासात योग्य ते उपचार केले तर त्या समस्या गंभीर रूप धारण करत नाही.
- ऊन लागल्यानं ताप आल्यास थंड पाण्याच्या पट्ट्या कपाळावर ठेवाव्यात.
अनेक जण ताप आला की, अंगावर ब्लँकेट टाकून, स्वेटर घालून शरीरातला घाम
काढतात. पण असं न करता पाण्याच्या पट्ट्यासोबत पंखा (कमी वेगावर)
लावावा/तसेच दिवसातून दोन-तीन वेळा पूर्ण शरीराचं स्पंजिंग करावं. म्हणजे
शरीरातील तपमान लवकरात लवकर खाली उतरतं.
- ऊन लागल्याच्या त्रासात कांदा हा अतिशय गुणकारी ठरतो. ताप लवकर उतरत
नसल्यास कांद्याचा रस संपूर्ण शरीराला विशेषत: कपाळाला आणि पोटाला
चोळावा. कांद्याच्या थंड प्रवृत्तीनं ताप उतरण्यास मदत होते.
- नाकाचा घोळणा फुटून रक्त येत असल्यास रुग्णाला कॉटवर झोपवून रुग्णाचे
डोके कॉटखाली येईल याची काळजी घ्यावी. रुग्णाच्या नाकावर आणि कपाळावर
बर्फ फिरवावा, दुर्वांचा रस लावावा किंवा हे दोन्ही उपलब्ध नसल्यास
कांद्याचा रस लावावा.
- उन्हाळ्यात भरपूर घाम येतो. त्यामुळे शरीरातील अतिरिक्त पाणी घामावाटे
बाहेर पडतं. इतर ऋतूत जास्त प्रमाणात ते लघवीवाटे बाहेर पडतं. घामामुळे
पाणी जास्त बाहेर पडत असल्यामुळे उन्हाळ्यात लघवीचं प्रमाण कमी होतं.
लघवीचं प्रमाण अतिशय कमी झाल्यास लघवीला जळजळतं. ज्यांना उन्हाळ्यात खूप
घाम येतो त्यांनी पाणी जास्त प्रमाणात प्यावं. पाण्यात धने आणि जिरे
रात्रभर भिजवून सकाळी ते प्यावं किंवा गरम पाण्यात धने आणि जिरे उकळवून
दिवसभर ते पाणी प्यावं. गोखरू हे औषधही रात्री पाण्यात भिजवून किंवा गरम
पाण्यात उकळवून प्यावं. पण हे औषध घेण्यापूर्वी वैद्यांचा सल्ला घ्यावा.
- उन्हाळ्यात येणार्‍या घामामुळे अनेकांना घामोळ्यांचा त्रास होतो. बारीक
पुरळीच्या स्वरूपात येणार्‍या घामोळ्यांमुळे खाजणं, जळजळणं यामुळे रुग्ण
बेजार होतात. घामोळ्यांचा त्रास ज्यांना नेहमी होतो त्यांनी उन्हाळ्यात
सिंथेटिक कपड्यांऐवजी कॉटनचे कपडे वापरावे. सिंथेटिक कपड्यांमुळे बाहेर न
पडता त्वचेत जिरणारा घाम कॉटनच्या कपड्यांमुळे बाहेर पडतो. शरीराच्या
ज्या ठिकाणी जास्त घाम येतो त्या जागेवर दिवसातून दोन-तीन वेळा स्पंजिंग
करावं किंवा त्या जागेवर वाळा आणि चंदन पावडर आपण वापरत असलेल्या टाल्कम
पावडरमध्ये मिसळून वापरावी किंवा टाल्कम पावडरमध्ये न मिसळता ती तशीच
लावली तरी उपयुक्त असते.
- उन्हाळ्यात खूप घाम येणार्‍या लोकांनी वाळा आणि चंदन पावडर पाण्यात
मिसळून पोटातून घ्यावी. तसेच वाळ्याचं सरबत प्यावं.
- हातापायाची जळजळ होत असल्यास पायांच्या तळव्यांना वाळा आणि चंदन
पावडरचा लेप लावावा. साजूक तूपही तळव्यांना लावल्यास स्निग्धता आणि
थंडावा मिळतो.
- कितीही पाणी प्यालं तरी तहान भागत नाही हेही ऊन लागण्याचं लक्षण आहे.
या प्रकारच्या लक्षणात रुग्णानं साधं, माठातलं किंवा फ्रीजमधलं पाणी न
पिता वाळ्याचं पाणी प्यावं. वाळ्याची चव तुरट असते. तृष्णेच्या आजारात
वाळ्याच्या पाण्यानं तहान शमते किंवा दिवसभर गरम पाणी प्याल्यासही तहान
शमते. आभासी तहानेवर माठाचं किंवा फ्रीजचं पाणी हा तात्पुरता उपाय ठरतो.
- ऊन लागलेलं असल्यास कैरी भाजून त्यातला गर काढून त्यात धने, जिरे घालून
केलेलं पन्हं फायदेशीर ठरतं. तसेच रोजच्या जेवणात कांद्याची कोशिंबीर
खावी.
- ऊन बाधलेल्या रुग्णांनी थंड प्रकृतीच्या भाज्यांचा वापर अधिक करावा.
हलका आणि पौष्टिक आहार घ्यावा. तसेच ताजी, हंगामी फळं जास्त खावीत.

Live with trees झाडं - लावणं आणि जगवणं

अनेकांना झाडं लावायची हौस तर असते पण जागाच नसते. तर काहींना खूप जागा
असूनही त्या जागेत काय लावावं हेच सुचत नाही. तर अनेकांना लावलेल्या
झाडांना वाढवणं जमत नाही. पण झाड म्हणजे असा जीव आहे जो अगदी सहज वाढतो.
त्यासाठी खूप श्रम करायची किंवा वेळ द्यायची गरज नाही. आपल्या जागेचा
विचार करून झाड लावून येता-जाता, आपली कामं करता-करता त्यांच्याकडे लक्ष
देता येतं. दिवसभराच्या धावपळीतून विरंगुळा म्हणून झाडांमध्ये मन रमवून
त्यांची थोडी काळजी घेता येते. प्रेमाच्या, आपलेपणाच्या थोड्याशा
शिडकाव्यानं झाडं बहरतात, आपलं अंगण फुलवतात आणि कोणाला तरी जगवण्याचा
आनंद ते आपल्या ओंजळीत टाकतात.
१)बर्‍याच लोकांना भीती असते की, आपल्या अंगणात झाडं लावली तर त्यांची
मुळं घराच्या भिंतींना कमजोर करतील. मग त्यावर अत्यंत सोपा उपाय आहे. जर
जागा कमी असेल तर फक्त अशीच झाडं लावा ज्यांची मुळं खोलवर जातील; पण
इकडे-तिकडे पसरणार नाहीत. उदाहरणार्थ- अशोकाचं झाड.
२) लावलेल्या झाडांना नियमित पाणी घालणं शक्य होत नसेल, तर जिथं आपण झाडं
लावली आहे तिथं चूळ भरावी, नुसत्या पाण्यानं हात धुताना झाडांच्या कुंडीत
धुवावे, चेहर्‍यावर पाणी मारताना झाडाच्या ठिकाणी जाऊन पाणी मारलं तर
आपलंही काम होतं आणि झाडालाही पाणी मिळतं.
३)पिण्याचे पाणी भरण्यापूर्वी बरेच जण आदल्या दिवशी भरलेल्या पाण्याला
शिळं झालं म्हणून फेकून देतात. मग तेच पाणी आपण झाडांना घातलं, तर
झाडांना वेगळं पाणी घालण्याची गरजच उरणार नाही.
४) ज्यांच्या घरासमोर झाड लावण्यासाठी थोडीही जागा नाही त्यांनी खिडकीत
कुंडीमध्ये जाई, गुलाब यासारखी झाडं आणि वेली लावावीत आणि घराच्या
सोयीप्रमाणे या वेली त्यांना घरावर चढवताही येतील.
५) फुलझाडं लावताना ती प्रखर उन्हात किंवा अगदी सावलीत लावू नये. ती अशा
ठिकाणी लावावीत ज्या ठिकाणी सकाळचे कोवळे किरण त्यांना मिळतील व
दुपारच्या उन्हाच्या झळाही त्यांना लागणार नाहीत.
६) कुंडीत लावलेल्या आपल्या फुलझाडांना किंवा वेलींना आपण खूप जपतो; पण
उन्हाळ्याच्या व दिवाळीच्या सुट्टीत आपण बाहेर जातो तेव्हा ती झाडे-वेली
पोरकीच होतात. त्यामुळे विश्‍वासू शेजार्‍याला रोज पाणी घालण्याची विनंती
करून जाता येईल, अथवा पाणीसाठवणीच्या भांड्यातून सलाईनच्या छोट्या
पाइपद्वारे कुंडीमध्ये ठिबक सिंचनाची व्यवस्था करता येईल. थेंबाचे प्रमाण
खूप मंद ठेवावे. ज्यामुळे झाडांच्या कुंडीतला मातीचा ओलावा कायम राहील.
७) झाडाची वाढ झाली की फांद्या घराच्या खिडक्यांची काचाही फोडतात.
त्याचप्रमाणे फुलझाडेही वेडीवाकडी व कुरूप दिसू लागतात. त्यासाठी झाडांची
वेळोवेळी छाटणी करणं आवश्यक असतं. छाटणीमुळे झाड चांगल्या प्रकारे
वाढण्यास मदत होते.
८) झाडांवर रोग पसरू नये म्हणून झाडावर अधूनमधून औषधफवारणी करावी.
९) जागा किती आहे हे पाहूनच कोणते झाड लावावं हे ठरवावं, नाहीतर कमी
जागेत मोठी किंवा खूप झाडे लावली तर त्यांचे पोषण व्यवस्थित होऊ शकणार
नाही.
अशा प्रकारे थोडं नियोजन केलं, थोडी काळजी घेतली तर आपल्याला जीवदान
देणार्‍या झाडांना सहज जगवता येतं.

Wednesday, April 25, 2012

Consumer panel relief for Adi Godrej

Consumer panel relief for Adi Godrej

The State Consumer Disputes Redressal Commission has set aside an order of the district consumer forum directing Adi Godrej, chairman and managing director of Godrej Consumer Products and Nadir Godrej, chairman of Godrej Industries Employees Co-operative Credit Society Ltd, to pay one of its former employees Rs30,900, for refunding late, the amount deposited by him in the credit society.

The commission while setting aside the order observed that “We are of the view that when the appellants had satisfied complainant’s dues on 22/09/2009, there was no propriety for the District Consumer Disputes Redressal Forum to proceed further with the complaint and pass further order directing appellants to pay.”

The state commission passed the order on April 16, while hearing the appeal by the chairman and the company, who were told by the forum to make the payment jointly and severally, on the complaint of a former member of the credit society Vipin Dwivedi, who resigned from the membership of society on October 8, 2001, and requested the society to refund him the amount of shares. The refund amounted to Rs8,569 and Rs53,647.

Advocate SB Prabhawalkar, appearing for Godrej, argued that Dwivedi had caused wrongful loss of Rs7 to 8 lakh to the company and, so, Nadir Godrej, told the credit society not to make any payment to him.

The commission termed Diwedi’s complaint filed in 2007 as barred by limitation and on that count itself the plea should have been rejected by the forum.

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email