Wednesday, April 11, 2012

Marathi jokes

लय भारी जॉक..Marathi jokes



चिनी कुत्र्याचे नाव काय ?
>हे हुंग ते हुंग

भारत सोडून जाणार्‍या माणसाला काय म्हणाल ?
>हिंदुस्तान लिव्हर

नेपाळमध्ये चोर्‍या का होत नाहीत ?
>कारण तिथे सगळेच गुरखे आहेत.

रशियन डोअरकिपरचे नाव काय ?
>उभा का बस की

हिवाळ्यात खिसेकापूंच्या धंद्यात मंदी का असते ?
>कारण हिवाळ्यात सर्वांचे हात खिशात असतात

अनुपम खेरला ३१ डिसेंबरला मुलगी झाली तर तिचे नाव काय असेल ?
>वर्षा अ खेर

हत्ती पाण्यात पडला तर काय होईल ?
>ओला होईल

ब्रूस लीच्या आईचे नाव काय ?
>माऊ ली

त्याच्या मोठ्या बहिणीचे नाव काय ?
>थोर ली

लहान बहिणीचे नाव काय ?
>धाक ली

जेंव्हा घड्याळात तेरा ठोके पडतात ती वेळ कुठली असते ?
>घड्याळ दुरुस्त करण्याची !

दोन चिमण्या असतात त्यातली एक म्हणते "चिऊ" दुसरी काहीच म्हणत नाही! का?
>कारण दुसरी चिमणी Factory ची असते.

कर्वे रोडला पाणी येते, पण कोथरुड ला नाही येत. का बरे ?
>कारण वाटेत नळ स्टॉप आहे.

ढिशुम ढिशुम: एकदा भारत आणि पाकिस्तान चे सैनिक समोरासमोर येतात पण ते
युद्ध करत नाहीत. का बरं?????
>कारण ढिशुम ढिशुम तर पेप्सोडेन्ट चे काम आहे ना....

रावणाच्या लंकेला "सोन्याची लंका" का म्हणतात???
कारण लहानपणी ..
>रावणाचे आई-वडिल त्याला लाडाने "सोन्या" म्हणायचे..

पुरातन काळातले हाडांचे सांगाडे सापडल्यानंतर त्यातला कोणता पुरुषाचा आहे
आणि कोणता स्त्रीचा, हे पुरातत्त्वशास्त्रज्ञ कसे ठरवतात?
>दोन्ही सांगाड्यांचे जबडे पाहायचे. जो जास्त घासला गेला असेल, तो स्त्रीचा!!!!

पप्पा कांगारू -अगं आपली बेबी कुठाय?
>मम्मा कांगारू -ओ माय गॉड! कोणी तरी माझा खिसा कापलेला दिसतोय.

नुकतीच ससा आणि कासवाची पुन्हा एकदा शर्यत झाली. आणि त्यात ससा मागे
पडला. पण तरीही शर्यत ससाच जिंकला... का?
>कारण...शर्यतीला डकवर्थ लुईस नियम लागू केला होता ना.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive