Thursday, May 31, 2012

रेल चक्र - हीरो आणि हिरा ! Railway - Hero and diamond

रेल चक्र - हीरो आणि हिरा !

शाळेत असताना माझा एक पाशा नावाचा मित्र होता. अतिशय देखणा होता. शाळेतल्या मुलींच्या नजरा त्याच्याकडेच वळत. मी व पाशा दोघं एका बेंचवर बसत असू. माझ्याकडे एकाही मुलीची नजर वळत नसे. मी मनातून नाराज होई आणि पाशाचा हेवा करी. पुढे आम्ही कॉलेजात गेलो. पाशाही माझ्याबरोबर होता. कॉलेजमध्ये मुली पाशाशी बोलत त्याच्या पुढेपुढे करत. पण त्याचबरोबर माझ्याशीही चर्चा करत असत. याचं कारण म्हणजे मी कॉलेजमध्ये स्कॉलर होतो. अनेक वक्तृत्व स्पधेर्तून बक्षिसं मिळवत होतो. प्राध्यापकांचा मी लाडका विद्याथीर् होतो. कॉलेजमध्ये गेल्यावर माझ्यात आमूूलाग्र बदल झाला होता आणि मी तो प्रयत्नाने व अभ्यासाने घडवला होता. पाशाकडे सुंदर व्यक्तिमत्त्व आहे , त्यामुळे मुली त्याच्याकडे पाहतात त्याच्याशी बोलण्यासाठी धडपडतात. आपल्याकडे त्याच्यासारखं व्यक्तिमत्व नसलं तरी बुध्दी आहे. आपण अभ्यासात पुढे यायला हवं , स्पधेर्तून बक्षिसं मिळवायला हवीत , आपलं व्यक्तिमत्व बहुश्रुत करायला हवं असा माझा निर्धार होता. त्यात मला यश मिळालंही. पाशाच्या बरोबरीतच मुली माझ्याशीही बोलू लागल्या. शाळेतला न्यूनगंड व पाशाबद्दल वाटणारा हेवा मी या अथक प्रयत्नानं दूर लोटला होता.

एके दिवशी मी पाशाला विचारलं , ' पाशा तुझं ध्येय काय आहे ?'

' माझं ध्येय रेल्वेत इंजिन ड्रायव्हर व्हायचं आहे. ' त्याचं उत्तर ऐकून माझा ' ' वासला. मी म्हणालो ' काय ?'

' एवढं तोंड फाटेपर्यंत काय म्हणायला काय झालं. ' तो म्हणाला. ' अरे मला वाटलं की तू सिनेनट होशील. नाटकात कामं करशील किंवा छोट्या पडद्यावर कलावंत होशील. ' मी म्हणालो.

' शी आय हेट दॅड फिल्ड. ' तो म्हणाला. ' अरे , पण तुझी पर्सनॅलिटी. ' माझ्या शब्दातलं आश्चर्य लपत नव्हतं. ' आय वॉण्ट टू बिकम ड्रायव्हर इन रेल्वे! ' त्याचं उत्तर ऐकून एव्हाना मी गार पडलो होतो.

आणि पाशानं रेल्वेच्या जाहिरातीत अर्ज टाकायला सुरुवात केली होती. पाशाचं असिस्टण्ट ड्रायव्हर म्हणून निवडही झाली. सगळं कॉलेज हळहळलं... खरं म्हणजे त्यानं सिनेनट व्हायला हवं होतं तर झाला काय , तर ड्रायव्हर. दात आहेत तिथे चणे नाहीत , आणि चणे आहेत तिथे दात नाहीत. हेच... खरं...

पाशानं कसबसं एक वर्ष असिस्टण्ट ड्रायव्हर म्हणून काम केलं व तो मेडिकल एक्झामिनेशनमध्ये नापास झाला , कारण तो रंगांधळा ठरला. ड्रायव्हर काय किंवा गार्ड काय त्यांची नजर चांगली पाहिजे व सिग्नलचे रंग ओळखता आले पाहिजेत. पंचेचाळीस वर्षांपर्यंत यांना तीन वर्षांत एक अशी मेडिकल असते व पंचेचाळीस वर्षांनंतर दरवषीर् असते. ती मेडिकल पास होणं आवश्यक असतं. पाशा मेडिकलमध्ये नापास झाल्यानं त्याला नॉन मेडिकल जागेत समावून घ्यावं लागलं. त्याला कुठे घ्यायचं कोणत्या खात्यात टाकायचं , याचा शोध सुरू झाला. पाशा साहेबाला जाऊन भेटला. साहेब पाशाच्या पर्सनॅलिटीवर खुश झाला. त्यांनी त्याची कंट्रोल ऑफिसमध्ये पॉवर कंट्रोलरचा असिस्टण्ट म्हणून नियुक्ती केली. पाशाच्या जीवनात आमूलाग्र बदल झाले. इंजिनवर काम करताना त्याला निळा ड्रेस घालावा लागत असे. हात व चेहरा काम करताना काळे होत असत. कंट्रोल ऑफिस एअर कण्डिशन्ड होतं. पाशा ऑफिसमध्ये एकदम अप टू डेट यायचा. त्याची पर्सनॅलिटी व त्याचा पेहराव पाहून संपूर्ण कंट्रोल ऑफिस त्याला ' हीरो ' म्हणत असे. कॉलेजमध्ये पाशाला त्याच्या व्यक्तिमत्त्वामुळे हीरो म्हणत तर मला मिळणाऱ्या बक्षिसांमुळे मला हीरो म्हणत असत. पण आथिर्क अडचणींमुळे माझ्या हिऱ्याचा कोळसा झाला आणि मला नोकरी धरावी लागली. मीसुध्दा रेल्वेत लागलो. पाशानं मात्र नोकरीतही ' हीरो ' हे नाव टिकवलं परंतु ' हिरा ' हे कॉलेजमधलं नाव मला नोकरीत काही टिकवता आलं नाही.

पाशानं मोटरमनचा सांगितलेला किस्सा तुम्हाला सांगतो. ड्रायव्हरमध्ये दोन प्रकार आहेत. एक ड्रायव्हर व दुसरा मोटरमन. मेल एक्स्प्रेस , पॅसेंजर मालगाड्या चालवणाऱ्याला ड्रायव्हर म्हणतात व लोकल गाड्या चालवणाऱ्या मोटरमन म्हणतात. परंतु प्रवासी या दोघांनाही ड्रायव्हर म्हणूनच संबोधतात.

कोणत्याही स्टेशनवर सुरू झालेली लोकल थांबली की मास्तर म्हणत मोटरमन फडके आहे वाटतं. ' हात दाखवा व बस थांबवा '. या धतीर्वर ' हात दाखवा व लोकल थांबवा ' या नुसार कृती करणाऱ्या लोकांसाठी फडके लोकल थांबवत व त्यासाठी खचीर् पडलेला वेळ वेगात जाऊन भरून काढत असत. लोकल सुरू झाल्यानंतरही पॅसेंजरने हात दाखवल्यावर फडके लोकल थांबवतात ही गोष्ट साहेबांच्या कानापर्यंत गेली. साहेबांनी फडकेंना असं न करण्याची तंबी दिली होती.

एकदा ठाणे स्टेशनहून फडकेची लोकल निघाली. समोरून एक म्हातारा माणूस गाडी थांबण्यासाठी हात करत होता. फडकेने त्यांच्या सवयीनुसार लोकल थांबवली. तो वृद्ध माणूस म्हणाला , ' ड्रायव्हरसाब पुढं रुळ तुटलया , गाडी फुडं घेऊ नका. '

फडकेंनी गाडी थांबवली व ते अर्धा फर्लांग रुळातून चालत गेले. एका ठिकाणी रुळ तुटला होता.

बापरे! खरंच लोकल पुढं गेली असती तर पडलीच असती. आपल्याला लोकल थांबवण्याबद्दल साहेबांनी गेल्याच आठवड्यात दम दिला होता याची त्यांना आठवण झाली आणि फडकेनी वेळेवर लोकल थांबवून अपघात टाळल्याचं ऐकून साहेबांनी त्यांचं कौतुक केलं व त्यांना बक्षीसही दिलं.


- व्यंकटेश बोर्गीकर

रेल चक्र - कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे ! Load on shoulder

रेल चक्र - कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे !
तो दिवाळीचा आदला दिवस होता. अंबरनाथ लोकलच्या पुढे डेक्कन एक्सप्रेस गेली आणि थोड्यावेळात अंबरनाथ मुंबई लोकल निघाली. लोकल उतारूंनी गच्च भरलेली होती. दोन डब्याच्या कपलिंकवरही लोक बसले होते. काहीजण लोकलच्या टपावरही होते. लोकलच्या पुढे डेक्कन एक्सप्रेस धावत होती. लोकल कुर्ल्याहून निघाली. डेक्कन एक्सप्रेस पुढे काढल्यामुळे लोकल दहा मिनिटे उशीरा धावत होती. त्यामुळे ही दहा मिनिटं भरून काढण्यासाठी मोटरमनला लोकल वेगाने चालवणं भाग होतं. तसं तो चालवतही होता. परंतु त्याला लोकल पुढे काही अंतरावर धुराळा दिसला. त्याने लोकलचा वेग कमी केला. धुराळ्यामुळे पुढे काय झालंय ते त्याला दिसत नव्हतं. परंतु त्यांच्या मनात विचार आला एवढा धुराळा रेल्वे लाइनीत उडतोय. म्हणजे एक्सप्रेसला अपघात झाला असावा. तेवढ्यात त्याला डेक्कन एक्सप्रेसचा एक डबा बाजूच्या रुळावर कलंडलेला दिसला. आता आपली लोकल डेक्कन एक्सप्रेसवर जाऊन आदळणार. ब्रेक लावून काही उपयोग होणार नाही आणि उलट आपला जीव जाणार असा विचार त्या मोटरमनच्या मनात येऊन गेला. कारण गेल्यावषीर् असंच घडलं होतं. मालगाडीच्या मागे लोकल होती. पुढे असलेल्या मालगाडीचे दोन डबे रुळावरून घसरले होते. मोटरमनच्या लक्षात आलं की आपण कितीही प्रयत्न केला तरी लोकल मालगाडीवर आदळणार व आपला मृत्यू होणार. अपघात तर आपण वाचवू शकत नाही. निदान आपला जीव तरी वाचवू शकतो असा विचार करून त्याने कॅबमधून बाहेर उडी मारली होती. मोटरमन वाचला पण लोकल मालगाडीवर आदळली आणि प्रवाशांना जखमा झाल्या होत्या.

हा प्रसंग त्या अंबरनाथ लोकलच्या मोटरमन , जयंत निमसूडकरला आठवला. क्षणभर त्याला वाटलं , आपणही कॅबबाहेर उडी टाकावी व आपला प्राण वाचवावा , परंतु दुसऱ्याच क्षणी त्याच्या मनात विचार आला... कॅबबाहेर उडी नाही टाकायची. प्राण गेला तरी चालेल परंतु अपघात वाचवायचा अटोकाट प्रयत्न करायचा आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्यात त्याला यश मिळालंही. डेक्कन एक्सप्रेसच्या पडलेल्या डब्याच्या चार फुटाच्या अंतरावर त्याला लोकल थांबवण्यात यश आलं. लोकलमधून सगळे उतारू उतरले व त्यांनी मोटरमनकडे धाव घेतली. ते दृष्य पाहून मोटरमनला म्हणाले , ' काही म्हणा तुम्ही स्वत:चा जीव धोक्यात घालून हा अपघात होण्यापासून वाचवलात आणि आम्हाला वाचवलंत. नाहीतर उद्याची दिवाळी ही काळी दिवाळी झाली असती. तुम्हाला किती धन्यवाद द्यावेत तेवढे थोडेच आहेत. ' रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्या मोटरमनला रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक देऊन त्याचं कौतुक केलं. तेव्हा निमसुडकर रेल्वेच्या अधिकाऱ्यांना म्हणाला , ' आपण मला रोख रक्कम व प्रशस्ती पत्रक देऊन कौतुक केलं. याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. परंतु आम्हा मोटरमनच्या काही अडचणी आहेत , त्याचा विचार व्हावा अशी आपणास विनंती करतो. '

सिग्नल हा नेहमी रुळाच्या डाव्या बाजूलाच असायला हवा. पण अजूनही काही ठिकाणी असलेले सिग्नल हे रुळाच्या उजव्या बाजूला आहेत. त्यामुळे मोटरमन गोंधळतो व सिग्नल दिला नसतानाही गाडी पास करतो. म्हणजे सिग्नलच्या पुढे जातो. असे प्रकार वारंवार घडूनदेखील सगळे सिग्नल रुळाच्या डाव्या बाजूलाच बसवण्याचे प्रयत्न होत नाहीत. मेल एक्सप्रेस पॅसेंजर गाड्या चालवणाऱ्या ड्रायव्हरला एक असिस्टण्ट असतो. तो ड्रायव्हरला सिग्नलची स्थिती स्पष्ट करून सांगतो. ते अशी असते , आऊटर सिग्नल - राइट , होम सिग्नल - राइट , स्टार्टर राइट , अॅडव्हान्स स्टार्टर - राइट. त्यामुळे ड्रायव्हर आपलं संपूर्ण लक्ष गाडी चालवण्यावर केंदीत करू शकतो. शिवाय व्हॅक्युम कमी झालं , चेन ओढली इत्यादी घटना घडल्या तर असिस्टण्ट त्या गोष्टी ठीक करू शकतो. परंतु मोटरमनला असिस्टण्ट नसल्यामुळे ड्रायव्हिंग करणं व सिग्नलकडे लक्ष देणं , या व्यतिरिक्त चेन ओढली तर त्याकडे बघणं इत्यादी कामं एकट्यानेच पार पाडावी लागतात. त्याचं थोड जरी लक्ष विचलित झालं तर अपघात होण्याचा संभव असतो. एका मेल एक्सप्रेस गाडीतल्या उतारूंपेक्षा एका लोकल गाडीतल्या उतारूंची संख्या तिप्पट चौपट असते. असं असतानाही रेल्वे प्रशासन मोटरमनला असिस्टण्ट देण्याच्या विरोधात आहे. तेव्हा मोटरमनला असिस्टण्ट देण्यासंबंधी विचार व्हावा. ड्युटी संपल्यानंतर मोटरमन रनिंग रूममध्ये विश्राम करतो तेव्हा त्या रनिंग रूमची व्यवस्था नीट नेटकी असायला हवी.

मध्य रेल्वेतल्या उपनगरीय गाड्यांवर काम करणाऱ्या बहुतांशी मोटरमनची तक्रार आहे की काही ठिकाणी सिग्नलच्या जागा योग्य नाहीत. मोटरमन गाडी चालवताना सिग्नल त्याच्या दृष्टीक्षेपात असला पाहिजे आणि तो मोटरमनकॅबच्या डाव्या बाजूला असला पाहिजे. परंतु बऱ्याच ठिकाणी सिग्नल उजव्या बाजूला आहेत. त्यामुळे तो सिग्नल लाल अवस्थेमध्ये असतानादेखील ओलांडून जातो. त्याबद्दल त्याला शिक्षाही होते. मोटरमनला शिक्षा देण्यामध्ये रेल्वे सरकारची तत्परता दिसून येते. परंतु विधायक कारवाईच्या बाबतीत दिरंगाई होत राहते आणि मोटरमन शिक्षा भोगत राहतात.


- व्यंकटेश बोर्गीकर

रेल चक्र - जित्याची खोड ... Railway bad habit

रेल चक्र - जित्याची खोड ...


मनुष्य स्वभावाला असलेल्या विविध पैलूंचा अनुभव मला पदोपदी येत होता. एकदा मी मोडनिंब स्टेशनवर काम करत होतो. सकाळी आठ ते रात्री आठ , अशी बारा तासांची ड्युटी असायची. रात्रीचे आठ वाजले होते. माझी ड्युटी संपली होती आणि मला सोडवायला मास्तर आला. मी त्याला चार्ज देऊ लागलो तेवढ्यात तो म्हणाला , ' प्रथम मी वेटिंग रूमचा चार्ज घेऊन येतो. '

' म्हणजे ?' न कळल्यामुळे मी प्रश्न केला.

' वाघाचे पंजे. ' एवढं बोलून तो वेटिंग रूममध्ये गेला. सात-आठ बायका , दहा-बारा पुरुष आणि काही पोरं वेटिंग रूममध्ये होती. त्यापैकी एका बाईजवळ जाऊन तो म्हणाला , ' मागच्या बाजारला तुम्ही मामा करून टाकलात. '

' या खेपेला मामी करून टाकते. काळजी करू नका. ' ती उत्तरली.

' नक्की. '

' अगदी नक्की. '

मग तो स्टेशनात येऊन म्हणाला , ' बाकी सगळं ठीक आहे ना. त्या चाव्या द्या आणि जा तुम्ही मास्तर. '

मी चाव्या दिल्या व विचारलं , ' वेटिंग रूमचा चार्ज , ही काय भानगड आहे रे. '

उजव्या नाकपुडीवर तर्जनी ठेवत तो म्हणाला , ' अरे , मला याचा नाद आहे. मी नेहमी नव्या स्त्रीच्या शोधात असतो. गेल्या बाजारला तिनं मला शब्द दिला होता. पण तिनं तो पाळला नव्हता आणि माझा मामा केला होता. म्हणून आज तिला त्याची जाणीव करून दिली. '

' अरे पण तू विवाहित आहेस. तुझ्या दोन मुली लग्नाच्या आहेत आणि तरी... तुला... ?'

' मास्तर , ही सवय फार वाईट. लग्नापूवीर्पासूनच लागली आहे मला. लग्नानंतर सुटेल असं वाटलं होतं. पण कसलं काय ? जाऊ द्या मास्तरसाहेब , तुम्हाला काही कळायचं नाही आणि आमचं रामायण काही संपायचं नाही. या तुम्ही. ' असं म्हणून त्याने मला निरोप दिला. ती स्त्री खिडकीतून त्याच्याकडे पाहत होती.

पुढच्या आठवड्यात जेव्हा तो सुट्टी द्यायला आला तेव्हा त्याच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती.

' हे आता काय झालं. ' मी विचारलं.

' एका बाईनं डोकं फोडलं. ' त्याचं शांत उत्तर.

' का ?'

' आमची हुंगेगिरी नडली. '

' म्हणजे. '

' ड्युटीवरच माझं एका तरुणीशी चांगलंच सूत जमलं. मला वाटलं ती माझ्या कह्यात आली असेल. मग मी तिला ऑफिसमध्ये बोलावलं. ती आली. मी दाराकडे जाण्याचं निमित्त केलं आणि ऑफिसचं दार लावलं.

' हे काय वं मास्तर दार का बंद केलंया. '

' तुझ्यासाठी. '

' माझ्यासाठी. ते कशा पायी. '

' या पायी ' म्हणून त्यानं तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. ती तरुणी चांगलीच आडदांड होती. तिने त्याला जोरात ढकललं. तो बेसावध होता कारण ती प्रतिकार करणार नाही याची त्याला खात्री वाटली पण त्यामुळे त्याचा तोल गेला. त्याचं कपाळ लोखंडी खुचीर्च्या पायावर आदळलं आणि कपाळाला खोक पडली. त्यातून रक्त भळभळ वाहू लागलं.

ती कडाडली , ' तू माझ्या बाच्या वयाचा हायेस आणि माझ्याशी लगट करतोया. नीच. हलकट. मुडदा पडो तुजा. '

तो उठण्याआधीच तिने त्याच्या पेकाटात लाथ घातली आणि दार उघडून बाहेर पडली.

तो कळवळत मनातल्यामनात म्हणाला , ' छे , ही तर मिळाली नाहीच. वर हिचा मारच मिळाला. '

ड्युटी संपल्यावर तो घरी गेला. डोक्याची पट्टी पाहून बायकोने विचारलं , ' काय झालं ?'

' तोल गेल्यामुळे पडलो. खुचीर्चा पाय लागला. '

' अस्सं. म्हणजे मदिराक्षीबरोबर आता मदिराही घ्यायला सुरुवात केली म्हणायची तुम्ही. '

' नाही. आई शप्पथ. पाहिजे तर तोंडाचा वास घे. ' तिने जवळ जाऊन त्याच्या तोंडाचा वास घेतला.

' आता लक्षात आलं. ' बायको चाणाक्ष होती.

' काय. '

' तुम्हाला ही जखम मदिराक्षीमुळेच झाली आहे. तुमच्या हुंगेगिरीचा हा प्रताप आहे. मी काही आज पाहत नाही तुम्हाला , लग्न झाल्यापासून पाहतेय. आता डॉक्टरकडे जाऊन टिटॅनसचं इंजेक्शन घेऊन या. '

समजूतदार बायकोच्या सहमतीने त्यानं तात्पुरती का होईना जखमेची कहाणी संपवून टाकली होती.


- व्यंकटेश बोर्गीकर

रेल चक्र - नागाने काढला फणा! Railway snakes hood

रेल चक्र - नागाने काढला फणा!

पार्सल क्लार्क व गुड्सक्लार्क यांची ड्युटी बुकिंग क्लार्क पेक्षा थोडी निराळी असते. कारण इथे यांचा संबंध व्यापाऱ्याशी किंवा दलालाशी येतो. लगेज बुकिंग असलं तरच प्रवाशांशी संबंध येतो. पार्सल व गुड्स बुकिंगमध्ये व्यापारी व दलालाशी संबंध असल्यामुळे राजीखुशीने व्यवहार होतो. त्यामुळे तळतळाट हा प्रकार इथे नसतो. चालत आलेली पद्धत , प्रथा , व मागच्या पानावरून पुढे सुरू या तऱ्हेने इथे काम चालतं.

पार्सल आणि लगेज ऑफिसमध्येही काही चमत्कारिक गोष्टी घडतात. लोकांची पार्सल ऑफिसमध्येच पडून राहतात. घेऊन जायला कुणीच येत नाही. अशी पडून राहिलेली पार्सल ठराविक मुदती नंतर उघडली जातात व त्यातील वस्तुंची यादी केली जाते. ती पार्सल एलपीओमध्ये म्हणजे लॉस्ट प्रापटीर् ऑफिसमध्ये पाठवली जातात. अशीच एक पेटी मुख्य पार्सल बाबू व पोलिसांच्या उपस्थितीत उघडण्यात आली. त्या पेटीमध्ये बक्षीसाचे शिल्ड , कप , सटिर्फिकेटस् , बक्षीस मिळालेली पुस्तकं इत्यादी वस्तु होत्या. त्या पेटीवर दीपा शेखर एवढंच नाव लिहिलेलं होतं. यावरून मुख्य पार्सलबाबू जोशींने एवढा अंदाज केला की ही बॅग दीपा शेखरची आहे. पुस्तकं चाळून तिचा तिचा पत्ता मिळवला. सेंट मेरी कॉन्हेण्ट स्कूल , नैनीताल. मुख्य पार्सल बाबूने वैयक्तिक पत्रव्यवहार त्या शाळेशी केला. शाळेकडून उतर आलं की ती आता अमेरिकेत आहे. तिचा अमेरिकेचा पत्ताही शाळेने दिला. अमेरिकेच्या पत्त्यावर पत्रव्यवहार करण्यात आला. दीपाचे वडील अमेरिकेवरून आले. ती बॅग व त्यातली बक्षीसं पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले. ते पार्सल बाबू जोशींना म्हणाले , ' मास्तर तुम्ही खरंच ग्रेट आहात. वैयक्तिक पत्रव्यवहार करून तुम्ही आम्हाला शोधलंत , बोला तुम्हाला काय देऊ ?

' मला काही नको. ' बाबू म्हणाले.

' असं कसं चालेल ? अहो माझ्या मुलीची अशी पेटी जर हरवली गेली असती तर मी त्याचा शोध घेतला नसता का ?'

' यू आर रिअली ग्रेट! खरं म्हणजे मी या पेटीचा क्लेम दक्षिण रेल्वेवर लावलाय व त्यांनी पंचाहत्तर हजार मंजुरी केले आहेत. ' दीपाचे वडील म्हणाले. ' आता तुम्हाला बॅग मिळाली आहे तसं त्यांना कळवून टाका. आम्हीही कळवतो. ' बाबू उत्तरले.

बॅग घेतल्यानंतर ते म्हणाले , ' खरं म्हणजे या बॅगेची किंमत पैशात होऊ शकत नाही. तरीपण तुम्ही फूल ना फुलाची पाकळी म्हणून काहीतरी घ्यायला हवं. '

' अहो तुमची मुलगी ती माझीच मुलगी. मुलीचं काम केल्याबद्दल बाप कधी त्याचे पैसे घेतो का ?' असं ड्युटीवरचे जोशी म्हणाले.

जाण्यापूर्वी ते पार्सल बाबूंना म्हणाले , ' तुमच्या माणुसकीपूर्ण कर्तव्य तत्परतेमुळेच ही बॅग मला मिळाली. हे मी कधीच विसरू शकणार नाही. '

ज्या वेळी ट्रक वाहतुकीने नीटसं बाळसं धरलं नव्हतं तेव्हाची गोष्ट. तेव्हा सगळी मालवाहतूक रेल्वेनेच व्हायची. एकदा पंधरा फूट लांबीचा एकशे पन्नास किलो वजनाचा कासव रेल्वेने आला. त्या कासवाला ब्रेकमधून उतरवणं काही रेल्वेच्या हमालांना जमेना. पार्सल बाबूंनी हाफकीन इन्स्टिट्यूटला फोन केला. त्यांची माणसं बोलावून घेतली मग ते कासवाला घेऊन गेले. याच दरम्यान हाफकीन इस्टिट्यूटसाठी नाग-सापांची पार्सलसुध्दा यायची. एकदा नागाच्या पार्सलमधून एक नाग बाहेर आला व वेटोळे घालून पार्सलच्या खोक्या शेजारी बसला. एका लगेज पोर्टरनं पाहिलं व तो मास्तरकडे ओरडत आला. ' साहेब पार्सलमधून नाग बाहेर आला आहे आणि चांगलाच मोठा आहे. '

मास्तर पोर्टरबरोबर पार्सल ऑफिसच्या दाराशी आले. नाग पार्सल खोक्याच्या शेजारीच बसला होता. मास्तरांनी हाफकीन इन्स्टिट्यूटला फोन केला ते लोक आले व त्यांनी नागाला पकडलं व पार्सलमध्ये टाकून पार्सलचं खोकं पॅक बंद केलं.


- व्यंकटेश बोर्गीकर

रेल चक्र - कार्यतत्परता आणि रेल्वे Work-efficiency and railway

रेल चक्र - कार्यतत्परता आणि रेल्वे
स्वर्गीय सी. डी देशमुखांना आयसीएसच्या तोंडी परीक्षेला एक प्रश्न विचारला होता , 'waht?' is the difference between the schoolmaster and a startion master?'...'schoolmasters train the mind and stationmasters mind the train.' असं त्यांनी उत्तर दिलं होतं.

ही गोष्ट स्टेशनमास्तरांच्या ट्रेनिंग कोर्सच्या दरम्यान आम्हाला आमच्या शिक्षकांनी सांगितली होती. ट्रेनिंग संपल्यानंतर आम्ही स्टेशन मास्तरचं काम करू लागलो , तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरेच्चा! खरंच , हे वाक्य किती सत्य आहे. आपण गाड्यांचाच विचार करतोय. आता ही गाडी नंतर ती... एकामागोमाग एक त्याचाच विचार.

घाटकोपर ते मुंबई अशा लोकलच्या फेऱ्या व्हायच्या. साधारणपणे 1973-77 सालची गोष्ट असावी. घाटकोपर -मुंबई लोकलच्या मुंबई बाजूच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून पाच-सहा मैत्रिणी कामासाठी मुंबईला रोज जात. एके दिवशी मुंबईला उतरल्यावर एका मुलीच्या लक्षात आलं की तिच्या हातातलं सोन्याचं ब्रेसलेट गायब आहे. ती धावत स्टेशनात आली व घाटकोपर वरून आलेली लोकल उभी आहे का , ते पाहू लागली. परंतु ती लोकल परत निघून गेली होती. ती मुंबईच्या स्टेशन मास्तरकडे जाऊन म्हणाली , ' मास्तरसाहेब माझं ब्रेसलेट घाटकोपरहून आलेल्या लोकलमध्ये स्त्रियांच्या प्रथम श्ाेणीच्या डब्यात पडलं असावं असं वाटतंय. ' स्टेशन मास्तरांनी त्या लोकलचा ठावठिकाणा घेतला. ती लोकल दादरहून निघाली होती. कुर्ल्याला के व्ही विचारे सहाय्यक स्टेशन मास्तर ड्युटीवर होते. त्यांना मुंबईच्या स्टेशनमास्तरांनी ब्रेसलेटबद्दल सांगितलं. विचारेंनी जीआरपी ला (त्नश्ा 1 द्गह्मठ्ठद्वद्गठ्ठह्ल क्रड्डद्बद्य 2 ड्ड 4 क्कश्ाद्यद्बष्द्ग) बोलावलं व त्यांना ही माहिती दिली. दोन पोर्टर , दोन हमाल व जीआरपी सह विचारे लोकलच्या प्रथम श्ाेणीच्या डब्यात गेले. ते सोन्याचे ब्रेसलेट स्क्रूसह बाकड्याच्या खाली मिळालं. विचारेंनी मुंबईला ब्रेसलेट मिळाल्याचं कळवलं. ती मुलगी मुंबईच्या स्टेशनमास्तरचं पत्र घेऊन कुर्ल्याला आली. त्या पत्रावर तिची सही घेऊन विचाऱ्यांनी ते ब्रेसलेट तिच्या ताब्यात दिलं. ती मुलगी म्हणाली , ' अंकल आप का यह एहसान मैं जिंदगीभर नही भुलूँगी. '

' एहसान वगैरे कुछ नही बेबी , मैने अपना फर्ज निभाया है. आपके तकदीर से ब्रेसलेट आपको मिल गया है. ' विचारे म्हणाले.

' यु आर सिंपली ग्रेट अंकल! ' ती मुलगी म्हणाली. तिने ही घटना परदेशात राहणाऱ्या आपल्या वडीलांना कळवली. तिच्या वडिलांनी , मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे श्री. डी.आर.एम बन्सल यांना के व्ही विचारेंच्या कर्तव्य तत्परतेबद्दल प्रामाणिकपणाबद्दल बरंच काही लिहून व पत्राच्या शेवटी लिहिलं , असे स्टेशनमास्तर भारतीय रेल्वेवर आहेत ही खरोखरच मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या प्रकारानंतर मुलीला भेटण्यासाठी ते भारतात आले. तेव्हा आवर्जून विचारेंना भेटत असत. तेव्हा विचारेंनी त्यांना वरील स्वगीर्य सी डी देशमुखांचा किस्सा सांगितला होता. त्यावर त्या मुलीचे वडील म्हणाले होते , ह्यष्द्धश्ाश्ाद्य द्वड्डह्यह्लद्गह्म ह्लह्मड्डद्बठ्ठह्य ह्लद्धद्ग द्वद्बठ्ठस्त्र 2 द्धद्गह्मद्ग ड्डह्य ह्यह्लड्डह्लद्बश्ाठ्ठ द्वड्डह्यह्लद्गह्म ठ्ठश्ाह्ल श्ाठ्ठद्य 4 द्वद्बठ्ठस्त्रह्य ह्लद्धद्ग ह्लह्मड्डद्बठ्ठ ड्ढह्वह्ल , ड्डद्यह्यश्ा द्वद्बठ्ठस्त्रह्य ह्लद्धद्ग ह्यड्डद्घद्गह्ल 4 ड्डठ्ठस्त्र 2 द्गद्यद्घड्डह्मद्ग श्ाद्घ ह्लद्धद्ग श्चड्डह्यह्यद्गठ्ठद्दद्गह्मह्य.

रेल चक्र - कंट्रोलर - Controller of railway

रेल चक्र - कंट्रोलर

निरनिराळ्या खात्यातील कर्मचाऱ्यांच्या खातेनिहाय युनियन असतात. त्या युनियनमार्फत ते आपले प्रश्न धसाला लावायचे. परंतु कंट्रोलरची संख्याच मुळात कमी असल्यामुळे त्यांची निहाय अशी प्रभावी युनियन नव्हती. त्यामुळे त्यांच्या कुठल्याही मताबाबत किंवा अन्यायाबाबत वैयक्तिक स्तरावरच्या प्रयत्नाला फळ मिळत नसे तर ते दुर्लक्षिलं जाई. ही त्रुटी लक्षात यायला 1999 साल उजाडावं लागलं. मंुबई विभागातले नियंत्रक अनिल भरडा यांच्या अथक प्रयत्नामुळे ही संघटना अस्तित्वात आली. नाही म्हणायला विभागीय स्तरावर ही यंत्रणा काम करत असे परंतु तिला अखिल भारतीय स्वरूप देण्याचं श्रेय अनिल भरडाकडे जातं.

अखिल भारतीय गाडी नियंत्रक संघटना रजिस्ट्रेशन नंबर 371, स्थापन झाली. याचा फायदा असा झाला की नियंत्रकाचा आवाज वाढला. त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाऊ लागली. झांशी विभागातील एका नियंत्रकाला नोकरीवरून काढण्याचं पत्रक किंवा चार्जशीट देण्यात आलं होतं.

या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे व बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळे त्या नियंत्रकाला रेल्वे प्रशासनाला कामावर घ्यावंच लागलं. या घटनेमुळे या संघटनेचं महत्त्व वाढलं. तसं इतर नियंत्रक जे या संघटनेच्या नावाने नाक मुरडत होते तेही या संघटनेचे सदस्य झाले. इतकंच नाही तर कार्यकारणी मंडळात काम करण्याची इच्छा व्यक्त करू लागले.

आम्ही ज्या वेळी कंट्रोल ऑफिसमध्ये नियंत्रक म्हणून काम करत होतो. तेव्हा निव्वळ अशी कंट्रोलरची अखिल भारतीय संघटना अस्तित्वात नव्हती.

मी कंट्रोल ऑफिसमध्ये कंट्रोलर म्हणून काम करत होतो तेव्हा आम्हाला हेडसेट वापरावे लागत. त्यामुळे हातात फोन धरून बोलण्याचा त्रास वाचायचा. हेडसेटमुळे काम सोपं व्हायचं. बोर्डवर काम करताना कंट्रोलरला एकाच वेळी अनेक कामं करावी लागतात. हेडसेट असल्याने हाताने गाड्यांचं चाटिर्ंग करायचं , तोंडाने स्टेशनांशी बोलायचं , मेंदूने गाड्यांच्या पुढील वाटचालीबद्दल प्लॅनिंग करायचं. त्याशिवाय रेल्वे कर्मचारी अधूनमधून मागतील ती स्टेशन्स द्यायची आणि साहेबांनी गाड्यांसंबंधी विचारलेल्या प्रश्नांची त्वरित उत्तरं द्यायची. अशी विविध स्तरीय कामाची लढाई चालू असायची.

कंट्रोलरची नोकरी ही साहेबांचे सान्निध्य व जवळीक साधणारी नोकरी आहे. त्यामुळे आमच्या वेळी जो तो साहेबाशी वैयक्तिकरीत्या संबंध वाढवायचा व स्वत:चा फायदा करून घ्यायचा. ज्यांना साहेबांची मेहेरनजर आपल्यावर वळवून घेता येत नसे , ते म्हणत आम्ही काही साहेबांचे चमचे नाहीत. चमच्याचं राजकारण आम्ही करत नाही व जाणतही नाही. दाक्षं आंबट आहेत या न्यायाने ते वागायचे. थोडक्यात म्हणजे चमचेवाले कंट्रोलर व बिनचमचेवाले कंट्रोलर , असा संघर्ष कंट्रोल ऑफिसमध्ये सदैव चाललेला असे. परंतु आता हे चित्र बदललं आहे. अलीकडच्या नियंत्रकामध्ये संघर्षाऐवजी सहकार्याची , मैत्रीची भावना दृढ होत आहे. ही खरोखरच अत्यंत स्वागतार्ह अशी गोष्ट आहे...


- व्यंकटेश बोर्गीकर

रेल चक्र - अस्वलाला घाबरला लाल बावटा ! Red railway signal fears Bear

रेल चक्र - अस्वलाला घाबरला लाल बावटा !

इंग्रजाचं राज्य गेलं परंतु गार्डाचे पगार व इतर भत्ते जसे होते तसेच सुरू राहिले. काही काही तरुणांचं ध्येय असं होतं की , रेल्वेत नोकरी करायची तर ती गार्डाचीच!

गार्डाला सगळे भत्ते मिळून भरपूर पगार मिळत असला तरी एखाद दुसरा गार्ड वरकमाईसाठी धडपडत असे. त्यासाठी अधिकाराचा हवा तसा वापर करत असे.

एका स्टेशनवर चार मोटारसायकल ब्रेक व्हॅनमध्ये म्हणजे माल डब्यामध्ये भरायच्या होत्या. पार्सल क्लार्क नव्यानेच नोकरीला लागला होता. तो गार्ड साहेबाकडे पुस्तक घेऊन गेला व म्हणाला , ' चार मोटारसायकली भरायच्या आहेत. '

' ही पावती घ्या व सही करा. ' तो पार्सल क्लार्क म्हणाला गार्डानं पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तो नुसतीच पावती देत होता.

गार्ड म्हणाला , ' जागा नाही '

' मग तसं लिहा. '

गार्डने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं व गाडी सुरू करण्यासाठी शिट्टी वाजवली. तेवढ्यात त्या मोटार सायकलीचा मालक धावत आला व म्हणाला , ' राम राम गार्डसाहेब. '

' राम राम. '

' हे घ्या साहेब तुमची आवडती ब्रँड. ' म्हणून त्या व्यापाऱ्यानं सिगरेटच पाकीट पुढे केलं , त्याखाली नोट ठेवली होती. गार्डनं पार्सल क्लार्ककडे पाहिलं , ' ही चावी घ्या आणि लवकर भरा. '

लगेज व्हॅन पोर्टरने उघडलं. पार्सल क्लार्कनं पाहिलं की लगेज व्हॅनमध्ये भरपूर जागा होती. प्रथम गार्ड जागा नाही म्हणाला होता मग हे असं कसं ? तो नव्यानेच कामाला लागलेला पार्सल क्लार्क विचार करत पार्सल ऑफिसकडे गेला.

एकदा एका गार्डला वाटलं की आपण ही वर कमाई करावी. कारण त्यानं काहीकाही गार्डकडून ऐकलं होतं की अमक्या ट्रीपमध्येे एवढं मिळाले. तर काही गार्ड म्हणायचे आम्ही त्या भानगडीतच पडत नाही. परंतु कधी नव्हे ते या गार्डला वाटलं की स्वखुशीनं जर काही मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे. एका छोट्या स्टेशनवर मेल थांबली. एक दरवेशी गार्डकडे आला व म्हणाला , ' साहेब हे अस्वल तुमच्या पिंजऱ्यात घाला. याचे पैसे व माझ्या तिकिटाचे पैसे तुम्हाला देतो. सिग्नल नसल्यामुळे गाडी थांबली , म्हणून तुम्हाला मी विनंती करतोय ,' असं म्हणत , त्याने शंभराची नोट गार्डसाहेबासमोर धरली.

गार्डनं ' ठीक आहे ' म्हणून शंभराची नोट घेतली. त्या दरवेशाला अस्वलाला डॉगबॉक्समध्ये टाकायला सांगितलं. त्यानं अस्वलाला पिंजऱ्यात टाकलं व तो पुढील डब्यात जाऊन बसला. थोड्या वेळानं गाडीला सिग्नल मिळाला तसं ड्रायव्हरनं शिट्टी वाजवली. गार्ड प्लॅटफार्मवर उभा होता त्यानं शिट्टी वाजवली. बावटा घेण्यासाठी ब्रेकमध्ये चढू लागला आणि आश्चर्य भीतीयुक्त स्वरात उद्गारला. ' अरे बापरे! ' कारण ते अस्वल पिंजऱ्यातून बाहेर आलं होतं आणि दारात बसलं होतं. गार्डला अस्वलाला ओलांडून ब्रेक मध्ये जाणं अवघड होतं. कारण त्याला अस्वलाची भीतीही वाटत होती. ब्रेकमध्ये जाता येत नसल्यामुळे बावटा घेता येत नव्हता व बावटा दाखवल्याशिवाय गाडी निघणार नव्हती. गार्ड लाल बावटाही दाखवत नाही व हिरवा बावटा ही दाखवत नाही , हे पाहून ड्रायव्हरनं आपल्या असिस्टण्टला चौकशी करायला पाठवलं. दहा मिनिटं झाली तरी गाडी का निघत नाही म्हणून स्टेशन मास्तर ड्रायव्हरकडे गेले. ड्रायव्हरने गार्ड बावटा दाखवत नसल्याचं सांगितलं. ' काय झालं! ' ' काय झालं ' म्हणून बरेच उतारूही खाली उतरले व स्टेशन मास्तरला विचारू लागले , ' मास्तर गाडी का जात नाही ?'

' तेच विचारायला गार्डकडं चाललोय. ' स्टेशन मास्तर व ड्रायव्हरच्या असिस्टण्टबरोबर उतारूही गार्डच्या डब्याकडं निघाले. ते दारात बसलेलं अस्वल गार्डला ब्रेकमध्ये येऊ देत नव्हतं. दोन्ही बावटे , लाल व हिरवा ब्रेकमध्ये होते.

स्टेशन मास्तर आले व त्यांनी गार्डला विचारलं , ' काय झालं गार्डसाहेब बावटा का दाखवत नाही ?' गार्डनं सगळी हकीकत स्टेशन मास्तरला सांगितली. स्टेशन मास्तरांनी गार्डकडे पाहिलं. त्यांची नजर म्हणत होती... एक ट्रीपमध्ये पैसे मिळाले नाहीत तर काय आकाश कोसळणार होतं का ?... त्यानजरेत गार्ड पुरता ओशाळला व म्हणाला , ' मास्तरसाहेब पोर्टरला पाठवा व त्या दरवेशाला बोलवा. पुढच्या एका डब्यात तो दरवेशी बसला होता. पोर्टर दरवेशाला हुडकायला निघाला. पोर्टर प्रत्येक डब्यात जाऊन ओरडू लागला , ' दरवेशी ओ दरवेशी... '

तो दरवेशी कोणत्या डब्यात बसलाय याचा पत्ता लागेना. सगळे डबे त्या पोर्टरनं दरवेशी ओ दरवेशी असं ओरडत पालथे घातले. एका उतारून पोर्टरला विचारलं , ' दरवेशी म्हणजे काय ?'

' अस्वलाचा खेळ करणाऱ्याला दरवेशी म्हणतात. '

' अस्सं होय , त्याला तुम्ही हुडकताय ?'

' होय. '

' तो या बाकड्याखाली झोपलाय. अस्वल गार्डच्या डब्यात पिंजऱ्यात घातल्याचं त्यानं मला सांगितलं होतं व झोपण्यापूवीर् म्हणाला होता कर्जत आलं की मला उठवा. '

' अस्सं कोणत्या बाकड्या खाली झोपलाय ?'

पोर्टरने त्या दरवेशाला उठवलं आणि गार्डच्या डब्याकडे आणलं. त्याने अस्वलाला पिंजऱ्यात घालू का म्हणून विचारलं.

दरवेशानं अस्वलाला खाली उतरवलं. अर्धा तास गाडी वाजली. गार्डने दरवेशाला शंभर रुपये परत केले व हात जोडले मग स्टेशन मास्तरला विनंती केली अस्वलामुळे गाडी वाजली असं कंट्रोलरला सांगून नका. दुसरं काहीही कारण सांगा व काय कारण सांगितलं ते मला पुढच्या स्टेशनला कळवा म्हणजे मी माझ्या पुस्तकातही तेच कारण लिहीन. माझं चुकलं मला वाचवा.

स्टेशन मास्तरने कंट्रोलरला कारण दिलं , दोन पॅसेंजरमध्ये काही कारणामुळे भांडण झालं. त्यापैकी एक उतारू खाली पडला. वारंवार साखळी ओढली गेली आणि गाडी अर्धा तास थांबली.


- व्यंकटेश बोर्गीकर

रेल चक्र - धरमपुरी बाबा का हुकूम Railway order from Dharmpuri baba snakebite

रेल चक्र - धरमपुरी बाबा का हुकूम

परिचलन विभागात काम करणारा दुसरा महत्त्वाचा घटक म्हणजे स्टेशन मास्तर. या स्टेशन मास्तरांना रेल्वेकडून युनिफॉर्म मिळतो. त्या युनिफॉर्मचा आकार व स्टेशन मास्तरांच्या शरीराचा आकार यांचं सख्य कधीच जमायचं नाही. त्यामुळे सगळ्यांनी तक्रारी केल्या. युनिफॉर्म देण्याअगोदर माप घ्यायला एक शिंपी यायचा. परंतु माप घेतलं तरी युनिफॉर्मच्या मापात माफक फरक पडायचा. त्यामुळे मिळालेले युनिफॉर्म शिंप्याकडून अंगाला येतील असे शिवून घ्यावे लागत असत. पूवीर् दक्षिण रेल्वेचे स्टेशन मास्तर पॅण्ट घालण्याऐवजी धोतर गुंडाळत , वरून कोट घालत व टाय बांधत. खरं म्हणजे या त्यांच्या मजेशीर पोषाखाकडे पाहून हसूच येई.

छोट्या छोट्या स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरांना ड्युटीनंतर वेळ घालवायचा कसा , हा प्रश्न पडत असे. गावं स्टेशनपासून दूर असायची. स्टेशनवरच्या रेल्वे क्वार्टर्समध्ये यांची राहण्याची सोय असायची. नवविवाहित जोडपी एकत्र राहायची. तेही क्वचितच कारण बायको कुरकुरायची , की इथे वेळ अजिबात जात नाही. इतर मास्तरांसारखं शहरात घर करा. मुलांच्या शिक्षणासाठी शहरात घर केलेले मास्तर दिसायचेही.

पण काही बायका हेका न सोडता शहरात घर करण्याचं टुमणं लावायच्या व आठवड्याच्या सुट्टीला येत जा , असं सांगायच्या.

त्यामुळे बहुतांश लहान स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरांना मुलं होण्यापूवीर्च वेगळं घर किंवा मुलं झाल्यानंतरही वेगळं घर करावं लागे. या मास्तरांना मॅरिड बॅचलर म्हणत असत आणि या लहान स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरांना टू टाइम्स पीपल म्हणत असत. म्हणजेच दोन लाइनची माणसं कारण , काम करत असलेल्या स्टेशनात एक मेनलाइन व एक लूपलाइन असायची. तर इथे ते त्याही अर्थाने लागू होत असे.

गाणगापूर स्टेशन हे दत्ताचं प्रसिद्ध ठिकाण आहे. रात्री दीडच्या सुमारास एक बैल गाडी स्टेशन समोर येऊन थांबली. घोंगड्यात लपेटलेल्या एका माणसाला चौघांनी उचलून स्टेशनसमोर निजवलं व म्हणाले , ' मास्तरसाहेब याला साप चावलाय '.

मी लगेच म्हणालो , ' त्याला इथे का आणलाय डॉक्टरकडे घेऊन जा. '

' अहो मास्तर साप चावला की लोक इथेच येतात फोनवरून मंत्र सांगतात. '

' काय ?' माझ्या टाळक्यात काहीच शिरेना. तेवढ्यात स्टेशनातला एक वयस्कर हमाल माझ्याकडे आला व म्हणाला , ' मास्तरसाहेब तुम्ही नवीन कामाला लागलात त्यामुळे तुम्हाला माहीत नाही. कंट्रोलरला सांगा ' स्नेकबाइट केस ' आहे म्हणून. ते सगळी कामं बाजूला ठेवून ताबडतोब या माणसाची माहिती घेऊन मंत्राची व्यवस्था करतील. '

मी कंट्रोलरला माणसाला साप चावल्याचं सांगितलं. कंट्रोलरला हवी असलेली त्या माणसाची माहिती दिली. कंट्रोलरने सगळं काम थांबवलं व पाच मिनिटांच्या आतच त्यांनी रिंग दिली व सांगितलं , ' त्या साप चावलेल्या या माणसाला उठवून बसवा त्याच्या कानात एकसारखं म्हणा - ' धरमपुरी बाबा के हुकूमसे साप नही काटा उठ जाओ आणि त्याला झोपू देऊ नका. '

हे मी त्या खेडूतांना सांगायचा अवकाश , ते त्या माणसाच्या कानाशी म्हणत राहिले. थोडा वेळ गेल्यावर त्या माणसाने डोळे उघडले. त्याला लिंबाचा पाला खायला दिला. त्या खेडूतांनी येताना सोबत लिंबाचा पाला आणला होता. त्याने लिंबाचा पाला खाल्ला व दोन-चारदा चावून थुंकला. तसं तो वयस्कर हमाल म्हणाला , ' त्याने पाला थुंकला बा मग त्याचं विष उतरलं. '

त्यानंतर मला स्नेकबाइट प्रकरण समजलं. यानंतर बरीच साप चावल्याची प्रकरणं ड्युटीवर घडली. तेव्हा वैद्य डॉक्टरांच्या कमतरतेमुळे साप चावला की जवळच्या रेल्वे स्टेशनात जायचं असं जणू ठरूनच गेलं होतं. रेल्वे नुसती प्रवाशांचीच काळजी घेते असं नाही , तर माणुसकीच्या बांधिलकीची बूज राखते अन् रेल्वेने प्रवास न करणाऱ्या लोकांचीही विना मूल्य सेवा करते.

- व्यंकटेश बोर्गीकर

रेल चक्र - त्या ऐतिहासिक दिनी... Railway - On Historical day

रेल चक्र - त्या ऐतिहासिक दिनी...
16 एप्रिल 1853 ला मुंबईत सुरू झालेल्या भारतीय रेल्वेला 149 वर्षं पूर्ण होत आहेत. या वाटचालीत एकपदरी मार्गाचं द्विपदरीकरण व द्विपदरी मार्गाचं चौपदरीकरण आणि चौपदरी मार्गावर पाचवी लाइन टाकण्याचं काम चालू आहे. अशा या भारतीय रेल्वे मार्गावर रोज 12,000 पेक्षा जास्त गाड्या चालतात. 1.3 कोटीपेक्षा जास्त लोकांची व 13 लाख टनापेक्षा जास्त मालाची ने-आण होते.

तर दीडशे वर्षं पूर्ण झाल्याच्या निमित्ताने रेल्वे मंत्रालयाने मुंबईसह देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम करण्यात आले होते. यातला एक महत्त्वाचा सोहळा म्हणजे 16 एप्रिल 1853 च्या त्या ऐतिहासिक दिवशी ज्या प्रकारच्या वाफेच्या इंजिनाने 14 डब्यांची गाडी बोरिबंदरहून ठाण्यापर्यंत गेली. त्याच प्रकारचं वाफेचं इंजिन लावून , तशाच प्रकारचे जुने दुमिर्ळ डबे जोडून नेमक्या त्याच वेळी म्हणजे दुपारी 3 वाजून 35 मिनिटांनी गाडी सोडण्याचं ठरवण्यात आलं. त्याप्रमाणे दुपारी अडीच वाजता सुरू झालेल्या कार्यक्रमाला तत्कालीन राज्यपाल डॉ. पी.सी. अलेक्झांडर , रेल्वेमंत्री नितीशकुमार , मुख्यमंत्री विलासराव देशमुख , प्रमोद महाजन , वेदप्रकाश गोयल , राम नाईक , दिग्विजय सिंग ओ. राजगोपाल , जयवंतीबेन मेहता व मंुबईचे महापौर महादेव देवळे उपस्थित होते.

रेल्वेला तिच्या गुणदोषांसह स्वीकारून आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग बनवलेल्या मुंबईकरांनी त्या दिवशी मध्य रेल्वेची ठाण्यापर्यंतची सगळी स्टेशन्स व्यापून टाकली आणि रेल्वेवरील आपलं निस्सिम प्रेम व्यक्त केलं होतं.

दुपारी अडीच वाजता हा कार्यक्रम मुंबई स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर 7 व 8 वर आयोजित करण्यात आला होता. या निमित्ताने खास तिकिटाचं प्रकाशन प्रमोद महाजन यांनी केलं. या प्रसंगी तत्कालीन राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर , मनोहर जोशी , राम नाईक , जयवंतीबेन मेहता , छगन भुजबळ इत्यादींची भाषणं झाली झाली. रेल्वेमंत्री नितीश कुमार म्हणाले , की जुने ऐतिहासिक डबे आणि अत्याधुनिक जर्मन डबे यांचा संगम साधलेली गाडी धावत असल्याने आजचा दिवस , 16 एप्रिल 2002 महत्त्वाचा आहे. राज्यपाल पी.सी. अलेक्झांडर आपल्या भाषणात म्हणाले , आपल्याला या कार्यक्रमाला राजभवनाहून बग्गीने आणण्याचा रेल्वे प्रशासनाचा विचार होता , मात्र दीडशे वर्षांपूवीर् सुरू झालेल्या रेल्वेच्या प्रारंभाला तात्कालीन गव्हर्नर फॉकलंड हे कबूल करूनही आले नव्हते. तेव्हाही त्यांच्यासाठी बग्गीच ठेवली होती. मला इतिहासाची पुनरावृत्ती करायची नव्हती म्हणून बग्गीतून येण्यास नकार दिला.

ठीक 3.35 वाजता दीडशे वर्षांचा इतिहास जागवणारी ही गाडी छत्रपती शिवाजी टमिर्नसमधून निघाली , तेव्हा उपस्थितांचा निरोप घेता घेता तिची गतीही काहीशी मंदावत होती. त्यानंतर सुरू झाला अलोट जनसागराचा उत्साह. छत्रपती शिवाजी टमिर्नस टमिर्नस सोडल्यानंतर मस्जिदबंदर , सॅण्डर्हस्ट रोड , भायखळा आदी स्टेशन्सच्या दुतर्फा असंख्य मंुबईकर या गाडीकडे कौतुकाने पाहत होते. या प्रवासाची आठवण म्हणून रेल्वेमंत्री नितीशकुमार यांनी सर्व सन्माननीय नेत्यांना वाफेवर चालणाऱ्या इंजिनाची एक देखणी प्रतिकृती भेट म्हणून दिली.

दीडशे वर्षांपूवीर्च्या भारतीय रेल्वेच्या पहिल्या प्रवासाचे साक्षीदार होण्यासाठी तात्कालीन कंपनी सरकारने साष्टी बेटावरील आणि ठाण्यातील सरकारी कचेऱ्या बंद ठेवल्या होत्या. योगायोग असा की 16 एप्रिल 2002 रोजी केंद सरकारच्या खाजगीकरणाच्या व कामगारविषयक धोरणाचा निषेध करण्यासाठी सार्वजनिक उद्योगातील कामगार संघटनानी बंद पाळला होता. ती संधी साधून असंख्य कामगार , कर्मचारीही या सोहळ्यात सहभागी झाले होते.

जसं एकेक स्टेशन मागे पडू लागलं तशी उत्साही जनतेची गदीर् एवढी वाढली , की रेल्वेचे इतर मार्ग गदीर्ने व्यापून गेले. अनेक उत्साही लोकांनी रुळावरच ठाण मांडल्याने एरवी आपल्या कर्णकर्कश भोंग्याने लोकांना मार्गापासून दूर पिटाळणाऱ्या उपनगरी गाड्याही मंदावल्या. दादर स्टेशनवर तर मध्य रेल्वेचे सहाही प्लॅटफॉर्म गदीर्ने ओसंडून वाहत होते. माटुंगा आणि शीवमध्ये असणाऱ्या वल्लभ संगीत विद्यालयाचे विद्याथीर् , रेल्वे वसाहतीमधल्या महिला आणि मुलं , धारावी झोपडपट्टीतील हजारो लोक होते. कुर्ला स्टेशनजवळ कसाईवाड्याला जोडणारा पूल , कुर्ला स्टेशन , घाटकोपर , विक्रोळी , कांजुरमार्ग , भांडूप , मुलुंड या साऱ्या ठिकाणी गदीर्चा महापूर लोटला होता. ठाणे स्टेशनमध्ये तर उत्साही मंडळींनी प्लॅटफॉर्मवरील छतही व्यापून टाकलं होतं. तेव्हा रेल्वे सुरक्षादल व पोलिस यांची धावपळ उडाली होती. प्लॅटफॉर्म नंबर आठच्या मागील बाजूस असणाऱ्या तलावात आनंद भारती समाज संस्थेतफेर् पारंपरिक कोळी वेषात काही कोळी बांधव व भगिनी होडीत उभे राहून या रेल्वेच्या स्वागतासाठी सज्ज झाले होते.

साडेचार वाजण्याच्या सुमारास दुरून कुठेतरी गाडीच्या शिट्टीचा व इंजिनाचा आवाज आला. साधारणपणे कोपरी उड्डाणपुलाच्या इथून हवेत काळ्या धुराचे लोट येताना दिसले आणि ती ऐतिहासिक गाडी आता काही क्षणातच ठाणे स्टेशनवर येणार याची खात्री झाली. बरोबर 4.45 वाजता गाडी धाडधाड आवाज करत ठाणे रेल्वे स्टेशनच्या प्लॅटफॉर्म नंबर सात वर आली. तसं उपस्थितांच्या टाळ्या , शिट्ट्या , आनंदाच्या व उत्साहाच्या आरोळ्या याने सारा परिसर दणाणून गेला.

5.40 वाजता सुरू झालेल्या या गाडीच्या परतीच्या प्रवासात जुनं दुमिर्ळ वाफेचं इंजिन व डबे काढून घेण्यात आले आणि जर्मनीहून आयात केलेल्या आधुनिक डब्यासह डिझेल इंजिनने ही गाडी बरोबर 6.30 वाजता छत्रपती शिवाजी टमिर्नसमध्ये आली आणि हा सोहळा पूर्ण झाला.


- व्यंकटेश बोर्गीकर

रेल चक्र - 'राजा'चं पार्सल - Railway parcel of Raja

रेल चक्र - 'राजा'चं पार्सल

ही 1960 सालची घटना आहे. त्या वेळी वाडी स्टेशनवर मी तारमास्तर म्हणून नुकताच नोकरीला लागलो होतो. माझी रात्रपाळी होती. रात्री दोनच्या सुमारास पार्सल ऑफिसमध्ये आरडाओरडा सुरू झाला. काय झालंय म्हणून बघायला गेलो तर पार्सल क्लार्क रॉड्रिक्स हमालावर ओरडत होता. त्याचं ओरडणं संपल्यानंतर मी त्याला विचारलं , काय झालंय ? त्याने माझ्याकडे पाहिलं , ' हे बघ आता मी फार बिझी आहे व टेन्शनमध्ये आहे. नंतर सांगेन. '

' ठीक आहे ' म्हणून मी तार ऑफिसात आलो. त्यानंतर एक आठवडा रॉड्रिक्सची माझी भेटच झाली नाही. एक दिवस तो मला रस्त्यात भेटला. माझा प्रश्नांकित चेहरा पाहून तो म्हणाला , ' त्या दिवशी काय झालं याची हकिकत तुला ऐकायची आहे ना. ' तर ती अशी होती.

नालवार इथल्या दगडाच्या खाणीचे मालक , नांगियाशेठ मंुबईहून नालावारला येताना आपला ' राजा ' नावाचा कुत्रा लगेज म्हणून बुक केला होता. ते मंुबई-मदास मेलने नालवारला येणार होते. त्याच गाडीने कुत्र्यालाही पाठवावं असं त्यांनी स्टेशन मास्तरांना सांगितलं. स्टेशन मास्तरांनी त्यांच्याच गाडीने कुत्रा पाठवण्यात येईल , असं आश्वासन दिलं होतं. नालवारला नांगियाशेठ उतरले. परंतु त्या गाडीने त्याचा कुत्रा काही आला नाही. त्यांनी नालवारच्या स्टेशन मास्तरांना चौकशी करायला सांगितलं. ' मी चौकशी करतो. एक-दोन दिवसांत आपला कुत्रा येईल. ' मास्तरांनी सांगितलं.

चार दिवसांनी नांगियाशेठ स्टेशनवर आले. स्टेशन मास्तरांनी कुत्रा आल्याचं सांगितलं. नांगियाशेठनी कुत्रा मिळाल्याची डिलिव्हरी बुकामध्ये सही केली. मग त्यांनी विचारलं , ' कुठे आहे आमचा राजा , कुत्रा. '

' हे काय. ' असं म्हणत मास्तरांनी पोर्टर जवळ उभा असलेल्या कुत्र्याकडे हात दाखवला. ' काय , हा माझा कुत्रा! कुठलं मरतुकडं कुत्रं आणलंय. ब्लडी हेल! ' म्हणत नांगियाशेठनी त्या कुत्र्याला लाथ घातली.

' कुई कुई ' असं विव्हळत ते कुत्रं पळालं. शेजारी उभा असलेला पोर्टर तोल जाऊन पडला. नांगियाशेठ रागाने बेभान झाले होते , ' मास्तर हे कुत्रं माझं नाही. माझा ' राजा ' कुत्रा मला मिळालाच पाहिजे नाहीतर मी माझ्या कुत्र्याच्या बाबतीत हलगजीर्पणा केलेल्या मास्तराची नोकरी खाल्ल्याशिवाय राहणार नाही. '

बुटाचा खाडखाड आवाज करत नांगियाशेठ स्टेशनबाहेर पडले. नालवारच्या स्टेशन मास्तरांना एकदम आठवलं की कुत्रा आल्यापासून वाडीचा पार्सल क्लार्क रॉड्रिक्स कुत्र्याची डिलिव्हरी झाली का , असं अधूनमधून विचारत होता. तेवढ्यात रॉड्रिक्सचा फोन आला , ' मास्तर कुत्र्याच्या पार्सलची डिलिव्हरी झाली का ?'

' झाली. ' मास्तर म्हणाले.

' सुटलो बुवा एकदाचा. ' रॉड्रिक्स आनंदाने म्हणाला. ' तुम्ही सुटलात हे खरं आणि त्या बरोबर नोकरी पण. '

' म्हणजे. ' रॉड्रिक्स हादरलाच.

कुत्र्याच्या डिलिव्हरीची सगळी हकिकत मास्तरांनी त्याला सांगितली. रॉड्रिक्स घाबरला , ' मास्तर माझ्या नोकरीवर गदा तर येणार नाही ना ?'

' पण नेमकं काय झालं होतं ते तरी सांग म्हणजे काहीतरी मार्ग काढता येईल. ' मास्तरांनी दिलासा दिला. रॉड्रिक्सने सुरुवात केली. नांगियाशेठचा कुत्रा मंुबई-मदास मेलने त्यांच्या बरोबर पाठवण्याऐवजी मंुबई-पुणे पॅसेंजरने पाठवला होता आणि पुण्याहून तो कुत्रा खरं म्हणजे पुणे-रायचूर पॅसेंजरने पाठवायला हवा होता. कारण नालवार स्टेशन रायचूर लाइनवर येतं. परंतु तो कुत्रा पुणे-सिकंदाबाद पॅसेंजरने पाठवला गेल्यामुळे वाडी जंक्शनवर उतरवण्यात आलं. कुत्र्याला घेऊन हमाल पार्सल ऑफिसकडे निघाला होता. तो धिप्पाड कुत्रा जागचा हलेना म्हणून हमालाने कुत्र्याला जोरात ओढलं. कुत्र्याचा गळा आवळला गेला. तो कुत्रा चिडला व त्याने हमालाच्या अंगावर झेप घेतली तसा हमाल खाली पडला. त्याच्या हातून कुत्र्याची दोरी सुटली आणि त्याने धूम ठोकली. पहाटे चार वाजता पुणे-रायपूर पॅसेंजर येणार होती त्याने तो कुत्रा पाठवायचा होता. कुत्रा पळाल्याने पार्सल मास्तर रॉड्रिक्स हमालावर ओरडला , ' काहीही कर आणि पुणे-रायपूर पॅसेंजर यायच्या आत ते कुत्रं पकडून आण. ' सगळे हमाल त्या रात्री त्या कुत्र्याला

शोधू लागले. पॅसेंजर यायची वेळ झाली तरी तो कुत्रा काही मिळाला नाही. एका हमालाने शक्कल लढवली आणि प्लॅटफार्मवर भटकणारं कुत्रं पकडून आणलं. तोपर्यंत पॅसेंजर फ्लॅटफॉर्मवर आलेली होती. ' पॅसेंजरमध्ये भरा. ' ऑफिसातून पार्सल क्लार्क रॉड्रिक्स ओरडला.

गाडी गेल्यावर त्या हमालाने पार्सल क्लार्कला तो कुत्रा न मिळाल्यामुळे भटकं कुत्रं पाठवून दिल्याचं सांगितलं. तसा तो पार्सल क्लार्क रॉड्रिक्स हादरला. तुम्ही माझी नोकरी घालवणार म्हणून हमालावर ओरडू लागला. त्यामुळे रोज तो नालवारच्या मास्तरांना फोन करून विचारत होता , ' कुत्र्याची डिलिव्हरी झाली का ?'

ही हकिकत ऐकून नालवारच्या मास्तरांनी नांगियाशेठना तक्रार करू नका म्हणून विनंती केली.

दुसऱ्या दिवशी नांगियाशेठ स्टेशनवर आले व मास्तरांना पेढे देत म्हणाले , ' पेढे घ्या मास्तर

आज आमच्या राजाचा वाढदिवस आहे. '

' तुमचा राजा कुत्रा मिळाला ?' मास्तरांना आश्चर्याचा धक्का बसला.

' त्या शिवाय का त्याचा वाढदिवस साजरा करतोय ?' नांगियाशेठ म्हणाले. ' कसा मिळाला ?' मास्तर म्हणाले.

त्या रात्री वाडी स्टेशनवर पोर्टरच्या हातून नांगियाशेठचा कुत्रा सुटला आणि भटकत दगडाच्या खाणीचे मालक अस्लमखाँच्या घरी गेला. कारण नांगियाशेठ कधीकधी घोड्यावरून नालवारहून वाडीला अस्लमखाँच्या घरी येत असत. त्यांच्याबरोबर कुत्राही असे.

त्यामुळे कुत्र्याला अस्लमखाँचं घर माहीत होतं. अस्लमखाँने नांगियाशेठला तसं कळवलं. अशा रीतीने कुत्रा त्याच्या मालकाच्या ताब्यात गेला आणि वाडीच्या पार्सल क्लार्कच्या नोकरीला जीवदानही मिळालं!

- व्यंकटेश बोरगीर

रेल चक्र - आयत्या सिग्नलवर नागोबा ! Snake on railway Signal

रेल चक्र - आयत्या सिग्नलवर नागोबा !

सिग्नलच्या लिव्हरवर नाग वेटोळं घालून फणा काढून बसला होता. लिव्हरमन लिव्हरला हात लावणार तेवढ्यात त्याचं लक्ष फणा काढलेल्या नागाकडे गेलं. तसं तो ओरडला , मास्तर लिव्हरवर नाग. ' मुंबई-मदास एक्सप्रेस 11 डाऊन बारा वाजून पाच मिनिटांनी छेंगुटा स्टेशन पास होणार होती , पण...


भारतीय रेल्वेमध्ये एकूण 16.5 लाख कर्मचारी आहेत. हे मुख्यत: चार भागांत (major 4 department of Indian railway) कार्यरत असतात. परिचलन विभाग(transport dept) , वाणिज्य विभाग(railway commerce dept) , इंजिनीअरिंग विभाग(railway engineering dept) व व्यवस्थापन विभाग(railway management). या मुख्य चार विभागांना अनेक उपविभागही असतात.

परिचलन विभाग म्हणजे रेल्वेचा मेंदू. माणसाच्या शरीरात मेंदूला जे महत्त्व आहे , तेच महत्त्व रेल्वेत परिचलन विभागाला आहे. रेल्वेचा संपूर्ण कारभार नियंत्रण कार्यालयातून चालवला जातो. या नियंत्रण कार्यालयात कालच्या कामाचा आढावा घेतला जातो व आजच्या कामाची रूपरेषा ठरवली जाते. त्याप्रमाणे काम पार पाडलं जातं. हे नियंत्रण कार्यालय चोवीस तास म्हणजे रात्रंदिवस सुरू असतं. अजिबात सुट्टी नसते. नियंत्रण कार्यालयाचं प्रमुख काम म्हणजे मेल -एक्सप्रेस गाड्या वेळापत्रकानुसार सुरक्षित चालवणं , उपनगरीय गाड्यांची वाहतूकही वेळापत्रकानुसार करणं , मालगाड्या चालवणं इत्यादी. अधिकारी मुख्यनियंत्रक , उपमुख्य नियंत्रक , नियंत्रक इत्यादी मंडळी या कार्यालयात कार्यरत असतात. मी मध्य रेल्वेतून मुख्य नियंत्रक म्हणून निवृत्त झालो.

कंट्रोल ऑफिसचे काही किस्से मी नमूद करू इच्छितो. मी नियंत्रक म्हणून काम करत असताना एका स्टेशनला कंट्रोल फोनवर महत्त्वाचा मेसेज दिला व मेसेज घेणाऱ्या मास्तरचं नाव विचारलं.

तो म्हणाला , ' फातरफेकर ,'
मी म्हणालो ' शॉर्टमध्ये सांगा ,'
' शॉर्टमध्ये म्हणजे ?'

' शॉर्टमध्ये म्हणजे असं. आर.के म्हणजे राजकपूर , डीडी म्हणजे दूरदर्शन. थोडक्यात म्हणजे तुझं इनिशियल सांग ,'

' पीपीपी ,'
' म्हणजे ,'
' प्रकाश पुरुषोत्तम फातरफेकर '
' ओके ,'
' ओके नाही तुमचं इनिशियल सांगा ,'

कंट्रोलला इनिशियल विचारणारा हा पहिलाच मास्तर निघाला. कदाचित त्याचा आज नोकरीचा पहिला दिवस असावा , असा माझ्या मनात विचार आला.

तो पुन्हा म्हणाला , ' तुमचं इनिशियल सांगा. '
' तुझा नोकरीचा आज पहिला दिवस आहे का ?'
' होय. इनशियल सांगा. '
' व्हीव्हीडी. ' मी म्हणालो.
' टीव्हीडी. ' तो.
' नाही व्हीव्हीडी. ' मी
' काय सीव्हीडी. ' तो
' अरे बाबा व्हीव्हीडी , व्हेरी व्हेरी डेंजरस. '
' अरे बापरे! ' तो उद्गारला.

रेल्वेखात्यात ठराविक कालावधीत सप्ताह साजरे केले जातात. उदाहरणार्थ सौजन्य सप्ताह , सुरक्षा सप्ताह , समय पालन सप्ताह इत्यादी. समयपालन सप्ताहाचा पहिला दिवस होता. रेल्वेचा दिवस , रात्री बारा वाजता म्हणजे 00 ते 24.00 असा असतो. मंुबई-मदास एक्सप्रेस 11 डाऊन व आताची 6511 डाऊन रात्री 00-05 ला म्हणजे रात्रीचे बारा वाजून पाच मिनिटांची छेंगुटा स्टेशनवरून पास व्हायला पाहिजे होती. परंतु रात्रीचे बारा वाजून वीस मिनिटं झाली तरी छेंगुटा स्टेशन पास झाली नाही. लिंगेरी स्टेशनला मी रिंग दिली व विचारलं 11 डाऊन कुठे आहे ? तो म्हणतोय की छेंगुटाने अजून मला डिपार्चर दिलं नाही. म्हणजे 11 डाऊन अजून छेंगुटा पास झाली नाही. इतकंच नाही तर छेंगुटाचा स्टेशन मास्तर फोनवरही येत नाही. मी छेंगुटा स्टेशनला कंट्रोल फोनवर येण्यासाठी रिंग देत होतो. शेवटी 00.45 म्हणजे रात्रीचे बारा वाजून पंचेचाळीस मिनिटांनी छेंगुटाचा मास्तर कंट्रोल फोनवर आला.

' छेंगुटा '

' बोल , छेंगुटा काय झालं ?' समयपालन सप्ताहामधली पहिलीच गाडी वाजवली का ?

' साहेब ती नागा मुळे वाजली. '
' काय ?'
' होय साहेब ,'
' काय , होय साहेब ? झोपायचं आणि वर खोटं बोलायचं ?'

' झोपायचं! काय बोलाताय साहेब , कायमचं झोपायची पाळी आली होती आमच्या लिव्हरमनवर. '
' म्हणजे. '

' अहो , सिग्नलच्या लिव्हरवर नाग वेटोळे घालून फणा काढून बसला होता. लिव्हरमन लिव्हरला हात लावणार तेवढ्यात त्याचं लक्ष फणा काढलेल्या नागाकडे गेलं. तसं तो ओरडला मास्तर लिव्हरवर नाग. '

' अस्स मग तेव्हाच तुम्ही कंट्रोल फोन व ब्लॉकफोनवर का येऊन सांगितलं नाहीत. आता पंचेचाळीस मिनिटं झाल्यानंतर हे कुभांड रचून सांगताय होय. '

' हे कुभांड नाही साहेब ब्लॉक फोन व कंट्रोल फोन घ्यायला जायचं म्हणजे नाग बसलेल्या लिव्हर जवळूनच जावं लागतंय. '

' काय थापा मारताय. '

' अहो थापा काय म्हणताय. त्या नागाला मारण्यासाठी गावातून या मल्ल्या नावाच्या माणसाला बोलावून आणलं. तो नाग-साप मारण्यात पटाईत आहे. असं लिव्हरमन म्हणाला. '

' एक खोटं लपवण्यासाठी शंभर खोट्या गोष्टी बोलाव्या लागतात. तुम्ही तेच करताय. सरळ कबूल करा की झोपलो होतो म्हणून. '

' नाही साहेब , मी झोपलो नाही. पाहिजे तर पुरावा म्हणून तो मारलेला साप फ्री सव्हिर्स वे बिल नंबर रेल्वेने तुमच्या कार्यालयात पाठवून देतो. मगच खात्री पटेल तुमची. '

मला हसूच आलं. मी कंट्रोल चार्टवर त्या मास्तरने सांगितलेला किस्सा लिहिला व कंट्रोल फोन व ब्लॉक फोन घेण्यासाठी लिव्हरच्या जवळून जावं लागतं का , याचीही खातरजमा करावी. असा शेराही मारला.


- व्यंकटेश बोर्गीकर

Kadalimatti Kashibai

रेल चक्र - अगं अगं म्हशी...
मी नॅरोगेजवर म्हणजे कुर्डुवाडी , मिरज , लातूर सेक्शनमध्ये काम करत होतो. कुर्डुवाडी पंढरपूर व कुर्डुवाडी बाशीर्पर्यंत चार येणाऱ्या व जाणाऱ्या गाड्या असायच्या व कधीकधी एखादी मालगाडीही धावायची. परंतु बाशीर् ते लातूर व पंढरपूर ते मिरज यात मात्र प्रत्येक स्टेशनमास्तरच्या ड्युटीत दोनच गाड्या धावायच्या. त्यामुळे आमची ड्युटी बारा तासाची होती. वाफेच्या इंजिनावर गाडी चालायची. सांगली स्टेशनवर मी काम करत असताना एका निवृत्त व वयस्कर कर्मचाऱ्यानं नॅरोगेजवर गाडी सोडली. तेव्हाच्या गाडीच्या वेगाचा एक किस्सा सांगितला.

या छोट्या लाइनच्या रेल्वेला तेव्हा ' बाशीर् लाइट ' रेल्वे म्हणत. या रेल्वेची पाहणी करण्यासाठी एक गोऱ्या साहेबाचं पथक लंडनमधून आलं. गाडी कुर्डुवाडीहून निघाली आणि थोडं अंतर पार केल्यावर थांबली. पुन्हा थोड्या वेळात निघाली. पुन्हा थोडं अंतर कापल्यानंतर थांबली व थोड्या वेळानं निघाली. असं दोन-चारदा झालं. मुख्य गोरासाहेब चिडला व म्हणाला ,

' काय भानगड आहे ? गाडी चालते थांबते. चालते थांबते. असं का होतंय ? काय कारण आहे ? चौकशी करा. '

इन्स्पेक्टर गाडी का रेंगाळत चालली आहे , याची चौकशी करून आला व साहेबाला म्हणाला , ' साहेब , म्हैस गाडीच्या समोरून रस्त्यातून पळतेय. ती गाडीच्या पुढे जाऊन रुळांवर आडवी उभी राहतेय. मग ड्रायव्हर खाली उतरतो. म्हशीला हाकलतो व गाडी सुरू करतो. '

यावर साहेब चित्कारला , ' असं आश्चर्य आहे का ? परंतु अशा किती म्हशी गाडीपुढे धावत आहेत ? गाडी चार वेळा थांबली व सुरू झाली. '

' एकच म्हैस आहे , साहेब. ती गाडीपुढे थांबते व रुळात आडवी उभी राहते. '

' वंडर फुल! ' म्हणून साहेबाने कपाळाला हात लावला.

' म्हणजे म्हशीचा पळण्याचा वेग गाडीच्या वेगापेक्षा जास्त आहे तर. ' यातला अतिशयोक्तीचा भाग सोडला तरी गाडीचा वेग कमी होता. हे सत्य नाकारता येत नाही. सुरुवातीला कमी वेगानं धावणाऱ्या रेल्वेने 150 वर्षांत प्रचंड प्रगती केली आहे. आज भोपाळ ते दिल्ली ही शताब्दी एक्सप्रेस ताशी 140 किलोमीटर वेगाने धावत आहे आणि आता कोकण रेल्वेवर जपानमध्ये धावणारी बुलेट ट्रेन सुरू करण्याविषयी प्रयत्न चालू आहेत. भारतीय रेल्वेची आधुनिकतेकडे होणारी ही वाटचाल खरोखरच स्तुत्य म्हणावी लागेल.


' कडलीमट्टी काशीबाई '

दक्षिण रेल्वेवरील ' कडलीमट्टी ' स्टेशनवर घडलेली एक सत्य घटना फार गाजली होती. त्यावर कन्नड भाषेत ' कडलीमट्टी काशीबाई ' नावाचं नाटक लिहिलं गेलं व सिनेमाही काढला गेला. या घटनेचा तपशील असा...

कडलीमट्टी या छोट्या स्टेशनवर एक सुरेख बाई आपल्या तान्ह्या मुलासह गावी जाण्यासाठी आली. गाडी यायला बराच अवकाश होता. स्टेशन मास्तरची नजर तिच्याकडे गेली. तिच्या रूपावर तो मोहित झाला. बाहेर थंडी होती म्हणून तो तिला स्टेशनावर बोलवू लागला. तिच्याशी गोडगोड बोलून तिचा विश्वास संपादन करण्याचा उद्योग त्यानं आरंभला. त्याची कामुक नजर तिच्यावर पडली. स्त्रियांना पुरुषांची कामुक नजर पटकन जाणवते. ती मुलाला घेऊन ऑफिसच्या बाहेर जायला निघाली. त्याक्षणी त्यानं दार बंद करून घेतलं आणि मुलाला तिच्या हातातून हिसकावून घेतलं. बाजूच्या खोलीत कोंडून ठेवून तिला तो म्हणाला ,' तू जर माझं समाधान केलं नाहीस , मी सांगेन तसं ऐकलं नाहीस , तर मी तुझ्या मुलाचा गळा दाबेन. '

' तू मुलाचा गळा दाब किंवा काहीही कर ,' तिनं ठणकावून सांगितलं ,' परंतु मी तुझं समाधान करणार नाही आणि ऐकणारही नाही. '

' अस्सं ' म्हणून मास्तर बाजूच्या खोलीतून मुलाला आणण्यासाठी गेला. ती स्त्री ऑफिसचं दार उघडून सरळ बाहेर निघून आली. ती बाहेर गेलेली पाहून मास्तर ओरडला , ' हे बघ मुकाट्यानं आत ये. मी तुझ्या मुलाचा गळा दाबेन. ' परंतु तिनं ऐकलं नाही. मुलाचा गळा दाबायला लागल्यावर ती आपलं म्हणणं झक्कत ऐकेल व आत येईल असं मास्तरला वाटलं. त्यानं त्या पोराचा गळा आवळला. ते पाहूनही ती आत आली नाहीच , उलट ऑफिसचं दार बंद करून तिनं बाहेरून कडी घालते. यात ते मूल दगावलं. एवढं होऊन तिनं काही त्याच्या म्हणण्याला होकार दिला नाही कारण स्त्रीला स्वत:चं शील अत्यंत प्रिय असतं. ' कडलीमट्टी काशीबाई ' या नावानंच ही घटना त्या भागात प्रसिद्ध आहे.

- व्यंकटेश बोर्गीकर

रेल चक्र - थोर तुझे उपकार! - Railway Gratefulness

रेल चक्र - थोर तुझे उपकार!
ट्रॅफिक अप्रॅण्टिसच्या ट्रेनिंगदरम्यान आम्हाला सहा महिन्यासाठी गाडीचं काम करावं लागत असे. एकदा आमची मालगाडी सावळगी स्टेशहून थ्रू गेली म्हणजे न थांबता गेली. पुढे बबलाद स्टेशन होतं व बबलाद स्टेशनच्या सायडिंगमध्ये गाडी घ्यायचं कंट्रोलरनं ठरवलं असावं कारण मागे एक्स्प्रेस गाडी होती. परंतु सावळगी व बबलादच्या मध्येच गाडी थांबल्यामुळे मी खाली उतरलो कारण मागून एक्स्प्रेस गाडी येणार होती. रात्रीची वेळ होती. इंजिनाचा आवाज ही येत नव्हता व उजेडही दिसत नव्हता. मी बत्ती घेऊन इंजिन आहे का नाही हे पाहण्यासाठी भरभर निघलो. मालगाडीला एकूण चाळीस डबे होते , त्यापैकी बावीस डबे घेऊन ड्रायव्हर पुढे निघून गेला होता. गाडी अलग कशी झाली याची जाणीव मला किंवा ड्रायव्हरला कशी झाली नाही याचं आश्चर्य वाटलं. मी परत धावत मागे आलो फटाके घेतले कारण तोपर्यंत मागून एक्स्प्रेस येण्याची वेळ झाली होती. मी रुळावर फटाके ठेवले व लालबत्ती तिथे ठेवली उरलेल्या गाडीकडे येण्यासाठी निघालो. मला आश्चर्याचा धक्काच बसला. उरलेले 18 डबेही ड्रायव्हर येऊन घेऊन गेला. मी ब्रेकमध्ये आहे का नाही याचीही त्याने दखल घेतली नाही. मी हातबत्ती घेतली व रुळावर ठेवलेले फटाकेही काढले व बबलाद स्टेशनच्या दिशेने निघालो. थोड्या वेळातच एक्स्प्रेस गेली व मी बबलाद स्टेशनवर आलो व ड्रायव्हवर मनसोक्त ओरडलो. ड्रायव्हर शांतपणे म्हणाला , ' अरे माझ्यावर ओरडतोस कशाला माझं अभिनंदन कर कारण सेक्शनमध्ये राहिलेले 18 डबे मी , एक्स्प्रेस सावळगी पास व्हायच्या आत बबलादच्या सायडिंगमध्ये आणले समजलं. '

स्टेशन मास्तर म्हणाले , ' त्यानी मलाही वाचवलं. कारण हा बावीस डबे घेऊन गाडी सायडिंगमध्ये येताच मी घाईघाईनं सेक्शन क्लियर केलं व एक्स्प्रेसला लाइन क्लियर दिली. केवढी मोठी चूक केली होती मी! '

हे देवा! म्हणून मी कपाळाला हात लावला व ड्रायव्हरवरची चीड कुठल्याकुठे पळून गेली. एकदा एक मेलगाडी सिग्नल न दिल्यामुळे एका छोट्या स्टेशनमध्ये उभी होती. सिग्नल देताच गाडी निघाली. एक बाई गार्डाकडे आरडत आली. ' गार्डसाहेब गाडी थांबवा वं माझ्या मुलाला दवाखान्यात न्यायचं हाय. लई शिरीयश हाय बघा. '

तिच्या मागे चार माणसे मुलाला एका फळफुटावर निजवून घेऊन येत होती. ती बाई गाडी मागे धावत गयावया करत होती. गार्डनं ब्रेक लावला थोड्या अंतरावर जाऊन गाडी थांबली. गार्डनं पाहिलं तो मुलगा अत्यवस्थ होता. ते सगळे मुलाला त्या फळकुटासह घेऊन चढले. यात दहा मिनिटं गेली. स्टेशन मास्तर ' काय झालं ' म्हणून गार्डला विचारायला आले.

' मुलगा सिरियस आहे त्याला घेण्यासाठी गाडी थांबवली. ' गार्ड म्हणाला.

' कंट्रोलरला काय सांगायचं ?' स्टेशन मास्तरनं विचारलं.

' सिग्नल मिळाल्यावर गाडी निघताना साखळी ओढल्याचं सांगा. त्यावर दहा मिनिटं दाखवू. '

' ठीक आहे. '

गाडी निघाली. स्टेशन मास्तरांनी कंट्रोलला गाडी प्रथम सिग्नल व नंतर साखळी ओढल्या मुळे थांबल्याचं सांगितलं.

पुढच्या मोठ्या स्टेशनला ती मेल थांबली त्या मुलाला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं.

एक महिन्यानंतर त्या गार्ड साहेबांना एक पत्र आलं. त्यातल्या महत्त्वाच्या मजकुरावरून गार्डची नजर वारंवार फिरू लागली...

.... त्या दिवशी तुम्ही गाडी थांबवल्यामुळे माझ्या मुलाला हॉस्पिटलमध्ये दाखल करू शकले व त्या मुळेच तो वाचला. कारण दाखल करताना डॉक्टर म्हणाले होते. ' बाई बरं झालं मुलाला लवकर आणलंत अजून अर्ध्यातासात आणलं असतं तर मुलगा हातचा गेला असता... '

गार्डसाहेब तुमचे उपकार मी जन्मभर विसरू शकत नाही. मला लिहिता वाचता येत नाही आमच्या गावच्या मास्तरांकडून लिहून हे पाठवत आहे. एकदा आमच्या शेतात तुम्ही सगळी मंडळी हुरडा खायला जरूर या नुसतं हो म्हणू नका...

घरच्या अडचणी , मुलांच्या शाळा परीक्षा , कामाचा ताण इत्यादीमुळे त्या गार्डला सहकुटुंब काही हुरडा खायला जाणं जमलं नाही. एके दिवशी ती बाईच आपल्या मुला , नवऱ्यासह गार्डच्या घरी हुरडा घेऊन आली. गार्ड साहेब आश्चर्यानं त्यांच्याकडे पाहतच राहिले.


- व्यंकटेश बोर्गीकर

रेल चक्र - ...आणि डिलिव्हरी झाली ! child delivery in railway

रेल चक्र - ...आणि डिलिव्हरी झाली !

जवळा स्टेशनवरच्या स्टेशन मास्तरची निवृत्ती जवळ आली होती. शेवटचे पंधरा दिवस राहिले होते. एक वीस वर्षाची खेडूत तरुणी त्यांच्या घरी भांडी घासत होती. मास्तरांची तिच्यावर नजर होती. त्या मुलीचा बाप मास्तरांच्या घरी भाजी , दूध , दही , हुरडा इत्यादी देण्याच्या निमित्तानं येत असे. एक दिवस चारच्या गाडीनं मास्तरांनी बायकोला पंढरपूरला पाठवून दिलं. आता पंधरा दिवस ते एकटेच घरात राहणार होते. ती खेडूत तरुणी भांडी घासायला आली की तिच्यावर झडप घालायचं मास्तरांनी आज ठरवलं होतं. भांडी घासून झाल्यानंतर ती म्हणाली , ' मी येते मास्तर साहेब. '

' अगं , थांब चहा घेऊन जा. अगं , जादा झालाय ', मास्तरांचा प्रेमळ आग्रह.

गरमागरम चहा बरोबर त्यांनी तिला बशीत बिस्किटंही दिली.

' बिस्किट मी बारक्याला नेते. ' असं म्हणून तिनं बिस्किटं कागदात गुंडाळली व गरम चहा पटकन पिऊन टाकला. रिटायर झाल्यावर तर ही आपल्या दृष्टीस ही पडणार नाही , असा मास्तरांच्या मनात विचार आला. त्यांनी बिस्किटाचा पुडा तिला दिला व म्हणाले , हा पुडाही तुझ्या बारक्यासाठी घेऊन जा. '

' येवढी बस मला , मास्तरसाहेब. '

' अग घे . '

ती पुडा घेऊ लागली , तसं मास्तरांनी तिला जवळ ओढलं व आवळून धरलं.

' अवं मास्तर , तुमची बायकू गाडीनं पंढरपूरला गेली न्हाय , तर माझ्या बा संगं आमच्या शेतात गेलीया. आता पत्तूर तुमची बायकू आमच्या शेतात लई येळा आलीया. तुम्हाला खोटं वाटत असलं तर चला , आता माज्यासंगं. '

मास्तरांची पकड ढिली पडली.

त्यांना बायकोचं वाक्य आठवलं , ' तुम्ही बाहेर शेण खायचं बंद करा , नाहीतर फार वाईट परिणाम होतील. हे लक्षात ठेवा. '

मास्तरांचा चेहरा पडला. ती तरुणी मास्तरांच्या चेहऱ्याकडे पाहत म्हणाली , ' आता जे तुमच्या बायकुसंबंधात सांगितलं ते खोटं हाय. तुमची बायकू पंढरपूरलाच गेलीया. तुमची बायकू देवी हाय , पर तुमी मातर राक्षस हाय , सैतान हाय. '

आणि बिस्किटाचा पुडा फेकून ती रागाने निघून गेली. या छोट्या लाइनवरच्या म्हणजे नॅरोगेजवर असे किस्से वारंवार घडत. त्याला कारण म्हणजे दोनच गाड्या तिथे धावत असल्यामुळे मास्तरांना फारसं काम नसायचं. म्हणून इतर उद्योग करायला भरपूर वेळ! फक्त मोठ्या लाइनवरच्या म्हणजे ब्रॉडगेजच्या मास्तरांना भरपूर काम असल्यामुळे अशा गोष्टीकडे त्यांचं क्वचितच लक्ष जात असे. तेवढी फुरसत त्यांच्याकडे नव्हती.

एकदा सॅण्डर्हस्ट रोड स्टेशनवर लोकल आली तेव्हा पहाटेचे साडेचार झाले होते. एक अवघडलेली आई व तिचा मुलगा लोकलमधून उतरले. ती बाई कण्हत होती. ' अग आई गं ' असा आक्रोश करत होती. असिस्टण्ट स्टेशन मास्तर गुलाटी तिकिटं घेण्यासाठी ऑफिस बाहेर आले. त्याचं लक्ष त्या बाईच्या विव्हळण्याकडे गेलं. त्या मुलाला त्यांनी विचारलं.

' क्या तकलीफ है बहनजी को ?'

' माँ के पेट मे दर्द हो रहा है. '

त्या बाईला प्रसूती वेदना होत असल्याचं गुलाटींच्या लक्षात आलं. त्यांनी लगेच झाडूवालीला मदतीला बोलावलं. त्या बाईला वेटिंग रूमच्या कोपऱ्यात निजवलं. चादरीचा आडोसा केला. गुलाटीनं त्या मुलाला आपल्या थर्मासमधला चहा दिला. तो मुलगा घाबरला होता. गुलाटीनं त्याला बिस्किटं दिली.

थोडा वेळ गेला आणि नवजात अर्भकाचा टँहा टँहा असा रडण्याचा आवाज आला. गुलाटी हात जोडून म्हणाले , ' भगवान , तेरा शुक्र है. '

आतापर्यंत स्टेशन मास्तर लगेज , पार्सल व गुड्सची डिलिव्हरी करत होते. परंतु चाइल्ड डिलिव्हरी करणारे गुलाटी हे भारतीय रेल्वेतले पहिलेच व एकमेव स्टेशनमास्तर ठरले.

- व्यंकटेश बोर्गीकर

रेल चक्र - भार फुकाचा आम्हावर!

रेल चक्र - भार फुकाचा आम्हावर!

जगात सगळी सोंगं वठवता येतात. परंतु पैशाचं सोंग मात्र वठवता येत नाही. पैसा गोळा करण्याचं व त्याचा हिशेब ठेवण्याचं काम रेल्वेचा वाणिज्य विभाग (commerce dept) करतो. पश्चिम विभागाला म्हणजे ह्रश्चद्गह्मड्डह्लद्बठ्ठद्द ष्ठद्गश्चड्डह्मह्लद्वद्गठ्ठह्ल ला रेल्वेचा मेंदू (railway brain) म्हणतात , तसंच या वाणिज्य विभागाला रेल्वेचं पोट (railway stomach) म्हणता येईल. पैसा असला तरच पोट भरता येईल नाही का ? या मुख्य विभागात अनेक उपविभागही आहेत. पार्सल बुकिंग विभाग(parcel booking dept) , गुड्स बुकिंग विभाग(goods booking dept) , रिझवेर्शन विभाग (reservation dept), तिकीट चेकिंग विभाग (ticket checking dept), अकाउण्ट ऑडिट विभाग(account auditing dept) , वैद्यकीय विभाग(medical dept) इत्यादी.

रेल्वेशी सामान्य जनांचा संबंध येतो तो तिकीट खिडकीशी(ticket window). गावाला जाताना आपलं तिकीट काढायला या खिडकीशी प्रत्येकजण जातो. तिकीट देणाऱ्या मास्तरला रेल्वेच्या भाषेत बुकिंग क्लार्क (booking clerk) म्हणतात. मला एका वयस्कर निवृत बुकिंग क्लार्कने पंढरपूर यात्रेच्या बाबतीतला त्याच्या वडिलांच्या वेळी घडलेला किस्सा सांगितला. तो असा की त्या काळी अतिशय स्वस्ताई होती. त्या मानाने पगारही कमी होते. तरीही पगारातले पैसे शिल्लक पडत असत. पंढरपूरच्या यात्रेला आलेले यात्रेकरू यात्रा करून परत जाताना तिकीट काढण्यासाठी बुकिंग क्लार्ककडे पैसे देत व गावाचं तिकीट मागत. बुकिंग क्लार्क तिकीट दिल्यावर उरलेले पैसे परत द्यायला लागला की , ते म्हणायचे ' हे पैसे आमाला नगं. ते इठोबासाठी आणलेले हाईती. ते घरी न्यायाचे न्हाईत. तुमीच ठेवा. '

त्या वेळी यात्रेकरू विठोबाच्या यात्रेसाठी मिळकतीतली ठरलेली रक्कम बाजूला काढून ठेवत व ती पूर्णपणे यात्रेसाठीच वापरली जावी अशी त्यांची भावना असे. त्यामुळे तिकीट काढल्यानंतर उरलेले पैसे ते घेत नसत. असे यात्रेकरूकडून जमलेले पैसे त्या वेळचे बुकिंग क्लार्क विठोबाच्या हुंडीत नेऊन टाकत किंवा गोरगरीबांमध्ये वाटून टाकत.

यानंतर मग काळ बदलला. लोकसंख्या वाढली. महागाई वाढली. पगार अपुरे पडू लागले. भ्रष्टाचाराने हळूहळू पाय पसरायला सुरुवात केली. कित्येक स्टेशनवर , प्रवासी बुकिंग क्लार्क विरुद्ध तक्रार करू लागले. क्लार्कने मला पैसे कमी दिले असं म्हणू लागले. असे प्रकार तिकिटासाठी गदीर्ची झुंबड उडालेली असताना फार घडू लागले. अशिक्षित आणि सुशिक्षित असे दोन्ही प्रवासी यात भरडून निघू लागले. सुशिक्षित प्रवासी स्टेशनमास्तरकडे जाऊन भांडण करत आणि तक्रार करत. परंतु अशिक्षित प्रवासी मात्र बुकिंग क्लार्कलाच शिव्या घालत प्रवास करत. उतारूंच्या या तक्रारी थांबवण्यासाठी रेल्वेने बुकिंग क्लार्कचं निरीक्षण सुरू केलं. कोणत्या बुकिंग क्लार्कच्या ड्युटीमध्ये जास्त तक्रारी येतात यांची नोंद ठेवली जाऊ लागली. त्यानंतर या तक्रारींचं प्रमाण घटलं. परंतु तरीपण काही जणांना भ्रष्ट्राचाराची चटकच लागलेली असते. त्यांना अनैतिक मार्गाने पैसा कमावल्याशिवाय चैनच पडत नाही. ते बुकिंग ट्यूबमधली चार-पाच तिकिटं देत व उरलेली तिकिटे साठा करून ठेवत. मग ठेवलेल्या तिकिटाच्या बंडलमधून तिकिटे काढून प्रवाशांना देत व त्या तिकिटाचे पैसे खिशात घालत. अशा कामगिरीमुळे काही बुकिंग क्लार्कने आपल्या नोकऱ्या गमावल्या आहेत. चोरी कितीही बेमालूमपणे केली तरी ती कधी ना कधी उघडकीला येतेच. याचा अर्थ सगळेच बुकिंग क्लार्क असे असतात असं होत नाही. आपण सर्वसाधारपणे असं पाहतो की समाजामध्ये चांगल्या गोष्टींपेक्षा वाईट गोष्टींची चर्चा अधिक चविष्टपणे केली जाते. एखादा दुसऱ्या बुकिंग क्लार्कच्या पैसे खाण्यामुळे संपूर्ण बुकिंग क्लार्कची कॅटेगिरीच बदनाम होते. काही वेळेला बुकिंग क्लार्कला फटकाही बसतो. म्हणजेच गदीर्च्या वेळी कधीकधी प्रवाशांना जादा पैसे दिले जातात , तेव्हा त्यांना खिशातून ते पैसे भरावे लागतात आणि अशा तऱ्हेने विनाकारण त्यांना हा भार सोसावा लागतो.


- व्यंकटेश बोर्गीकर

मुलुंड नव्हे मुचलिंद Mulund real name is Muchlind

http://www.loksatta.com/images/stories/newlok/newdaily/20090830/rv04.jpg

प्रत्येक खेडय़ाला, गावाला, शहराला इतिहास असतो. त्या इतिहासाचे आपण सर्वजण गोडवे गात असतो. आपल्या मुंबई शहराचेदेखील असेच आहे. या शहरालाही स्वतचा वेगळा इतिहास आहे. सर्वसाधारणपणे सामान्य मुंबईकराला या शहाराचा इतिहास ज्ञात आहे तो म्हणजे फार पूर्वी हे शहर सात बेटांचं होतं आणि ब्रिटिशांनी ही सात बेटं एकत्र जोडली आणि त्या बेटांचं हे शहर तयार झालं, एवढाच.  परंतु या शहरांमध्ये किती खेडी होती, त्यांची नावं काय किंवा या खेडय़ांना ती नावे कशी पडली आदींची तसेच या शहरामध्ये कधीकाळी युद्ध झाली होती काय याची माहिती कुणालाही नसते किंवा ती माहिती जाणून घ्यायची उत्सुकताही नसते..
या मुंबईवर इतर मुंबईकरांप्रमाणेच प्रेम करणारा, त्या प्रेमापोटी स्व-खर्चाने मुंबई शहर पायाखाली घालणारा असाच एक अवलिया या शहरात गेली कित्येक वर्षे राहत आहे.. फक्त मुंबईच नव्हे तर एकूण महाराष्ट्राच्या भौगोलिक, ऐतिहासिक आणि सामाजिक जडणघडणीवर अभ्यास करणारा एक मुंबईकर म्हणजे रवींद्र लाड. हे गृहस्थ मुंबईच्या पूर्व उपनगरातील ‘मुचलिंद’ म्हणजे मुलुंड येथे गेली ३० वर्षे राहात आहेत. लौकिकार्थाने रवींद्र लाड हे इतिहासाचे संशोधक नव्हेत. खरे तर ते आकडेमोडीच्या व्यवसायातले. सुमारे ३० वर्षे त्यांनी आपटे उद्योगसमुहाच्या अकाऊंटस् विभागामध्ये आकडेमोडीसारख्या रुक्ष वातावरणात काढली. परंतु अशा रुक्ष वातावरणात राहूनसुद्धा आपली जिज्ञासा मात्र सतत जागृत ठेवली. त्यातूनच रवींद्र लाड हे आजचे आघाडीचे इतिहास अभ्यासक म्हणून प्रसिद्ध आहेत. अखिल महाराष्ट्र इतिहास परिषद, महाराष्ट्र सेवा संघ, मुलुंड या संस्थेच्या कला विभागाचे प्रमुख त्याचप्रमाणे कोकण इतिहास परिषद संस्थेच्या उभारणीच्या कामातदेखील ते गुंतले आहेत. त्यांच्या नावावर आज अनेक शोध-निबंध असून काही पुस्तकांचे संपादनदेखील त्यांनी केले आहे. कुठल्याही प्रकारे पूरक वातावरण नसतानाही इतिहासाशी नाते कसे जोडले असे विचारल्यावर रवींद्र लाड म्हणाले, एखादी घटना तुमच्या आयुष्यावर प्रभाव टाकून जाते, तसेच काहीसे माझ्याबाबतीत घडले. त्याचं असं झालं की, १९७४ साली छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा ३०० वा सोहळा रायगडावर साजरा करण्यात येणार होता. या सोहळ्यास तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधीदेखील उपस्थित राहणार होत्या. त्याचप्रमाणे इतर शिवप्रेमींप्रमाणे मीदेखील उपस्थित होतो. त्यावेळी बाबासाहेब पुरंदरे, गो. नी. दांडेकर यांची भेट झाली व त्यातूनच इतिहास या विषयाची आवड उत्पन्न झाली. त्यांच्याच सल्ल्याने शिवपूर्वकालीन महाराष्ट्राचा अभ्यास सुरू केला. इतकेच.
याच आवडीतून पुढे बखरी वाचणे, त्याचा अर्थ समजून घेणे, इतिहासाचे संशोधक, अभ्यासकांच्या भेटी घेणे व यातून मुंबई शहर हा विषय ठरवून त्या दिशेने अभ्यासास सुरुवात केली.
आजचे मुंबई शहर आणि पूर्वीचे मुंबई शहर यावर काय भाष्य कराल? लाड म्हणाले, आपण कल्पनाच करू शकणार नाही. इतर मुंबईकरांप्रमाणे मलासुद्धा मुंबईचा इतिहास दीडशे वर्षाचा माहीत होता. परंतु या शहराला इ.स. पूर्व २५० चा इतिहास आहे. या शहरात किती खेडी होती, त्याची नावे कुणी व कशी दिली तसेच यावर कुणाची सत्ता होती याचा अभ्यास केला असता खूपच नवीन माहिती मिळाली.
http://www.loksatta.com/images/stories/newlok/newdaily/20090830/rv05.jpg
उदाहरणार्थ, आपले मुलुंड शहर. या नगराला प्रश्नचीन इतिहास आहे. ‘मुंबादेवी’वरून मुंबई हे नाव या शहराला दिले गेले, तसेच काहीसे मुलुंडबद्दल आहे. सम्राट अशोकाची सत्ता इ.स. पूर्व २५० च्या सुमारास कोकणावर होती. त्याकाळी सोपारा, कल्याण, घारापुरी, ठाणे ही आसपासची प्रमुख बंदरे होती व त्या मार्गाने व्यापारी, भिक्षुक, प्रतिष्ठित नागरिक यांची ये-जा सुरू असे. काही बौद्ध भिक्खू येथेच येऊन स्थायिक झाले व त्यांनी त्यांच्या देव-देवतांच्या नावाने येथील गावांना नावे दिली. ‘तारा’ या देवतेवरून तारापूर तर ‘महाबली’ या देवाच्या नावावरून माहूल असे नाव रूढ झाले. ‘आरा’ या देवतेच्या नावामुळे ‘आरे’ असे नामांकन झाले. त्याचप्रमाणे ‘मुचलिंद’ या नाग राजावरून मुळंद, मुलंद असे अपभ्रंश करीत आजचे मुलुंड हे नाव रूढ झाले. मुलुंड हा शब्द आपल्याला ‘नालंद’ या विद्यापीठाच्या नावाची आठवण करून देतो. मुलुंड या नावाचा लिखित पुरावा इ.स. दहाव्या शतकातील शिलाहारकालीन शिलालेख व ताम्रपटात आढळतो. आजचे मुलुंड हे अगदी छोटेसे आणि आटोपशीर असे उपनगर आहे. परंतु त्याकाळी कांदिवली, बोरिवली, कान्हेरी गुंफा, येऊरचे जंगल, घोडबंदर, नाहूर, पवई, भांडुप हा सर्व प्रदेश मुलुंडमध्येच समाविष्ट होता हे सांगताना लाड इतिहासात घेऊन जातात. लाड म्हणाले, इ. स. १०४५ ते १०७० या काळात मुमुणिराजा येथे राज्य करीत होता व तसा उल्लेख या ताम्रपटात असून तेव्हाही मुलुंड असाच उल्लेख आहे. त्याचप्रमाणे मुलुंडच्या माहितीचा आणखी एक ताम्रपट भांडुप येथे सापडला असून इ. स. १०२० ते १०३५ या काळातील राजा छित्तदेव याचा आहे. या ताम्रपटात मुलुंड या गावाची सीमारेषा दाखविण्यात आली आहे. तसेच ठाणे परिसरातील ६६ गावांमध्ये मुलुंड या खेडय़ाचा अंतर्भाव केला होता. या खेडय़ाच्या पूर्वेस गोवणिग्राम म्हणजेच आजचा ‘गव्हाणपाडा’ आहे व इथूनच गव्हाणी नदी वाहत असे. जी गव्हाणी नदी आज ‘आनंद नगरचा नाला’ म्हणून ओळखण्यात येतो. तसेच ‘नोऊर ग्राम’ म्हणजेच नाहूर जो आज भांडुपमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. याच खेडय़ातून पश्चिमेला राजमार्ग म्हणजेच राजपथ जात असे ज्याला लालबहादूर शास्त्री मार्ग म्हणून आपण ओळखतो. रवींद्र लाड मुलुंडची ओळख करून देत असताना आपण अगदी दिङ्मुढ होत असतो. लाड म्हणाले, मुंबईतील इतर उपनगरांपेक्षा मुलुंड या गावाचे वेगळेपण म्हणजे या नगराची रचना. प्रश्नचीन वास्तुशास्त्राच्या अभ्यासकांनुसार हे नगर कमळ फुलाच्या पाकळ्यासारखे डोंगर व टेकडय़ांच्या रांगामध्ये एकात एक गुंफलेले आहे व पवई येथील तलाव हा त्यांच्या मधोमध विसावलेला दिसून येतो व याची जाणीव मुलुंडमध्ये आलेल्या प्रत्येक नवीन माणसाला होते.. मुंबईचा अज्ञात असलेला हा सारा इतिहास ज्ञात करून घेण्यासाठी मुंबईला अशा अनेक रवींद्र लाडांची गरज आहे!
 विकास नाईक
   

रेल चक्र : फुकटे प्रवासी! - Without ticket mumbai local touriest

रेल चक्र : फुकटे प्रवासी!

कॉटन ग्रीन स्टेशनवरची घटना. टीसी मानकर ड्युटीवर होते. मुंबईला जाणाऱ्या लोकलने दोन मुली उतरल्या. मानकर यांनी तिकीट विचारलं.

एक म्हणाली , ' हिच्याकडे आहे. '

मानकर तिच्याकडे वळले. तसं ती मुलगी पळून गेली. मानकरांनी उभ्या असलेल्या मुलीला तिकीट विचारलं. ती म्हणाली , ' तिकिटं आम्ही काढली होती परंतु गदीर्त चढताना कुठेतरी पडली कळलीच नाही. '

' बरं कुठून आलात तुम्ही. '

' कुर्ल्याहून. '

' बरं तिकीट केव्हा पडली कळलं नाही ना होतं असं कधीकधी. '

' तेच म्हणते मी माझ्या हातातून तिकीट पडली. '

' मग ती का पळून गेली. '

' तिला लवकर जायचं होतं. '

' अस्स. कुर्ला ते कॉटन ग्रीन तिकिटाला किती पैसे पडतात. '

' ती गोंधळली. '

' खरं बोलायचं. खरं बोललीस तर मी तुला सोडेन. '

' खरं सांगते. मास्तर आमी दोघीबी बिनतिकिटाचं आलाव. '

' आता असं कर तुझा पत्ता सांग आणि घरी जाऊन पैसे घेऊन ये. अर्ध्या तासात पैसे घेऊन ये अर्ध्या तासात तू आली नाहीस तर पोलिस तुझ्या घरी येतील. '

तिने पत्ता दिला. ती पैसे आणायला गेली. दरम्यान , पळून गेलेल्या मुलीने चाळीत गेल्यावर आपल्या मैत्रिणीला टीसीने पकडल्याचं सांगितलं. चाळीतली दोन पोरं स्टेशनवर आली. ' आमच्या चाळीतल्या या पोरीला तुम्ही धरलंय तुम्ही. '

' होय. '

' किती पैसे भरायचे. '

मानकरांनी हिशेब करून पैसे सांगितले. त्यांनी पैसे दिले. मानकरांनी पावती दिली.

' कुठे आहे ती. '

' ती पैसे आणायला घरी गेली. ' असं सांगताच पोरं हादरली.

तेवढ्यात ती मुलगी आली. तिनेही पैसे दिले. तशी ती पोरं म्हणाली.

' अगं आम्ही पैसे दिलेत. '

' केव्हा आताच काय हो मास्तर आम्ही पैसे दिलेत ना ?'

' होय. '

' मग हिचे पैसे परत करा. '

' नाही त्याचीही पावती करणार. '

' असं कस ?'

' एक हिची आणि दुसरी हिच्याबरोबर आलेल्या आणि पळून गेलेल्या मुलीची. '

एक पोरगा दुसऱ्या पोराला म्हणाला , ' हिच्यासाठी काही करायची लई खाज हाय तुला. गेलं की नाय पैसं अन् ती बी तुझ्याकडे न पाहता निघून गेलीया. '

- व्यंकटेश बोगीर्कर

Relchakara - Experiences in mumbai railway job

रेल चक्र - रूळ ओलांडला आणि...
ऑटोमॅटिक सेक्शनमध्ये सिग्नल लाल असला तर दिवसा एक मिनिट व रात्री दोन मिनिटे थांबून गाडी सुरू होत असल्याचं लोकांना माहीत झालं होतं. एकदा एक लोकल लाल सिग्नलजवळ थांबली व पाच ते दहा मिनिटे झाली तरी लोकल का सुरू होत नाही हे पहायला उतारू खाली उतरले. मोटरमनच्या केबिनभोवती सगळे जमले व म्हणू लागले.

' अबे ओ मोटरमन गाडी चला. '

' गाडी शुरू कर लालबत्ती रहा तो क्या हुआ. दस मिनिट हो गये. '

मोटरमन सिग्नलकडे पाहात गप्प बसून राहिला व त्याने कॅबच्या काचा ओढून घेतल्या. ते पाहून उतारू चिडले , ' अब , े खिडकी बंद मत कर. अगर हम काँच पर पत्थर मारेंगे तो तेरा थोबडा फूट जायेगा. '

' गाडी क्यूँ नही चला रहा है. औरतसे झगडा करके आया क्या ?'

' घर का गुस्सा बाहर मत निकाल. ' गाडी चलाच्या आरडाओरड्यात चार-पाचजणांनी खिडकीवर मारण्यासाठी दगड हातात घेतले. मोटरमननं खिडकी उघडली व ओरडून म्हणाला ' हे पहा , मी गाडी मुद्दाम थांबवली नाही. तसा मला अधिकारही नाही. सिग्नल लाल आहे म्हणून मी थांबलोय. '

' सिग्नल लाल असला तर काय झालं ?' ( एकानं ओरडून विचारलं.)

' हे पहा तुम्हाला सिग्नल लाल असताना , केव्हा पुढे जायचं व केव्हा थांबायचं या संबंधी काही नियम आहेत. ते नियम तुम्हाला संपूर्णपणे माहीत नाहीत. तसं माहीत असणंही शक्य नाही. लाल सिग्नल असताना दिवसा एक मिनिट व रात्री दोन मिनिटे थांबून गाडी पुढे गेल्याचं तुम्ही पाहिलं आहे. त्यामुळे तुम्ही मला पुढे जायला सांगत आहात. ज्या सिग्नलवर ' ए ' मार्कर असेल व तो सिग्नल लाल असेल तरच वरील नियमाप्रमाणे पुढं जाता येतं. परंतु या सिग्नलला ' ए ' मार्कर नाही. म्हणजेच हा ऑटोमॅटिक सिग्नल नाही. त्यामुळे हा सिग्नल हिरवा होत नाही तोपर्यंत मला गाडी सिग्नल ओलांडून पुढे जाता येत नाही. '

' ओ , आम्हाला काहीतरी फेकू नका. सकाळपासून कुणी भेटलं नाही का ?' एक ओरडला.

तेवढ्यात सिग्नल हिरवा झाला. मोटरमननं दीर्घ शिट्टी दिली व सगळे उतारू डब्यात चढल्याचं पाहताच लोकल सुरू केली. तेव्हा लोकलमध्ये चर्चा सुरू झाली. एक उतारू म्हणाला , ' मोटरमन म्हणत होता ते खरं आहे , ऑटोमॅटिक सिग्नल असला तरच तो लाल असतानाही सिग्नल पार करू शकतो परंतु तो जर नॉन ऑटोमॅटिक असेल तर सिग्नल हिरवा होईपर्यंत त्याला पुढे जाता येत नाही. '

पावसाळ्यात तर मोटरमनचे फारच हाल होतात. रुळावर पाणी साचलेलं असतं आणि रुळावर चार इंचापर्यंत पाणी असेल तरच गाडी पुढे घेऊन जाता येते. नाहीतर त्या मर्यादेपर्यंत पाणी ओसरण्याची वाट पाहात थांबावं लागतं. तेव्हा उतारूंच्या प्रक्षोभाला ड्रायव्हरला तोंड द्यावं लागतं.

धुक्याचं साम्राज्य जेव्हा पसरतं त्या वेळेसही ड्रायव्हर व मोटरमनला गाडी फार सावधानतेने व सुरक्षितेने चालवावी लागते.

लोकांनी रुळ ओलांडून जाऊ नये तर पूलाचा उपयोग करावा म्हणजे आपल्या जीविताला हानी होणार नाही , असं उदघोषक नेहमी सांगत असतो. ज्या ठिकाणी उद्घोषक नसतो तिथे या संबंधीच्या मजकुराच्या पाट्या लावलेल्या असतात. परंतु लोक या उद्घोषणाकडे व पाट्यांकडे दुर्लक्ष करतात व रुळ ओलांडत राहतात. रुळ ओलांडताना एक शाळकरी मुलगा व मुलगी लोकलखाली चिरडली गेली व मेली. गाडी वेगात असल्यानं मोटरमनला गाडी ताबडतोब थांबवणं व त्यांचा जीव वाचणं अशक्यच होतं. त्याला लोकांच्या क्षोभाला , रागाला सामोरं जावं लागलं.

' साला , याची मुलं असती तर यानं ताबडतोब गाडी थांबवली असती ?'

' परदु:ख शितळ म्हणतात तसं या मुलांच्या चिरडण्याचं याला काय दु:ख होणार ?'

परंतु प्रत्यक्ष घटना पाहिलेले उतारू मात्र म्हणतात , ' नाही , यात मोटरमनची काही चूक नव्हती. त्या रूळ ओलांडणाऱ्या मुलांचीच चूक होती. तरीही मोटरमनने शिट्टी वाजवून त्यांना सावधान करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु काही उपयोग झाला नाही. '

बहुतांशी ड्रायव्हर व मोटरमनच्या नोकरी दरम्यान असे अपघात घडतच असतात. अशा घटनांचे त्यांच्या मनावर ही आघात होत असतात. एक प्रकारची अपराधी भावना त्यांची चूक नसतानाही त्यांना कुरतडत राहते. एका मोटरमनच्या आठ तासाच्या ड्युटीत असे चार अपघात घडले. त्याचं मन त्याला खात होतं... अरेरे , चार जण आपल्या गाडी खाली चिरडले गेले...

तो ड्युटी संपवून घरी गेला. हातपाय धुवून खुचीर्वर बसला. बायकोनं विचारलं , ' जेवायला वाढू. '

' नको , आज जेवायची इच्छाच नाही. ' आणि त्याने घडलेल्या अपघातांचा बायको समोर पाढाच वाचला , ते ऐकून बायकोही शहारली.

भारतीय रेल्वेचा इतिहास सांगणारं रेलचक्र हे नवं सदर Relchakra railwaychakra book

भारतीय रेल्वेचा इतिहास सांगणारं रेलचक्र हे नवं सदर

भारतात रेल्वे सुरू झाल्यानंतर मात्र रेल्वेने दुतगतीने प्रगती केली. ईस्ट इंडिया कंपनी व जीआयपीआर कंपनीच्या पावलावर पाऊल ठेवून अन्य रेल्वे कंपन्या उभारण्यात आल्या. उदाहरणार्थ बॉम्बे बडोदा अॅण्ड सेंट्रल इंडिया रेल्वे , मदास रेल्वे आणि अन्य अशा बेचाळीस कंपन्या उभारल्या गेल्या. या बहुसंख्य कंपन्यांच्या विलीनीकरणानंतर त्यांची संख्या पंचवीसवर आली. त्यानंतर म्हणजे स्वातंत्र्यप्राप्तीनंतर 1951 मध्ये पंचवीस कंपन्यांचं एकूण नऊ क्षेत्रीय रेल्वे मध्ये वगीर्करण करण्यात आलं ते असं.

मध्य रेल्वे , पश्चिम रेल्वे , दक्षिण रेल्वे , उत्तर रेल्वे , दक्षिण-मध्य रेल्वे , दक्षिण-पूर्व रेल्वे , उत्तर-पूर्व रेल्वे , पूर्व रेल्वे , पूर्वोत्तर सीमा रेल्वे.

त्यानंतर 1-4-2003 पासून सोयीच्या दृष्टीने व कार्यक्षमता वाढवण्याच्या दृष्टीने आणखीन पाच क्षेत्रीय रेल्वेची निमिर्ती करण्यात आली.

उत्तर-मध्य रेल्वे , उत्तर-पश्चिम रेल्वे , पश्चिम मध्य रेल्वे , दक्षिण-पूर्व मध्य रेल्वे , दक्षिण-पश्चिम रेल्वे.

थोडक्यात म्हणजे आता संपूर्ण भारतीय रेल्वेही चौदा क्षेत्रीय रेल्वेने विभागली गेली आहे.

दीडशे वर्षांच्या भारतीय रेल्वेच्या वाटचालीतील काही महत्त्वाचे टप्पे.


*** पहिलं सीझन तिकीट मंुबईत 1854 मध्ये देण्यात आलं.

*** पहिली दुमजली गाडी 1862 साली निम्न वर्गाच्या डब्यासाठी चालवली गेली.

*** पहिला ऐष आरामी दालनयुक्त डबा , 1863 मध्ये मंुबईच्या गव्हर्नरसाठी बांधण्यात आला.

*** पहिला महत्त्वाचा तांत्रिक विकास होता व्हॅक्युम बेक. या आविष्काराचं कार्य- 1879 मध्ये सुरू झालं.

*** पहिली छोटीशी गाडी 1881 मध्ये दाजिर्लिंगला धावू लागली 1999 मध्ये. तिला युनेस्कोतफेर् हेरिटेज म्हणून जाहीर करण्यात आलं.

*** टॉयलेटची सोय पहिल्या वर्गात 1891 मध्ये तर निम्न वर्गात 1907 मध्ये प्रथम करण्यात आली.

*** डब्यामध्ये विजेचे दिवे प्रथम बसवण्याचा मान 1902 मध्ये जोधपूर रेल्वेने पटकावला. त्यानंतर 1903 मध्ये विजेवर चालणारे पंखेदेखील फिरू लागले.

*** रेल्वेमधील पहिलं भोजनालय 1904 मध्ये आलं.

*** पहिली इ.एम.यु (उपनगरीय गाडी) 3 फेब्रुवारी 1925 रोजी हार्बर मार्गावरून व्हिक्टोरिया टमिर्नस ते कुर्ला अशी धावली होती.

*** पहिल्या स्वयंचलित सिग्नलचं काम 1928 मध्ये सुरू झालं.

*** फ्रॅण्टियर मेलची सुरुवात सप्टेंबर 1928 मध्ये झाली. त्या वेळी ती सर्वात वेगवान गाडी होती.

*** गाडीला पहिला वातानुकूलित डबा 1936 मध्ये जीआयपी रेल्वेवर जोडण्यात आला होता.

*** पहिलं डिझेल इंजिन 1945 मध्ये धावलं.

*** मुंबई आणि दिल्ली यांना जोडणाऱ्या पहिल्या राजधानी एक्सप्रेसचं उद्घाटन 17 मे 1972 रोजी झालं. केवळ 19 तास 5 मिनिटाच्या अवधीत या गाडीने 1388 किलोमीटर अंतर पार केलं.

*** पहिल्या आणि एकमेव राष्ट्रीय रेल्वे म्युझियमचं उद्घाटन 1977 मध्ये नवी दिल्लीत झालं.

*** पहिली कम्प्युटरकृत आरक्षण व्यवस्था 1986 मध्ये नवी दिल्ली इथे सुरू झाली.

*** जगातली पहिली लाइफलाइन एक्सप्रेस (धावते रुग्णालय) 1991 मध्ये व्हीटीइथून धावली.

*** उपनगरी रेल्वेत महिलांसाठी पहिली खास गाडी पश्चिम रेल्वेने 4 मे 1992 रोजी सुरू केली.

*** क्रेडिट कार्डवर तिकीट देणारं पहिलं स्थानक ठरलं दिल्ली. ही सुविधा सप्टेंबर 1997 मध्ये सुरू झाली.

*** फेअरी क्वीन-पऱ्यांची राणी हे 145 वर्षं जुनं इंजिन जगातलं सर्वात जुनं कार्यरत इंजिन असल्याचं प्रमाणपत्र गिनिज बुक ऑफ र्वल्ड रेकार्डने दिलं.

*** नवी दिल्ली-भोपाळ शताब्दी एक्सप्रेस ताशी 140 किमी हा कमाल वेग गाठणारी आज भारतातील सर्वात वेगवान गाडी आहे.

*** भारतीय रेल्वेवरचा सर्वात दीर्घ मार्ग कन्याकुमारी ते जम्मुतावी आहे व हे 3751 किमीचं अंतर पार करायला हिमसागर एक्सप्रेसला 72 तास 55 मिनिटं लागतात.

*** जगातला सर्वात लांब फलाट खरगपूरला आहे. त्याची लांबी 833.56 मीटर आहे.

*** भारतात सर्वात जास्त काळ सुरू राहिलेलं डीसी , इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह ' सर लेस्ली विल्सन ' हे होतं.

*** भारतीय रेल्वेवरचा सर्वात लांब पूल राजमुंदीजवळ गोदावरी नदीवर आहे. त्यांचीलांबी 5 किमी पेक्षा जास्त आहे.

*** पहिली जनशताब्दी (मुंबई-मडगाव) 16 एप्रिल 2002 मध्ये धावली.

आज एकाच व्यवस्थापना खाली असणारं रेल्वेचं जाळं आशियात सर्वात मोठं व जगात दुसऱ्या क्रमांकाचं आहे. भारतीय रेल्वेत काम करणारा 16.5 लाख कर्मचारी वर्गसुध्दा जगात सर्वात जास्त आहे.

16 एप्रिल 1853 साली रेल्वेत फक्त चौदा डबे व तीन वाफेची इंजिनं होती तर आज दीडशे वर्षांनंतर भारतीय रेल्वेकडे 39,236 प्रवासी वाहतुकीचे डबे , 2,16,717 माल वाहतुकीचे डबे , 63,140 कि.मी. रेल्वे मार्गाची लांबी व एकूण रेल्वे स्थानकाची संख्या 6,856 आणि एकूण इंजिनाची संख्या 7,739 एवढी आहे. या शिवाय ऐंशी टक्के रेल्वे मार्गाचं विद्युतीकरण झालेलं आहे. बऱ्याच एकपदरी मार्गाचं व्दिपदरी रेल्वे मार्गात रूपांतर केलेलं आहे. अशा या भारतीय रेल्वेनं राजापासून प्रजेपर्यंत , नेत्यापासून अनुयायापर्यंत , उच्चासनाच्या श्ाेष्ठीपासून सामान्यापर्यंत प्रत्येकाची आशा आकांक्षाची पूर्तता करण्यात मोलाचा हातभार लावला आहे. या देशाच्या आथिर्क , सामाजिक , सांस्कृतिक आणि तंत्रज्ञान प्रगतीला भारतीय रेल्वेने वेग दिला आहे. युरोप आणि अमेरिकेत रेल्वे व्यवस्था सुरू झाली ती त्या-त्या देशाच्या औद्योगिक क्रांतीतून उद्भवलेल्या वाहतूक विषयक समस्यांवर उत्तर शोधण्याच्या आवश्यकतेतून. या उलट भारतात औद्योगिक क्रांतीचा पायाच रेल्वे परिवहन व्यवस्थेने घातला आहे.


- व्यंकटेश बोर्गीकर

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email