|
|
गोंबर यांनी सतराव्या शतकापासून मिळालेली हनुमानाची चित्रे संग्रहित केली आहेत. त्यांचा छानसा अल्बम बनविला आहे. याशिवाय हनुमानाच्या अनेक दुर्लभ मूर्ती येथे आहेत.
|
हनुमान संग्रहालयात या रामभक्तावर निघालेल्या ध्वनिफितींचाही संग्रह आहे. हनुमानावरील विविध भाषांमधील, देशविदेशांमधील जवळपास अडीचशे पुस्तके येथे पहायला मिळतात. हनुमानावर काम करणार्या विविध देश-परदेशातील संस्थांची सूचीही येथे आहे. याशिवाय हनुमानाच्या व्यक्तिमत्वाचा भाग असलेला मुकूट, कुंडल, गदा, ध्वज, शेंदूर, जानवे हेही येथे आहे. हनुमानाच्या विचारांचा प्रसार करणार्या साधुपुरूषांची चित्रे येथे आहेत. त्यात नीम करौली बाबा, महाराष्ट्रातील समर्थ रामदास यांचा समावेश आहे. याशिवाय हनुमानावर आधारीत १३७ संकेतस्थळांची यादी येथे पहाता येईल.
|
गोंबर यांनी संग्रहालयाव्यतिरिक्त राम-हनुमान लेखन बॅंकेचीही स्थापना केली आहे. गोंबर हे प्रकाशन व्यवसायात आहेत. सातव्या इयत्तेत असल्यापासून ते हनुमानाची भक्ती करत आहेत. हळूहळू ही भक्ती आत्यंतिक प्रेमात परावर्तित झाली. काही वर्षांपूर्वी त्यांच्या नाकातून अचानक रक्त निघू लागले. त्यानंतर त्यांचे व्यक्तिमत्वच बदलून गेले. मग त्यांनी जय बजरंग चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली. संपूर्ण आयुष्य त्यांनी हनुमानाच्या भक्तीतच घालवण्याचे ठरविले.
गोंबर यांनी हनुमानासंदर्भात चार पुस्तकांचे संपादन केले आहे. तुलसीदार हनुमान साधना शब्दमणी हे त्यांचे सर्वाधिक खपले गेलेले पुस्तक आहे. याशिवाय तुलसीदास का हनुमान दर्शन, सुंदरकांड सुंदर क्यो?, भक्तों का दृष्टिकोन अर्थात वर्ल्ड ऑफ लॉर्ड हनुमान हीसुद्धा त्यांची पुस्तके आहेत.
हनुमानासंदर्भात काहीही माहिती, एखादी दुर्मिळ वस्तू वा साहित्य सापडल्यास वा त्याची माहिती मिळआल्यास त्वरीत आपल्याशी संपर्क साधावा असे आवाहन गोंबर यांनी केले आहे. गोंबर यांचे हे संग्रहालय भक्तांना रविवारी सकाळी अकरा ते दुपारी एकपर्यंत पाहता येते.
No comments:
Post a Comment