रेल चक्र - अस्वलाला घाबरला लाल बावटा !
इंग्रजाचं
राज्य गेलं
परंतु
गार्डाचे
पगार व इतर
भत्ते जसे
होते तसेच
सुरू राहिले.
काही काही
तरुणांचं
ध्येय असं
होतं
की
,
रेल्वेत
नोकरी करायची
तर ती
गार्डाचीच!
गार्डाला सगळे भत्ते मिळून भरपूर पगार मिळत असला तरी एखाद दुसरा गार्ड वरकमाईसाठी धडपडत असे. त्यासाठी अधिकाराचा हवा तसा वापर करत असे. एका स्टेशनवर चार मोटारसायकल ब्रेक व्हॅनमध्ये म्हणजे माल डब्यामध्ये भरायच्या होत्या. पार्सल क्लार्क नव्यानेच नोकरीला लागला होता. तो गार्ड साहेबाकडे पुस्तक घेऊन गेला व म्हणाला , ' चार मोटारसायकली भरायच्या आहेत. ' ' ही पावती घ्या व सही करा. ' तो पार्सल क्लार्क म्हणाला गार्डानं पुन्हा त्याच्याकडे पाहिलं. तो नुसतीच पावती देत होता. गार्ड म्हणाला , ' जागा नाही ' ' मग तसं लिहा. ' गार्डने पुन्हा त्याच्याकडे पाहिलं व गाडी सुरू करण्यासाठी शिट्टी वाजवली. तेवढ्यात त्या मोटार सायकलीचा मालक धावत आला व म्हणाला , ' राम राम गार्डसाहेब. ' ' राम राम. ' ' हे घ्या साहेब तुमची आवडती ब्रँड. ' म्हणून त्या व्यापाऱ्यानं सिगरेटच पाकीट पुढे केलं , त्याखाली नोट ठेवली होती. गार्डनं पार्सल क्लार्ककडे पाहिलं , ' ही चावी घ्या आणि लवकर भरा. ' लगेज व्हॅन पोर्टरने उघडलं. पार्सल क्लार्कनं पाहिलं की लगेज व्हॅनमध्ये भरपूर जागा होती. प्रथम गार्ड जागा नाही म्हणाला होता मग हे असं कसं ? तो नव्यानेच कामाला लागलेला पार्सल क्लार्क विचार करत पार्सल ऑफिसकडे गेला. एकदा एका गार्डला वाटलं की आपण ही वर कमाई करावी. कारण त्यानं काहीकाही गार्डकडून ऐकलं होतं की अमक्या ट्रीपमध्येे एवढं मिळाले. तर काही गार्ड म्हणायचे आम्ही त्या भानगडीतच पडत नाही. परंतु कधी नव्हे ते या गार्डला वाटलं की स्वखुशीनं जर काही मिळत असेल तर घ्यायला काय हरकत आहे. एका छोट्या स्टेशनवर मेल थांबली. एक दरवेशी गार्डकडे आला व म्हणाला , ' साहेब हे अस्वल तुमच्या पिंजऱ्यात घाला. याचे पैसे व माझ्या तिकिटाचे पैसे तुम्हाला देतो. सिग्नल नसल्यामुळे गाडी थांबली , म्हणून तुम्हाला मी विनंती करतोय ,' असं म्हणत , त्याने शंभराची नोट गार्डसाहेबासमोर धरली. गार्डनं ' ठीक आहे ' म्हणून शंभराची नोट घेतली. त्या दरवेशाला अस्वलाला डॉगबॉक्समध्ये टाकायला सांगितलं. त्यानं अस्वलाला पिंजऱ्यात टाकलं व तो पुढील डब्यात जाऊन बसला. थोड्या वेळानं गाडीला सिग्नल मिळाला तसं ड्रायव्हरनं शिट्टी वाजवली. गार्ड प्लॅटफार्मवर उभा होता त्यानं शिट्टी वाजवली. बावटा घेण्यासाठी ब्रेकमध्ये चढू लागला आणि आश्चर्य भीतीयुक्त स्वरात उद्गारला. ' अरे बापरे! ' कारण ते अस्वल पिंजऱ्यातून बाहेर आलं होतं आणि दारात बसलं होतं. गार्डला अस्वलाला ओलांडून ब्रेक मध्ये जाणं अवघड होतं. कारण त्याला अस्वलाची भीतीही वाटत होती. ब्रेकमध्ये जाता येत नसल्यामुळे बावटा घेता येत नव्हता व बावटा दाखवल्याशिवाय गाडी निघणार नव्हती. गार्ड लाल बावटाही दाखवत नाही व हिरवा बावटा ही दाखवत नाही , हे पाहून ड्रायव्हरनं आपल्या असिस्टण्टला चौकशी करायला पाठवलं. दहा मिनिटं झाली तरी गाडी का निघत नाही म्हणून स्टेशन मास्तर ड्रायव्हरकडे गेले. ड्रायव्हरने गार्ड बावटा दाखवत नसल्याचं सांगितलं. ' काय झालं! ' ' काय झालं ' म्हणून बरेच उतारूही खाली उतरले व स्टेशन मास्तरला विचारू लागले , ' मास्तर गाडी का जात नाही ?' ' तेच विचारायला गार्डकडं चाललोय. ' स्टेशन मास्तर व ड्रायव्हरच्या असिस्टण्टबरोबर उतारूही गार्डच्या डब्याकडं निघाले. ते दारात बसलेलं अस्वल गार्डला ब्रेकमध्ये येऊ देत नव्हतं. दोन्ही बावटे , लाल व हिरवा ब्रेकमध्ये होते. स्टेशन मास्तर आले व त्यांनी गार्डला विचारलं , ' काय झालं गार्डसाहेब बावटा का दाखवत नाही ?' गार्डनं सगळी हकीकत स्टेशन मास्तरला सांगितली. स्टेशन मास्तरांनी गार्डकडे पाहिलं. त्यांची नजर म्हणत होती... एक ट्रीपमध्ये पैसे मिळाले नाहीत तर काय आकाश कोसळणार होतं का ?... त्यानजरेत गार्ड पुरता ओशाळला व म्हणाला , ' मास्तरसाहेब पोर्टरला पाठवा व त्या दरवेशाला बोलवा. पुढच्या एका डब्यात तो दरवेशी बसला होता. पोर्टर दरवेशाला हुडकायला निघाला. पोर्टर प्रत्येक डब्यात जाऊन ओरडू लागला , ' दरवेशी ओ दरवेशी... ' तो दरवेशी कोणत्या डब्यात बसलाय याचा पत्ता लागेना. सगळे डबे त्या पोर्टरनं दरवेशी ओ दरवेशी असं ओरडत पालथे घातले. एका उतारून पोर्टरला विचारलं , ' दरवेशी म्हणजे काय ?' ' अस्वलाचा खेळ करणाऱ्याला दरवेशी म्हणतात. ' ' अस्सं होय , त्याला तुम्ही हुडकताय ?' ' होय. ' ' तो या बाकड्याखाली झोपलाय. अस्वल गार्डच्या डब्यात पिंजऱ्यात घातल्याचं त्यानं मला सांगितलं होतं व झोपण्यापूवीर् म्हणाला होता कर्जत आलं की मला उठवा. ' ' अस्सं कोणत्या बाकड्या खाली झोपलाय ?' पोर्टरने त्या दरवेशाला उठवलं आणि गार्डच्या डब्याकडे आणलं. त्याने अस्वलाला पिंजऱ्यात घालू का म्हणून विचारलं. दरवेशानं अस्वलाला खाली उतरवलं. अर्धा तास गाडी वाजली. गार्डने दरवेशाला शंभर रुपये परत केले व हात जोडले मग स्टेशन मास्तरला विनंती केली अस्वलामुळे गाडी वाजली असं कंट्रोलरला सांगून नका. दुसरं काहीही कारण सांगा व काय कारण सांगितलं ते मला पुढच्या स्टेशनला कळवा म्हणजे मी माझ्या पुस्तकातही तेच कारण लिहीन. माझं चुकलं मला वाचवा. स्टेशन मास्तरने कंट्रोलरला कारण दिलं , दोन पॅसेंजरमध्ये काही कारणामुळे भांडण झालं. त्यापैकी एक उतारू खाली पडला. वारंवार साखळी ओढली गेली आणि गाडी अर्धा तास थांबली. - व्यंकटेश बोर्गीकर |
No comments:
Post a Comment