Tuesday, May 8, 2012

Chhatrapati Shivaji's rare photos

नमस्कार मावळ्यांनो,
इथे मी आपल्यासाठी शिवरायांची दुर्मिळ अशी काही छायाचित्र देत आहे..
Chhatrapati Shivaji's rare photos
१. पहिले छायाचित्र मीर मोहम्मद नामक चित्रकाराने काढले असून ऐतिहासिक दृष्ट्या या चित्राला खूप महत्व आहे..
२.दुसरे छायाचित्र एका डच कलाकाराने  काढलेले आहे.
३.तिसरे छायाचित्र शिवकालीन आहे परंतु याच्या चित्रकाराचे नाव उपलब्ध नाही.
४.चवथे छायाचित्र राजा रवी वर्मा नामक भारतीयाने काढलेले आहे.
५. पाचवे छायाचित्र तर सर्वांनी पाहिलेलेच आहे कारण This is an Official painting for Government of Maharashtra and Government of India

 
 Chhatrapati Shivaji's rare photos
छत्रपती शिवरायांच्या शस्त्रांपैकी ढाल,अंगरखा,बिचवा अशी अनेक शस्त्रे आज उपलब्ध नाहीत.परंतु त्यांच्या काही तलवारींपैकी तीन तलवारी जगदंबा,भवानी आणि तुळजा या आजही अस्तित्वात आहेत.वाघनखे व्हिक्टोरिया आणि अल्बर्ट संग्रहालयात आहेत. तलवारींपैकी जगदंबा हि तलवार लंडन मध्ये आहे.ती स्वतः बाबासाहेब पुरंदरे यांनी पाहिल्याचे नमूद केले आहे.दुसरी भवानी तलवार सध्याचे श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याकडे आहे,तर तुळजा तलवार हि सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात आहे.
माझ्या मागील लेखात जगदंबा आणि भवानी तलवार एकच असल्याचे नमूद केले होते त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहे.
मराठा तलवार
मराठा तलवार
मराठा तलवार
मराठा तलवार
जगदंबा तलवार-
उगम – इ.स.१५१० साली आल्फोन्सो आल्बुकर्क याने गोवा जिंकला .त्याचा सेनापती डियागो फर्नांडीस याने लगेचच सावंतवाडीवर हल्ला केला,पण
हल्ला सपशेल फसला आणि पोर्तुगिजांचा दारूण पराभव खेमसावंत भोसल्यांनी केला.त्यावेळी हि पोर्तुगीज राजघराण्यातील (Imperial) तलवार खेमसावंत यांच्याकडे आली. (तलवारीच्या पात्यावर I.H.S. हि अक्षरे कोरली आहेत)
छत्रपतींना हि तलवार १६५९ साली भेट म्हणून देण्यात आली किंवा खेमसावंता वर झालेल्या जप्तीत ती छत्रपतींना मिळाली.

जगदंबा तलवार

जगदंबा तलवार
जगदंबा तलवार
जगदंबा तलवार

तलवारी संबंधीची करवीर संस्थानातील नोंद -
पंतप्रधान सरकार कदीम करवीर, शस्त्रागार तर्फे रावबहाद्दूर दादासो सुर्वे
नोंदणी जीनस – जगदंबा तलवार
जिनसाचे नाव | डाग आकार सहित | तपशील दास्तान | चालूकडे
तलवार सडक | १९७-११ | १९७-११ | हल्ली नाही
जगदंबा मेणावर
तपशील – नाकीत्यास हिरे ६,माणके ४४ ,पाचा १०
एकूण पराज हिरे १३,पाचा १८ , माणके ४६७
मिळून सबंध तलवार.
जगदंबा तलवार प्रतिकृती
जगदंबा तलवार प्रतिकृती
चौथे शिवाजी – प्रतापसिंहराजे भोसले यांनी हि तलवार प्रिन्स ऑफ वेल्स याला भेट दिल्याचे सांगण्यात येते.
भवानी तलवार – शिवछत्रपतींनी वापरलेल्या अनेक तलवारींपैकी हि एक, परमानंद नेवासकर कृत शिवभारत मध्ये “मी तुझ्या तलवारीमध्ये आशीर्वाद बनून राहीन” अश्या अर्थाचा श्लोक होता, त्याचे नंतर भवानी आईने तलवार दिली असे रुपांतर झाले.असो…
तर हि भवानी तलवार रायगड पडला तेव्हा झुल्फिकार खानच्या हातात पडली असावी.त्याचवेळी शाहू छत्रपती,येसूबाई राणीसाहेब व इतर लोक कैद झाले.औरंगजेबाने येसूबाई आणि शाहू महाराजांची विशेष बडदास्त ठेवली येसूबाई यांना स्वतः चा शिक्का व चरितार्थासाठी काही वतने दिली,तसेच शाहूंना “सरकार राजा शाहू ” अशी पदवी दिली.
नंतरच्या काळात शाहू महाराज मोठे झाल्यावर औरंगजेबाने त्यांचे धर्मांतर करण्याचे ठरविले परंतु शाहू आणि येसूबाई राणी साहेबांनी त्यास विरोध दर्शविला त्यामुळे औरंगजेबाने तो विचार सोडून दिला आणि शाहूंचे लग्न बहादुर्शहा च्या मुलीशी लावले
त्या लग्नप्रसंगी औरंगजेबाने भवानी तलवार,अफझलखानची तलवार आणि काही रत्ने शाहूंना भेट दिली.नंतर हीच तलवार
शाहू महाराजांबरोबर सातार्यात आली,तीच तलवार सातारा छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर मध्ये आहे.त्यावर
‘सरकार राजा शाहू’ असे कोरले आहे.
तुळजा तलवार - तिसरी तलवार म्हणजे सिंधूदूर्ग किल्ल्यातील शिवराजेश्वर मंदीरातील तुळजा फिरंग ही तलवार.सहजी महाराजांनी ती तलवार शिवाजी महाराजांना दिली असे सांगण्यात येते. यापैकी तिसरी तलवार असण्याची शक्यता इतिहास संशोधकांनी वर्तवल्यामुळे या तलवारीचं महत्त्व वाढलं आहे. या तलवारीला जतन कराण्यासाठी ती काचेच्या पेटीत ठेवण्यात आली आहे. तसेच पूजेसाठी तिची प्रतिकृती ठेवण्यात आली आहे.
संदर्भ साभार – भवानी तलवार ब्लॉग
महाराष्ट्र टाईम्स
रॉयल एशियाटिक सोसायटी
औरंगजेबाचे अखबार
शिवकालीन शस्त्रे – पुरंदरे




जगदंबा तलवार प्रतिकृती

This memorial in the form of a museum was to be erected on the plot of land known as the Crescent Site on the southern tip of the island.

The building was completed in 1914 but it opened to the public much later on 10th January, 1922.

Till then it was used by the military as a hospital and for the Children’s Welfare Exhibitions.

Many things have changed since then. Bombay is now known as Mumbai and the name of the Prince of Wales Museum of Western India
is changed to the Chhatrapati Shivaji Maharaj Vastu Sangrahalaya. Set against a well-laid-out garden which retains its original plan even today,
the museum is a Grade I Heritage building of the city.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive