रेल चक्र - कार्यतत्परता आणि रेल्वे
स्वर्गीय
सी. डी
देशमुखांना
आयसीएसच्या
तोंडी
परीक्षेला एक
प्रश्न
विचारला
होता
,
'waht?' is the difference between the schoolmaster and a startion
master?'...'schoolmasters train the mind and stationmasters mind the train.'
असं त्यांनी
उत्तर दिलं
होतं.
ही गोष्ट स्टेशनमास्तरांच्या ट्रेनिंग कोर्सच्या दरम्यान आम्हाला आमच्या शिक्षकांनी सांगितली होती. ट्रेनिंग संपल्यानंतर आम्ही स्टेशन मास्तरचं काम करू लागलो , तेव्हा आमच्या लक्षात आलं की अरेच्चा! खरंच , हे वाक्य किती सत्य आहे. आपण गाड्यांचाच विचार करतोय. आता ही गाडी नंतर ती... एकामागोमाग एक त्याचाच विचार. घाटकोपर ते मुंबई अशा लोकलच्या फेऱ्या व्हायच्या. साधारणपणे 1973-77 सालची गोष्ट असावी. घाटकोपर -मुंबई लोकलच्या मुंबई बाजूच्या प्रथम श्रेणीच्या डब्यातून पाच-सहा मैत्रिणी कामासाठी मुंबईला रोज जात. एके दिवशी मुंबईला उतरल्यावर एका मुलीच्या लक्षात आलं की तिच्या हातातलं सोन्याचं ब्रेसलेट गायब आहे. ती धावत स्टेशनात आली व घाटकोपर वरून आलेली लोकल उभी आहे का , ते पाहू लागली. परंतु ती लोकल परत निघून गेली होती. ती मुंबईच्या स्टेशन मास्तरकडे जाऊन म्हणाली , ' मास्तरसाहेब माझं ब्रेसलेट घाटकोपरहून आलेल्या लोकलमध्ये स्त्रियांच्या प्रथम श्ाेणीच्या डब्यात पडलं असावं असं वाटतंय. ' स्टेशन मास्तरांनी त्या लोकलचा ठावठिकाणा घेतला. ती लोकल दादरहून निघाली होती. कुर्ल्याला के व्ही विचारे सहाय्यक स्टेशन मास्तर ड्युटीवर होते. त्यांना मुंबईच्या स्टेशनमास्तरांनी ब्रेसलेटबद्दल सांगितलं. विचारेंनी जीआरपी ला (त्नश्ा 1 द्गह्मठ्ठद्वद्गठ्ठह्ल क्रड्डद्बद्य 2 ड्ड 4 क्कश्ाद्यद्बष्द्ग) बोलावलं व त्यांना ही माहिती दिली. दोन पोर्टर , दोन हमाल व जीआरपी सह विचारे लोकलच्या प्रथम श्ाेणीच्या डब्यात गेले. ते सोन्याचे ब्रेसलेट स्क्रूसह बाकड्याच्या खाली मिळालं. विचारेंनी मुंबईला ब्रेसलेट मिळाल्याचं कळवलं. ती मुलगी मुंबईच्या स्टेशनमास्तरचं पत्र घेऊन कुर्ल्याला आली. त्या पत्रावर तिची सही घेऊन विचाऱ्यांनी ते ब्रेसलेट तिच्या ताब्यात दिलं. ती मुलगी म्हणाली , ' अंकल आप का यह एहसान मैं जिंदगीभर नही भुलूँगी. ' ' एहसान वगैरे कुछ नही बेबी , मैने अपना फर्ज निभाया है. आपके तकदीर से ब्रेसलेट आपको मिल गया है. ' विचारे म्हणाले. ' यु आर सिंपली ग्रेट अंकल! ' ती मुलगी म्हणाली. तिने ही घटना परदेशात राहणाऱ्या आपल्या वडीलांना कळवली. तिच्या वडिलांनी , मध्य रेल्वेचे मुंबई विभागाचे श्री. डी.आर.एम बन्सल यांना के व्ही विचारेंच्या कर्तव्य तत्परतेबद्दल प्रामाणिकपणाबद्दल बरंच काही लिहून व पत्राच्या शेवटी लिहिलं , असे स्टेशनमास्तर भारतीय रेल्वेवर आहेत ही खरोखरच मोठी अभिमानास्पद गोष्ट आहे. या प्रकारानंतर मुलीला भेटण्यासाठी ते भारतात आले. तेव्हा आवर्जून विचारेंना भेटत असत. तेव्हा विचारेंनी त्यांना वरील स्वगीर्य सी डी देशमुखांचा किस्सा सांगितला होता. त्यावर त्या मुलीचे वडील म्हणाले होते , ह्यष्द्धश्ाश्ाद्य द्वड्डह्यह्लद्गह्म ह्लह्मड्डद्बठ्ठह्य ह्लद्धद्ग द्वद्बठ्ठस्त्र 2 द्धद्गह्मद्ग ड्डह्य ह्यह्लड्डह्लद्बश्ाठ्ठ द्वड्डह्यह्लद्गह्म ठ्ठश्ाह्ल श्ाठ्ठद्य 4 द्वद्बठ्ठस्त्रह्य ह्लद्धद्ग ह्लह्मड्डद्बठ्ठ ड्ढह्वह्ल , ड्डद्यह्यश्ा द्वद्बठ्ठस्त्रह्य ह्लद्धद्ग ह्यड्डद्घद्गह्ल 4 ड्डठ्ठस्त्र 2 द्गद्यद्घड्डह्मद्ग श्ाद्घ ह्लद्धद्ग श्चड्डह्यह्यद्गठ्ठद्दद्गह्मह्य. |
No comments:
Post a Comment