रेल चक्र - जित्याची खोड ...
मनुष्य
स्वभावाला
असलेल्या
विविध
पैलूंचा
अनुभव मला
पदोपदी येत
होता. एकदा मी
मोडनिंब
स्टेशनवर काम
करत होतो.
सकाळी आठ ते
रात्री
आठ
,
अशी बारा
तासांची
ड्युटी
असायची.
रात्रीचे आठ
वाजले होते.
माझी ड्युटी
संपली होती
आणि मला
सोडवायला
मास्तर आला. मी
त्याला चार्ज
देऊ लागलो
तेवढ्यात तो
म्हणाला
,
'
प्रथम मी
वेटिंग रूमचा
चार्ज घेऊन
येतो.
'
' म्हणजे ?' न कळल्यामुळे मी प्रश्न केला. ' वाघाचे पंजे. ' एवढं बोलून तो वेटिंग रूममध्ये गेला. सात-आठ बायका , दहा-बारा पुरुष आणि काही पोरं वेटिंग रूममध्ये होती. त्यापैकी एका बाईजवळ जाऊन तो म्हणाला , ' मागच्या बाजारला तुम्ही मामा करून टाकलात. ' ' या खेपेला मामी करून टाकते. काळजी करू नका. ' ती उत्तरली. ' नक्की. ' ' अगदी नक्की. ' मग तो स्टेशनात येऊन म्हणाला , ' बाकी सगळं ठीक आहे ना. त्या चाव्या द्या आणि जा तुम्ही मास्तर. ' मी चाव्या दिल्या व विचारलं , ' वेटिंग रूमचा चार्ज , ही काय भानगड आहे रे. ' उजव्या नाकपुडीवर तर्जनी ठेवत तो म्हणाला , ' अरे , मला याचा नाद आहे. मी नेहमी नव्या स्त्रीच्या शोधात असतो. गेल्या बाजारला तिनं मला शब्द दिला होता. पण तिनं तो पाळला नव्हता आणि माझा मामा केला होता. म्हणून आज तिला त्याची जाणीव करून दिली. ' ' अरे पण तू विवाहित आहेस. तुझ्या दोन मुली लग्नाच्या आहेत आणि तरी... तुला... ?' ' मास्तर , ही सवय फार वाईट. लग्नापूवीर्पासूनच लागली आहे मला. लग्नानंतर सुटेल असं वाटलं होतं. पण कसलं काय ? जाऊ द्या मास्तरसाहेब , तुम्हाला काही कळायचं नाही आणि आमचं रामायण काही संपायचं नाही. या तुम्ही. ' असं म्हणून त्याने मला निरोप दिला. ती स्त्री खिडकीतून त्याच्याकडे पाहत होती. पुढच्या आठवड्यात जेव्हा तो सुट्टी द्यायला आला तेव्हा त्याच्या कपाळावर पट्टी बांधलेली होती. ' हे आता काय झालं. ' मी विचारलं. ' एका बाईनं डोकं फोडलं. ' त्याचं शांत उत्तर. ' का ?' ' आमची हुंगेगिरी नडली. ' ' म्हणजे. ' ' ड्युटीवरच माझं एका तरुणीशी चांगलंच सूत जमलं. मला वाटलं ती माझ्या कह्यात आली असेल. मग मी तिला ऑफिसमध्ये बोलावलं. ती आली. मी दाराकडे जाण्याचं निमित्त केलं आणि ऑफिसचं दार लावलं. ' हे काय वं मास्तर दार का बंद केलंया. ' ' तुझ्यासाठी. ' ' माझ्यासाठी. ते कशा पायी. ' ' या पायी ' म्हणून त्यानं तिला मिठीत घेण्याचा प्रयत्न केला. ती तरुणी चांगलीच आडदांड होती. तिने त्याला जोरात ढकललं. तो बेसावध होता कारण ती प्रतिकार करणार नाही याची त्याला खात्री वाटली पण त्यामुळे त्याचा तोल गेला. त्याचं कपाळ लोखंडी खुचीर्च्या पायावर आदळलं आणि कपाळाला खोक पडली. त्यातून रक्त भळभळ वाहू लागलं. ती कडाडली , ' तू माझ्या बाच्या वयाचा हायेस आणि माझ्याशी लगट करतोया. नीच. हलकट. मुडदा पडो तुजा. ' तो उठण्याआधीच तिने त्याच्या पेकाटात लाथ घातली आणि दार उघडून बाहेर पडली. तो कळवळत मनातल्यामनात म्हणाला , ' छे , ही तर मिळाली नाहीच. वर हिचा मारच मिळाला. ' ड्युटी संपल्यावर तो घरी गेला. डोक्याची पट्टी पाहून बायकोने विचारलं , ' काय झालं ?' ' तोल गेल्यामुळे पडलो. खुचीर्चा पाय लागला. ' ' अस्सं. म्हणजे मदिराक्षीबरोबर आता मदिराही घ्यायला सुरुवात केली म्हणायची तुम्ही. ' ' नाही. आई शप्पथ. पाहिजे तर तोंडाचा वास घे. ' तिने जवळ जाऊन त्याच्या तोंडाचा वास घेतला. ' आता लक्षात आलं. ' बायको चाणाक्ष होती. ' काय. ' ' तुम्हाला ही जखम मदिराक्षीमुळेच झाली आहे. तुमच्या हुंगेगिरीचा हा प्रताप आहे. मी काही आज पाहत नाही तुम्हाला , लग्न झाल्यापासून पाहतेय. आता डॉक्टरकडे जाऊन टिटॅनसचं इंजेक्शन घेऊन या. ' समजूतदार बायकोच्या सहमतीने त्यानं तात्पुरती का होईना जखमेची कहाणी संपवून टाकली होती. - व्यंकटेश बोर्गीकर |
No comments:
Post a Comment