Wednesday, March 31, 2010

संस्कारशिदोरी

संस्कारशिदोरी


साहित्यवर्तुळात स्वत:चं स्थानिर्माण करणाऱ्या अनुपमा उजगरे यांनी कथा, कविता, ललित आणि संशोधनपर लेखन केलं आहे. त्यासाठी त्यांना अनेक पुरस्कार लाभले आहेत

. अनेक साहित्य संस्थांमध्ये त्या कार्यरत आहेत.

 

...........

 

''तुम्ही संस्कृत श्लोक, सुभाषिते, सुविचार यांची पेरणी निबंधात केली, तर परीक्षक चांगले गुण देतात,'' असं आमच्या शिक्षकांचं सांगणं असायचं. त्यामुळे अशा वह्यांचा संग्रह बहुतेक विद्यार्थ्यांकडे असायचा. त्याचा वापर प्रत्येकाने आपल्या लेखनात किंवा जीवनात कसा केला हे ज्याचं त्याला ठाऊक. एक मात्र नक्की की, आमच्या पिढीला चांगल्या संस्कारांचा लाभ त्यामुळे मिळत गेला. असे संस्कारवर्ग कुठल्याही फीशिवाय घेणारी माणसंही त्यावेळी होती. 'मोठ्ठे बाप्पा' हे त्यापैकी एक.

 

रोज रात्री जेवणं आटोपून आम्ही सगळी मुलं ठोंबरेंच्या अंगणात जमत असू. आठ-आठ दिवस संपणाऱ्या गोष्टींची मेजवानी तिथे आम्हाला मिळायची. रात्री साडेआठचा भोंगा नगरभर ऐकू यायचा. भोंगा वाजायला सुरुवात झाली की, तो संपायच्या आत गोष्टीला तिथेच पूर्णविराम देऊन आम्ही सगळी मुलं समोरच्याच मोठ्ठे बाप्पांच्या अंगणात ठोंबरेंच्या अंगणाकडे पाठ करून बसत असू. धर्मविषयक गोष्टी सांगण्याचं कंत्राट मोठे बाप्पांकडे असायचं. त्यानंतर प्रत्येकाने उठून गीतेमधील एखादं तरी सुवचन बोलून दाखवायचं. कधी कधी स्तोत्रं-गाणी पाठ म्हणून दाखवावी लागत. गैरहजेरीचा बहाणा अजिबात चालत नसे. 'आपल्या प्रत्येकाच्या नावाचा एक शुभ्र देवदूत असतो. आपण पाप केलं तर त्याच्या शुभ्र कपड्यांवर काळा डाग पडतो. न्यायाच्या दिवशी सर्वांसमोर आपल्या देवदूताला उभं केलं जाणार आहे, तेव्हा देवदूत स्वच्छ असेल अशी काळजी घ्या.' मोठे बाप्पा म्हणायचे. 'देवदूताचे कपडे डागाळले तर अमूक एक धुलाई पावडर किंवा एखाद्या चांगल्या लाँड्रीची सोय त्यावेळी नव्हती का? असा आजच्या मुलांकडून विचारला जाऊ शकणारा प्रश्ान् आमच्या मनातही कधी आला नाही. देवदूताच्या मलीन होण्याची भीती मनात बसली ती आजतागायत.

 

शब्दकोडी सोडवण्याचा एक फार छान खेळ त्यावेळी मोठी मुलं खेळायची. एखाद्या शब्दाची अक्षरसंख्या सांगायची. उदाहरणार्थ, एक तीन अक्षरी शब्द आहे. पहिलं अन् शेवटलं अक्षर घेतलं की, एक खाण्याचा पदार्थ असा अर्थ होतो. पहिलं अन् दुसरं अक्षर घेतलं तर वजन असा अर्थ निघतो. दुसरं अन् तिसरं घेतलं तर मग्न आणि तिन्ही अक्षरं घेतली तर मुलाचं नाव होतं. -तो शब्द कोणता? बरं, ही सगळी कोंडी तोंडीच चालत. कठीण शब्दांची आणि जास्त अक्षरसंख्या असलेली, जास्त अर्थ निघतील अशी कोडी घालण्याची चुरसच लागायची. शाळेत इंग्रजी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना अशी कोडी घालून मराठी शब्दांचा त्यांचा संग्रह वाढवण्याच्या माझ्या प्रयोगात मुलांनाही मौज वाटायची. पुढच्या वेळी असे शब्द पुस्तकातून शोधून, माझ्या मदतीने आणखी अर्थ जमवत वर्गात फळ्यावर हा खेळ ती आवडीने खेळत. महिन्यातला शेवटचा माझा तास हा अशा खेळांसाठीच मी ठेवला होता. शब्दांशी खेळण्यातली गंमत कळू लागल्यावर याच विद्यार्थ्यांकडून गोष्ट, कविता जे वाटेल ते मराठीतून चार-पाच वाक्यात लिहिण्याच्या प्रयोगाला तर पुढे असा प्रतिसाद मिळाला की, काही अमराठी मुलांनी चक्क कविता लिहून दाखवल्या!

 

माझ्या विषयात वर्गात मुलं छान रमत; पण बडोद्याहून आलेल्या एका गुजराती मुलाच्या चेहऱ्यावर मराठी भाषा शिकण्याचा कायम कंटाळा स्पष्ट दिसायचा. एक दिवस त्याने मला विचारलं, ''ये सबका रोकडा कितना मिलेगा?''

 

''म्हणजे?'' मी अचंबित. गोंधळलेली. नंतर लक्षात आलं, 'या सगळ्या गोष्टी परीक्षेत किती गुण मिळवून देणार आहेत?' असं त्याला विचाराचंय. त्याला मराठी भाषेतील सौंदर्यस्थळं आणि संदर्भ-स्पष्टीकरणं यांच्याशी काडीमात्र कर्तव्य नव्हतं. त्याने केलेला सवाल त्याच्या दृष्टीने रोकडा होता!

 

केजीतल्या एकाला आपल्या शेजारी बसलेल्या मुलाच्या टिफिनमधलं क्रीम बिस्किट हवं होतं. दुसरा मुलगा नुसता 'नाही देत' म्हणून गप्प बसला नाही, तर आपल्या नकाराला त्याने पुस्ती जोडत म्हटलं, ''तेरा बाप भी तो कमाता होगा, बोल उसको लाने को.'' हे ज्या कुणाचे संस्कार त्याच्या तोंडून बोलले गेले त्यामुळे मी अस्वस्थ झाले. एक तीळ सात भावांनी वाटून खाल्ल्याची कथा त्या छोट्याच्या आधीच्या पिढीपर्यंत पोहोचलीच नव्हती! कुठे गहाळ झाल्या त्या सगळ्या त्यागाच्या, औदार्याच्या कथा? किती बदललाय माणूस!

 

... कृष्णामाईचा पान्हा सुकून गेला आहे

 

आणि प्रतिबिंब पाहायला म्हणून जावे

 

तर गंगेच्या पाण्यात गाळ साचला आहे.

 

आता कुठे शोधावा मी माझा चेहरा

 

साने गुरुजींच्या कथामालेतला?

 

... माणूस नावाच्या माझा पत्ता

 

आज मी शोधते आहे

 

हरवले आहे माझे बरेच काही

 

गेल्या काही वर्षांत...

 

- अनुपमा उजगरे

त्रास कुणालाच नाही

त्रास कुणालाच नाही


इथे मुंबईमध्ये जीवाला आराम कसला तो मूळीच नाही. ट्रेनच्या रिकाम्या डब्यातून ( स्वप्नातल्या ) संध्याकाळी घरी परतल्यावर थोडा आराम करायचा म्हटला तर शप्पथ. थंड झालेला पचपचित चहा घोटभरच पिहून बिछान्यावर थोडा आडवा होताच कळते की लाईट गेली आहे. 'थंडी हवा का झोका' नावाने प्रसिद्ध कुठलाही पंखा शेवटी लाईट नसेल तर तो तरी बिचारा काय करणार. मुंबईमध्ये विज पुरविणार्‍या बेस्टची पण कमाल आहे. बाकी सर्व कामे आरामात चालतात पण माझ्यासारख्या प्रतिष्ठित माणसाने जरा दोन तीन महिने लाईटचे बील नाही तर मेले लगेच विज बंद करतात. अरे मी काय कुठे पळून जाणार होतो, दिले असते महिन्याभराने. इथे घराचे भाडे मी सहा महिन्यानंतर देऊनही घराचे मालक मलच हात जोडतात. आता दोन तीन लाईट बील न भरल्याने यांना काही लाखोंचे नुकसान होणार नव्हते. पण यांना बघवेल तर ना ! लगेच विज कापून टाकली. आता विजच नाही तर टिव्हि तरी कसा बघायचा. टिव्हि वरुन आठवले. टिव्हिचे सहा महिन्याचे हाप्ते उशिरा दिले तरी त्याचा काही त्रास नाही. इतकेच काय केबलची लाईनपण शेजार्‍यांकडे आलेल्या लाईन वरुन ( चोरुन ) तरी त्या केबल वाल्याचा काही त्रास नाही आणि हे मेले एखाद्या प्रतिष्ठित माणसाला त्रास द्यायला सदैव तत्पर पाण्याची लाईन घरात घेण्यासाठी वर्ष लागणार होते. म्हणून म्युनिसिपालटीच्या पाण्याच्या पाईपमधून गूपचूप एक लाईन माझ्या घरात घेतली. आता २४ तास पाणी असते. शेजारीपण आमच्याकडेच पाणी भरतात. आता समाजकार्य मी नाही तर आणखी कोण करणार ? आमच्या शेजाऱ्यांचेच उदाहरण सांगतो, पाण्याच्याचे बील भरुनही कधी कधी पाणी येत नाही. पण आमच्याकडे मात्र पाण्याची गंगा म्युनिसिपलटीच्या कृपेने सदैव वाहत असते, ते देखिल एक रुपया न भरता आणि तरीही त्यांना काही प्रॉब्लेम नाही.


"यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे"


 

"यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये काही बदल करणे आवश्यक आहे."

यशस्वी होण्यासाठी आत्ता पर्यंत तुम्ही स्वतःमध्ये बरेच बदल केले असतील असे नक्कीच तुम्ही म्हणाल आणि त्याचा काही काहीच उपयोग झाला नाही असे देखिल तुमचे म्हणणे असेल. बरोबर ना ! पण खरी गोष्ट सांगू तुम्ही ते बदल नक्कीच केले नाहीत, खरंच. विश्वास ठेवा. कारण आपण बर्‍याच गोष्टी आपण करतो किंवा केल्या असे बोलतो पण प्रत्यक्ष्यात आपण काहीच केले नसते. असो. ते जावू दे. इथे पण असाच काहीसा प्रयत्न केला आहे पण थोड्या वेगळ्या प्रकाराने. खाली दिलेल्या सर्व गोष्टी नक्कीच सोप्या आहेत आणि त्या अंमलात आणणे पण शक्य आहे. आता बघूया यशस्वी होण्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये हे सुचविलेले बदल करता का? 

 

 'मी शहाणा आहे', 'मला कुणी मुर्ख बनवू शकत नाही', 'असे छप्पन पाहीलेत ', 'मी त्यातला नाही', 'असे जा रे', 'तु मला अजून ओळखले नाहिस', 'मला खोटं बोललेल चालत नाही', 'एकदा का मी बिघडलो तर माझ्यासारखा वाईट कुणी नाही'  ई. असे फालतू डायलॉग मारु नये. निट विचार केल्यास तुम्हाला आत्तापर्यंत कितीतरी लोकांनी मूर्ख बनविल्याचे तुम्हाला आठवेल.

 

 कुठल्याही ज्योतिषाला तुमचा स्वभाव अथवा भविष्य विचारु नका. तो नेहमीच खालील गोष्टी सांगेल.

    * तुम्हाला इत्रांचे दुःख पाहवत नाही.

    * तुम्ही नेहमी दुसर्‍यांचा विचार करता.

    * तुम्ही इतरांसाठी खूप काही केलेत परंतू तुम्हाला गरज असताना कुणीच.....

    * तुम्हाला खोटे बोललेले आवडत नाही.

    * तुम्ही नेहमी इतरांना मदत करत असता.

    * आज पर्यंत तुमची कुणीच कदर केली नाही. ई. ई.

ज्योतिषांच्या मते जगातील सर्वच लोक 'वरील प्रमाणे' चांगले काम करत असतात. तर मग जरा विचार करा सर्वच जर 'तुमच्या सारखेच वरील प्रमाणे चांगले वागत असतील' तर जगात सर्वच चांगले का होत नाही ?

    कधी कुठल्या ज्योतिषाने असे सांगीतलेले एकले आहे का ?

    * तुम्हाला इतरांचे सुख पाहवत नाही.

    * तुम्ही नेहमी स्वतःचा विचार करता.

    * लोकांनी तुमच्यासाठी खुप केले पण तुम्ही त्यांना विसरलात.

    * स्वतःच्या स्वार्थासाठी तुम्ही खोटे बोलता.

    * मी कशाला इतरांना मदत करु, असे तुम्हाला वाटते.

    * स्वतःच्या फायद्यासाठी तुम्ही इतरांची पर्वा करत नाही.

 

'एखादी गोष्ट माझ्या नशिबामध्ये नव्हती म्हणून मला मिळाली नाही' असा विचार करु नका.

    "आयुष्य तुम्हाला ज्या मार्गाने नेत असेल त्या मार्गाने जाऊ नका. तर तुम्हाला ज्या मार्गाने जायचे असेल त्या मार्गाने आयुष्याला न्या".

 

 तुम्ही लाख म्हणा की तुम्ही प्रगती करत आहात. परंतू स्वतःची प्रगती पडताळून पहायासाठी खालील गोष्टी करा.

    *  दोन वर्षापूर्वी तुम्ही जे काम करत होता. तेच काम सध्या करता की त्यापेक्षा व्व्गळे चांगले अथवा मोठे काम सध्या तुम्ही करता का ते पहा.

    *  ( माफ करा पण ) स्वतःची लायकी पडताळायची असेल तर तुम्ही नोकरी सोडण्याचा विचार करत आहात असे आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यास / साहेबांना सांगा. त्यांचे उत्तर जर 'ठिक आहे' असे त्यांनी दिले तर समजा कंपनीला तुम्ही असून-नसून काहिच फरक पडत नाही. तुम्ही जर खरंच कामाची व्यक्ती असाल तर त्याच महिन्यापासून तुम्हाला पगारामध्ये बढती मिळेल.

 

वेळ नाही असे कधी सांगू नका. वेळ काढायला शिका. सर्वाना वेळ द्यायला शिका.

 

तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करता ते चालूच ठेवा परंतू त्याबरोबर इतर क्षेत्रांचा पण अभ्यास भले तूमचा त्या क्षेत्राशी काही संबध नसेल पण नंतर भविष्यामध्ये तुमच्या या दोन्ही क्षेत्रांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केलात तर नक्किच तुमचा फायदा होईल."शोधाल तर सापडेल"


 

"शोधाल तर सापडेल"

आजही जेव्हा आपण एखादा नवीन गोष्ट पाहतो तेव्हा, अरेच्च्या! असेही होते असे बोलतो आणि ती गोष्ट दाखविणारा आपणास त्यात काय? अशी फुशारकी मारतो. मग त्याच्या समोर आपण किती अडाणी आहोत असे आपणास वाटू लागते.

हे मान्य आहे की आहे की एखादी नवीन गोष्ट पाहिल्यास आश्चर्यचकित व्हायला होते, पण दरवेळेस कुठलीही नवीन गोष्ट दुसर्‍यानेच आपल्याला दाखवायला हवी हे मात्र आपणास बदलता येईल.

शोधल्यास सर्व सापडते हे तर तुम्हालाही मान्य असेल, मग काय शोधायचे हाच मोठा प्रश्न असतो. पण जर काय शोधायचे हे माहीत असेल तर मग शोधण्यासाठी त्याची तुम्ही एवढे दिवस थांबलात का असा प्रश्न तुम्हाला स्वतःला विचारावा लागेल.

असो. इथे आता हा प्रश्न आहे की काय शोधायचे आणि कुठे सापडेल? या दोन्ही गोष्टींचे उत्तर अगदी सोपे आहे. थोडावेळ असा विचार करा की कुठली गोष्ट असू शकत नाही आणि ती गोष्ट आठविल्यास त्याची माहिती गुगल.कॉमवर शोधायची. तुम्हाला असे वाटेल की हे सहज सोपे नाही. पण खरंच हे शक्य आहे.

इथे काही कॉम्प्युटरमधील काही अशा प्रोग्रॅमची ओळख दिली आहे, जे प्रोग्रॅम तुम्ही कधी विचार देखिल केले नसतील. इतकेच की या प्रोग्रॅमबद्दल जास्त कुणाला माहिती देखिल नसते. जर तुम्ही शोधलात तर तुम्हाला नक्कीच सापडतील तसेच हे प्रोग्रॅम शोधता-शोधता अशाच निरनिराळ्या प्रोग्रॅमबद्दल तुम्हाला कल्पना यावी या विचाराने इथे सांगितलेला प्रोग्रॅम कुठे मिळेल याची काहीच माहिती दिली नाही आहे.

 १. याहू चॅटींग तर तुम्ही नक्कीच केले असेल. आपण आपल्या याहू मॅसेंजरमध्ये असलेल्या कुठल्याही व्यक्तीबरोबर ती व्यक्ती ऑनलाईन असल्यास चॅट करू शकतो, हे तुम्हाला माहीत असेलच. एखाद्याशी चॅट करायचे नसल्यास आपण त्याला मॅसेंजरमध्ये ब्लॉक करतो, त्यामुळे फक्त त्याच्यासाठीच आपण अदृश्य होतो. पण जर एखादा आपला मित्र जर एखाद्यावेळेस आपणास चॅटींगद्वारे जरा जास्तच त्रास देत असेल व त्यावेळी त्याला टाळता येत नसेल तर काय करायचे असा प्रश्न निर्माण होतो. जरा विचार करा एका अशा प्रोग्रॅम बद्दल ज्या प्रोग्रॅमद्वारे तुम्ही तुमच्या कॉम्प्युटरवरून त्या व्यक्तीचा याहू मॅसेंजर बंद करू शकता आणि ते देखिल त्या न काही सांगता. तुमच्या प्रोग्रॅममुळे त्याचा याहू मॅसेंजर आपोआप बंद होईल व पुन्हा-पुन्हा प्रयत्न करून देखिल बंद होत असल्यास काहीतरी प्रॉब्लेम आहे असे समजून तो तेव्हा चॅटींग करण्याचा विचारच सोडून देईल.


 २. सध्या हार्डडिस्क रिकव्हरी किंवा डाटा रिकव्हरी हा प्रकार तुम्हाला नक्कीच माहीत असेल. तरीही सांगतो. बर्‍याचवेळा कॉम्प्युटरची हार्डडिस्क खराब होते आणि त्यातील डाटा म्हणजेच माहिती नष्ट होते. एखाद्या व्हायरसमुळे अथवा बरीच जुनी हार्डडिस्क काही काळाने खराब होते व आपला कॉम्प्युटर चालायचा बंद होतो. अशावेळी हार्डवेअर इंजिनिअर आपला कॉम्प्युटरची हार्डडिस्क खराब झाली असून आपला सर्व डाटा उडाला असे सांगतो. यावेळी हळहळण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नसतो. अशावेळी तोच हार्डवेअर इंजिनिअर आपल्याला हार्डडिस्क रिकव्हरी किंवा डाटा रिकव्हरी करून घ्या असा सल्ला देतो. परंतू हार्डडिस्क रिकव्हरी किंवा डाटा रिकव्हरी करून घेणे फार खर्चीक आहे असेही तो सांगतो. बर्‍याच मोठ्या कंपन्यांना हा खर्च करणे शक्य होते परंतू सर्वसामान्य व्यक्तीला हा खर्च शक्य नसतो व त्याचा कॉम्प्युटरमधील संपूर्ण डाटा नष्ट होतो. जरा विचार करा अशाप्राकारे डाटा परत मिळवून देणारा सॉफ्टवेअर तुम्हाला मिळाल्यास.


 ३. एखादी फाइल डिलिट केल्यास ती रिसायकल बीन (Recycle Bin) जाते आणि ती तेथून देखिल डिलिट केल्यास कॉम्प्युटरमधून नष्ट होते हे आपणास माहीत असेलच. पण जरी ती आपल्या समोरून नष्ट झाली असली तरी प्रत्यक्षात ती कॉम्प्युटरमधून नष्ट झालेली नसते. मग एखादी महत्त्वाची फाइल आपल्या हातून डिलिट झाल्यास मोठी पंचाईत होते. अशावेळी त्या फाइलमधील सर्व काम पुन्हा करावे लागते.  इथे जरा विचार करा. एखाद्या अशा सॉफ्टवेअर बद्दल जो आपणास रिसायकल बीन (Recycle Bin)  मधून देखिल डिलिट केलेल्या इतकेच की आठवड्यापूर्वी देखिल रिसायकल बीन (Recycle Bin)  मधून देखिल डिलिट केलेल्या फाइली व्यवस्थित मिळवून देईल.


 ४. वर्ड अथवा एक्सेलमध्ये फाइलीला पासवर्ड देऊन सुरक्षित करणे फारच सोपे आहे. परंतू अशाप्रकारे पासवर्ड दिल्यानंतर तो विसरल्यास तो काय होता हे न आठवल्यास ती महत्त्वाची फाइल नंतर अनावश्यक बनते. अशावेळी पासवर्ड मिळवून देणार्‍या कंपन्या त्या फाइलीचा पासवर्ड परत मिळवून देण्याचे बरेच पैसे आकारतात. जरा विचार करा त्या कंपन्या फाइलीचा पासवर्ड परत मिळवण्यासाठी काय करीत असतील. प्रत्यक्षात त्या कंपन्या कुठलेतरी सॉफ्टवेअर वापरून त्या फाईलीचा पासवर्ड परत मिळवतात. पण जर तसा सॉफ्टवेअर आपल्यास मिळाल्यास.


 ५. कितीतरी वेबसाइटवर पासवर्ड सोबत युजर आयडी देखिल साठविण्याची सोय असते. अशाठिकाणी लॉगीनच्या ठिकाणी (Remember Me)  असे लिहिलेले असते. म्हणजेच पुढीलवेळेस जेव्हा आपण त्या वेबसाइटवर जाता तेव्हा लॉगीन करताना युजर आयडी आणि पासवर्ड देण्याऐवजी तेथे आधीच आपला युजर आयडी आणि पासवर्ड असतो अथवा युजर आयडी दिल्यास पासवर्ड आपोआप समोर येतो. परंतू अशावेळी तो पासवर्ड गोल चिन्हांच्या स्वरूपात असतो त्यामुळे तो ओळखणे शक्य नसते. इथे जरा विचार करा एखाद्या अशा सॉफ्टवेअर बद्दल जो अशा ठिकाणी त्या गोल चिन्हांच्या स्वरूपात दिसणार्‍या पासवर्डला व्यवस्थित इंग्रजी शब्दांमध्ये दाखवेल.


६. आपण कितीही स्वतःला हुशार समजत असलो तरी आपल्या पाठीमागे आपल्या कॉम्प्युटरवर काय काम केले जाते, कुठल्या फाइली उघडल्या जातात, कुठल्या वेबसाइट पाहिल्या जातात, कोणाला काय -मेल लिहिले जातात, कोणते पासवर्ड दिले जातात .. बर्‍याच गोष्टी आपल्या नकळत केल्यास आपणास त्याची काहीच माहिती मिळत नाही. पालकांसाठी हीच समस्या मोठी समस्या असते ती म्हणजे त्याच्या पाठीमागे त्याचा मुलगा/मुलगी कॉम्प्युटरवर काय करतात. अशावेळी विचार करा एखाद्या अशा सॉफ्टवेअर बद्दल जो आपल्या कॉम्प्युटरवर कि-बोर्डद्वारे दाबलेल्या प्रत्येक बटणाची नोंद ठेवेल. तसेच कुठले-कुठले प्रोग्रॅम, सॉफ्टवेअर, वेबसाइट वापरल्या गेल्या या सर्वांची माहिती आपणास देईल.


७. बर्‍याच कंपन्यांमध्ये सध्या त्यांच्या कंपनीतील सहकार्‍यांनी ऑफसमध्ये फालतू टाईमपास करू नये म्हणून त्यांच्या कॉम्प्युटरवर इंटरनेट असूनदेखील चॅटींगकरण्याचे प्रोग्रॅम बंद केलेले असतात. म्हणजेच त्या वेबसाइटदेखील सुरू होत नाहीत. त्यामुळे ऑफिसमधील व्यक्तीशी जरी कामासंबंधी बोलायचे असल्यास चॅटींगचे सॉफ्टवेअर नसल्याने वेळ वाया जातो. इंटरनेटरवर असे बरेच प्रोग्रॅम मोफत मिळतात ज्याद्वारे ऑफिसमध्येच आपण आपल्या सहकार्‍याशी चॅटींगवरुन बोलू शकतो.


 ८. बर्‍याच पालकांना आपला मुलगा/मुलगी कोणत्या वेबसाइट पाहतात, त्यांच्या मागे कॉम्प्युटरवर काय करतात याची चिंता असते. अशावेळी त्यांना नको असलेल्या वेबसाइट पाहण्यापासून कसे थांबवायचे हा मोठा प्रश्न असतो. यासाठी सध्या इंटरनेटवर नको असलेल्या वेबसाइट बंद करणारे वेबसाइट ब्लॉकर सॉफ्टवेअर देखिल मिळतात आणि ते देखिल अगदी मोफत.

 

टीप : एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी ती म्हणजे इथे सांगितलेला प्रोग्रॅम कुठे मिळेल याची काहीच माहिती दिली नसल्याने तसा अथवा तशा स्वरूपाचा प्रोग्रॅम आपणास एखाद्या वेबसाइटवर आढळल्यास तो डाउनलोड करण्यापूर्वी त्याची संपूर्ण माहिती वाचून घ्या तसेच त्या प्रोग्रॅम/सॉफ्टवेअर बद्दल इतर वेबसाइटवर कुणी त्याबद्दलचा अनुभव दिल्या असल्यास तो वाचूनच मग निर्णय घ्यावा. शक्यतो डाउनलोड.कॉम वरून कुठलाही सॉफ्टवेअर डाउनलोड करावा जेणे करून व्हायरसचा त्रास होणार नाही.Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive

Follow by Email