Tuesday, March 30, 2010

फ्रीजचा वापर नीट करताय ना?

फ्रीजचा वापर नीट करताय ना?

पदार्थ खराब होऊ नये म्हणून आपण तो फ्रीज अर्थात शीतकपाटात ठेवत असतो. परंतु, याचा अर्थ तो तिथेच पडून द्यावा असा नाही. 'स्मार्ट वूमन' फ्रीजमध्ये जास्त दिवस पदार्थ ठेवत नाहीत. कुटुंबातील सदस्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी फ्रीजमध्ये कोणते पदार्थ असायला पाहिजेत, यासाठी या काही टिप्स नक्कीच तुमच्या उपयोगी पडतील...

fridge
 
दूध :
कॅल्शियम वाढीच्या दृष्टीने सर्वांत उत्तम साधन म्हणजे दूध. प्रत्येक कुटुंबात दूध मुबलक प्रमाणात साठवलेले असते. मात्र, जास्त दिवस फ्रीजमध्ये ठेवल्यास दुधातील कस नाहीसा होतो. त्यातील पोषकतत्वे लोप पावतात. त्यामुळे फ्रीजमध्ये जास्त दिवस दूध ठेवू नये.

उकडलेले बटाटे व अंडी
उकडलेली अंडी फ्रीजमध्ये ठेवावीत. कारण कुठल्याही वेळी तुम्ही एग करी किंवा भुर्जी तयार करू शकता. उकडलेले बटाटेसुद्धा उपयुक्त ठरतात. अचानक येणारे पाहुणे किंवा मुलांना भूक लागल्यावर लगेचच तुम्ही सँडविच, भाजी, परोठे किंवा कटलेट तयार करू शकता. या दोन्ही वस्तू उन्हाळ्यात 2-3 दिवस आणि हिवाळ्यात किमान 1 आठवड्यापर्यंत खराब होत नाहीत.

बटर किंवा मार्जरी
लो फॅट बटर किंवा मार्जरीन फ्रीजमध्ये ठेवणे जरूरी आहे. हे ब्रेड किंवा सूप व पोळीवर लावून त्याचे वापर करू शकता.

टोमॅटो
सलाड किंवा जेवण्यात लाल टोमॅटो असल्यास जेवणाची चव वाढते. टोमॅटो चिल ट्रेमध्ये कागदाच्या लिफाफ्यात ठेवावे.
टोमॅटोची प्युरी रेडीमेड आणू शकता किंवा घरी बनवून बर्फ जमवणार्‍या ट्रेच्या क्यूब्समध्ये जमवून ठेवू शकता. गरज भासेल तेव्हा 2-4 क्यूब्स काढून भाजी किंवा वरणात त्याचा वापर करू शकता.

ड्राई फ्रूट्स
फ्रीजरमध्ये हिरव्या मटरचे पॅकेट, ड्राय फ्रूट्स लहान लहान प्लॅस्टिकच्या डब्यात ठेवायला पाहिजे. कारण कुठल्याही वेळेस खीर, कस्टर्डमध्ये त्यांचा वापर करता येतो.

लेमन ज्यूस, आलं-लसूण पेस्ट सुद्धा फ्रीजरमध्ये एका डब्यात घालून ठेवू शकता. सीझनला फळांची प्युरी बनवून फ्रीजरमध्ये ठेवण्यास हरकत नाही. गरजेनुसार त्याचा वापर करावा. चीजचे काप करून फ्रीजमध्ये ठेवायला पाहिजे. पालक, मेथी इत्यादींना उकळून त्याची पेस्ट तयार करून फ्रीजमध्ये ठेवू शकता.

परतलेला कांदा, पोळ्यांची कणीक, कोथिंबीर-मिरच्यांची चटणी, दही इत्यादी वस्तू फ्रीजमध्ये असायलाच पाहिजे. 2 भाज्या आधीच चिरून एअरटाइट डब्यांमध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवावे. त्यामुळे घाईच्या वेळेस स्वयंपाक लवकर तयार होण्यास मदत मिळते.

इंस्टंट कॉफी, सूप, उपमा, इडली, लमोनेड इत्यादींचे सॅशे फ्रीजमध्ये ठेवणे आवश्यक आहे.

वर दिलेल्या वस्तू तुम्ही फ्रीजमध्ये ठेवण्यास सुरू केल्या तर तुमचं काम अपेक्षेपेक्षा लवकर आवरेल. पण हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की फ्रीज हे फक्त फ्रीज आहे कचरापेटी नाही. 

No comments:

Post a Comment

sterra

https://www.effectivecpmnetwork.com/ch72yvye4s?key=4a0b887dafac489a2f6ab362663b40f9

Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive