Saturday, March 13, 2010

सचिनच्या आयुष्यातल्या ‘जरा हटके’ गोष्टी

 

सचिनचं नाव प्रसिद्ध संगीतकार सचिन देव बर्मन यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं आहे.
-
सचिन जेव्हा पाकिस्तानच्या दौऱ्यावर पहिल्यांदा गेला होता (१९८९) तेव्हा त्याचा मोठा भाऊ अजित तेंडुलकर त्याच्यासोबत गेले होते. या टूरवर असताना सचिनने स्वतच्या हाताने ऑम्लेट बनवलं होतं.
-
सचिनचं पहिल्यांदा फास्ट बॉलर बनायचं स्वप्न होतं यासाठी त्याने एमआरएफ पेस ॅकडमी, चेन्नई येथे जाऊन डेनिस लिली यांच्याकडून ट्रेनिंगही घेतलं होतं.
-
१९९० यशस्वी दौऱ्यानंतर त्याने तो राहात असलेल्या साहित्य सहवास सोसायटीमधील लोकांना बांद्रा इंटरनॅशनल हॉटेलमध्ये जेवणाची पार्टी दिली होती.
-
पहिली इंग्रजी विलोची बॅट दिलीप वेंगसरकर यांनी त्याला दिली होती.

 

 

- सचिनने रणजी, इराणी आणि दिलीप ट्रॉफीतील पहिल्याच सामन्यात शतक झळकावलं होतं.
- थर्ड अंपायर आऊट दिला गेलेला सचिन पहिला बॅट्समन आहे.
- सचिन अंजलीला १९९० मध्ये भेटला. एका मुलाखतीत त्यांने सांगितलं होतं की, मला ती आवडली कारण तिला लाजता येत होतं.
- १७ व्या वर्षी सचिनने पहिल्यांदा कार खरेदी केली. निळ्या रंगाची मारूती ८०० घेऊन आपल्या मित्रांना बांद्रा स्टेशनला सोडायला तो गेला होता तेव्हा आपल्याकडून दंड आकारला जाणार अशी भीती त्याच्या मनात होती.
- भारत आणि न्यूझीलंडमध्ये १९८९-९० मध्ये झालेल्या नेपियर टेस्टमध्ये तो ८८ रन्सवर असताना जॉन राईट यांनी त्याचा झेल पकडला आणि सर्वात कमी वयात कसोटी शतक झळकावण्याचा विक्रम चुकला.
- १९९० च्या इंग्लंड दौऱ्यात त्याला मनोज प्रभारकने पोहायला शिकवलं होतं तेही अवघ्या अध्र्या तासात
- घरी आलेल्या पाहुण्यांसाठी सचिन कधी कधी स्वत: चहा बनवितो.
- सचिनला वांग्याचे भरीत बनविता येते.
- त्याला आईच्या हातचं जेवण खूप आवडतं त्यातल्या त्यात मच्छी म्हणजे काही विचारायलाच नको.
- त्याला घडय़ाळं प्रचंड आवडतात, त्याच्याकडे अनेक देशी विदेशी कंपन्यांची घडय़ाळं आहेत.
- मुंबईसाठी खेळायला सुरूवात केल्यानंतर त्याचा लोकल ट्रेनचा प्रवास थांबला.
- वरळीच्या सत्यम सिनेमागृहात लागलेला 'रोजा' हा सिनेमा पहाण्यासाठी त्याने वेशांतर केले होते.
- टेस्ट मॅचच्या पहिल्या अवघड अनुभवानंतर टेस्ट क्रिकेट आपण खेळू शकणार नाही असं वाटलं होतं
- मार्शल, रॉबर्ट्स, होल्डिंग आणि गार्नर या वेस्ट इंडिजच्या महान बॉलर्सचा सामना करण्याची संधी मिळाल्याची खंत त्याला नेहमीच जाणवते.
- सचिनने त्याच्या आयुष्यातली पहिली एका वर्तमानपत्राला दिलेली मुलाखत एका इराण्याच्या हॉटेलात दिली होती.
- एकदा पत्रकारांच्या फोन कॉल्सला कंटाळून तो सोसायटीतील आपल्या एका मित्राकडे गेला आणि तिथे त्याने चित्रपट पाहत अनेक दिवस एकांतात घालवले होते.
- जाने भी दो यारो हा त्याचा सर्वात आवडता चित्रपट आहे.
- अमिताभने सचिनला 'देश की धडकन' म्हटलं होतं
- फैसलाबाद टेस्ट इम्रान खानच्या एका इनस्विंगरवर तो आऊट झाला होता. तेव्हा त्याने 'फुटभर आत आला' असे उद्गार काढले होते.
- सचिन हा एक खवैय्या आहे. सलील अंकोलासोबत तो नेहमी खाण्याची शर्यत लावायचा आणि जिंकायचाही.
- सचिनला टेबल टेनिस चांगलं खेळता येतं. तो दोन्ही हातांनी खेळू शकतो. टूरवर जाताना त्याच्या बॅगमध्ये रॅकेट असतेच.
- त्याच्या किटबॅगमध्ये त्याची मुलगी सारा आणि मुलगा अर्जुन यांनी बनविलेलं एक कार्ड असतं ज्यावर ऑल बेस्ट पापा' असं लिहिलेलं आहे.
-सचिन आजही आई रजनी तेंडुलकर यांचे आशीर्वाद घेतल्याशिवाय घराबाहेर पडत नाही.
- सचिन मुंबईत असताना त्याला वडापाव खायला आवडतं.




 

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive