Thursday, March 25, 2010

शतायुषी बनण्यासाठी

शतायुषी बनण्यासाठी


मोठ्या शहरांमध्ये खाण्या-पिण्यापासून झोपण्यापर्यंत सर्वच गोष्टी सुपरफास्ट बनल्या आहेत. मानवी शरीर या गतीत स्वत:ला बसवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत अस

ला तरी त्यालाही काही मर्यादा आहेतच.

 

या ओढाताणीचा परिणाम म्हणून आपण ताणतणाव आणि जलद गतीने होणाऱ्या शारीरिक झीजेला बळी पडत आहोत. आयुवेर्दाने या अनियंत्रित परंतु सहजरित्या नियंत्रणात आणता येऊ शकणाऱ्या संघर्षासाठी हजारो वर्षांपूवीर्च पर्याय आणि उपचार शोधून ठेवले आहेत!

 

अनेक वर्षं आपण आपल्या शरीराला देत असलेले कष्ट आणि त्यातल्या अणूरेणूंची झालेली कुचंबणा, मन आणि इंदियांची होणारी हानी, धातूंचा क्षय हे सर्व रोखणं आपल्याला शक्य आहे. कारण 'डब्ल्यूएचओ'ने केलेल्या पाहणीत असं दिसून आलं आहे की मानवाला हतबल करणाऱ्या ३००० हून अधिक रोगांमध्ये केवळ ३०-४० रोगच मोठ्या प्रमाणावर असू शकतात. या प्रमुख रोगांपैकी कर्करोग, हृदयविकार, एचआयव्ही-एड्स या रोगांवर प्रतिबंधात्मक औषधं उपलब्ध झाली असली तरी हे रोग आणि ताणतणावांना आटोक्यात आणण्यासाठी जीवनशैलीत बदल हेच प्रमुख साधन असू शकतं, हे सर्वांनीच मान्य केलं आहे.

 

जीवनशैलीत बदल आणि प्रतिबंधामध्ये आयुवेर्दाचा सर्वांनाच आधार वाटतो आहे. गाडी सुस्थितीत राहावी यासाठी आपण जशी तिला सव्हिर्सिंगसाठी गॅरेजमध्ये पाठवतो, तसंच शरीर तंदुरुस्त राहावं म्हणून चांगल्या आरोग्यकेंदात आपण नियमितपणे जायला हवं. नेमकं काय करावं?

 

शरीर आणि मनावरचा ताण कमी करण्यासाठी सर्वांग मर्दन, धारा हे उपाय करता येतील. ताण आणि शरीरातली विषारी दव्यं यामुळे कमी होण्यास मदत होते. शिरोधारा आणि वक्रधारा मनावरचा ताण कमी करतात. शिरोधारेमुळे मनोलहरींवर नियंत्रण आणणं शक्य असल्याचं प्रयोगातून सिद्ध झालं आहे. संपूर्ण शरीरशुद्धीसाठी बस्ती, वमन, विरेचन आदी पंचकर्मं करणं फायदेशीर ठरतं.

 

निसर्गच्या सानिध्यात राहून नैसगिर्क पद्धतीने (गरजेनुसार, प्रकृतीनुसार) औषधं घेऊन ताणतणाव आणि दैनंदिन झीजेमुळे झालेली शरीराची हानी भरून काढता येते. प्रकृतीनुसार विविध पंचकर्मांच्या उपचाराने शरीर उत्तम राखता येतं. उत्तम शरीर आणि मन ही शतायुषी बनण्याची गुरुकिल्ली आहे.

 

अशी पंचकर्मं करणाऱ्या उत्तम आरोग्यकेंदांसाठी बरीच पायपीट करावी लागते. परंतु ठाणेकरांना (खरंतर मुंबईकरांसाठीही!) आता अशी पायपीट करण्याची आवश्यकता नाही. कारण आयुर्वार्ता प्रबोधिनी आणि आयुवेर्द पंचकर्मं केंद लवकरच 'आरोग्यग्राम' हे केंद चालू करत आहे. पाच दिवसांपासून अगदी एक महिन्यापर्यंत इथे वास्तव्य करून उपचार घेणं शक्य आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive