Tuesday, March 23, 2010

गुंतवणूक करण्यापूवीर्...

गुंतवणूक करण्यापूवीर्...

तुम्ही गुंतवणूक केलेल्या म्युच्युअल फंडाचा परफॉर्मन्स पाहताना मन कचरते का? तुमच्या म्युच्युअल फंडाने ज्या शेअर्समध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांचे भाव कोसळतील, ही भीती तुमची पाठ सोडत नाही का? या भीतीपासून सुटका करायची असेल तर मुळात शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यापूवीर् काही गोष्टी ध्यानात घेतल्या पाहिजेत.

शेअर्समध्ये गुंतवणूक ही कायम एक जोखीमच असते. शेअर्सच्या फायद्याला कधी गळती लागेल, याचा अंदाज वर्तवता येत नाही. यापासून इक्विटी म्युच्युअल फण्डचीही मुक्तता नसते. त्यांचा एनएव्ही कमी होऊन ते कधी घसरतील हे निश्चितपणे सांगता येत नाही. असं झालंच तर फण्डची ही घसरण का आणि किती मर्यादेपर्यंत झाली, याचाही विचार केला पाहिजे. बेंचमार्क प्रमाण मानून तुमच्या फण्डची घसरण तपासा. सतत आघाडीवर असणाऱ्या फण्डची घसरण खूपच तीव्र गतीने होते. ती बेंचमार्कलाही मागे टाकते. या फण्डसना आपण सुगीच्या काळात खूप फायद्यात पाहिलेलं असतं. चांगल्या फण्डसची घसरण बेंचमार्कपेक्षा फारच कमी असते. म्हणूनच दीर्घकाळासाठी इक्विटी म्युच्युअल फण्डमध्ये गुंतवणूक करणे फारसे फायदेशीर नसते. त्यामुळे एखाद्या म्युच्युअल फण्डात गुंतवणूक करण्यापूवीर् त्याचा प्रकार कोणता आहे, हे तपासणे गरजेचे आहे.

इक्विटी म्युच्युअल फण्डमध्ये गुंतवणूक केल्यानंतर तुमची रात्रीची झोप उडाली असेल तर यातून बाहेर पडणेच उत्तम. कारण शेअर्समधले चढउतार सहन करण्याची तयारी असेल तरच म्युच्युअल फण्डमध्ये गुंतवणूक करणे इष्ट असते. आपली गुंतवणूक सुरक्षित राहावी आणि आपल्याला टेन्शन देता तिची वाटचाल होत राहावी, असे वाटत असल्यास बँकेत फिक्स्ड डिपॉझिटमध्ये पैसे गुंतवून ठेवावेत. मात्र ज्यांच्यावर माकेर्टच्या चढउताराचा फारसा प्रभाव पडत नाही. या चढउतारामुळे इतर मंडळी घाबरतात आणि जे तटस्थ राहून आणखी गुंतवणूक करू इच्छितात, त्यांनीच म्युच्युअल फण्डचा मार्ग धरावा. दीर्घकाळ गुंतवणुकीसाठी 'सिस्टिमॅटिक इन्व्हेस्टमेण्ट प्लॅन' म्हणजेच एसआयपीमध्ये गुंतवणूक करावी.

एखादी गुंतवणूक 'होल्ड' करायची तुमची तयारी असेल, परंतु ती गुंतवणूक तुमच्या अपेक्षेप्रमाणे परफॉर्म करत नसेल तर दुसऱ्या फण्डकडे वळण्याची ती योग्य वेळ असते. परंतु हे निर्णय घाईघाईत घेता कामा नये. याबाबत निर्णय घेण्यास तुम्हाला जमत नसल्यास एखाद्या तज्ज्ञाचा सल्ला घ्या. वॉरन बफे यांचा एक मंत्र नेहमीच ध्यानी ठेवा, 'इतर मंडळी जेव्हा हावरटासारखी वागत असतील तेव्हा तुम्ही घाबरले पाहिजे आणि दुसरे घाबरले असतील तेव्हा तुम्ही हावरटासारखे वागले पाहिजे.'


No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive