कोकणात देवाला गार्हाणं घालण्याची रीत अजूनही प्रचलीत आहे.चांगल्या प्रसंगी देवाची आठवण काढून बरेच वेळा देवळात जाऊन पुजार्याकडून (भटजीकडून) गार्हाणं
घालून देवाशी संपर्क ठेवण्याची प्रथा आहे.देवाच्या कानावर घालून झाल्यावर एक प्रकारचं मानसीक समाधान प्राप्त झाल्याची समाधानी अगदी विरळीच असते.पुजार्याच्या प्रत्येक भाष्या पुढे "होय म्हाराज्या" असं इतरानी म्हणून स्वतःची समत्ती असल्याची जाहिर कबूली दिल्या सारखी असते.
ह्या वर्षी आमच्या घरी गणपतिच्या दिवसात विसर्जनादिवशी बाप्पामोर्याला आम्ही खास गार्हाणं घातलं,आणि ते मालवणीतून.
आमची दोन नातवंडं या वर्षी कॉलेजात जाणार होती.त्यांना
यश,समाधान,आणि चांगली बुद्धि दे हि बाप्पामोर्याला विशेष विनंती होती.
बाप्पा मोर्याला गार्हाणं ......
हे श्रीगणेशा,हे गणराया,हे शंकर-पार्वती पुत्रा,हे कार्तीकाच्या भावा,हे वक्रतुंडा,हे बाप्पा मोर्या तुका, आम्ही, आज, तुझ्या जन्मदिवशी, गार्हाणा घालतो,तां एकून घे म्हाराज्या.
"होय म्हाराज्या"
हे देवा,तूं आमच्या ह्या, सगळ्या गोतावळ्याक, सुखी ठेव. तेंची, सर्वांची प्रकृती, चांगली ठेव.
तेंची सदैव, भरभराट होऊ दे, असा आमचा तुका, हात जोडून सांगणा.
"होय म्हाराज्या"
हे देवा,आज, आमच्या जांवंयबापूचो, जन्मदिवस आसां.तेंका उदंड आयुष्य दी.
"होय म्हाराज्या"
हे गणनायका,लवकरच, आमची दोन नातवंडा, आमका सोडून, बाहेर गावाक, पुढचां, शिकुक जातहत,तेंच्यावर, तुझी चांगली नजर, असूं दे, तेंचो, अभ्यासात, नीट लक्ष लागू दे,तेंची, दिवसे दिवस, प्रगती होवूं दे.
"होय म्हाराज्या"
हे गौरीपति, पुढची सगळी, चार वर्षां, त्या दोघांक, सुखाची जावूं दे,असा तुका आमचा सांगणा.
"होय म्हाराज्या"
शेवटी देवा,आमच्याकडून, काय चूक झाली असल्यास, किंवा, काय तुझो उपम्रर्द, झालो असल्यास , किंवा, तुझो आमकां, विसर पडलो असल्य़ास, किंवा, वाडवडीलांचो, पुर्वजांचो ,किंवा, लहान मोठ्यांचो, आमच्या कोणाकडून, अपमान झालो असल्यास, चूक झाली असल्यास, आमका सगळ्याक, क्षमा कर.
"होय म्हाराज्या"
पुढ्ल्या वर्षी सुद्धा, तुझ्या पायाकडे येंवक, अशीच ताकद, आणि बुद्धी दी,ह्या, पार्वतीपुत्रा तुका अखेरचा सांगणा.
"होय म्हाराज्या"
गणपती बाप्पा मोर्या.पुढ्च्या वर्षी लवकर या.
श्रीकृष्ण सामंत
===============
शिमग्याचा गार्हाणं .... malvani garana lyrics
हे बारा गावच्या, बारा वेशीच्या, बारा बावडीच्या, बारा नाक्याच्या, बारा गल्लीच्या, बारा शहराच्या देवा महाराजा....
होय महाराजा....🙏🏻
आज जो शिमग्याचो सण सगळे पोरा टोरा, म्हातारे कोतारे, मिळान साजारो करतत, त्यांचो तू नेहमी सांभाळ कर आणि जी काय इडा पिडा, वाकडा नाकडा असात त दूर कर रे महाराजा....
होय महाराजा....🙏🏻
कोणी काय कोणावर वाकडा नाकडा केला असात तर ता बाहेरच्या बाहेर निघाण जाऊं दे रे महाराजा....
होय महाराजा....🙏🏻
कोणाक पोर होत नसात तर त्याक पोर होऊ दे, काम धंद्यात सर्वानका यश दे, पोरा टोराक शिक्षणात यश दे, कोणाचा लग्न जुळत नसात तर ता तुझ्या क्रुपेन जमानदे रे महाराजा....
होय महाराजा....🙏🏻
हे देवा महाराजा आज जो काय महाराष्ट्रात दुष्काळ पडलो हा, त्याचो तू नाय नाट कर आणि तुझ्या कृपा दुष्टीने भरभरून पाणी दे रे महाराजा....
होय महाराजा....🙏🏻
हे देवा महाराजा आणि जो काय आजकाल पोरी टोरीन वर अत्याचार होतंत आणि जे करतत त्याचो नाय नाट कर रे महाराजा....
होय महाराजा....🙏🏻
ह्या बघा देवक मी नारळ देऊन सगळ्यांच्या वतीने गराणा घातलाय.
चला आता सगळ्यांनी पाय पडा आणि शिमगो खेळाक यवा.
आपणा सर्वाना शिमग्याच्या मनपुर्वक शुभेच्छा
======================
No comments:
Post a Comment