Thursday, November 24, 2011

Why is the Indian rupee being devalue?


Why is the Indian rupee being devalue?
 
डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य १५ पैशांनी घसरून ५२.३० रुपयांवर पोहचले. सत्रांतर्गत व्यवहारात रुपयाचे मूल्य ५२.७६ च्या पातळीवर पोचले होते. ही रुपयाची आतापर्यंतची नीचांकी पातळी आहे. या वषीर् रुपयाच्या मूल्यात १५ टक्क्यांपर्यंत घट झाली आहे. रुपयाच्या घसरणीचे परिणामही आता दिसू लागले आहेत. त्याचा घेतलेला हा आढावा

रुपया का घसरतो आहे?

अमेरिकेत मंदी येण्याची शक्यता आहे आणि युरोपातील वित्तीय पेच सुटण्याची चिन्हे अजूनही दिसत नाहीत. डॉलर हे अन्य देशांच्या तुलनेत मजबूत आणि जगमान्य चलन आहे. मंदीमुळे गुंतवणूकदारांनी गेल्या काही महिन्यांपासून आंतरराष्ट्रीय पातळीवर शेअर बाजारातून निधी काढून घेण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत खर्चाचे बजेट कमी करण्यावर करार होण्याची शक्यता कमी असल्याची चर्चा आहे. त्यामुळे जोखीम कमी करण्यासाठी शेअर बाजाराप्रमाणे काही प्रमाणात सोन्यातून गुंतवणूक काढून डॉलरमध्ये गुंतविण्यास सुरुवात झाली आहे. परकी गुंतवणूकदार संस्थांनीही (१.७ अब्ज डॉलर) भारतातून गुंतवणूक काढून घेण्यावर भर दिला आहे; थेट परकी गुंतवणूक मंदावली आहे. तेल आयात करणाऱ्या कंपन्या आणि बँकांकडून डॉलरला मागणी वाढल्याने डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य घसरत आहे.

घसरण केव्हा थांबणार?

जागतिक घडामोडी आणि युरोपातील वित्तीय पेचावर रुपयाचे घसरणे अवलंबून आहे. येथील प्रश्न सुटल्यावरच रुपयात झालेली घसरण थांबू शकते. यास रिर्झव्ह बँकेचे गव्हर्नर डी. सुब्बाराव यांनीही दुजोरा दिला आहे. रुपयाच्या मूल्यात असणारी अस्थिरता रिर्झव्ह बँक हाताळू शकते, असे बँकेचे म्हणणे आहे. मार्च २०१२ मध्ये रुपया पुन्हा ५० च्या पातळीपर्यंत येऊ शकतो, असा अंदाज रिर्झव्ह बँकेने बांधला आहे.

घसरण कोणत्या पातळीपर्यंत?

रुपयाची घसरण कमी करण्यात रिर्झव्ह बँकेचे उपाय मर्यादित राहतील, असे केंदीय अर्थमंत्रालयाने नुकतेच स्पष्ट केले होते. त्यातच मंदावलेली 'एफडीआय', धोरणात्मक निर्णयांचा अभाव आणि जागतिक परिस्थिती यांचा परिणाम रुपायवर होणार आहे. 'युरोपातील पेचावर लवकरच तोडगा न निघाल्यास पुढील काही महिन्यांत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे मूल्य ५५-५६ रुपयांपर्यंत जाऊ शकते,' असे शेअर बाजार तज्ज्ञ विलास महाजन म्हणाले. 'आगामी काळात डॉलरच्या तुलनेत रुपया ५४-५६ रुपयांच्या पातळीपर्यंत जाऊ शकतो,' असे इंडसइंड बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष जे. मोजेस हार्डिंग यांनी नमूद केले.

सामान्यांना फटका कसा?

भारत एकूण कच्च्या तेलाच्या गरजेच्या ८० टक्क्यांहून अधिक कच्चे तेल आयात करतो. डॉलरच्या तुलनेत रुपया घसरल्याने तेल खरेदीसाठी अधिक पैसे द्यावे लागणार आहेत. यापूवीर् कंपन्यांनी जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमती वाढल्यावर इंधनाच्या दरात वाढ केली होती. रुपया ४९.३० च्या पातळीवर असताना गेल्या आठवड्यात पेट्रोलच्या किमती कमी करण्यात आल्या होत्या. कंपन्यांना अजूनही १.३० लाख कोटी येणे बाकी आहे. रुपयाचे मूल्य आणखी घसरल्यास इंधनाच्या दरात वाढ होऊ शकते. त्यामुळे महागाईत पुन्हा तेलच ओतले जाऊन भाज्या, अन्नधान्य, फळे आदींच्या भावात आणखी वाढ होईल. सध्या महागाईचा दर नऊ टक्क्यांच्या पुढे आहे.

अधिक किंमत मोजावी लागणार?

देशातील ऑटो कंपन्या अनेक सुटे भाग आयात करतात. रुपया घसरल्याने आयात महागत असून, उत्पादन खर्चात वाढ होत आहे. त्यामुळे जनरल मोटर्स, टोयोटा या कंपन्यांनी कारच्या किमतीत वाढ करण्याचे संकेत दिले आहे. ही वाढ जानेवारीमध्ये जाहीर केली जाऊ शकते, असे या कंपन्यांनी नमूद केले. आयात केल्या जाणाऱ्या वस्तूंचे पेमेंट हे डॉलरमध्ये केले जाते. रुपया घसरल्याने अन्य देशांच्या तुलनेत भारतीय ग्राहकांना आयफोन घेण्यासाठी अधिक रक्कम द्यावी लागणार आहे. त्याचप्रमाणे परदेशातून आयात केली जाणारे उत्पादने खरेदी करणे महागच पडणार आहे. या घसरणीमुले परदेशी प्रवास महाग होणार आहे. काही ट्रॅव्हल कंपन्यांनी ट्रॅव्हल पॅकेजमध्ये दहा ते बारा टक्के वाढ केली आहे.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive