Saturday, May 26, 2012

दीड सेकंदाच्या फरकाने वाचले तरुणाचे प्राण - one and half seconds difference saved life in local railway

दीड सेकंदाच्या फरकाने वाचले तरुणाचे प्राण
one and half seconds difference saved life in local railway

मिनिट काट्यावर चालणा-या लोकल आणि त्यात प्रवाशांची खच्चून गर्दी असे चित्र असणा-या लोकलच्या धावपळीत एका प्रवाशाचे प्राण केवळ दीड सेकंदामुळे बचावल्याची घटना नुकतीच मरिन लाइन्स स्टेशनवर घडली. पश्चिम रेल्वेवर गार्ड असणा-या संतोष मोंडे यांनी हे प्रसंगावधान दाखवले असून त्यामुळे सत्यसिंग हरमन (२२) हा तरुण सुदैवी ठरला.

चीराबाजार येथे राहणाऱ्या हरमनने काही दिवसांपूर्वी दुपारी मरिन लाइन्स स्टेशनवरील प्लॅटफॉर्म क्रमांक एकवरून विरार लोकल पकडली होती. तब्येत बरी नसूनही दारात उभा राहून प्रवास करणाऱ्या हरमनचा तोल गेला आणि खाली कोसळत असताना बॅरिकेड्सवर आपटून विरुद्ध दिशेच्या रूळांवर पडला. त्याचवेळी , बोरीवली-चर्चगेट लोकल मरिन लाइन्स स्टेशनला उभी होती. प्रवासी डब्यात चढल्याचे पाहून बेल दाबणार तोच गार्ड मोंडे यांना दुसऱ्या बाजूने प्रवाशांचा गोंधळ ऐकू आला. काहीतरी गडबड असण्याच्या शक्यतेने त्यांनी लागलीच इमर्जन्सी ब्रेक दाबला.

हा ब्रेक दाबल्यानंतर मोटरमनलाही आपत्कालीन स्थिती उद्भवल्याचे लक्षात येते. ब्रेक दाबल्यानंतर मोंडे यांनी दुसऱ्या दिशेस पाहिले असता हरमन चाकाखाली असल्याचे दिसले. इमर्जन्सी ब्रेक दाबला गेला नसता तर लोकलच्या चाकाखाली येऊन हरमनचे शीर आणि धड वेगळे झाले असते. मात्र , प्रवाशांचा आवाज ऐकून प्रसंगावधान दाखवल्याने हरमनचे प्राण वाचले गेले.

No comments:

Post a Comment


Popular Posts

Total Pageviews

Categories

Blog Archive