रेल चक्र - कंट्रोलर
निरनिराळ्या
खात्यातील
कर्मचाऱ्यांच्या
खातेनिहाय
युनियन असतात.
त्या
युनियनमार्फत
ते आपले
प्रश्न धसाला
लावायचे.
परंतु
कंट्रोलरची
संख्याच
मुळात कमी
असल्यामुळे
त्यांची
निहाय अशी
प्रभावी
युनियन
नव्हती.
त्यामुळे
त्यांच्या
कुठल्याही
मताबाबत
किंवा
अन्यायाबाबत
वैयक्तिक
स्तरावरच्या
प्रयत्नाला
फळ मिळत नसे तर
ते
दुर्लक्षिलं
जाई. ही त्रुटी
लक्षात यायला
1999
साल
उजाडावं
लागलं. मंुबई
विभागातले
नियंत्रक
अनिल भरडा
यांच्या अथक
प्रयत्नामुळे
ही संघटना
अस्तित्वात
आली. नाही
म्हणायला
विभागीय
स्तरावर ही
यंत्रणा काम
करत असे परंतु
तिला अखिल
भारतीय
स्वरूप
देण्याचं
श्रेय अनिल
भरडाकडे
जातं.
अखिल भारतीय गाडी नियंत्रक संघटना रजिस्ट्रेशन नंबर 371, स्थापन झाली. याचा फायदा असा झाला की नियंत्रकाचा आवाज वाढला. त्यांच्या मागण्यांची दखल घेतली जाऊ लागली. झांशी विभागातील एका नियंत्रकाला नोकरीवरून काढण्याचं पत्रक किंवा चार्जशीट देण्यात आलं होतं. या असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नामुळे व बाजू प्रभावीपणे मांडल्यामुळे त्या नियंत्रकाला रेल्वे प्रशासनाला कामावर घ्यावंच लागलं. या घटनेमुळे या संघटनेचं महत्त्व वाढलं. तसं इतर नियंत्रक जे या संघटनेच्या नावाने नाक मुरडत होते तेही या संघटनेचे सदस्य झाले. इतकंच नाही तर कार्यकारणी मंडळात काम करण्याची इच्छा व्यक्त करू लागले. आम्ही ज्या वेळी कंट्रोल ऑफिसमध्ये नियंत्रक म्हणून काम करत होतो. तेव्हा निव्वळ अशी कंट्रोलरची अखिल भारतीय संघटना अस्तित्वात नव्हती. मी कंट्रोल ऑफिसमध्ये कंट्रोलर म्हणून काम करत होतो तेव्हा आम्हाला हेडसेट वापरावे लागत. त्यामुळे हातात फोन धरून बोलण्याचा त्रास वाचायचा. हेडसेटमुळे काम सोपं व्हायचं. बोर्डवर काम करताना कंट्रोलरला एकाच वेळी अनेक कामं करावी लागतात. हेडसेट असल्याने हाताने गाड्यांचं चाटिर्ंग करायचं , तोंडाने स्टेशनांशी बोलायचं , मेंदूने गाड्यांच्या पुढील वाटचालीबद्दल प्लॅनिंग करायचं. त्याशिवाय रेल्वे कर्मचारी अधूनमधून मागतील ती स्टेशन्स द्यायची आणि साहेबांनी गाड्यांसंबंधी विचारलेल्या प्रश्नांची त्वरित उत्तरं द्यायची. अशी विविध स्तरीय कामाची लढाई चालू असायची. कंट्रोलरची नोकरी ही साहेबांचे सान्निध्य व जवळीक साधणारी नोकरी आहे. त्यामुळे आमच्या वेळी जो तो साहेबाशी वैयक्तिकरीत्या संबंध वाढवायचा व स्वत:चा फायदा करून घ्यायचा. ज्यांना साहेबांची मेहेरनजर आपल्यावर वळवून घेता येत नसे , ते म्हणत आम्ही काही साहेबांचे चमचे नाहीत. चमच्याचं राजकारण आम्ही करत नाही व जाणतही नाही. दाक्षं आंबट आहेत या न्यायाने ते वागायचे. थोडक्यात म्हणजे चमचेवाले कंट्रोलर व बिनचमचेवाले कंट्रोलर , असा संघर्ष कंट्रोल ऑफिसमध्ये सदैव चाललेला असे. परंतु आता हे चित्र बदललं आहे. अलीकडच्या नियंत्रकामध्ये संघर्षाऐवजी सहकार्याची , मैत्रीची भावना दृढ होत आहे. ही खरोखरच अत्यंत स्वागतार्ह अशी गोष्ट आहे... - व्यंकटेश बोर्गीकर |
No comments:
Post a Comment